Life Quotes in Marathi :- आज आपण 200+ Life Quotes in Marathi चा संग्रह पाहणार आहोत. Marathi quotes on life and love वाचून तुम्ही जीवन आजून चांगल्या प्रकारे समजू शकता. त्यामुळे तुम्ही best life quotes in marathi, real life quotes in marathi आणि positive life quotes in marathi, simple life quotes in marathi चा संग्रह नक्की वाचा.
हल्लीचे जग खूप वेगाने पुढे जात आहे. पूर्वी एकमेकांशी बोलण्यासाठी फोन चा वापर केला जायचा. पण आता जगातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी बोलण्यासाठी सोशल मीडिया चा वापर केला जातो. हल्लीचे युग आणि पुढे येणारे युग हे सोशल मिडियाचे युग समजले जाणार आहे. सोशल मीडिया जीव की प्राण झाला आहे.
एखादी गोष्ट लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची असेल, तर आपण व्हॉट्सॲप, ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया ॲप्स वरून पटकन स्टेटस ठेवून पोहोचवू शकतो. रोज सकाळी उठून सर्वात अगोदर एखादे सुविचार, मोटिवेशनल स्टेटस ठेवण्याचा सगळीकडे सवय झाली आहे.
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत बेस्ट मराठी लाईफ स्टेटसचा heart touching life quotes in marathi संग्रह. जर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी सुविचार आणि स्टेटस चा Life Quotes in Marathi, Life status in Marathi शोधत असाल तर आमचा हा मराठी संग्रह नक्की वाचा.
Life Quotes in Marathi – जीवन मराठी स्टेटस आणि सुविचार
आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून दुसऱ्यांना आनंदित करतो.
जो मेहनत करतो त्याला यश मिळतेच.
फक्त दुसऱ्याचं न ऐकता स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.
चांगली व्यक्ती स्वार्थी नसते, फक्त दूर होते
त्या लोकांपासून ज्यांना त्याची किंमत नसते.
कोणत्या व्यक्तीद्वारा काही चूक झाल्यास, त्याचा बदला घेण्याविषयी विचार करू नका, कारण जेवढा वेळ तुम्ही बदला घेण्यात घालवाल, त्या दरम्यान सुंदर भविष्य बनवू शकता.
समस्यांपासून पळत राहिलात तर त्या पाठलाग करतच राहतील.
त्याचा सामना करून बाहेर पडलात तर त्यापासून कायमची मुक्ती मिळेल.
एखाद्या कामात आपण यशस्वी होतो.
तेव्हा आपण आजुन मेहनतीने काम केले पाहिजे.
अपयशी व्यक्तीने नेहमी मेहनत केली पाहिजे,
कारण यश हे एका रात्रीत सुद्धा मिळते. हे लक्षात ठेवा!
अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते,
कारण उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक
नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची.
पैश्याचा पाठलाग करू नका,
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो
यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे.
पाप होईल इतके कमवू नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये,
आणि भांडण होईल असे बोलू नये.
अशक्य काम शक्य करण्यात एक
वेगळीच मजा आहे.
आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा
कधीही घमेंड करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा
स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.
कोणतेही यश अपयश हे आपण
घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.
तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही,
तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.
सुखात असताना समजून घेणारे खूप असतात,
पण दुःखात असताना जो समजून घेतो
तोच आपला असतो.
लोकांना वाटतं यशस्वी
माणसाला दुःख होत नाही;
त्यालासुद्धा दुःख होतं,
तो त्यांना सामोरा जातो
आणि पुन्हा लढण्यास तयार होतो.
Best life quotes in marathi,
अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल,
अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील
तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता.
हे वाचा: जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!
बदल होण्यापासून घाबरणे आणि संघर्षासाठी मागेपुढे बघणे,
मानवाचा सर्वात मोठा भेकडपणा आहे.
जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो,
कारण जे काळ शिकवतो ते कुणीच शिकवत नाही!
जगात फक्त मन आहे,
जे विश्रांती न घेता काम करतं म्हणून त्याला आनंदी ठेवा,
मग ते तुमचं असो वा दुसऱ्याचं.
वाळवंट सुद्धा हिरवी होतात जेव्हा
आपल्यासोबत आपली माणसे उभी राहतात.
ज्याची बुद्धी संकटात खचत नाही,
त्याच्यासाठी अशक्य असे काहीच नाही.
लोकांची मदत करताना जर आपल्या चेहऱ्यावर हसू उमटले तर तीच खरी सेवा असते.
ते सोडून बाकी जे असतं तो फक्त देखावा.
विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा-योग आहे,
परंतु सज्जन म्हणून मरणे, ही आयुष्य भराची कमाई आहे.
“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”
आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात.
आयुष्य म्हणजे समस्या नाही, जी सोडवावी लागते, आयुष्य अनुभवायचं असतं!
प्रेरणा इतकी शक्तिशाली असते की, ती आपल्या मनातील संशय दूर करून आपल्याला प्रेरित करते आणि गतिशील बनवते.
संकट किती मोठं असू द्या.. फक्त आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा!
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नसतो.
कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक असतो!
तो माणूस खोटारडा असतो,
जो म्हणतो की “मी देवाला मानतो.”
परंतु आपल्या आईचा आदर करीत नाही!
अतिकोपता कार्य जाते लयाला,
अती नम्रता पात्र होते भयाला! अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामध्ये सर्व काही असावे!
सूर्याच्या दिशेने मान वळवणारी फुलं..
ढगाळ दिवसांतही तोच मार्ग अनुसरतात!
लाईफ आपल्याला सर्व काही शिकवते. म्हणून काम करत रहा आणि आपल्याला हवे ते नक्की मिळवा.
कधीही मोठेपणा करू नका,
कारण मोठेपणा केल्याने लोकं तुम्हाला गर्विष्ठ समजतील.
Happy life quotes in marathi
कधी ही दुसऱ्याला कॉपी करू नका
कारण तुम्ही सुद्धा युनिक आहात
हे तेव्हाच समझेल जेव्हा तुम्ही दुसऱ्याला
कॉपी न करता स्वतःचे ओरिजनल काम कराल.
इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण झाली
की लोभ वाढतो. म्हणून जीवनाच्य
प्रत्येक स्थितीत धैर्य ठेवणे हीच श्रेष्ठता आहे.
आयुष्यभर सुख कमावून दरवाजातून घरी आणण्याचा प्रयत्न करीत राहिलो, कळलंच नाही की केव्हा खिडक्यांमधून वय निघून गेलं.!
प्रत्येक दिवशी नवीन शिकण्याची संधी मिळते.
त्याचा फायदा तीच घेते जिला जीवनात काहीतरी मिळवायचं असतं.
यशस्विता नेहमी चांगल्या विचारांतून येते,
चांगले विचार नेहमी चांगल्या विचार असणाऱ्या माणसांच्या संगतीतून येतात!
माणसाची इच्छा आहे की उडायला पंख मिळावेत
आणि पक्षी विचार करतात की राहायला घर मिळावं.
चांगले काम करत रहा,
कोणी सन्मान करो या ना करो.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात.
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…
छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.
जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व
असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली,
यावरुन तुमची श्रीमंती कळते
यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.
जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.
प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते,
कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन
दवाखान्यात खूप महाग विकला जातो.
तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही
तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.
एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी
खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.
रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर;
रिकामं डोकं आणि रिकामे मन यशाच्या मार्गात अडसर बनते.
तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने
जगाला दाखवून द्या,
तरच जग तुम्हाला ओळखेल.
संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे
उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.
Meaningful life quotes in marathi
तुम्ही किती जगलात,
ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
“आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका …
कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही”
हे वाचा: फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
जेव्हा आपली माणसं आपल्यासोबत असतात!!
समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात
आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन,
आणि आकाशात नझर लावून तिथे चमकणारी
माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन.
पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो.
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही.
यालाच खरे आयुश्य म्हणतात.
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.
इतरांशी प्रामाणिक राहण कधीही
चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहणं
सुद्धा तितकच चांगलं असतं.
शहाण्या माणसाच्या आयुष्याचा उत्तरार्ध त्याने पूर्वार्धात गोळा
केलेले पूर्वग्रह, चुकीच्या समजुती
आणि चुकांना दुरुस्त करण्यात व्यग्र असतो.
आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.
तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.
Inspirational Life Quotes In Marathi
तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही,
इतरांचं अनुकरण कमी कराल आणि
अधिताधिक स्वत:सारखे बनक जाल.”
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.
ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे.
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.
जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक फक्त एवढाच असतो,
“कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं”…!!
आज आपण जीवनावर आधारित मराठी लाईफ कोट्स (Marathi Life Quotes ) पाहणार आहोत. तसेच marathi quotes on life and love, life quotes in marathi text, good quotes on life in marathi, happy life quotes marathi सुद्धा पाहणार आहोत.
जीवनात काहीतरी करून दाखवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण काही अडचणी काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. जीवनात अनेक चढाव आणि उतार येतात. पण आपण जिद्दीने पुढे गेले पाहिजे आणि आपले यश मिळवले पाहिजे.
Marathi Life Quotes | मराठी जीवन सुविचार
आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.
वर्तमानात राहून भविष्याचा विचार
करायला शिका.
पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.
जगण्यासाठी काम करा
फक्त काम करण्यासाठी जगू नका.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात,
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते
तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल.
वेळ आला आहे तर घाम गाळा,
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
थेंब कितीही छोटा असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची धमक असते.
तुमच्या मेहनतीचे फळ
तुम्हाला नक्की मिळेल,
फक्त रोज कष्ट आणि
कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
हे वाचा: Postman – Our Friend Story In Marathi (मराठी कथा)
ध्येय एवढं मोठे ठेवा की,
समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.
राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.
जीवनात तेच लोक यशस्वी होतात,
ज्यांना बघून लोकांना वाटतं
हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.
निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या
एका हत्यारानंही काम करू शकतो,
पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा
संच असूनही तो काम करू शकत नाही.
गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.
तुमच्याकडे वेळ फार कमी आहे
तेव्हा कोणा दुसऱ्याचं
आयुष्य जगणं सोडून द्या.
Positive life quotes in marathi
प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत.
होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा
पुढे काय करायचंय याचा विचार करा.
तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील
तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड हवेत.
जगासमोर हरलात तरी चालेल
पण स्वतःच्या मनात स्वतःला
कधीही हरलेलं समजू नका.
लोक काय म्हणतील?
पहिल्या दिवशी हसतील,
दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील,
तिसऱ्या दिवशी विसरून जातील,
त्यामुळे लोकांचा विचार करू नका.
तुम्हाला जे करायचंय तेच करा.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
माणसाला अलार्म नाही
तर जबाबदाऱ्या जागं करतात.
माणसानं स्प्रिंगसारखं असावं,
जेवढं दाबलं जाईल,
तेवढं उसळून वर यावं.
जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत
त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.
जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन
आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.
जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि जे शेवपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.
सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू,
असा विचार केला तर तुम्ही कधीच
प्रारंभ करू शकणार नाही.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदरानं झुकतात.
प्रश्न सोडण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत
यावर आपण जास्त भर दिला पाहिजे.
आयुष्यात खूप काही मिळतं,
आपण तेच मोजत बसतो
जे मिळालं नाही.
जर तुम्हाला महान बनायचं असेल,
तर जगाच्या विचारसरणी प्रमाणे
जगणे सोडून द्या.
जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.
जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत,
मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.
कोणताही बिजनेस छोटा नसतो,
छोटी असते आपली मानसिकता.
श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका
क्षेत्रात सातत्याने मेहनत करावी लागते.
Heart touching life quotes in marathi
पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,
तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.
तुमच्या चाली रचण्याआधीच
त्या जाहीर करू नका.
व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,
तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.
पैसे मला प्रेरित करत नाही,
तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य
मला प्रेरित करत असते.
हे वाचा: मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!
जी माणसं निश्चयी असतात
त्यांना काहीच अशक्य नसतं.
मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते,
कमावलेली नाही,
आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात,
मागण्यासाठी नाही.
ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची
पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.
ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला,
त्यांचा मी खूप आभारी आहे;
त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी
स्वतः करू शकलो.
प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असावा.
यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो.
आयुष्य हे कवड्यांच्या खेळाप्रमाणे असते
तुमचा आवडता अंक नाही आला,
तर पुन्हा खेळावेच लागते.
नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा
कारण सोनाराचा कचरा सुद्धा
वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.
सगळे कागद सारखेच असतात,
फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं
सर्टिफिकेट होऊन जातं.
ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही,
पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही
खरी शोकांतिका आहे.
स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करताना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या,
नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची
इमारत बांधायला कामाला ठेवेल.
कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा
तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा.
नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला
असला तरी नारळ फोडल्याशिवाय
आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही.
हे वाचा: YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?
हे वाचा: Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!
हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.
दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.
सोन्याची पारख सोन कापून,
घासून आणि तापवून होते.
माणसाची पारख गुणाने,
त्यागाने आणि चारित्र्याने होते.
जेव्हा काही माणसांना
तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं
वाईट सांगायला सुरवात करतात.
जेव्हा तुम्हाला कुमकुवत पणा जाणवेल
तेव्हा सामर्थ्यवान व्हा.
जेव्हा घाबराल तेव्हा हिमंतवान व्हा,
आणि विजयी असतांना नम्र व्हा.
आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत
तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत
तुम्ही हे कसं केलंत.
कल्पनांना सत्यात उतरविण्याची
ज्यांच्यात धमक असते,
त्यांना कोणीच रोखू शकत नाही.
मी पाहिलंय, मला ते हवंय,
मी त्यासाठी मेहनत करणार
आणि ते मी मिळवणारच.
लोक काय म्हणतील याचा विचार करत जगलात,
तर आयुष्यभर त्यांचे गुलाम म्हणून जगाल.
स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं
अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.
खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो,
खरा योद्धा तो आहे जो नेहमीच लढायला
तयार असतो.
विश्वास इतरांवर इतका करा की,
तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.
स्वतः ठाम रहा,
कोणाचेही अनुकरण करू नका.
ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले
त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,
स्वतःला दोष द्या कारण
तुम्ही त्यांच्याकडून जास्त पॆक्षा ठेवल्या.
हरण्याची काळजी अन जिंकण्याची
महत्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून
लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो
आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही.
जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते
तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता
तुमचा हात रिकामा करीत असते.
हे वाचा: Good Morning Wishes Marathi (शुभ सकाळ मराठी शुभेच्छा)
काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी
सर्वात वाईट गोष्टींतून जावे लागते.
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या
गोष्टी विकत घेत असाल,
तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी
विकण्याची वेळ येणार आहे असं समजा.
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे जास्त महत्वाचे असतात.
रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,
सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.
जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याचा अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा
समोर बादशाह असेल.
आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही,
कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे,
तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.
आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून
तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.
फक्त जिंकणारच नाही तर,
कधी, कुठे काय हरायचं
हे जाणणारा सुद्धा सिकंदर असतो.
तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,
पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.
कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,
आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.
यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,
पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.
स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना
आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची
अजिबात पर्वा नसते.
कधी कोणाला समजवायचा
प्रयन्त करत बसू नका,
कारण माणसं तेवढंच समजतात
जेवढी त्यांची कुवत असते.
या जगात बोलणारे आणि
विचार करणारे खूप आहेत,
तुम्ही कृती करणारे व्हा.
चांगल्या वेळेची वाट पाहणे सोडून द्या,
कारण वेळ कधीच तुमची वाट पाहणार नाही.
डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर
नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.
जीवनात काही केलं नाही तरी चालेल
पण स्वतःवरचा विश्वास
मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.
हे वाचा: Happy Birthday Wishes In Marathi (वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह)
जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता
तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.
जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,
तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी
हजर राहण्याची.
माणसाची नीती चांगली असेल तर
मनात भीती उरत नाही.
हातचे सोडून पळत्याच्या मागे
कधीही लागू नये.
चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे
असतातच.
छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,
कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.
पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की
नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.
जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,
तर यशही हाताळू शकणार नाही.
Best Marathi Life Thoughts & Images
चांगल्या दिवसांची किंमत
वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
कळत नाही.
एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान पेलायची सवय झाली,
की आपली पावलं सुद्धा
आपोआप संघर्ष करू लागतात.
अंथरून पाहून पाय पसरले कि
कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात
त्या नक्कीच संपतात.
जगात काहीच फुकट भेटत नाही
सल्ल्याशिवाय.
काय चुकलं हे शोधायला हवं
पण, आपण मात्र
कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो.
आळशी माणूस
कामाच्या विचारानेही थकतो.
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
पण सुरवात माझ्यापासून कर.
हृदयात खूप जागा होती
पण काय करणार काही लोकांना
डोक्यात बसायला जास्त आवडतं.
नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने आलेले
हात वापरा.
बारशाला घरातले आणि
इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात.
समजूतदार लोक कधी भांडत नाहीत
फक्त आग लावून बाजूला होतात.
मी संकटाना कधीच शोधत नाही
पण त्यांनाच मी सापडतो.
हे वाचा: नववर्षाभिनंदन मराठी शुभेच्छा संदेश (Happy New Year Marathi Wishes)
आजकाल बाईकवर मुलांच्या मागे
मुली अश्या बसतात जणू
विक्रमादित्याला वेताळ लटकला आहे.
प्रत्येकाने आपल्या चुकांना
दिलेलं नाव म्हणजे अनुभव.
मन मोकळे असणे कधीही चांगले,
परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका.
हातपाय न हळवता मिळालेल्या
पैश्याला लगेच पाय फुटतात.
माणूस म्हणतो,
पैसा आला की मी काही तरी करेन
पैसा म्हणतो,
तू काहीतरी कर मगच मी येईन.
माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते
विश्वासघात करणाऱ्याला नाही.
त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू नका
ज्याने तुमच्यासाठी पूर्ण दुनियेला इग्नोर केलं.
नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोर
कायमस्वरूपी नसतो,
काळ संपला की पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो.
सोडून देऊ नका
कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात
शेवटची चावी त्या कुलुपाची असते.
हे वाचा: Friendship Quotes in Marathi
नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की
हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते.
काही नाही या शब्दामागे
खूप काही लपलेलं असतं.
आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात,
ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.
मनातलं जाणणारी आई
आणि भविष्य ओळखणारा बाप
म्हणजे जगातील एकमेव ज्योतिष.
मला इगो सोडायचाय
पण त्यातही इगो आड येतो.
Success life quotes in marathi
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे
पण त्याची फी आपल्याला परवडत नाही.
विषय किती वाढवायचा,
कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं
हे ज्याला जमते,
तो जगातील कुठल्याही
परिस्थितीवर मात करू शकतो.
कष्ट इतक्या शांततेत करावे
की यश धिंगाणा घालेल.
जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे,
जर दिशा योग्य नसेल तर
वेगाचा काहीच उपयोग नाही.
हे वाचा: Marathi WhatsApp Status (51+ व्हॉट्सअँप मराठी स्टेटस)
भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा
थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट?
जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर
मेंदू संपावर आहे हे नक्की.
अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या,
कि अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटेल.
जगणं सोपं आहे
फक्त काड्या करणाऱ्याच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !
आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
एकवेळ माणूस बोलून कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा.
मी सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवतो,
कारण कधी कधी गटारातले पाणी पण
आग विझवायचं काम करते.
हे वाचा: 100+ Instagram Marathi Attitude Captions
झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
संसार असाच असतो
लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून
चूल पेटवायची थांबवायचं नसतं.
जीवनात दरी निर्माण झाली म्हणून
आपण खोल खोल जायचं नसतं
ती दरी पार करायची असते.
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
माणसाला एखादी गोष्ट
करायची असेल तर मार्ग सापडतो,
आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.
संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.
तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.
शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर का घेतले तर
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो.
ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक
आपला विचार सुरु करतील.
तुम्हाला हे जीवनावर आधारित मराठी कोट्स (Life Quotes in Marathi) कसे वाटले. ते कमेंट्स द्वारे नक्की सांगा. तसेच अश्याच मराठी स्टेटस, मराठी माहिती साठी क्रिएटर मराठी वेबसाईट ला जोडून रहा
One thought on “Life Quotes in Marathi | Marathi quotes on life and love – जीवन मराठी स्टेटस आणि सुविचार”