How to Earn Money Online From Instagram marathi | Instagram वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

How to Earn Money Online From Instagram marathi

डिजिटल युगात सर्व डिजिटल होत आहे. सोशल मीडिया आल्यापासून सर्वत्र सोशल मीडिया ऍप चा वापर वाढत आहे. तसेच प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती आज सोशल मीडिया वर आहे. त्यामुळे सोशल मीडियाला खूप पसंती आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअँप ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर हल्ली खूप होत आहे.

त्याचाच फायदा घेऊन जर आपण एखादे इंस्टाग्राम पेज ओपन केले आणि त्यातून पैसे कमवले तर! किती भारी ना! पण इंस्टाग्राम वर एखादे पेज बनवून खरच पैसे कमवता येतात का? तसेच कसे कमवायचे? (How To Earn Money Online From Instagram marathi) तर ह्या सर्वांची उत्तरे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

चला तर मग आजच्या आपल्या ऑनलाईन जॉब्स च्या सीरिज मधल्या दुसऱ्या आर्टिकल ला सुरुवात करुया. जर तुम्ही पहिले आर्टिकल वाचले नसेल तर येथे क्लिक करा.


Instagram वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? ( How to Earn Money Online From Instagram marathi)

मित्रांनो, इंस्टाग्राम वरून ऑनलाईन पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. पण ते मार्ग निवडण्या अगोदर तुम्ही ह्या खालील काही गोष्टी जाणून घ्या. ज्यामुळे तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही.

  • इंस्टाग्राम वरून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी आपल्याकडे एक इंस्टाग्राम अकाऊंट असणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला हे ठरवावे लागेल की, तुमची आवड कशात आहे. म्हणजेच कोणत्या विषयाबाबत तुम्ही न थकता लिहू शकता. तो विषय तुम्हाला निवडावा लागेल.
  • विषय निवडून झाल्यानंतर त्या विषयाबद्दल किती लोकांना माहिती हवी आहे, किती लोकं ती माहिती शोधतात, किती जण त्या माहितीमध्ये रस दाखवतात. हे सर्व माहिती करून घेणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर जे इंस्टाग्राम पेज सुरू करणार त्याचे नाव (Name), पेज बद्दल थोडक्यात माहिती, पेंचा आकर्षक लोगो, पेजचे एक घोषवाक्य, पोस्ट डिझाइन, हे सर्व तयार करावे लागेल.
  • तसेच पेज वरील सर्व माहिती अपडेट करून झाल्यानंतर रोज किमान 3 पोस्ट केल्या पाहिजे. तसेच पोस्ट च्या खाली कॅप्शन, hashtags वापरणे सुद्धा गरजेचे आहेत.

» गूगल बद्दल मराठी रोचक तथ्य

» फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!


इंस्टाग्राम वर स्वतःचे अकाऊंट कसे बनवावे? (How to create Instagram account Marathi)

1 . तुम्ही दोन प्रकारे अकाऊंट तयार करू शकता. एक इंस्टाग्राम च्या ऑफिशियल वेबसाईट वरून किंवा इंस्टाग्राम ऍप वरून.

2. आपण इंस्टाग्राम ऍप वरून कसे अकाऊंट उघडायचे ते पाहूया.

3. App ओपन केल्यावर Create New Account वर क्लिक करा.

4. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल id द्यावा लागेल. त्यानंतर त्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वर तुम्हाला OTP येईल. तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल. टाकून Next वर क्लिक करा.

5. नंतर तुमचे Full Name आणि Password तिथे टाईप करा आणि Continue and Sync Contacts वर क्लिक करा.

6. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाऊंट चे जे नाव (Username) ठेवायचे आहे. ते टाईप करण्यासाठी Change username वर क्लिक करून change करा. त्यानंतर Next वर क्लिक करा.

7. आता तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंट ला जॉईन करायचे असेल connect to facebook वर क्लिक करा. किंवा जर नसेल करायचे, तर skip वर क्लिक करा.

8. अश्या प्रकारे तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट तयार करू शकता. तसेच सर्व माहिती भरून घ्या. आणि नंतर तुम्हाला तुमचे अकाऊंट Professional Account बनवावे लागेल. तरच तुम्ही इंस्टाग्राम वरून ऑनलाईन पैसे कमवू शकता.

» जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!


Instagram Professional Account कसे तयार करायचे?

वरील दाखवलेल्या पद्धतीचा उपयोग करून इंस्टाग्राम अकाऊंट बनवून घ्या. त्यानंतर तुम्ही बनवलेले अकाऊंट तुम्हाला इंस्टाग्राम प्रोफेशनल अकाऊंट मध्ये कन्व्हर्ट करावे लागेल. त्यासाठी ही पद्धत वापरा.

1 . इंस्टाग्राम मधील ही पद्धत वापरा. Settings > Account > Switch to Professional Account > Continue

2. वरील पद्धत वापरून तुम्ही तुमचे instagram page सुरू करू शकता.

» टॉप 13 बेस्ट मराठी वेब सीरिज! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे! (2021)


Instagram वर पेज बनवून पैसे कसे मिळणार?

How To Make Money Online From Instagram?

जेव्हा इंस्टाग्राम वर आपल्या पेजचे 10 हजार किंवा 50 हजार फॉलोवर्स पूर्ण होतात. तेव्हा दुसरे पेज तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्या पेज वर त्यांचे प्रोमोशन करण्यासाठी तुम्हाला पैसे देतील. तसेच इंस्टाग्राम वर तुम्ही Posts, Stories, IGTV Videos, Reels, Videos टाकून दुसऱ्या पेज चे प्रॉमोशन करू शकता.

त्यासाठी तुम्हाला हवे तितके तुम्ही पैसे आकारू शकता. तसेच तुम्ही ह्या पद्धतींनी सुद्धा पैसे कमवू शकता.

  • Affiliate Marketing – तुम्ही अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मधून पैसे कमवू शकता. तुम्ही एखाद्या कंपनीच्या अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन ती लिंक तुमच्या इंस्टाग्राम पेज वरील Bio मध्ये देऊन, तिथून कमिशन द्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकता. Amazon, Flipkart, Upstox, RazorPay सारखे अनेक अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम आहेत. ज्यांची अफिलिएट मार्केटिंग लिंक तुमच्या इंस्टाग्राम पेज वर देऊन त्याद्वारे पैसे कमवू शकता.
  • Personal Products – जर तुमचे स्वतःचे clothes चे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचे प्रॉडक्ट्स असतील. जसे की, नवनवीन कपडे, टीशर्ट इत्यादी वस्तू तुम्ही इंस्टाग्राम वर लोकांना विकून त्या द्वारे पैसे कमवू शकता.

अश्या प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम वर फक्त एक पेज बनवून ऑनलाईन पैसे कमवू शकता. तसेच तुम्ही जसे तुमचे ब्रँड बनवता तसे तसे मोठ मोठ्या कंपन्या तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट्स किंवा त्यांचे पोस्ट्स दाखवण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे सुद्धा देऊ शकतात.

Instagram वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? (How To Earn Money Online From Instagram Marathi) ही Online Job ची माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच मराठी माहिती, ऑनलाईन जॉब्स आणि मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

~ Thank you for reading this article! ❤️

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts