टॉप 13 बेस्ट मराठी वेब सीरिज! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे! (2021)

Share This Article

मराठी मध्ये अनेक दर्जेदार व कथापूर्ण चित्रपट येत असतात. व ते खूप लोकप्रिय सुद्धा होतात. त्यासोबत आता मराठी मध्ये वेब सीरिज चे प्रमाण खूप प्रमाणात वाढत आहे. Netflix, Amazon Prime Video, MX Player, Disney+ Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्म वर अनेक मराठी चित्रपटांसोबत आता मराठी वेब सीरिज रिलिज होत आहेत.

लॉकडाऊन मध्ये खूप वेळ असल्या कारणाने आपण घरातच आहोत. तर फॅमिली सोबत काही मनोरंजन म्हणून चित्रपट बघण्यापेक्षा ह्या मराठी वेब सीरिज पाहा. तसेच काही वेब सीरिज फ्री आहेत, तर काहींसाठी पैसे द्यावे लागतील. चला तर मग Top 13 Best Marathi Web Series कोणत्या आहेत त्या पाहूया..


1 .Samantar ( Season 2 )

Samantar Season 2 Official Trailer (Marathi)

तसेच ही मराठी मधील सर्वात लोकप्रिय अशी वेब सीरिज आहे. ही वेब सीरिज MX Player वर फ्री मध्ये पाहू शकतो. ही वेब सीरिज सुहास शिरवळकरांच्या लिखित कादंबरी वर आधारित आहे. तसेच ही वेब सीरिज हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेत सुद्धा उपलब्ध आहे.

» महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती


2. High Time

High Time Season 1 Web Series (Marathi)

मित्रांची अशी ही धमाल गोष्ट तुम्ही यूट्यूब वर पाहू शकता. हाई टाईम ही वेब सीरिज सहा एपिसोड असलेली कॉमेडी वेब सीरिज आहे. आशुतोष गोखले, क्षितिज दाते, केतकी नारायण, तन्वी कुलकर्णी हे कलाकार ह्या वेब सीरिज मध्ये आहेत. ही वेब सीरिज तुम्हाला करवंद निर्मिती ह्या यूट्यूब चॅनल वर मोफत पाहायला मिळेल. ह्या वेब सीरिज मध्ये मित्रांची धमाल, मस्ती दाखवली आहे.


3. Gondya Ala Re

Gondya Ala Re Official Trailer (Marathi)

अंकुर काकटकर दिग्दर्शित गोंड्या आला रे ही वेब सीरिज Zee5 वर उपलब्ध आहे. तसेच ह्यामध्ये भूषण प्रधान, सुनील बर्वे, आनंद इंगळे सारखे दिग्गज मराठी कलाकार आहेत. ही वेब सीरिज 1897 च्या एका घटनेवर आधारित आहे. एकूण 10 एपिसोड्स ची ही वेब सीरिज आहे. Zee5 वर ही वेब सीरिज तुम्ही पाहू शकता.

» जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!


4. Aani Kay Hava ( Season 1 )

Aani Kay Hava Season 1 Official Trailer (Marathi)

Aani Kay Hava ही एक गोड आणि मॉडर्न लव्ह स्टोरी आहे. ही नुकतेच लग्न झालेल्या साकेत आणि जुई ह्या जोडप्यावर आधारित आहे. तसेच ही प्रेमावर आधारित वेब सीरिज तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत पाहू शकता. सर्वोत्कृष्ट लेखन आणि उत्तम प्रतीचे मराठी डायलॉग असलेली ही मराठी वेब सीरिज आहे.

ह्या वेब सीरिज मध्ये खरे नवरा बायको उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी काम केले आहे. MX Player वर फ्री मध्ये उपलब्ध आहे, तुम्ही हवं तेव्हा पाहू शकता.


5. Kaale Dhande

Kaale Dhande Season 1 Official Trailer (Marathi)

ही वेब सीरिज एक comedy वेब सीरिज आहे. तरुण फोटोग्राफर्स च्या जीवनावर आधारित वेब सीरिज आहे. ह्यात मुख्य भूमिकेत महेश मांजरेकर, नेहा खान, निखिल रत्नपरखी आहेत. Zee5 वर तुम्ही ही वेब सीरिज फ्री मध्ये पाहू शकता.


6. Samantar ( Season 1 )

Samantar Season 1 Official Trailer (Marathi)

स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित ह्यांच्या मुख्य भूमिकेत बनलेली ही समांतर वेब सीरिज मराठी मधील आज पर्यंतची सर्वात लोकप्रिय आणि पाहिली गेलेली वेब सीरिज आहे. ही वेब सीरिज सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे. तसेच ही वेब सीरिज सुहास शिरवळकरांच्या लिखित कादंबरी वर आधारित आहे.

» जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींची नावे!


7. Shala

Shala Season 1 Web Series (Marathi)

शाळेतील जीवनावर आधारित ही मराठी वेब सीरिज Synergy Productions ह्या यूट्यूब चॅनल वर फ्री मध्ये उपलब्ध आहे. ह्या मध्ये अनुष्री माने आणि कौशल जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.


8. Aani Kay Hava ( Season 2 )

Aani Kay Hava Season 2 Official Trailer (Marathi)

Aani Kay Hava ह्या मराठी वेब सीरिज चा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन प्रमाणे हा सीझन सुद्धा रोमँटिक आणि कॉमेडी आहे. नवरा बायको चे भांडण, छोट्या- मोठ्या आठवणी, ह्या सर्व ह्या वेब सीरिज मध्ये आहे. ही वेब सीरिज MX Player वर फ्री मध्ये उपलब्ध आहे.

» फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!


9. U Turn

U Turn Season 1 Web Series (Marathi)

राजश्री मराठी निर्मित U Turn ही मराठी सीरिज खूप लोकप्रिय आहे. तसेच ह्यात काही दिया परदेस फेम गौरी म्हणजेच सायली संजीव आहे. आणि ही वेब सीरिज यूट्यूब वर फ्री मध्ये पाहू शकतो.


10. Pandu

Pandu Season 1 Web Series (Marathi)

रात्रीस खेळ चाले ह्या लोकप्रिय मराठी मालिकेतील पात्र दत्ता नाईक ह्याने मुख्य भूमिका साकारलेली आहे. ह्या मध्ये त्याने एका मुंबई पोलिसाची भूमिका साकारली आहे. ह्यामध्ये कॉमेडी, ड्रामा, जिवना संबंधी गोष्टी आहेत. MX Player वर ही वेब सीरिज पाहू शकतो.


11. Moving Out

Moving Out Web Series Official Trailer (Marathi)

एक तरुण मुलगी जी घर सोडून तिचे स्वतःचे आयुष्य कष्या प्रकारे जगते. ह्याबद्दल ह्यात दाखवले आहे. अभिज्ञा भावे आणि निखिल राजशिक्रे ह्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. Reverb Katta ह्या मराठी यूट्यूब चॅनल वर उपलब्ध आहे.

» उद्योगपती रतन टाटा यांचे अनमोल सुविचार


12. Once A Year

Once A Year Season 1 Official Trailer (Marathi)

एक गोड आणि प्रेमळ अशी प्रेम कथा असलेली ही मराठी वेब सीरिज आहे. निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले ह्यात मुख्य भूमिकेत आहेत. MX Player वर फ्री मध्ये पाहू शकता. मैत्रीपासून प्रेमा पर्यंतची गोड प्रवास ह्यात दाखवला आहे.


13. Back Benchers

Back Benchers Season 1 Web Series (Marathi)

ही एक शाळेतील विद्यार्थ्यांवर आधारित धमाल विनोदी मराठी वेब सीरिज आहे. ह्यात वर्गातील Back Benchers बद्दल दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ही वेब सीरिज प्रत्येकाला कुठेना कुठे थोडीशी रीलेट करेलच. ही वेब सीरिज यूट्यूब वर ShotPutFilms ह्या चॅनल वर उपलब्ध आहे. तसेच यूट्यूब वरील ही मराठीतील खूप लोकप्रिय वेब सीरिज आहे.

» 100+ Instagram Marathi Attitude Captions (मराठी कॅप्शन)


तुम्ही घरात बसून कंटाळले असाल किंवा नवीन मराठी वेब सीरिज पहायची असेल, तर तुम्ही वरील दिलेल्या वेब सीरिज पैकी कोणतीही (Top 13 Best Marathi Web Series) वेब सीरिज पाहू शकता. तसेच ह्या सर्व वेब सीरिज फ्री मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे एकही पैसा खर्च न करता पूर्ण मनोरंजन घेता येईल.

मराठी माहिती आणि ऑनलाईन जॉब्स बद्दल माहितीसाठी क्रिएटर मराठी वेबसाईट ला जोडून रहा.

Share This Article

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *