ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कोण कोणत्या ॲप चा वापर करायचा? (UPI Payments Apps information in Marathi) ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच हे UPI Payment Apps वापरून तुम्ही रोज कॅशबॅक सुद्धा मिळवू शकता.
डिजिटल युगात आपण डिजिटल राहणे सुद्धा गरजेचे आहे. सध्या संपूर्ण जग डिजिटल युगात जगत आहेत. भारत सुद्धा आता डिजिटल युगात बदलत आहे. इंटरनेट चे दर कमी झाल्यापासून भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक झाले. प्रत्येक घरात आता एक तरी स्मार्टफोन आहेच.
तसेच डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सर्व व्यवहार डिजिटल म्हणजेच ऑनलाईन होत आहेत. 2020 साली भारतामध्ये एकूण 25.5 Billion transactions झाले होते. बँकेतील सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे आता बँकेत जाण्याची आवश्यकता सुद्धा लागत नाही. तसेच मोबाईल रिचार्ज, लाईट बिल, टीव्हीचा रिचार्ज, वायफाय रिचार्ज सर्व काही स्मार्टफोन वरून आपण करू शकतो.
पण ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कोणत्या ऍप चा वापर करायचा? (Best UPI Payment Apps) हे आज आपण जाणून घेणार आहोत. ह्यामुळे तुम्ही कोणतेही ऑनलाईन पेमेंट तुमच्या स्मार्टफोन वरून करू शकता.
UPI म्हणजे काय? (What is UPI in Marathi)

Unified Payments Interface (UPI) ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने ही सेवा सुरू केली आहे. तसेच UPI ही सेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या अंतर्गत चालते. UPI चा वापर मोबाईल पेमेंट साठी केला जातो.
तसेच UPI चा वापर करून तुम्ही डायरेक्ट बँक टू बँक पेमेंट करू शकता व पैसे ट्रान्स्फर करू शकता. भारतामध्ये तसेच भूतान मध्ये UPI ही सेवा उपलब्ध आहे. भारतामध्ये एकूण 207 बँक UPI पेमेंट सर्व्हिस वापरण्याची परवानगी देते.
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ह्या ऍप चा वापर करायचा? (Best UPI Payment Apps)
1 . Amazon Pay

Amazon Pay हे एक अतिशय लोकप्रिय अॅप आहे. जो यूपीआय व्यवहार करण्यासाठी वापरला जातो. ह्या पेमेंट ऍप वर आपण फक्त मोबाईल रिचार्ज आणि इलेक्ट्रिसिटी बिल नाही, तर अनेक UPI सुविधांचा वापर करू शकतो. दुकानातील QR Code, D2h रिचार्ज करू शकतो.
2. Google Pay

गुगल पे हे साधे, सोप्पे, सरळ ऑनलाईन पेमेंट ऍप आहे. ह्या ऍप वरून यूजर बॅंकेतून थेट पैसे ट्रान्स्फर करू शकतो. तसेच डीटीएच बिल, मोबाइल रिचार्ज, ब्रॉडबँड रिचार्ज, वीज आदींचे पेमेंट करता येतात. तसेच अनेक व्हाउचर आणि कॅशबॅक सुद्धा मिळतात.
3. PhonePe

फ्लिपकार्ट कंपनीचे प्रॉडक्ट असलेले PhonePe 2015 मध्ये लाँच केले गेले होते. हे एक यूपीआय पेमेंट अॅप आहे. ह्या ऍप वरून बँक टू बँक transaction करू शकतो. तसेच आपल्याला थेट आपल्या बँक खात्यातून व्यवहार करण्यासारखे बरेच फायदे मिळतात, ज्यासाठी फक्त मोबाइल नंबर आवश्यक आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट ऍप आहे.
4. BHIM UPI

8 नोव्हेंबर, 2016 रोजी जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हा सरकारने कॅशलेस इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी 30 डिसेंबर 2016 रोजी BHIM UPI अॅप लाँच केले. त्याचे संपूर्ण नाव भारत इंटरफेस फॉर मनी (Bharat Interface For Money) आहे. हे भारताचे पहिले यूपीआय App आहे, याच्या मदतीने आपण एका बँकेतून दुसर्या बँकेत थेट पैशांचे व्यवहार करू शकतो.
5. Freecharge

Freecharge ही सुद्धा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट ऍप्लिकेशन आहे. हे ऍप UPI बेस पेमेंट ला प्राधान्य देते. Landline, Gas Bills, लाईट बिल, मोबाईल रिचार्ज करू शकतो. तसेच हे सर्वात लोकप्रिय ऍप आहे. Cred ऍप चे फाऊंडर कुणाल शाह ह्यांनीच ह्या ऍप ची स्थापना केली होती. तसेच Freecharge ह्या ऍप वरून तुम्ही mutual funds मध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता.
» Instagram वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?
6. Paytm

पेटीएम हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय पेमेंट अॅप आहे जो कोट्यावधी लोक वापरतात. भारतातील डिजिटल पेमेंटसंदर्भात नुकत्याच आलेल्या अहवालानुसार पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून पेटीएम पेमेंट गेटवे वेगाने वाढत आहे आणि त्याचा बाजारातील हिस्सा 2 टक्क्यांहून अधिक आहे. Paytm वर अनेक Vouchers आणि Cashbacks मिळतात.
7. Cred

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना हा ऍप सर्वात बेस्ट आहे. Cred हे सर्वात लोकप्रिय व वापरले जाणारे ऍप आहे. ह्या ऍप वरून आपण क्रेडिट कार्डची सर्व ऑनलाईन बिल भरू शकतो. तसेच ह्यावर ऑफर्स आणि अनेक कॅशबॅक सुद्धा मिळतात.
» Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!
8. PayPal

तुम्हाला कोणत्या फॉरेन वेबसाईट वरुन कोणतेही प्रॉडक्ट किंवा शॉपिंग करायची असेल, तर डॉलर मध्ये तुम्ही PayPal वरून पेमेंट करू शकता. तसेच जर तुम्ही ब्लॉगर किंवा फ्रीलान्सर असात, तर तुमचे बाहेर देशातून ऑनलाईन पेमेंट येत असेल तर तुम्ही PayPal च्या मदतीने ते घेऊ शकता.
9. Mobikwik

हे एक भारतीय डिजिटल पेमेंट ऍप असून ज्यामधून तुम्ही सर्व ऑनलाईन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, मोबाईल रिचार्ज करू शकता. तसेच ह्या ऍप मधील eWallet मध्ये तुम्ही पैसे जमा करून ठेवून नंतर हवे तेव्हा वापरू शकता. तसेच जर तुम्हाला कमी किमतीचे loans घ्यायचे असतील, तर Mobikwik ऍप वर ती सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. त्यासोबत बिल पेमेंट वर 5% कॅशबॅक सुद्धा मिळतो.
हे नक्की वाचा:-
» जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!
2 thoughts on “मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!”