फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Flipkart information in Marathi: फ्लिपकार्ट ही भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स कंपनी आहे. फ्लिपकार्ट चे मुख्यालय बंगळूरू, कर्नाटक येथे आहे. फ्लिपकार्ट कंपनीची स्थापना सचिन बन्सल व बिन्नी बन्सल यांनी सन २००७ मध्ये केली होती. सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टने आपले लक्ष विविध पुस्तके विकण्यात केंद्रित केले होते, परंतु आता फ्लिपकार्ट वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू, इत्यादींची विक्री करते. भारतामध्ये फ्लिपकार्ट खूप लोकप्रिय इ-कॉमर्स कंपनी आहे.

फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती | Flipkart information in Marathi

Flipkart information in Marathi language

आताच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला सगळे जलद व्हावे असे वाटते. इंटरनेट मुळे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली. अगोदर लोकं मार्केट मध्ये जाऊन शॉपिंग करायचे मात्र आता प्रत्येकाकडे वेळ नसल्यामुळे प्रत्येकजण ऑनलाईन शॉपिंग करण्याला प्राधान्य देत आहे. कारण ऑनलाईन शॉपिंग मध्ये आपण एका जागी बसून आपल्याला हव्या त्या गोष्टी पाहू शकतो व खरेदी करू शकतो. तसेच आपल्याला हवे असणारे प्रॉडक्ट्स एका क्लिकवर खरेदी करता येतात.

फ्लिपकार्ट वर कोणतेही प्रॉडक्ट्स खरेदी करता येते. फ्लिपकार्ट ही भारतातील लोकप्रिय कंपनी होण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांनी दिलेले प्रादेशिक भाषेत सपोर्ट. फ्लिपकार्ट कंपनी प्रादेशिक भाषेत त्यांची सेवा प्रदान करते. तेलुगू, कन्नड, बंगाली, तमिळ, इंग्लिश, तसेच मराठी भाषेतील ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार शॉपिंग करता येते.

फ्लिपकार्ट ही कंपनी कोणतेही प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, E-Wallet, इत्यादी सुविधा देते. त्यामुळे ग्राहक सुरक्षितरित्या आणि सोप्प्या पद्धतीने कोणतेही प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतो.

फ्लिपकार्ट कंपनी ची दोन मित्रांनी केली होती. ह्या कंपनीची सुरुवात दोन रूम पासून झाली होती. Banglore मध्ये flipkart चे ऑफीस आहे. जवळपास 7000 कर्मचाऱ्यांना घेऊन आपले काम करते. फ्लिपकार्ट चे देशात वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस आहेत. वॉलमार्ट कंपनी ने फ्लिपकार्ट ला 77% हिस्सेदारी सोबत 16 अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले आहे.

फ्लिपकार्ट वर इलेक्ट्रॉनिक, कॉस्मेटिक्स, फुड्स, टॉईज, फ्लाईट तिकीट, फर्निचर इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. व ह्यावर डिस्काउंट आणि ऑफर्स सुद्धा मिळतात. तसेच फेस्टिवल डेज किंवा खास दिवशी फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जाते.

Flipkart वर होणारे सेल्स

  • Big Billion Days
  • Big Saving Days
  • Laptop Bonaza Sale
  • Flipkart Big Shopping Days
  • Super Coins Day
  • Super Cooling Days
  • Monsoon Appliances Dhamaka
  • Grand Home Appliances Sale

हे सुद्धा वाचा:

आज आपण फ्लिपकार्ट ह्या इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती (Flipkart information in Marathi) मराठी मध्ये जाणून घेतली. तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच अश्याच नवनवीन माहिती साठी आणि मराठी रोचक तथ्य वाचण्यासाठी क्रिएटर मराठी सोबत जोडून रहा.

Thank You For Reading This Article & Keep Supporting ! ❣️


माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

9 thoughts on “फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

  1. खुप छान माहिती दिली आहे.अशीच मराठी भाषा पुढे नेली पाहिजे.

  2. फ्लिपकार्ट बद्दल खूप व्यवस्थित माहिती तुम्ही मराठी भाषेत उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *