फ्रीलान्सिंग म्हणजे काय? (Freelancing information in marathi) आणि Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? (Earn money online from freelancing in marathi) ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
फ्रीलान्सिंग चे प्रमाण जगभरात वाढत आहे. प्रत्येक व्यक्ती त्याचे स्किल्स वापरून फ्रीलान्सर बनत आहे. काहीं जण जॉब करता करता फ्रीलान्सिंग काम करत आहेत. फ्रीलान्सिंग मुळे नोकरी करणाऱ्याला एक साईड इन्कम सोर्स उपलब्ध होत आहे. त्यामुळे ह्या कडे कल वाढत चालला आहे.
पण असेही काही जण आहेत, ज्यांना आजूनही फ्रीलान्सिंव म्हणजे काय? आणि त्यातून घरबसल्या पैसे कसे कमवायचे? हे माहिती सुद्धा नाही आहे. तर आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
फ्रीलान्सिंग म्हणजे काय? (Freelancing information in Marathi)
फ्रीलान्सिंग म्हणजे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरून वेगवेगळ्या क्लाएंट ची कामे ऑनलाईन पद्धतीने ठराविक वेळेत पूर्ण करून देणे. व त्याबदल्यात ठराविक मोबदला घेणे. ह्यालाच फ्रीलान्सिंग असे म्हणतात.
फ्रीलान्सिंग हा काम करण्याचा एक मार्ग आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती अनेक वेगवेगळ्या क्लायंटसाठी कॉन्ट्रॅक्ट घेऊन स्वतंत्रपणे काम करते. फ्रीलान्सिंग करणाऱ्या व्यक्तीला फ्रीलान्सर म्हणतात. फ्रीलांसर हा कंपनीचा कर्मचारी नसून स्वयंरोजगार असलेली व्यक्ती आहे.
फ्रीलांसर त्याच्या ग्राहकांना त्याची कौशल्ये आणि अनुभव वापरून सेवा पुरवतो. येथे क्लायंट एकल व्यक्ती किंवा कंपनी असू शकते. म्हणजेच, फ्रीलांसर एखाद्या प्रकल्पासह कोणाशीही काम करू शकतो. काम पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाकडून पैसे घेतले जातात.
फ्रीलान्सर म्हणजे काय? (What is Freelancer in Marathi)
Freelancer अशी व्यक्ती जी स्वतंत्ररीत्या freelance वेबसाइट्स वरून स्वतःच्या वेळेनुसार काम करून ऑनलाईन पैसे कमवते.
फ्रीलान्सर व्यक्ती स्वतःचे स्किल्स वापरून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर द्वारे ऑनलाईन पैसे कमवतात. त्यासाठी त्यांना वेळेचे बंधन नसते. तसेच ते डॉलर, pounds किंवा भारतीय rupees मध्ये पैसे कमवू शकतात.
फ्रीलान्सर व्यक्ती ऑनलाईन किंवा ऑफलाईन clients कडून काम घेऊन ते ठराविक वेळेत पूर्ण करून पैसे कमवतात. फ्रीलान्सर होण्यासाठी कोणत्याही वेगळ्या कोर्स ची गरज लागत नाही. आपण आपल्याकडे असलेल्या स्किल्स चा वापर करून फ्रीलान्सिंग द्वारे पैसे कमवू शकता.
हे नक्की वाचा: जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 8 यशस्वी मार्गांचा वापर करा!
फ्रीलान्सिंग जॉब करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे?
फ्रीलान्सिंग सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जास्त गोष्टी असणे आवश्यक नाही आहेत. फक्त काही पुरेश्या गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेच्या आहेत. जसे की,
- संगणक किंवा लॅपटॉप (मोबाईल वरून तुम्ही व्यवस्थित काम करू शकणार नाही)
- इंटरनेट कनेक्शन
- तुमच्याकडे असलेल्या Skills आणि काम करण्यासाठी लागणारा वेळ
- Email Account
- मोबाईल नंबर
- Bank Account
- PayPal/Skrill Account (इंटरनॅशनल पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी)
हे सुद्धा वाचा: मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!
फ्रीलान्सिंग जॉब्स चे फायदे (Advantages of freelancing in marathi)
लोक फ्रीलान्सिंग का करतात आणि फ्रीलान्सिंगचे फायदे काय आहेत हे आता आपण जाणून घेऊया. जर तुम्हाला फ्रीलांसर बनायचे असेल तर तुम्हाला खालीलपैकी काही गोष्टी नक्कीच मिळतील:
- तुम्ही कधीही फ्रीलांसिंग सुरू करू शकता.
- पैसे गुंतवण्याची गरज नाही.
- तुम्ही संगणक आणि इंटरनेटच्या मदतीने काम सुरू करू शकता.
- फ्रीलांसर घरून काम करू शकतो.
- ऑफिसला जाण्याचे टेन्शन नाही.
- स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकतो.
- तुमचा बॉस नाही.
- कोणत्या क्लायंटसोबत काम करायचे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.
- कामाची किंमत तुम्ही स्वतः ठरवता.
- तुम्ही उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत बनवू शकता.
- तुम्ही स्वतंत्रपणे काम करता.
- नोकरी किंवा अभ्यासानंतर मिळालेला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरता येईल.
हे सुद्धा वाचा: टॉप 13 बेस्ट मराठी वेब सीरिज! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे!
फ्रीलान्सिंग जॉब्स चे तोटे (Disadvantages of freelancing in marathi)
फ्रीलान्सिंगचे फायदे वाचल्यानंतर तुम्हाला पूर्णवेळ फ्रीलान्सर व्हायचे असेल तर फ्रीलान्सिंगचे काही तोटेही लक्षात घ्यायला हवेत. जवळजवळ प्रत्येक व्यवसायात काही कमतरता असतात, त्याचप्रमाणे फ्रीलान्सिंगमध्येही काही कमतरता असतात. जसे:
- फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला प्रकल्प मिळत राहतील याची शाश्वती नाही.
- तुम्हाला इतर फ्रीलांसरशी स्पर्धा करावी लागेल.
- सुरुवातीला ग्राहक मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.
- तुम्हाला तुमचे कौशल्य सतत सुधारावे लागेल.
- तुमचा पोर्टफोलिओ उत्कृष्ट असावा.
- कधीकधी घरून काम करणे सोपे नसते, वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यात फरक करणे कठीण असते.
- कामाची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे.
- बर्याच फ्रीलांसरना संघ नसतो, त्यांना एकटेपणा वाटतो.
- फ्रीलांसर हा स्वयंरोजगार असतो, त्याला पगारदार व्यक्तीप्रमाणे सुविधा (उदा: आरोग्य विमा, बोनस, निधी इ.) मिळत नाहीत.
- सक्रिय उत्पन्न फ्रीलांसिंगमधून मिळते – म्हणजेच, तुम्ही जोपर्यंत काम करत आहात तोपर्यंतच तुम्हाला पैसे मिळतील.
हे सुद्धा वाचा: फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!
फ्रीलान्सिंग करण्यासाठी बेस्ट फ्रीलान्स वेबसाइट्स (Best freelancing websites in Marathi)
इंटरनेट वर तुम्हाला अनेक फ्रीलान्स वेबसाइट्स मिळतील. परंतु मी तुम्हाला काही ठराविक फ्रीलान्स वेबसाइट्स ची नावे सांगणार आहे. ह्या वेबसाइट्स पॉप्युलर आहेत तसेच ह्या वेबसाईट खात्रीशीर आहेत.
फ्रीलान्सिंग मधील in-demand स्किल्स (in-demand freelancing skills)
- Digital Marketing
- Social Media Management
- Graphic Designer
- Photo Editing
- Video Editing
- Data Analysis
- Web Developer
- Virtual Assistant
- Content Writing
- UX Design
- Photography
- Translation
हे सुद्धा वाचा: YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?
फ्रीलान्सिंग जॉब्स कसे शोधावे?
फ्रीलान्सिंग जॉब्स करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या कोणत्याही एका फ्रीलान्स वेबसाईट वर जाऊन तुम्हाला एक पोर्टफोलिओ बनवावा लागेल. त्या मध्ये तुम्हाला तुमच्या बद्दल माहिती add करावी लागेल.
तुमचा मोबाईल नंबर, तुमचे पूर्ण नाव, तुमच्याकडे असलेल्या स्किल्स बद्दल माहिती, तसेच तुम्ही पेमेंट कसे रिसिव्ह करणार त्याबद्दल माहिती, इत्यादी माहिती add करून नंतर. तुमच्या जवळ असलेल्या स्किल्स बद्दल तिथे थोडक्यात माहिती add करा.
त्यानंतर तुम्ही ज्या फ्रीलान्स वेबसाईट वर प्रोफाइल बनवली आहे. त्यावर तुम्हाला येत असलेल्या स्किल्स बद्दल एखादा keyword सर्च करा. त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या जॉब्स बद्दल रिझल्ट्स येतील.
त्यातील तुम्हाला योग्य वाटेल तो सिलेक्ट करा. आणि तिथे तुम्हाला Bid असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून bid लावा. त्यानंतर तो client तुम्हाला तुमची प्रोफाइल बघून तुम्हाला काम देईल.
तुम्हाला थोडे दिवस किंवा महिने कोणतेही काम मिळणार नाही कारण इथे खूप जण ती काम अगोदरच चांगल्या प्रकारे करत असतात. पण तुम्ही हे वाचून निराश होऊ नका.
तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या स्किल्स च्या आधारे थोड्याच दिवसात एखादा क्लाएंट मिळवू शकता. त्यानंतर हळू हळू तुम्हाला क्लाएंट मिळत जातील. फक्त client मिळत नाही म्हणून हार मानू नका.
हे नक्की वाचा: Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!
FAQs-
फ्रीलान्सिंग मध्ये करिअर करू शकतो का?
अमेरिका, जपान सरख्या देशांमध्ये अनेक जण फ्रीलान्सिंग मधून खूप पाऊस कमवत आहेत. परंतु भारतात आजूनही तसे काही नाही आहे. भारतामध्ये फ्रीलान्सिंग मधून तुम्ही थोडे फारच पैसे कमवू शकता. त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहू नये.
फ्रीलान्सिंग मधून किती पैसे कमवू शकतो?
ह्या मधून पैसे कमावणे तितके सोप्पे नाही आहे. तुम्हाला अनेक महिने क्लाएंट ची वाट पाहावी लागते. जेव्हा क्लाएंट तुम्हाला एखादे काम देतो त्यानंतर तो तुम्हाला त्याचा मोबदला देतो. फ्रीलान्सिंग मधून महिन्याला $30-$50 कमवू शकतो.
फ्रीलान्सिंग करण्यासाठी तुमच्याकडे कोण कोणते स्किल्स असणे गरजेचे आहेत?
फ्रीलान्सिंग करण्यासाठी तुमच्याकडे सोशल मीडिया मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट राईटिंग, वेबसाईट डिझाईन, इत्यादी स्किल्स असणे आवश्यक आहेत.
हे सुद्धा वाचा:
›› 100+ Instagram Marathi Attitude Captions
›› नववर्षाभिनंदन मराठी शुभेच्छा संदेश २०२२
फ्रीलान्सिंग म्हणजे काय? (Freelancing information in Marathi) आणि Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा.
तसेच मराठी माहिती, Online Tips, डेली टिप्स आणि मराठी फॅक्ट्स साठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.
2 thoughts on “फ्रीलान्सिंग म्हणजे काय? Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?”