Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

तुम्हाला सुद्धा घरबसल्या फ्रीलान्सिंग करून पैसे कमवायचे आहेत. तर मग ही पोस्ट फक्त तुमच्यासाठी आहे. फ्रीलान्सिग करणे आता काही कठीण गोष्ट राहिली नाहीय. कोणीही फ्रीलन्सिंग करू शकतो. Freelancing करून घरात बसून ऑनलाईन पैसे कमवता येतात. पैसे हे डॉलर किंवा भारतीय रुपीज मध्ये कमवू शकतो. इंटरनेट वर अश्या अनेक वेबसाइट्स आहेत ज्या फ्रीलांसर ना त्यांच्या कामाचे पैसे देतात.

आजच्या लेखात Freelancing चा जॉब करण्यासाठी कोण कोणत्या वेबसाईट चा वापर करू शकतो? ते पाहणार आहोत.


आपल्या पेज वर वाचकांसाठी उपयुक्त अशी नवनवीन माहिती आणायचा प्रयत्न करत असतो. ज्यामुळे ती माहिती वाचून वाचकाला त्याचा उपयोग होईल. म्हणून तुमच्यासाठी ऑनलाईन जॉब्स (Online Jobs) ही नवीन सिरीज सुरू केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन घरबसल्या करता येणाऱ्या जॉब्स बद्दल माहिती देणार आहे. ह्या माहितीचा वापर करून तुम्ही घरातून ऑनलाईन जॉब करू शकता आणि पैसे कमवू शकता. ह्या सीरिज मधील सर्व पोस्ट तुम्हाला Online Jobs ह्या कॅटेगरी मध्ये मिळतील. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया..

Freelancing जॉब्स बद्दल थोडक्यात माहिती.

Freelancing jobs information in marathi

आज आपण फ्रीलान्सिंग करून करता येणाऱ्या ऑनलाईन जॉब्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. फ्रीलान्सिंग करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन, जीमेल अकाऊंट, रिज्युम आणि मोबाईल/लॅपटॉप असणे गरजेचे आहे. फ्रीलान्सिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला ज्या वेबसाईट वरून फ्रीलान्सिंग हा जॉब करायचा आहे. त्या वेबसाईट वर स्वतःचे अकाऊंट बनवून.

तुमची संपूर्ण माहिती देऊन, तिथे तुमचा रिज्युम add करावा लागतो. त्यानंतर थोड्या दिवसांनी तुम्हाला काही ऑनलाईन कंपन्यांकडून जॉब्स यायला सुरुवात होतील. त्यानंतर तुम्हाला त्या कंपन्या जॉब केल्याचे काही पैसे देतील. ते पैसे 10$ ते 20$ पर्यंत असू शकतात. ते तुमच्या काम करण्याचा क्षमेतवर अवलंबून आहे. अश्या प्रकारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवू शकता.

> Amazing Facts About india in Marathi


फ्रीलन्सिंग जॉब्स करण्यासाठी कोणत्या वेबसाइट्स उपयुक्त आहेत?

▪️PeoplePerHour

People Per Hour, कायदेशीररित्या पिपल पर अवर लिमिटेड ही एक यूके-आधारित कंपनी आहे. ह्या वेबसाईट वर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर फ्रीलांसर साठी अनेक जॉब्स आहेत. तसेच ह्यावर डॉलर मध्ये पैसे कमवू शकतो.

यूकेमधील फ्रीलन्सिंग जॉब्स साठी सर्वात लोकप्रिय अशी साईट म्हणजे people per hour. Freelancer साठी सर्वात जास्त मागणी असलेली ही साईट आहे.

▪️Fiverr

Fiverr ही एक ऑनलाईन मार्केटप्लेस आहे. ह्या कंपनीची सुरुवात 2010 मध्ये झाली होती. ही सर्वात लोकप्रिय अशी फ्रीलन्सिंग साईट आहे. ऑनलाईन पैसे कमवायला ही बेस्ट वेबसाईट आहे. ह्या वेबसाईट वर स्वतःचे अकाऊंट बनवून पोर्टफोलिओ add करावा लागतो.

फिवररची स्थापना मीका कॉफमन आणि शाई विंजर यांनी केली होती.

▪️Freelancer

Freelancer.com एक ऑस्ट्रेलियन फ्रीलान्स मार्केटप्लेस वेबसाइट आहे. ह्या वेबसाईट वर जॉब्स पोस्ट केले जातात. त्यानंतर फ्रीलॅन्सर त्यांच्या वेळेनुसार ते काम पूर्ण करून देतात. ही कंपनी 2009 मध्ये सुरू झाली होती. आणि ह्या कंपनीची मुख्यालये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे आहे. तसेच, वॅनकूवर, लंडन, ब्वेनोस एयर्स, मनिला आणि जकार्ता येथे कार्यालये आहेत.

▪️Guru

गुरु हे एक फ्रीलान्स मार्केटप्लेस आहे. ह्या वेबसाईट वर तुम्ही कोणतेही ऑनलाईन काम की शकता. जसे की, डेटा एन्ट्री, फोटो एडिटिंग, कंटेंट राईटींग इत्यादी ऑनलाईन काम करू शकता. गुरु ही कंपनी 1998 मध्ये पिट्सबर्ग येथे eMoonlighter.com म्हणून सुरू झाली आणि अजूनही तिचे मुख्यालय तिथेच आहे.

▪️Upwork

Upwork हे जगातील सर्वात मोठे फ्रीलान्स मार्केटप्लेस आहे. अपवर्कवरील फ्रीलॅन्सर त्यांच्या जॉब हिस्ट्रीज आणि पोर्टफोलिओ सोबत त्यांची कौशल्ये आणि अनुभव यांचे सुद्धा वर्णन त्यांच्या प्रोफाइल मध्ये करतात. क्लाएंट त्यांचे प्रोजेक्ट्स जॉब्स मध्ये पोस्ट करतात. त्यानंतर एखादा फ्रीलॅन्सर त्यांचे जॉब accept करून प्रोजेक्ट पूर्ण करून देतो. त्यानुसार त्याला पेमेंट दिला जातो.

Upwork ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित अशी वेबसाईट आहे. ज्यावरून फ्रीलॅन्सर खूप जास्त पैसे कमवू शकतात आणि जॉब्स मिळवू शकतात.

▪️Interesting Facts in Marathi


इतर काही Freelancing वेबसाइट्स:

▪️Simply Hired
▪️Mechanical Turk
▪️Toptal
▪️Freelancermap.com
▪️FlexJobs


Freelancing वेबसाइट्स वरून पैसे कमावण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्याकडे एक फ्रीलान्स अकाऊंट असणे गरजेचे आहे. अकाऊंट तुम्ही कोणत्याही freelancing वेबसाईट वरून काढू शकता. जसे की, मला fiverr वरून पैसे कमवायचे आहेत. तर मी fiverr वर ऑनलाईन अकाऊंट काढून त्यात माझी सर्व माहिती आणि बँक डिटेल्स add करेन.

ज्याने काम पूर्ण झाल्यानंतर पेमेंट माझ्या बँक खात्यात ट्रान्स्फर होतील. तसेच कोणतेही freelancing काम करताना त्याची संपूर्ण माहिती आणि ती साईट सुरक्षित आहे की नाही ते जाणून घ्या. वर दिलेल्या साईट्स सर्व सुरक्षित आणि उपयोगी आहेत. त्याचा वापर करून तुम्ही घरातून काम करून ऑनलाईन पैसे कमवू शकता. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी Best Of Luck!


Note : बर्‍याच ऑनलाइन फ्रीलान्स साइट्समध्ये सारखी गोष्ट ही आहे की येथे तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ तयार करावा लागतो. तसेच उत्तम आणि सर्वाधिक पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि कोणतेही काम करून तुम्ही एका रात्रीत श्रीमंत होऊ शकत नाही.

ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच मराठी माहिती, ऑनलाईन जॉब्स आणि मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

~ Thank you for reading this article! ❤️

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *