make money online from YouTube in Marathi

YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

How to make money online from YouTube in Marathi

भारतात इंटरनेट चा वापर सुरू झाल्यापासून अनेक सोशल मीडिया ऍप चा वापर वाढला. त्यातच अनेक भारतातील लोकं गूगल आणि यूट्यूब चा वापर खूप वाढत आहे. तसेच यूट्यूब चा वापर करून अनेक जणांना अनेक माहिती उपलब्ध आहे. यूट्यूब हे Video Sharing Platform आहे. यूट्यूब वर व्हिडिओ अपलोड करून लाखो रुपये कमवता येतात.

पण यूट्यूब वर व्हिडिओ अपलोड करून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? (How to make money online from YouTube in Marathi) ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

यूट्यूब म्हणजे काय? (What is Youtube in Marathi?)

YouTube information in Marathi

यूट्यूब हे एक मोबाईल वेब ऍप आहे. गूगल कंपनीचे यूट्यूब हे प्रॉडक्ट आहे. यूट्यूब वर व्हिडिओ अपलोड केल्या जातात. तसेच आपण आपल्या Gmail अकाऊंट ने यूट्यूब वर लॉगिन करून किंवा न लॉगिन करता व्हिडिओ पाहू शकतो. YouTube हे Video Sharing Platform आहे.

यूट्यूब वर जगभरातील अनेक व्हिडिओज अपलोड केले जातात. मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरून आपण यूट्यूब वरील व्हिडिओज पाहू शकतो. गूगल नंतर यूट्यूब ही वेबसाईट दुसऱ्या नंबर वर येते.

यूट्यूब दर दिवसाला अनेक व्हिडिओज अपलोड केले जातात. यूट्यूब अनेक असे यूट्यूब चॅनल आहेत. ज्यांना रोज अनेक लोक फॉलो करतात व त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होतात.

हे नक्की वाचा:-

» Instagram वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

» Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!

यूट्यूब वरून ऑनलाईन पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामधील आपण मार्ग जाणून घेऊया. तसेच यूट्यूब वरून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी आपल्या कडे एखादे यूट्यूब चॅनल असणे गरजेचे आहे.

1 . एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

Affiliate Marketing हा खूप चांगला पर्याय आहे लगेच पैसे कमावण्याचा. ह्यासाठी आपल्याला Affiliate Program मध्ये स्वतःचे अकाऊंट तयार करावे लागते. इंटरनेट वर अनेक वेबसाइट्स आहेत ज्या Affiliate Program सेवा उपलब्ध करून देते. Amazon, Flipkart, RazorPay, Hostinger, Bluehost अश्या अनेक वेबसाइट्स आहेत. ह्या वेबसाईट वरून आपण affiliate program मध्ये अकाऊंट बनवून पैसे कमवू शकतो.

जेव्हा आपण affiliate program मध्ये अकाऊंट बनवतो, तेव्हा आपल्याला एक affiliate link मिळते. ती लिंक आपण यूट्यूब चॅनल च्या description मध्ये देऊन त्यावरून जेव्हा कोणी काही खरेदी करतं तेव्हा आपल्याला त्यामधील काही टक्के कमिशन मिळते. जितकी जण खरेदी करणार तितकं तुम्हाला कमिशन मिळते.

2. Sell Courses

जर तुमचे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल इन्फॉर्मेशन देणारे असेल. तर तुम्ही Udemy Upgrade, Coursera ह्या वेबसाईट वरील कोर्स यूट्यूब चॅनल वर विकून पैसे कमवू शकता. यूट्यूब चॅनल च्या description मध्ये लिंक देऊन तुम्ही कोर्सेस विकू शकता.

3. स्पॉसरशिप (Sponsership)

स्पॉसरशिप हे एक सर्वोत्तम माध्यम आहे यूट्यूब वर ऑनलाईन पैसे कमावण्याचा. ह्यासाठी आपल्याला काही कंपनीशी संपर्क साधून त्यांचे प्रॉडक्ट्स किंवा त्यांची जाहिरात करून आपल्याला त्यांच्या कंपनीच्या बद्दल सांगायचे लागते. तसेच असे केल्याने ती कंपनी आपल्याला काही ठराविक पैसे देते.

फक्त तुमच्या यूट्यूब चॅनल वर जास्तीत जास्त 10,000 फॉलोवर्स असणे गरजेचे आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकं ते प्रॉडक्ट्स पाहू शकतील व खरेदी करतील.

» मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!

4. गूगल अ‍ॅडसेन्स (Google Adsense)

गूगल अ‍ॅडसेन्स हे गूगल कंपनीचे प्रॉडक्ट आहे. तसेच Google AdSense हे मॉनीटायझेशन वर चालणारी सेवा आहे.यूट्यूब वरून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे. यूट्यूब चॅनल चे Google AdSense वर अॅप्रोवल मिळण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याकडे गूगल अ‍ॅडसेन्स अकाऊंट असणे गरजेचे आहे.

गूगल अ‍ॅडसेन्स अकाऊंट बनवून तुमचे यूट्यूब चॅनल approval साठी अर्ज करा. अर्ज स्विकारल्यानंतर तुमच्या यूट्यूब चॅनल वर Google Ads दिसण्यास सुरुवात होतील. त्यानंतर जेव्हाही कोणी तुमच्या यूट्यूब चॅनल वरील व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याला YouTube वरील Ads दिसतात. त्यानंतर त्या ads द्वारे तुम्हाला पैसे मिळतात. ते पैसे डॉलर मध्ये तुमच्या अ‍ॅडसेन्स अकाऊंट मध्ये जमा होतात.

नंतर महिन्याच्या 21 तारखेला ते पैसे तुमच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होतात. तसेच आपल्या चॅनल वर 1000 Subscribers आणि 4000 Watch Hours असणे गरजेचे आहे.

20+ Small Business Ideas In Marathi

Tip– यूट्यूब वरून ऑनलाईन पैसे कमावणे खूप सोप्पे आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तसेच तुम्हाला तुमचे काम रोज वेळच्या वेळी करावे लागेल.

YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? (How to make money online from YouTube in Marathi) ही Online Job ची माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच मराठी माहिती, ऑनलाईन जॉब्स आणि मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

~ Thank you for reading this article! ❤️

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts