Marathi Prem Kavita | 100+ मराठी प्रेम कविता | Marathi Kavita
आज आपण मराठी Marathi Prem Kavita संग्रह पाहणार आहोत. तसेच ह्या मराठी प्रेम कविता तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवू शकता. व त्यांच्या मनात आजुन प्रेम वाढवू शकता. Love poems in marathi चा उत्तम कलेक्शन आपण आज पाहूया.
प्रेम हे मौल्यवान असतं. प्रेम ही एक ‘गोड भावना’ आहे. आयुष्यात एकदा तरी प्रेम होतंच. परंतु एखाद्यावर प्रेम करत असल्यास त्या व्यक्तीच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होणे, हेच तर खरं प्रेम आहे. प्रेम ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला व्यक्त करण्याची आवश्यकता नसते.
जर आपलं कोणावर प्रेम असेल तर ते प्रेम डोळ्यांत दिसून येते. जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात असतो तेव्हा तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात आनंददायक आणि अविस्मरणीय क्षण असतो. जो आपण मरेपर्यंत कधीच विसरत नाही.म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी प्रेम कविता मराठी संग्रह आणला आहे. जो तुम्हाला खूप आवडेल. त्यासोबत तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटस वर किंवा इंस्टाग्राम स्टोरी वर Romantic Marathi Love Status ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला खुश करू शकता.
जर तुम्ही मराठी मधे प्रेम कविता शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. क्रिएटर मराठी ह्या वेबसाईट वर तुम्हाला प्रेम कवितामराठी मधे मिळेल. या वेबसाईटवर तुम्हाला Marathi Love poems, Gf Bf Poems in Marathi, Love Poems Marathi, Sad peoms marathi, मराठी प्रेमाच्या कविता,प्रेमातील सुंदर चारोळी, मराठी प्रेम स्टेटस, मराठी प्रेम कविता संग्रह हे सर्व काही फक्त आणि फक्त Creatormarathi वेबसाईट वर.
Menu
मराठी प्रेम कविता | Marathi Romantic Love Poem
💝 “जो जो येतो जन्माला, त्याला कधी प्रेम मुकले नाही.. आयुष्यात एकदा तरी, प्रेमाच्या गावी जावे..” 💘
Instagram poems in marathi
कुणी तरी असावी आस्थेने विचारपूस करणारी काय करतेस, कसा आहेस काळजी घे म्हणनारी || कुणी तरी असावी मनातल समजून घेणारी बघताच क्षणी मनातल सारं काही ओळखणारी || कुणी तरी असावी दिसताच मिठी मारणारी हळूवार केसांवरून हात फिरवून आपलंसं करणारी || कुणी तरी असावी जिवाला जीव लावणारी प्रत्येक सुख – दुःखात सोबत असणारी || कुणी तरी असावी तु माझाच आहेस म्हणून हातात हात घेऊन प्रीतीची साथ देणारी || ~ हरिष नैताम
💝 “असं फक्त प्रेम असंत त्याला हृदयातचं जपायचं असतं प्रेमात अधिकार असतो पण गाजवायचा नसतो प्रेमात गुलाम असतो … पण राबवायचा नसतो प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं नेहमीच एकट्याचं असतं पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं…असं फक्त प्रेमच असतं”💘
💝 “तुझे प्रेम मजला आनंद देई.. तुझ्या डोळ्यात वसे माझे जग सारे.. तुझ्या हृदयात वसे प्रेम माझे.. तुझा हात हातात घेऊन ह्या जीवनाचा आनंद घेऊ.. चल एकदा आपण दुर कुठे तरी जाऊ.”💘
💝 “तुझं आपलं एक बरं असतं, रागवलो जरी मी तरी तू काही माफी मागणार नाही.. पण मी काही तुला मनवल्या शिवाय शांत बसणार नाही.”💘
love poems for girlfriend in marathi
💝 “त्या समुद्र किनारी असावे आपले घर.. त्यात करावा आपण आपला सुखी संसार.. तू रोज माझी वाट पाहत.. त्या समुद्र किनारी उभी असे.”💘
💝 “तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्या पर्यंत असे.. हे जग माझे तुझ्या अवती भोवती फिरे.. असेच असावे, असेच राहावे.. आयुष्यभर फक्त तुझ्याच विचारात मन माझे फिरे.”💘
💝 “अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास काहि काळ का असो माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास.”💘
💝 “कधी हसणार आहे..कधी रडणार आहे.. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.” 💘
वाऱ्याचे असेच असते, हळूच येवून स्पर्शून जाणे, नि:शब्द कळ्या फुलांना, स्मित देत खुलवून जाणे ! येणे जाणे जरी तयाचे, अस्तित्व तो ठेवून जातो, स्मरण होता कधी कधी, रोमांचित करून जातो ! मौनाचा पहारा मौनात, बरेच काही बोलून जातो, स्पर्श आणि मौन याच, भावनेने फुलून जातो ! खेळ असा लपाछपीचा, असाच रंगी रंगुन जातो, सांज सकाळच्या उन्हात, अलगद मिसळून जातो ! सावरणे ते चांदणीला, स्वभाव गगनाचा तो, हरवल्या तारकेला, क्षितिजा पल्याड शाधतो !
💝 “असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे… असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे तर उन्हात साथ देणारे… असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे…💘
💝 “अज़ून तरी मी तुला काही निरुत्तर केले नाही…. तरीपण माझ्या प्रश्नाना तू कधि उत्तर दिले नाही….”. 💘
💝 “आयुष्यातील सारे दुःख या डोळ्यांसमोर फिके आहे कारण आता नजरेसमोर तुझ्या आठवणीचेच धुके आहे.” 💘
💝 “अजुन ही मला कळत नाही तु अशी का वागतेस प्रत्येक गोष्ट तुझीच असुन तु माझ्या कडे का मागतेस.” 💘
💝 “अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास काहि काळ का असो माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास.” 💘
💝 “असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे… असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे… असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे… ”💘
💝 “आज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहे, जगण्याला ही माझ्या काहिशी रंगत आली आहे.” 💘
💝 “आज ही माझी सकाळ तुझे नाव घेऊन होते आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे माझी सर्व रात्र जाते.” 💘
💝 “आठवणी सांभाळणे सोप्प असत, कारन मनात त्या जपून ठेवता येतात, पण क्षण सांभाळणे फार अवघड असत, कारण क्षणांच्या आठवणी होतात.” 💘
💝 “आठवणींतल्या आठवणींना हळुच आठवायचं असतं. डोळे पान्हावलेले असले तरी मंद गालातल्या गालात हसायचं असतं.” 💘
💝 “आठवणीच्या हिंदोळ्यावर तुझे माझे भेटणे एकांती पावूल वाटेवर तुझ्या आठवणीतच माझे चालणे.”💘
💝 “आभाळ बरसताना सरळ दार लावून घ्यावं नाहीतर स्वत:ला दिशाहीन जाऊ द्यावं.”💘
💝 “हरवले होते ते स्वप्न माझे जे तुझ्या रुपाने परत मिळाले, रुसले होते ते प्रेम माझे जे तुझ्या साथिने परत आले, प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले, तुच आहेस त्या स्वप्नांना जागवणारी, तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारी.” 💘
तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल प्रेम काय आहे माहीत नाही, पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल तर मला जन्मो जन्मी हवयं.🙇❤️
Dear Bayko.. हातात हात घेशील तेव्हा भिती तुला कशाचीचच नसेल अंधारातील काजवा तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर दिसेल सहवासात तुझ्या, आयुष्य म्हणजे, नभात फुललेली चांदणरात असेल.🌃❤️
Love Poems in Marathi | Romantic Peom in marathi
मी मागे नसतानाही, असल्याचा भास होतो ना तुला! लोकांशी महत्वाचं बोलतानाही माझा जोक आठवतो ना तुला! आपण गर्दीत चालतानाही, माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला! इतरांसोबत जोरात हसतानाही, माझा दुरावा रडवतो ना तुला! कधी उदास वाटतानाही, माझा चेहरा हसवतो ना तुला! तुला नको असतानाही, माझा आवाज लाजवतो ना तुला! तू शब्दांनी नाकारतानाही चेहराच सांगतो ना मी आवडतो तुला!🥺❤️
चांदण्यात राहणारा मी नाही, भीतींना पाहणारा मी नाही तू असलीस नसलीस तरीही शून्यात तुला विसरणारा मी नाही.🥰🤞🏼
🤩🤩बायको, बायको लाडाची बायको कितीही बोललो तरी घेते कायम समजून तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ तू नसशील तर माझे जीवन आहे व्यर्थ..
तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते बायको तू मला माझ्या परिही प्रिय वाटतेस प्रेमाने तुझ्या मला दिली आयुष्याला दिशा तू नसशील तर आयुष्याची होईल दशा कितीही भांडलो तरी नाही होऊ शकत तुझ्यापासून दूर सतत तू सोबत असावे हीच माझी इच्छा
तुझ्यावर रागावणं देखील जमत नाही, तुझ्यावर रुसन देखील जमत नाही, एवढे प्रेम आहे तुझ्यावर की, तुझ्यावर ओरडणे सुद्धा मुश्किल आहे. प्रेम आहे तुझ्यावर हे तुला समजत कसं नाही.. काय करावे, काय नाही करावे?? हाच रोज विचार असे..
तू खूप प्रेम करतेस म्हणून तुझ्याशी भांडायला आवडते भांडण झाल्यावर तुझा रुसवा काढायला आवडते तू जवळ नसल्यावर तुझी आठवण काढायला आवडते आणि तू जवळ असल्यावर तुला चिडवायला आवडते तुझ्यावर प्रेम करत नाही हे भासवायला आवडते आणि तू जवळ नसल्यावर तुझ्या आठवणीत रडायला आवडते.
तुला राणी सारखं जपेन, तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. एवढे प्रेम करेन तुझ्यावर की तुला माझ्या शिवाय दुसरे काही दिसणार नाही. तुला हसवेन, तुला फिरवेन तुझ्यासोबत मस्करी करेन, तू आणि मी असे राहू जसे की, आपण एकमेकांसाठी बनलेले आहोत. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
marathi prem kavita | marathi charolya
या मुसळधार पावसातअवचित तुझे येणे,तुझे ते स्मित हास्यअन् गार चिंब वारे.. ह्या पावसात भिजून मीतुझेच नाव घेई ओठी,तुझ्या सोबती हे जीवनहोई बेधुंद आणि मनमोहक…
प्रिय नवऱ्यासाठी खास मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita For Husband)
तो बोलायला लागला की, मी हरवून जाते, त्याच्याकडून माझी तारीफ ऐकताच लाजेने गुलाबी होते.
तुझ्या कवेत मला माझे आयुष्य सारे काढायचे आहे तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ
मला तुझी आयुष्यभराची साथ नकोय तर तू जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य हवयं.😘😘
तुझ्या येण्याने माझे आयुष्य झाले पुरे तुझ्या येण्याने माझ्या जगण्याला मिळाले अर्थ नवे. माझे आयुष्य, माझा सोबती माझा श्वास, माझं स्वप्न माझे प्रेम आणि माझा प्राण. 🌹🌹
marathi charolya marathi prem
तुझ्या आठवणी म्हणजे मोरपिसाचा हळुवार स्पर्श… तुझ्या आठवणी म्हणजे नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे स्वप्नांनी सजवलेलं एक गाव… तुझ्या आठवणी म्हणजे विरह सागरात हरवलेली नाव…
तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा.
मराठी कविता प्रेमाची चारोळी
तुझ्या सारखा जोडीदार मिळणे, हे माझ्या आई वडिलांचे पुण्य आहे. आणि जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळणं, हे माझ्या भाग्य आहे. 🤞🏼❤️ (Marathi Prem Kavita)
आयुष्यभर तुझ्यासोबत राहेन, तुझी सावली बनून तुझा सोबत राहेन, तुझ्या हृदयाची धडधड बनून तुझ्या हृदयात राहेन, तुझ्या हातांवरील स्पर्श बनून तुझ्या आठवणीत कायम राहेन, प्रेम हे तुझ्यावरच करेन आणि मरताना सुद्धा तुझ्यावर राहेल. हे माझं वाचन आहे तुला. 🤞🏼🥰 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गर्लफ्रेंड साठी मराठी कविता | Marathi Prem Kavita For GF
तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला, तुझ्या प्रत्येक शब्दांचा आवाज व्हायचंय मला, तुझ्या हसण्याचं कारण बनायचं आहे मला, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करायचंय मला, तुझ्या एकटेपणात सहभागी व्हायचंय मला, तुझ्या अडचणीत साथ द्यायची आहे मला, तुझ्या या निरागस मनात छोटीशी जागा बनवायची आहे मला, तुझ्या डोळ्यात बेधुंद होऊन, तुझ्या जगात जगायचंय मला, तुझ्या मिठीत पूर्ण आयुष्य अधिकाधिक सुंदर करायचंय मला, खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला…. 🥰
रोजच भेटत असते “ती” आजची भेट खास आहे स्वप्नाप्रमाणेच घडले सारे सत्य की सारे भास आहे! ती असता समोर तेव्हाच मनाचा बांध फूटून जातो काळजात साठवून सारंच प्रेमात तिच्या वाहून जातो रोजच्या सहवासातील जादू घट्ट बांधून जाते नाजूक नाते अबोला असला दोघात जरी डोळ्यांची भाषा सांगून जाते हे प्रेम नक्की काय असतं? तुलाच पाहून समजले सारे दोघांच्या भेटीत हरवलो मी तुझ्या नजरेत जादूई इशारे
ती पावसाची सर कशी आली अंगावर लट निथळते कशी थेंब थेंब गालावर चिंब भिजूनीया आली अशी नजरे समोर जणू दिवसा पहावी रातराणीची बहर आता हटायची नाही तुझ्यावरची नजर गाली हसुनिया सखे केला भलता कहर रूप देखणे तुझे हे मन झाले अनावर तुझ्या प्रेमानेच आता सखे मला तू सावर….
romantic status in marathi
““तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरीआता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरीनजर न लागो तुझ्या माझ्या जोडीलाकारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा””
तुझी आठवण म्हणजे कस्तुरी, कधीच साथ न सोडणारी, सदैव सोबत दरवळत रहणारी| पण तशीच हवी हवीशी वाटणारी, सुखात सात देणारी आणि दुख विसरवणारी | स्वप्ना जुळवणारी आणि, स्वप्नात रमवणारी| पण तिथे मनाला सोडवात नाही, कारण जितकी सुखद तुझी आठवण, तितकाच पर्तीचा प्रवास असतो माझ्यासाठी ~ प्रियांका
कस सांगु मी तुला…….. सांगु कस तुला मी साजणी मन माझे तुझ्यामध्ये गुंतले तुझ्या एका भेटीने मन माझे फुलले आयुष्याच्या इंद्रधनुष्याचे रंग बदलले गर्द रानाच्या काटेरी कुंपणातील फुल मज आवडले भिती भीतीने मन माझे हरवले प्रत्येक शण रंगवूनी मी फुलवू लागलो दुःखाचे ढग मन तुडवू लागलो आज भिती नाही कुणाची मनाला फक्त दिसते तिच माझ्या ऋद्याला
बॉयफ्रेंड साठी मराठी कविता | Marathi Prem Kavita For BF
तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा… तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा… तुझ्या हसण्याचा मला आनंद मिळावा… प्रत्येक वेळी तुझ्या विषयात माझा लेख असावा… तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा… माझ्या दु:खात मला तुझा हसरा चेहरा दिसावा… माझ्या सिक्रेट गोष्टींचा पासवर्ड तुझ्या कडे असावा… चंद्रा प्रमाणे तुझा गारवा माझ्यात असावा… तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा..
gf bf kavita in marathi
“मी दिवस संपण्याची वाट बघतो कारण रात्री ओढ असते.. मी रात्रीची वाट पाहतो कारण रात्र स्वप्नांची असते.. मी स्वप्नांची वाट पाहतो. कारण स्वप्नात तुझी ओढ असते.. मी त्या भेटीची वाट पाहतो तू माहीत असतेस.. मी तुझी वाट पाहातो कारण तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.”
एक कटींग चहा पिऊया, तुझ्या माझ्या प्रेमाचा, सदैव गोडवा राहील त्यात, तुझ्या माझ्या ओठांचा😘 सुखाचा क्षण असतो. आणि ताजेपणा येतो, जेव्हा माझ्या चहाला, तुझा स्पर्श भासतो.💕 एक इच्छा पूर्ण व्हावी, तुझ्यासोबत चहा प्यावी. नकळत हरवून तुझ्या नजरेत, सकाळची संध्याकाळ व्हावी.😌 प्रश्न नको करू मला, तुला ‘ चहा की मी ‘ आवडतो ?? तुझ्यासोबत जगण्याचा आनंद मला वेडावतो…💙 – वेदांती निंबरे
तुम्हाला वरील मराठी प्रेम कविता संग्रह (Marathi Prem Kavita Sangrah) आवडला असेलच. जर आवडला असेल तर, नक्की तुमच्या प्रियजनांना व गर्लफ्रेंड ला सेंड कर व तिला खुश करा. आणि तुम्हाला आजचा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून सांगा. तसेच Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.
Thank You For Reading This Article & Keep Supporting 💖
One thought on “Marathi Prem Kavita | 100+ मराठी प्रेम कविता | Marathi Kavita”