World’s Richest Persons List in Marathi: ह्या जगात अनेक श्रीमंत व्यक्ती राहतात. ज्यांनी स्वतःच्या बळावर सर्व काही उभ केलेलं असतं. त्यांनी जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, म्हणून ते यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
जीवनाच्या शर्यतीत जो व्यक्ती मेहनत करतो, त्यालाच यश मिळते. मेहनत घेताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तरच केलेली मेहनत विशिष्ट ओळख बनून जाते.
आजच्या लेखात आपण अश्याच मेहनती आणि यशस्वी व्यक्तींविषयी माहिती, तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी (World’s Richest Persons List in Marathi) पाहणार आहोत. ज्यांनी स्वतःला या जगापेक्षा वेगळ सिद्ध केलं आणि जगात स्वतःच नाव कमावलं.
जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींची नावे! | World’s Richest People List in Marathi
1 .जेफ बेझोस | Jeff Bezos
Amazon कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस आहेत. सर्वांना परिचय असेलच अमेझोन कंपनी विषयी, जेथे A टू Z असे प्रोडक्ट उपलब्ध असतात. आणि आपल्याला जे प्रॉडक्ट हवे आहे, ते आपल्याला घरपोच मिळते ते सुद्धा काही दिवसात.
जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याचे वय सध्या 56 वर्ष आहे. त्यांचे नेट वर्थ $183.6 Billion आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तसेच त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
2. बर्नार्ड अर्नाल्ट – Bernard Arnault
बर्नार्ड अर्नाल्ट हे Louis Vuitton Moet
Hennessey (LVMH) या कंपनी चे सीईओ आहेत.
बर्नार्ड अर्नाल्ट हे फ्रांस चे राहिवाही आहेत. त्यांचे वय हे 72 वर्ष इतके आहे.
बर्नार्ड अर्नाल्ट यांचे नेट वर्थ $179.4 Billion आहे. तसेच ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
3. एलोन मस्क | Elon Musk
एलोन मस्क हे टेक्सस (Texas) चे रहिवासी आहेत. एलोन मस्क हे टेस्ला कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. Tesla ही कंपनी Martin Eberhard ह्यांनी जुलै 2003 ला स्थापन केली होती. टेस्ला मोटर्स हे नाव निकोलस टेस्ला ह्यांना समर्पित केलेले आहे.
टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी एनेर्जी स्टोरेज, सोलर पॅनल इत्यादी प्रॉडक्ट्स तयार करते. एलोन मस्क यांचे नेट वर्थ $145.5 Billion इतके आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच त्यांची Space X नावाची कंपनी सुद्धा आहे.
4. बिल गेट्स | William Henry Gates
बिल गेट्स हे अमेरिकेचे रहिवासी आहेत. ते मायक्रोसॉफ्ट कंपनीचे चे सह-संस्थापक आहेत. त्यांनी 1975 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनी ची स्थापना केली. बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स ह्या दोघांचे मिळून एक Bill & Melinda Gates Foundation आहे.
बिल गेट्स हे 65 वर्षाचे आहेत. ते जगातील चौथ्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत. त्यांचे नेट वर्थ $ 127.7 Billion आहे.
▪️Bill Gates Information in Marathi
5. मार्क झुकरबर्ग | Mark Zuckerberg
मार्क झुकरबर्ग हे कॅलिफोर्निया चे रहिवासी आहेत. मार्क झुकरबर्ग हे फेसबुक कंपनीचे मालक आहेत. तसेच त्यांनी ही कंपनी 2004 साली स्थापित केली होती. सध्या ते तीन कंपन्यांचे मलिक आहेत, WhatsApp, Facebook आणि Instagram.
2019 मध्ये त्यांनी WhatsApp आणि Instagram ह्या दोन कंपन्यांना विकत घेतले. मार्क झुकरबर्ग हे जगातील सर्वात युवा अरबपती आहेत. त्यांचे वय फक्त 37 वर्ष आहे. त्यांचे नेट वर्थ $110.8 billion आहे. ते जगातील पाचव्या क्रमांकावर असलेले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
6. वॉरेन बफेट | Warren Buffett
वॉरेन बफेट ह्यांचे नेट वर्थ $108.2 Billion इतके आहे. ते अमेरिकेत राहत असून त्यांचे वय 90 वर्ष आहे. “ओरेकल ऑफ ओमाहा” म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफेट हे आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहे.
ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. वॉरेन बफेट बर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway) चालवतात, ज्यामध्ये 60 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, ज्यामध्ये विमा कंपनी जिको, ड्युरसेल आणि रेस्टॉरंट चेन डेअरी क्वीन यांचा समावेश आहे.
7. लॅरी एलिसन | Larry Ellison
लॅरी एलिसन हे चेअरमन, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आणि सॉफ्टवेअर जायंट ओरॅकलचे को-फाउंडर आहेत.
ओरॅकल कॉर्पोरेशन हि अमेरिकेची एक मोठी कंपनी आहे.
त्यांनी 37 वर्षानंतर 2014 मध्ये ओरॅकल सीईओची भूमिका सोडली.
वर्षाच्या सुरुवातीला 3 मिलियन टेस्ला शेअर्स खरेदी केल्यानंतर एलिसन डिसेंबर 2018 मध्ये टेस्लाच्या बोर्डात सामील झाले. लॅरी एलिसन ह्यांचे नेट वर्थ $101.2B इतके आहे. तसेच ते जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
8. लॅरी पेज | Larry Page
लॅरीपेज हे Google कंपनीचे सह-संस्थापक (Co-founder) आहेत. त्यांनी 1998 साली एका मित्रासोबत मिळून Google नावाची कंपनी सुरू केली. गूगल हे आताच्या काळात जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन असून गूगल ही कंपनी जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय कंपनी आहे.
गुगलचे सह-संस्थापक लॅरीपेज ह्यांचे नेट वर्थ $97.3 billion इतके आहे. त्यांनी प्लॅनेटरी रिसोर्सेस या प्रसिद्ध स्पेस एक्सप्लोरर कंपनीत गुंतवणूक केली आहे. तसेच ते स्टार्टअप कंपन्या किट्टी हॉक (Kitty Hawk) आणि ओपनर (Opener) यांनाही अर्थसहाय्य करत आहेत.
त्यासोबत त्यांनी फ्लाइंग कार ह्या कंपनी मध्ये सुद्धा गुंतवणूक गेली आहे. तसेच लॅरी पेज हे सुद्धा जगातील नवव्या क्रमांकाचे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत.
9. सर्जे ब्रिन | Sergey Brin
सर्जे ब्रिन यांनी डिसेंबर 2019 मध्ये मूळ गूगल कंपनी आणि अल्फाबेटचे अध्यक्ष म्हणून पद सोडले, परंतु ते नियंत्रक भागधारक आणि बोर्डाचे सदस्य आहेत.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संगणक शास्त्रात प्रगत पदवी शिकत असताना दोघांची भेट झाल्यावर 1998 मध्ये त्यांनी लॅरी पेज सोबत मिळून गूगल ची सुरुवात केली.
त्यांचे नेट वर्थ $94.3 Billion इतके आहे. ते श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत.
10. अमानसीओ ऑर्टेगा | Amancio Ortega
अमानसीओ ऑर्टेगा ह्यांचे नेट वर्थ $85.7 Billion इतके आहे. ते मूळचे स्पेन चे राहणारे आहेत.
जगामध्ये ब्रांडेड कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले झारा स्टोर चे ते संस्थापक आहेत. त्यांचे वय 85 वर्ष आहे.
त्याच्याकडे माद्रिद-सूचीबद्ध इंडिटेक्सपैकी जवळजवळ 60% मालकीचे आहेत, ज्यात 8 ब्रांड्स आहेत ज्यात मॅसिमो डत्ती आणि पुल अँड बीयर आणि जगभरातील 7,500 स्टोअर आहेत. ते जगातून दहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
11. फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स | Francoise Bettencourt Meyers
फ्रॅन्कोइस बेटेनकोर्ट मेयर्स लॉरियलची संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत महिला यांची नात आहे. बेरेनकोर्ट मेयर्स आणि तिच्या कुटुंबाकडे सुमारे 33% लॉरियल कंपनीचे स्टॉक आहेत.
त्यांचे नेट वर्थ $84.4 Billion इतके आहे. तसेच त्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अकराव्या क्रमांकावर आहेत.
12. मुकेश अंबानी | Mukesh Ambani
मुकेश अंबानी हे Reliance Industries चे chairman आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे धीरूभाई अंबानी यांचे पुत्र आहेत. तसेच त्यांचे वय जवळजवळ ६२ वर्ष इतके आहे. त्यांच्या भारतात तेल आणि गॅस च्या मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आहेत.
तसेच त्यांचे नेट वर्थ (कमाई) जवळपास $77.3 Million इतके आहे. संपूर्ण जगातून ते श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या खूप मोठ मोठ्या कंपन्या भारतात तसेच जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची भारतात टेलिकॉम क्षेत्रात सुद्धा मोठी कंपनी आहे. ज्याचे नाव रिलायन्स जियो असे आहे.
हे नक्की वाचा:
▪️ रोज सकाळी लवकर उठण्याचे फायदे! जाणून घ्या संपूर्ण माहिती!
▪️ फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!
आजच्या लेखात आपण जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींची नावे अणि त्यांची कमाई जाणून घेतली. तसेच ही कमाई दरवर्षी कमी जास्त होत असते, व त्यांचे क्रमांक वर खाली होत असतात.
तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींची नावे! (World’s Richest Persons List in Marathi) ही दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट्स द्वारे नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका.
अश्याच नवनवीन माहिती साठी आणि मराठी रोचक तथ्य वाचण्यासाठी क्रिएटर मराठी सोबत जोडून रहा.