postman aapla mitra marathi short story

Postman – Our Friend Story In Marathi | पोस्टमन – आपला मित्र (मराठी कथा)

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

नियमित अपडेट साठी फॉलो करा  Facebook | Instagram | Twitter | Sharechat


Postman-Our Friend Story In Marathi | पोस्टमन-आपला मित्र मराठी कथा:- पोस्टमन ला कोण ओळखत नाही..लहानापासून मोठ्यापर्यंत..आई पासून आजीपर्यंत..म्हातारा माणूस असो की कोणीही, पोस्टमन हा सर्वांचा ओळखीचा असतो. म्हणजेच आपला एक मित्रच असतो. जो आपली सेवा करतो व त्याबदली कधी पैसे सुद्धा घेत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणती सेवा? तर पत्र पाठवणे, लिहून देणे, कधीकधी काही पोस्टमन पत्र वाचून सुद्धा दाखवतात.

तर मित्रांनो व मैत्रिणींनो आजच्या लेखामध्ये तुम्हाला अशीच एक मराठी कथा वाचायला मिळेल. आम्ही मनापासुन विनंती करतो की तुम्ही तुमचा किमती वेळ काढून ही कथा मन लावून वाचावी व आवडल्यास आम्हाला कमेंट्स करून सांगा. तसेच व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम, फेसबुक वर शेअर करा.तर आजच्या कथेचे नाव [ पोस्टमन – आपला मित्र ] हे आहे.

चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करुया..

पोस्टमन – आपला मित्र

पोस्टमन हे नाव ऐकल्यावर प्रत्येकाच्या डोक्यात एकच कल्पना येते, ती म्हणजे खाकी गणवेश घातलेला, डोक्यावर खाकी टोपी आणि खांद्याला पत्रांनी भरलेली भलीमोठी बॅग घेऊन असलेला माणूस. म्हणजेच आपला मित्र पोस्टमन होय. उन्हा-तानाची पर्वा न करता, कधी खूप खूप किलोमीटर सायकल चालवून तर कधी मैलोमेल पायपीट करीत खेड्यापाड्यात तहानभूक विसरून प्रत्येक घरात पत्ररूपी सुख दुःखाची विभागणी करणारा हा साधा माणूस म्हणजे आपला पोस्टमन. कधी कुणाला पत्र वाचून चेहऱ्यावर आनंद आणायचा तर कधी कुणाच्या मुलाने शहरातून पाठवलेले पैसे त्यांच्या हाथी सोपवून त्यांना आनंदाचे क्षण देणारा दुसरा कोणीही नसून आपला मित्र पोस्टमन होय.

पूर्वीच्या काळी म्हणजेच साधारण ७०-८० च्या दशकात पोस्टमन हा अगदी आपल्या जिव्हाळ्याचा होता. त्याकाळी पोस्टमन जणू प्रत्येक घराचा सदस्यच बनला होता. कुणी त्यांना काका, कुणी दादा तर कुणी मामा म्हणायचे. घरातील महिला त्यांना आदराने चहा द्यायच्या. आणि ते ही प्रत्येकाशी आपुलकीने व आदरार्थी पणाने बोलायचे. घरात अशिशित व्यक्तींना त्यांची पत्रे वाचून दाखवणे अथवा शहरात राहणाऱ्या मुलास पत्र लिहून देणे व ते पोस्ट करणे. तसेच शहरातून मुलाने पाठवलेल्या मनी-ऑर्डरच्या पैशांची देवाणघेवाण सुद्धा ते व्यवस्थित रित्या पूर्ण करायचे.

पोस्टमन हा फक्त एवढ्या कामापुरता मर्यादित नव्हता, तर व्यापार, उद्योग, कार्यालयात सुद्धा त्यांचा दबदबा होता. पूर्वीच्या काळी चित्रपटांत पोस्टमन शी निगडित एखादे गाणे हमखास असायचे. ‘संदेसे आते हैं’, ‘चिठ्ठी आई हैं’, ‘डाकिया डाक लाया’ इत्यादी गाणी पोस्टमन वर चित्रित असायची. तसेच आजच्या काळात मराठी मधील गाजत असलेला कार्यक्रम म्हणजेच “चला हवा येऊ द्या” मध्ये कार्यक्रमात सागर कारंडे हा पोस्टमन ची भूमिका साकारतो. कार्यक्रमाच्या शेवटी एक भावनात्मक पत्र वाचून दाखवतो. ती पत्र सत्य परिस्थितीशी निगडित असतात. तसेच त्या पत्रांमधून एक संदेश दिला जातो जो खूप महत्त्वाचा असतो. तसेच मराठी मध्ये सुद्धा पोस्टमन वर आधारित चित्रपट आहेत.

असे काही मराठी चित्रपट आहेत. जे तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडतील.

तसेच हे सुद्धा वाचा :-
बिल गेट्स मराठी मोटिवेशनल कोट्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार
वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह
प्रेम कविता मराठी संग्रह

पण पुढे काळ झपाट्याने बदलत गेला. मनुष्याच्या जीवनात संगणकाने शिरकाव केला. त्यामुळे पत्र पाठवणे, तार पाठवणे हळू हळू कमी होऊ लागले, कारण आता प्रत्येक मनुष्याच्या जीवनात व्हॉट्सअँप (WhatsApp), ई-मेल (E-mail), फेसबुक (Facebook), ने प्रवेश केला होता. हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. ह्यावरून तुम्ही इंटरनेट चा वापर करून जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकता व चॅटिंग करू शकता. ह्यावरून तुम्ही फोटोज्, फाईल्स, डॉक्युमेंट्स, मेसेजेस, व्हिडिओज एकमेकांना पाठवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट चा वापर करावा लागतो. महिना महिना भर पत्राची वाट बघत ताटकळत राहावे लागत असे.मात्र व्हॉट्सअँप वरून व्हिडिओ कॉल करून तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. तसेच कॉल करून कुठूनही बोलता येत. ह्याचा खूप फायदा होत असल्यामुळे लोकांनी ह्याला प्राधान्य देणे सुरू केले. तसेच कुरिअर ने त्यांची नवीन सेवा आणली होती. त्यामुळे पत्र कुठे गायब झाले होते.

मात्र भारत सरकारने डबघाईस आलेल्या ह्या पोस्टाच्या उद्योगास भक्कम आधार दिला आणि त्यांनी बचत योजना, बिल भरणे केंद्र, आधार कार्ड सबंधित कामे, बॅंकेचे कार्ड तसेच इतर सरकारी कामांसाठी भर दिला. तसेच बहुतांश कामे आता पोस्टाच्या माध्यमाने होत असल्याने आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात पोस्टाचे अस्तित्व आजुन टिकून आहे.


Final Words

तुम्हाला Postman – Our Friend Story In Marathi | पोस्टमन – आपला मित्र मराठी कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा. तसेच आम्हाला सोशल मीडिया वर देखील फॉलो करा.

Thank You For Reading This Article & Keep Supporting! 

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “Postman – Our Friend Story In Marathi | पोस्टमन – आपला मित्र (मराठी कथा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *