डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार | Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

नमस्कार मित्रांनो.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार (Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi)
बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि त्यांचे महान सुविचार खरोखरच प्रेरणादायक आहेत, जर आपण या महान माणसाच्या विचारांना आपल्या जीवनात अंमलात आणले तर आपण आपल्या आयुष्यात खूप उंचीवर पोहचू शकतो. प्रेरणादायक सुविचारांचे वाचन केल्याने आपल्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. प्रेरणादायक सुविचारांचे वाचन केल्यास एखादी व्यक्ती प्रत्येक समस्येचा सामना अगदी सहजपणे करू शकते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडक्यात माहिती

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या भीमराव
आंबेडकर यांनी समाजातील उच्च-नीच बंद केले. यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे जीवन अतिशय संघर्षपूर्ण होते आणि त्यांनी भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान दिले, म्हणूनच त्यांना “आधुनिक भारताचा निर्माता” देखील म्हटले जाते.

सामाजिक समानतेसाठी संघर्ष करणारे, समाजसुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे मुख्य निर्माता डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदोर जवळ महू छावणी येथे झाला. हायस्कूल उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बडोद्याच्या महाराजाच्या मदतीने उच्च शिक्षण घेतले आणि शिष्यवृत्तीवर कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि कोलंबिया विद्यापीठातूनच पीएच.डी. ची पदवी घेतली,अभ्यास करण्यासाठी परदेशात गेलेले हे भारताचे पहिले अस्पृश्य होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार | Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

“तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


babasaheb ambedkar marathi thoughts
babasaheb ambedkar marathi thoughts

“संपूर्ण देशाला एका भाषेत बोलायला शिकवा, मग बघा काय चमत्कार घडतो ते.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“एखादा खरा प्रियकर
ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो
त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग?”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


Dr B R Ambedkar thought in Marathi
Dr B R Ambedkar thought in Marathi

“इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा,,
त्यांच्यातील सद्गुण शोधावे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


thoughts of babasaheb ambedkar in marathi
thoughts of babasaheb ambedkar in marathi

“ग्रंथ हेच गुरू आणि आई-वडील हेच परमेश्वर आहेत.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


““कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.””
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“करूणेशिवाय विद्या
बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“ह्या जगात स्वाभिमानाने ‘जगायला’ शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तेव्य केलेच पाहिजे,
जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा
*प्रामाणिकपणा* सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करू लागतात.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“मी अश्या ‘धर्माला’ मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“आकाशातील ग्रह तारे जर माझं ‘भविष्य’ ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ‘ध्येय’ असले पाहिजे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


babasaheb ambedkar Inspirational thoughts
babasaheb ambedkar Inspirational thoughts

“स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


““माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.””
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


dr ambedkar yanche marathi suvichar
dr ambedkar yanche marathi suvichar

“शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो”.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“माणसांशी चांगले वागा..मदत करा..माणूस जपा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“जीवन लांब नाही तर महान असायला हवे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“पती – पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असणे आवश्यक आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


babasaheb ambedkar marathi suvichar
babasaheb ambedkar marathi suvichar

“लोकशाही म्हणजे ‘प्रजासत्ताक’ किंवा ‘संसदीय’ सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“*बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे*”.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


““एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.””
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“माणसाने आपल्या कर्मा वर विश्वास ठेवावा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“वाचाल तर वाचाल.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या ‘स्वातंत्र्यासाठी’ लढले पाहिजे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“तिरस्कार माणसाचा नाश करतो.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेल.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी कोट्स

“बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


““वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.””
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


babasaheb ambedkar yanche marathi thoughts
babasaheb ambedkar yanche marathi thoughts

“तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


आपल्याला तर माहीतच आहे.. दरवर्षी १४ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. त्या जयंतीनिमित्त आपण ह्या विचारांना आपल्या जीवनात लागू करू शकतो. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार आपल्याला जिवनात एक नवीन उत्साह देतो.

अश्या या महामानवाला क्रिएटर मराठी टीम कडून मानाचा मुजरा.. आम्ही आजच्या लेखात तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आणले आहेत, आम्ही आशा करतो तुम्हाला आवडले असतील. आवडल्यास या लेखाला आणि या महान विचारांना आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करायला विसरू नका. व ह्या लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करू. आणि आम्हाला देखील सोशल मीडिया वर फॉलो करा. रोजच्या अपडेट्स साठी.

Energetic Attitude Status In Marathi

Thank You For Reading This Article & Keep Supporting ! ❣️

 

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

3 thoughts on “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार | Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *