आजच्या लेखामध्ये आपण महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती (MS Dhoni information in Marathi) जाणून घेणार आहोत. तसेच महेंद्र सिंह धोनी च्या जीवनाची अनोखी कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.
महेंद्र सिंह धोनी ह्या नावामुळे क्रिकेट खेळाला एक नवीन ओळख मिळाली. आज भारतातील प्रत्येक व्यक्ती क्रिकेट हा खेळ फक्त महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) मुळे पाहत आहेत. एम.एस धोनी एक चांगला आणि अष्टपैलू क्रिकेटर म्हणून सर्वत्र जगभर प्रसिद्ध आहे. भारतीय क्रिकेट संघाला सर्वत्र ओळख ही फक्त ह्या एका व्यक्तीमुळे मिळाली.
कसोटी, T-20, एकदिवसीय सामना ह्या सर्वात भारतीय संघाला विजय आणि सर्वात उच्च स्थान मिळवून दिले. पण हे सर्व काही एका रात्रीत झाले नाही, तर हे सर्व मिळवण्यासाठी एम.एस धोनी ला अनेक संघर्षामधुन जावे लागले.
या संघर्षामधुन निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी आहे. एम एस धोनी ची जीवन कहाणी खूप कठीण होती, पण मेहनत आणि संघर्षाने एम.एस धोनी ने जीवनात खूप काही मिळवले. त्याने जगापुढे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊया
पुर्ण नाव : महेन्द्र सिंग धोनी | |
जन्म : 7 जुलै 1981, रांची, बिहार (भारत) | |
उंची : 5 फुट 9 इंच (1.75 मीटर) | |
पत्नीचे नाव : साक्षी धोनी | |
मुलगीचे नाव : जीवा | |
आईचे नाव : देवकी देवी | |
वडिलांचे नाव : पान सिंह | |
राष्ट्रीयत्व : भारत |
एम एस धोनीचे बालपण आणि सुरूवातीचा काळ
महेंद्र सिंह धोनी चा जन्म 7 जुलै 1981 ला बिहार मधील रांची (आता झारखंड मध्ये समाविष्ट झाले आहे) येथे झाला. रांची हे शहर आता झारखंड मध्ये समाविष्ट झाले आहे. महेंद्र सिंह यांचे वडील पान सिंह धोनी मेकॉन (स्टील मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी कनिष्ठ व्यवस्थापकीय पदावरही काम केले आहे. त्याची आई देवकी देवी ही गृहिणी आहे. ते मूळचे उत्तराखंडच्या राजपूत घराण्याचे आहेत.
त्यांना एक मोठा भाऊ (नरेंद्र सिंह धोनी) आणि एक मोठी बहिण (जयंती गुप्ता) आहे. भाऊ राजकारणात सक्रिय असुन बहिण इंग्रजी विषयाची शिक्षीका आहे. महेंद्र सिंह धोनी ला त्याचे घरातले लाडाने ‘माही’ असे हाक मारायचे. माहीचे शालेय शिक्षण रांची मध्ये श्यामाली येथील डीएव्ही जवाहर विद्या मंदिर मधुन झाले. तो एक अॅथलेटिक विद्यार्थी होता, सुरूवातीच्या काळात क्रिकेट पेक्षा बॅडमिंटन आणि फुटबाॅल या खेळांमधे त्यांला अधिक रूची होती. शाळेतील फुटबाॅल टिमचा तो एक चांगला गोलकिपर होता.

शाळेतील फुटबॉल कोच ने धोनीला स्थानिक क्रिकेट क्लब मध्ये विकेटकीपर म्हणून पाठवले. धोनीने तिथे चांगले प्रदर्शन केले. त्याची विकेट कीपिंग सर्वांना आवडायला लागली. त्यामुळे 1995 ते 1998 दरम्यान कमांडो क्रिकेट क्लब टीम मधे नियमित विकेट किपर म्हणुन धोनी चे स्थान पक्के झाले.
माहीचे प्रदर्शन दिवसेंदिवस चांगले होत गेले. त्यामुळे धोनीला वेगवेगळ्या चॅम्पियनशिप मध्ये निवडण्यात आले. 1997-1998 दरम्यान धोनी ला विनु मंकड ट्राॅफी करीता अंडर 16 चॅम्पियनशिप करीता निवडले. 10 वी नंतर माही ने क्रिकेट कडे कल वाढवण्याकडे सुरुवात केली. त्यामुळे माहीने 12 वी नंतर शिक्षण सोडले आणि पूर्णपणे क्रिकेटला प्राधान्य दिले.
धोनीने क्रिकेटची सुरुवात शाळेपासून केली. पण त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागले. अनेक संघर्षानंतर धोनीला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. त्याने त्या संधीचे सोने केले आणि स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर माही ने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळाडूंमध्ये ’’माही’’ चे नाव सुद्धा घेतले जाते. माही ने कसोटी सामन्यात तसेच मर्यादित षट्कात भारतीय संघाचे नेर्तृत्व केले. आणि जगात भारतीय संघाला एक नवीन ओळख निर्माण करून दिली.
महेंद्र सिंह धोनी विषयी थोडक्यात माहिती (MS Dhoni information in Marathi)

महेंद्र सिंह धोनी ने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद (Captain) सप्टेंबर 2007 पासुन 4 जानेवारी 2017 पर्यंत सांभाळले. धोनी ने कसोटी, टी ट्वेण्टी, वन डे ह्या तिन्ही फॉरमॅट मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.
तसेच 2008 ते 28 डिसेंबर 2014 पर्यंत माही कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता.
त्याचा खेळण्याचा अंदाज, त्याचा शांतपणा, निर्णय घेण्याची क्षमता, माणुसकी, खेलाप्रती असलेली भावना आणि त्याची स्टायलिश हेअरस्टाईल ह्या सर्वांमुळे धोनी हा एक विशेष आणि अनोखा खेळाडू न्हाऊन जगभरात प्रसिद्ध झाला. क्रिकेट मध्ये तसेच जाहिरातींमध्ये धोनी प्रसिद्ध होऊ लागला. धोनी उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे.
माही ने भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाला 2011 साली दुसरा विश्वकप मिळवुन दिला. पुढे 2007 ते 2016 पर्यंत भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावर राहिला. 2008 ते 2014 पर्यंत माही ने कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार पद सांभाळले. त्याच्या खेळातील कौशल्यामुळे त्याने क्रिकेट विश्वात एक नवीन ओळख निर्माण केली.
भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी माही हा एक आहे. ज्यांनी आपल्या संघाचे चांगले नेर्तृत्व केले आणि अनेक सामन्यांमधे भारताला विजय मिळवुन दिला. या व्यतिरीक्त त्यांच्या नेर्तृत्वात अनेक नोंदी देखील आहेत.
धोनीच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये भारतीय क्रिकेट संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला. तसेच 2007 मधील T-20 वर्ल्ड कप आणि 2011 मधील एकदिवसीय वर्ल्ड कप धोनीने जिंकवून दिले. त्यासोबत 2013 मधील चॅंपियंस ट्राॅफी सुद्धा माही ने भारतीय संघासाठी जिंकवून दिल्या.
तसेच ह्या सर्व आयसीसी ट्रॉफीज एम एस धोनी च्या नेतृत्वाखाली जिंकण्यात आल्या होत्या. तसेच धोनी हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आयसीसी च्या तिन्ही फॉरमॅट मधील ट्रॉफी जिंकल्या आहेत.
बीसीसीआय अंतर्गत ठेवल्या जाणाऱ्या आयपीएल (IPL) मध्ये सुद्धा धोनीने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स् चे नेतृत्व करत 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
धोनीने केलेले भारतीय क्रिकेट संघातील पदार्पण
▪️धोनीने 23 डिसेंबर 2004 ला बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले. त्याने भारताकडून पाहिला एकदिवसीय सामना (ODI) खेळला.
▪️धोनीने 2 डिसेंबर 2005 ला श्रीलंके विरूध्द कसोटी सामना खेळून भारतीय कसोटी संघात पदार्पण (Debut) केले.
▪️1 डिसेंबर 2006 ला दक्षिण आफ्रिके विरूद्ध पहिला T-20 सामना खेळला.
धोनीने खेळलेल्या घरगुती संघाबद्दल माहिती
▪️1999–2004 पर्यंत बिहार क्रिकेट संघा कडून धोनी खेळला.
▪️2004/05 ते आतापर्यंत धोनी झारखंड क्रिकेट टीम मध्ये खेळत आहे.
▪️2008 ते 2015 आणि त्यानंतर 2018 ते आतापर्यंत धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघातून खेळत आहेत. तसेच तो त्या संघाचा कर्णधार आहे.
▪️2016 ते 2017 पर्यंत माही रायझिंग पुणे सुपर जायंट (Rising Pune Supergiant) कडून क्रिकेट खेळाला.
महेंद्र सिंह धोनीच्या सुरूवातीच्या खेळाची माहिती
1998 च्या दरम्यान धोनी शालेय आणि क्लब स्तरावरच क्रिकेट खेळत होता. धोनीची कोल फिल्ड लिमीटेड संघात खेळण्याकरीता निवड झाली. ह्या संघात खेळताना धोनी ने क्रिकेट असोसिएशन चे पुर्व राष्ट्रपती देवल सहाय यांना त्याच्या खेळाने खूप प्रभावित केले. त्यामुळे धोनी ला प्रथम श्रेणीतील क्रिकेट मध्ये खेळण्याची संधी दिली गेली.
त्यानंतर सीके नायडु ट्राॅफी करीता ईस्ट झोन U19 संघाकरता माही ची निवड करण्यात आली. दुर्देवाने यावेळी धोनीच्या संघाने चांगले प्रदर्शन केले नाही. त्यामुळे ही ट्रॉफी जिंकन्यात आली नाही.
रणजी ट्राॅफी ची सुरूवात (MS Dhoni’s Ranji Career)
1999 – 2000 मध्ये धोनी ला रणजी ट्राॅफी खेळण्याची संधी मिळाली. तेव्हा धोनी फक्त 18 वर्षांचा होता. बिहार विरूध्द आसाम असा हा सामना खेळला गेला. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी ने नाबाद 68 धावा केल्या. पुढच्या सत्रामधे धोनी ने बंगाल विरूध्द सामना खेळला यात त्याने शतक मारले. तरी देखील संघ हा सामना हरला.
या ट्राॅफी च्या सत्रात माही ने एकुण 5 सामन्यांमधे 283 धावा काढल्या. या ट्राॅफी नंतर धोनी ने स्थानिक स्तरावर अनेक सामने खेळले. धोनीच्या चांगल्या प्रदर्शनानंतर देखील ईस्ट झोन सिलेक्टर तर्फे त्यांची निवड करण्यात आली नाही, यामुळे धोनी खेळापासुन दुरावला आणि त्याने नौकरी करण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या 20 व्या वर्षी माही ला खेळ कोटयातुन खडगपुर रेल्वे स्थानकावर ट्रॅव्हलिंग टिकीट परीक्षक (टीटीई) पदावर नौकरी मिळाली आणि तो पश्चिम बंगाल मधल्या मिदनापुर ला निघुन गेला.
एम एस धोनी बद्दल काही अनोख्या गोष्टी
▪️ MS धोनी चा हेलिकॉप्टर शॉट जगप्रसिद्ध व आकर्षक शॉट म्हणून ओळखला जातो.
▪️ हेलिकॉप्टर शॉट धोनी अगोदर टेनिस बॉल सोबत सर्वात जास्त खेळत असे.
▪️३ जुलै २०१० ला MS धोनी याचे लग्न त्यांची बालमैत्रीण साक्षी हिज सोबत झाले. MS धोनी व साक्षी या दोघांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले.
▪️धोनी व साक्षी या दोघांचे वडील एकाच कंपनीत जॉब करत होते.
▪️ प्रत्येक सामना जिंकल्या नंतर मैदानावरील स्टंप आठवण म्हणून घेणे, हा धोनी चा छंद आहे.
▪️ एम एस धोनी च्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपट सुद्धा आहे. त्या चित्रपटाचे नाव ” MS Dhoni – THE UNTOLD STORY” आहे. आणि हा चित्रपट खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. ह्या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत यांनी एम एस धोनीची भूमिका साकारली आहे.
▪️ MS धोनी एकमेव असे कर्णधार आहे जो ODI सामन्यात ७ व्या क्रमांकावर खेळून देखील सामन्यांमध्ये शतक पटकावले. हे त्यांनी २०१२ मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध केले होते.
▪️ MS धोनी कर्णधार रुपात सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे तसेच जास्त क्रिकेट सामने जिंकवून देण्यात येणाऱ्या कर्णधार मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
▪️एम एस धोनी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे तसेच T-२० चे कर्णधार होते.
▪️ महेंद्र सिंह धोनी आजपर्यंत क्रिकेट इतिहासात एकदिवसीय क्रिकेट संघाचे एक यशस्वी कर्णधार मानले जातात.
▪️ धोनी कर्णधार असताना भारताने पहिले ICC T -२० विश्वचषक (worldcup) २००७ मध्ये आपल्या नावी केला.
▪️ एम एस धोनी ने त्याच्या कर्णधार कालावधीत श्रीलंका व न्यूझीलंड मध्ये प्रथम ODI सिरीज मध्ये विजय प्राप्त केले.
▪️ धोनी लगातार सात वर्ष (२००८-२०१३) पर्यंत ICC World One Day Eleven मध्ये सहभागी झाले आहेत.
▪️ धोनी कर्णधार असतानाच तब्बल २८ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने ODI World Cup २०११ पुन्हा एकदा आपल्या नावी केला.
▪️ सन २०१३ मध्ये प्रथमच भारताने Champions Trophy देखील पटकावली.
▪️ धोनी जगातील पहिले असे कर्णधार आहे ज्यांचे नाव ICC च्या सर्व चषकांवर (CUP आणि Trophy) वर आहे.
▪️ MS धोनी भारताचे एकमेव असे कर्णधार आहे ज्याने भारताला १०० हून अधिक ODI सामने जिंकले आहेत.
▪️ MS धोनी IPL च्या प्रथम सामन्यातील सर्वात महाग खेळाडू होते ज्याने CSK सोबत १.५ दशलक्ष डॉलर मध्ये करार केला होता.
▪️ MS धोनी ने आयपीएल (IPL) सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज ला 2010, 2011 आणि 2028 मध्ये विजय मिळवून दिले. त्याच बरोबर
▪️ तसेच माही ने चॅम्पियन्स लीग T-20 मध्ये देखील 2010 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकल्या आहेत.
▪️ धोनी हा एक असा पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याला ICC ODI Player Of The Year 2008 हा सन्मान मिळाला.
महेंद्र सिंग धोनीला मिळालेले सन्मान
▪️2007 साली भारत सरकारने धोनी ला राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले.
▪️महेंद्र सिंग धोनीला 2011 मध्ये डी मोंटफोर्ट विद्यापीठा तर्फे मानद डाॅक्टरेट पदवी ने सन्मानित केले गेले होते.
▪️महेंद्र सिंग धोनी ला एकदिवसीय सामन्यांमधे चांगल्या प्रदर्शनाकरीता 6 मालिकावीर पुरस्कार आणि 20 मॅन आॅफ द मॅच पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या संपुर्ण कसोटी सामन्याच्या कारकिर्दीत त्याला 2 मॅन आॅफ दी मॅच पुरस्कार देखील मिळाले आहेत.
▪️धोनीला 2009 साली भारताच्या ’’पद्मश्री’’ या चैथ्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने गौरवण्यात आले.
▪️धोनीला 2 एप्रिल 2018 मधे ’’पद्मभुषण’’ या अवॉर्ड ने गौरवण्यात आले.
▪️महेंद्र सिंग धोनी हा महान क्रिकेटपटु कपिल देव नंतर दुसरे असा खेळाडु आहे. ज्याला इंडियन आर्मी चे सन्मान पद मिळाले आहे.
▪️2011 साली जगातील सर्वात 100 प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत धोनीचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.
▪️2012 मधे जगातील सर्वात महाग खेळाडुंमधे महेंद्र सिंग धोनी 16 व्या क्रमांकावर आहे.
▪️2015 मधे फोब्र्स ने धोनी ला सर्वात महाग खेळाडूंच्या यादीत 23 व्या क्रमांकावर ठेवले आहे. या लिस्टनुसार त्याची कमाई 31 मिलियन अमेरिकी डाॅलर होती.
आजच्या लेखामध्ये दिलेली महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती (MS Dhoni information in Marathi) तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. मराठी माहिती आणि ऑनलाईन जॉब्स बद्दल माहितीसाठी क्रिएटर मराठी वेबसाईट ला जोडून रहा.
One thought on “महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती | MS Dhoni information in Marathi”