Mutual fund investment benefits in marathi
तुम्हाला सुद्धा म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे. मग चला, आज तुम्हाला सांगतो म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे १० फायदे ते ही आपल्या मायबोलीत. Mutual fund investment benefits in marathi
प्रत्येक व्यक्तीला गुंतवणुक केल्यानंतर काही महिन्यात किंवा काही वर्षात चांगला परतावा मिळावा असे वाटत असते. बाजारात अश्या अनेक योजना आहेत. ज्यातून आपल्याला चांगला परतावा मिळतो. त्यांपैकी एक चांगल्या गुंतवणुकीचे साधन आहे Mutual Fund. गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड कशासाठी आवश्यक आहे या बद्दल संपूर्ण माहिती ह्या लेखात जाणून घेऊया.
तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे कोणते फायदे होतात. ह्या बद्दल सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊया. अशीच Finance बद्दल माहिती मराठी भाषेत जाणून घेण्यासाठी Creator Marathi ला नक्की भेट द्या.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे! | Mutual Fund Investment Benefits in Marathi
१. योजनांची विविधता
गुंतवणुक करणाऱ्याच्या विविध गरजा असतात. ह्या सर्व गरजांचा विचार करून म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजना तयार केल्या आहे. भारतात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. ज्या गुंतवणूकदारांसाठी अनेक चांगल्या प्रकारच्या योजना उपलब्ध करून देतात.
गुंतवणूकदारांच्या Short Term, Long Term अश्या कालावधीतील गरजा लक्षात घेऊन म्युच्युअल फंड योजना तयार जातात.त्यामुळे गुंतवणुक करणाऱ्यांना हव्या त्या योजना निवडता येतात.
इक्विटी फंड (Equity Fund), Debt Fund, हायब्रिड फंड, गोल्ड फंड (Gold Fund), सेक्टर फंड (Sector Fund), ईएलएसएस फंड (ELSS) या कॅटेगरी मध्ये म्युच्युअल फंड योजना विभागल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार योग्य त्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो.
२. तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकादारांनी गुंतवलेल्या रक्कमेच्या योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक म्युच्युअल फंड हाउस मध्ये मॅनेजर नेमलेला असतो. तसेच मॅनेजर ला योग्य ती मदत करण्यासाठी रिसर्च टीम आणि व्यावसायिक तज्ञ नेमलेले असतात.
हे नक्की वाचा :- 500+ Marathi Youtube Channel Name Ideas 2023 | मराठी युट्यूब चॅनल ची नावे
ही रिसर्च टीम आर्थिक बाजारपेठेवर योग्य ते लक्ष ठेवून असते. ही रिसर्च टीम वेगवेगळ्या क्षेत्रात आणि कंपन्यांमधील सध्याचे आणि येणाऱ्या काळातील ट्रेंड्स यांचे बारकाईने संशोधन करत असते. याबद्दल सविस्तर माहिती ते फंड व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजरला देतात.
मॅनेजर या अहवालाचा अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घेतात. गुंतवणूक केलेल्यांना योजनेतून जास्तीत जास्त प्रमाणात परतावा मिळवून देण्यासाठी फंड मॅनेजर योग्य ते निर्णय घेतात. आणि योग्य ती उद्दिष्टे नेमतात.
३. कमी जोखीम
म्युच्युअल फंड च्या मार्फत गुंतवणूकदार वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणुक करू शकतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळतात. ज्याचा फायदा गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला जास्त प्रमाणात होतो. तसेच जर एखाद्या योजनेत चांगला परतावा मिळत नसेल, तर दुसऱ्या योजनेच्या चांगल्या कामगिरीचा फायदा घेता येतो. त्यामुळे गुंतवणूकीवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच जोखीम कमी राहते.
हे नक्की वाचा :- Attitude Status In Marathi | 200+ हटके एटीट्यूड स्टेटस मराठी
म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणुकदारांनी केलेली गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतवणुक करते. म्हणजे तुम्ही कितीही रक्कम गुंतवली असेल. तर त्या रकमेमधील थोडी – थोडी रक्कम अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवली जाते. तसेच फंड मॅनेजर या गुंतवणुकीची प्रत्येकवेळी पडताळणी करतो. ज्यामुळे फंड मॅनेजर हा नेमलेला असतो.
४. खर्च कमी येतो
स्टॉक मार्केट मध्ये जास्त रक्कम गुंतवणूक करावी लागते. तसेच त्या रक्कमेचा योग्य तो परतावा मिळेल. की नाही ह्याची खात्री नसते. पण म्युच्युअल फंड मद्ये महिन्याच्या गुंतवणूकीवरून आपण योग्य ती रक्कम परत मिळवू शकतो. तसेच स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी मध्ये खर्च कमी येतो.
५. १००, ५०० रुपयांपासून गुंतवणूक
जर तुम्हाला जास्त पैसे गुंतवायचे नसतील. तर तुम्ही सुरुवातीला कमी पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंडा मध्ये तुम्ही एसआयपी (SIP) द्वारे दर महिन्याला अगदी कमी किंमत गुंतवू शकता. कमीत कमी १०० रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता.
तसेच ५०० रुपये सुद्धा तुम्ही दर महिन्याला SIP द्वारे गुंतवून तुमची योजना चालू ठेवू शकता. भविष्यातील उपयोगी योजनांचा विचार करून गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मद्ये गुंतवणूक करू शकतो.
६. कर बचत
म्युच्युअल फंडांतील कर वाचवण्यासाठी अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत. ELSS आणि इक्विटी लिंक्ड सेविंग्स स्कीममध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकादारांना त्यांची कर बचत करता येते. ईएलएसएस योजनांचा लॉक-इन पिरीयड हा ३ वर्षांचा दिलेला असतो.
जर तुम्ही ह्या योजनेत गुंतवणूक केलात तर तुम्हाला ३ वर्ष एकही पैसा काढता येणार नाही. ईएलएसएस मध्ये गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणुकीवर दरवर्षी दीड लाख रुपयांची कर सवलत मिळते. ज्यामुळे आपला खूप फायदा होतो.
7. SEBI, AMFI ह्या सरकारी संस्थांचे योग्य नियंत्रण
म्युच्युअल फंडात भारतीय सरकारने योग्य ते संरक्षण ठेवण्यासाठी काही संस्था नियुक्त केल्या आहेत. ज्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकादारांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडते. सेबी म्हणजेच Security & Exchange Board of India (SEBI) आणि Association of Mutual Funds of India (AMFI) ह्या सर्व म्युच्युअल फंडांची नोंदणी करतात.
तसेच त्यांच्या वर योग्य ते लक्ष ठेवते. सेबी सर्व म्युच्युअल फंडांच्या कार्याची तपासणी करते. म्युच्युअल फंड कंपन्यांना आपल्या योजनांचा कार्य अहवाल नियमीतपणे प्रकाशित करणे बंधनकारक आहे. हा अहवाल SEBI आणि AMFI कंपनी मार्फत सादर केला जातो.
8. गुंतवणूक करणे अगदी सोयीस्कर
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. कारण mutual fund च्या योजना खूप चांगल्या आणि फायद्याच्या आहेत. म्युच्युअल फंड वितरक, ब्रोकर यांच्या तर्फे तुम्ही म्युच्युअल फंड मद्ये गुंतवणूक करू शकता. तसेच थेट त्या म्युच्युअल फंड कंपनीकडून तुम्ही योजने मध्ये गुंतवणूक करू शकता.
- हे नक्की वाचा :- Share Market Tips in Marathi | शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!
डिजिटल क्रांती मुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आजुन सोयीस्कर झाले आहे. आता आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा Mutual Funds मध्ये गुंतवणूक म्हणजेच investment करू शकतो. Grow, Zerodha, UpStox सारखे अनेक म्युच्युअल फंड invest ॲप आहेत.
ज्या मार्फत तुम्ही ऑनलाइन गुंतवणूक करू शकतो. तसेच ह्यामुळे तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ सुद्धा वाचवू शकता. Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणते ॲप चांगले आहेत? त्याबद्दल माहिती जाणून घ्या.
9. कधीही पैसे काढता येतात (वेळेची मर्यादा नाही)
गुंतवणुकदार हव्या त्या वेळी सहजपणे त्याच्या गरजेसाठी पैसे काढू शकतो. ही सुद्धा mutual fund मध्ये खूप उपयोगी ठरते. म्युच्युअल फंडच्या ओपन एंडेड (Open Ended) योजनांमध्ये आपण कधीही गुंतवणूक सुरू करू शकतो. तसेच आपल्या गरजेनुसार आपण कधीही पैसे काढू शकतो. पैसे काढण्याची ऑर्डर नोंदवल्यानंतर २-३ दिवसात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे हा लेख तुम्ही नक्कीच वाचला असेल. हा लेख वाचून तुम्हाला समझले असेल, की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करून तुम्ही तुमची साइड इन्कम तयार करू शकता. तसेच मराठी भाषेत उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या Creator Marathi वेबसाईट ला नक्की भेट द्या.
5 thoughts on “म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे! | Mutual fund investment benefits in marathi”