Amazon कंपनी बद्दल संपूर्ण माहिती | Amazon Information in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Amazon Information in Marathi :- आज आपण इंटरनेट वर लोकप्रिय असलेल्या अमेझॉन कंपनी बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये (Amazon Information in Marathi) जाणून घेणार आहोत. तसेच अमेझॉन कंपनीचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत.

अमेझॉन ह्या कंपनी बद्दल आजच्या काळात खूप कमीच लोकं असतील ज्यांना Amazon हे नाव माहिती नाही. कारण Amazon ह्या कंपनीने जगभर नाव कमावले आहे. अमेझॉन ही कंपनी काय आहे? कश्या प्रकारे कार्य करते? कंपनीची स्थापना, इत्यादी माहिती आपण जाणून घेऊया.

अमेझॉन कंपनी काय आहे? (Amazon information in Marathi)

अमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी आहे. Amazon.com ही ह्या कंपनीची अधिकृत वेबसाईट आहे. पुस्तके, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल फोन्स, ग्रोसेरी, कपडे इत्यादी गोष्टी ऑनलाईन पद्धतीने अमेझॉन.कॉम ह्या वेबसाईट वरून ऑर्डर करू शकतो. अमेझॉन ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि चांगली सुविधा देणारी ई कॉमर्स कंपनी आहे.

अमेझॉन ह्या कंपनीची सुरुवात व स्थापना जेफ बेझोस ह्यांनी केली होती. ह्या कंपनीची स्थापना ५ जुलै, १९९४ साली झाली होती. वॉशिंग्टन येथील एका Garage मधून ह्या कंपनीची सुरूवात झाली होती. सुरुवातीला ही कंपनी फक्त ऑनलाईन पुस्तके (Books) विकायची. तेव्हा कंपनीचे नाव Cadabra असे होते. थोड्या वर्षांनी त्यांनी हे नाव बदलून Amazon असे ठेवले.

हे सुद्धा वाचा:

त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये वस्तू ऑनलाईन विकायला सुरू केल्या. जेफ बेझोस ह्यांना त्यांच्या वेबसाईट वर “The Everything Store” बनवायचे होते. त्यानंतरही प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांना यश सुद्धा मिळाले. आता जगातील सर्वात फेमस ऑनलाईन स्टोअर पैकी अमेझॉन हे पहिल्या नंबर वर आहे.

अमेझॉन कंपनी बद्दल संपूर्ण माहिती (Amazon Company information in Marathi)

Amazon Company information in Marathi
Amazon Company information in Marathi

अमेझॉन ही कंपनी इंटरनेट वर असून ह्या कंपनीचे स्वतःचे असे मार्केट किंवा दुकान नाही आहे. इंटरनेट च्या दुनियेत अमेझॉन कंपनीची Amazon.com ही वेबसाईट ऑनलाईन शॉपिंग मध्ये नाव कमावत आहे. अमेझॉन ही फक्त ई कॉमर्स वेबसाईट नसून क्लाउड कम्प्युटिंग, अमेझॉन पे, अमेझॉन प्राईम विडिओ, सारख्या सुविधा सुद्धा देते.

अमेझॉन ह्या कंपनीचे माजी सीईओ (CEO) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. Amazon कंपनीची कमाई amazon वेबसाईट वरून विकल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्स च्या कमिशन मधून मिळते. तसेच ही कंपनी कधीच कोणत्याही प्रॉडक्ट चे उत्पादन करत नाही.

हे सुद्धा वाचा: फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

इतर प्रोडक्शन कंपन्यांकडून प्रॉडक्ट विकत घेऊन किंवा फक्त स्वतःच्या वेबसाईट वर ऑनलाईन display करून. त्यानंतर जेव्हा एखादा कस्टमर ते विकत घेतो, तेव्हा अमेझॉन ला पैसे मिळतात. अमेझॉन ची ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट व्यवस्थित आणि आकर्षक असल्यामुळे सामान्य लोकांना ऑनलाईन शॉपिंग करणे.

तसेच हवे असलेले प्रॉडक्ट ऑनलाईन सर्च करणे सोप्पे बनते. अमेझॉन कंपनी प्रॉडक्ट्स ची डिलिवरी वेळेवर करते. तसेच त्यांनी Amazon Prime ही सुविधा सुरू केली आहे. त्यामध्ये जर तुम्ही ही सुविधा घेतली असेल तर, तुमचे प्रॉडक्ट त्याच दिवशी डिलिव्हर होते व डिलिव्हरी चार्जेस सुद्धा द्यावे लागत नाहीत.

तसेच जर कोणतेही डिलिव्हर झालेले प्रॉडक्ट खराब असेल किंवा वेगळे असेल, तर ते रिटर्न पॉलिसी अंतर्गत परत सुद्धा करत येऊ शकते. CoD (Cash On Delivery), Net Banking, UPI, Debit/Credit Cards सारख्या ऑनलाईन पेमेंट सेवा दिलेल्या आहेत. त्यामुळे शॉपिंग करणे सोपे झाले आहे.

Amazon ह्या कंपनीचे मुख्यालय (headquarter) Seattle, Washington, United States येथे आहे. ह्या कंपनीचे सीईओ हे जेफ बेझोस होते. परंतु 2021 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर Andy Jassy ह्यांनी सीईओ पदाचा कारभार सांभाळला आहे. तसेच Jeff Bezos हे एक्झिक्युटिव्ह चेअरमन (Executive Chairman) ह्या पदावर कार्यरत आहेत.

अमेझॉन कंपनी B2C म्हणजेच Business 2 Consumer प्रॉडक्ट विकते. अमेझॉन ची वेबसाईट 24 तास चालू असते. त्यामुळे तुम्ही कधीही शॉपिंग करू शकता. तसेच तुम्ही Amazon affiliate program मार्फत अमेझॉन कंपनीचे प्रॉडक्ट विकून, त्यामार्फत कमिशन मिळवू शकता.

अमेझॉन वेबसाईट वर अनेक ऑनलाईन सेल्स चालू असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असे सेल्स दर महिन्याला चालूच असतात. “Great Indian Festival Sale” ही भारतातील दिवाळी, होळी, रक्षाबंधन, ह्या सणांना सुरू केली जाते. आजुन कोण कोणत्या सेल्स असतात. त्याबाबत खाली जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा: फ्रीलान्सिंग म्हणजे काय? Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

तसेच तुम्हाला हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे. Amazon ह्या कंपनीचे जगभर मार्केट आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक देशात वेगवेगळी वेबसाईट आहे. www.amazon.com ही त्यांची कंपनी वेबसाईट आहे. तर भारतातील वेबसाईट साठी www.amazon.in ही वेबसाईट आहे.

कॅनडा साठी www.amazon.ca, तर ऑस्ट्रेलिया साठी www.amazon.com.au हे डोमेन आहे.

अमेझॉन वेबसाईट वरील ऑनलाईन शॉपिंग सेल्स ची नावे

  1. The Amazon Republic Day
  2. Great Indian Festival Sale
  3. Amazon Diwali Sale
  4. Amazon Prime Day Sale
  5. Amazon Great Indian Sale
  6. Amazon Freedom Sale
  7. Women’s Day Sale
  8. Holi Sale
  9. Festive Season Sale
  10. Summer Appliance Dhamaka
  11. Back To School Sale
  12. Wardrobe Refresh Sale
  13. Amazon Valentine’s Day Sale
  14. Home Shopping Sale

हे सुद्धा वाचा: जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!

अमेझॉन कंपनी द्वारे प्रत्येक क्षेत्रात दिलेल्या सेवा

  1. Supermarket
  2. Self-driving cars
  3. Digital Distribution
  4. Consumer Electronics
  5. OTT Services
  6. Artificial Intelligence
  7. Cloud Computing
  8. AWS
  9. E-commerce

हे सुद्धा वाचा: महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती

अमेझॉन कंपनीचे प्रॉडक्ट्स आणि सेवा (Amazon Company’s Products)

अमेझॉन कंपनीबद्दल आपण वर संपूर्ण माहिती जाणून घेतली. तरीही आजुन खूप माहिती जाणून घेणे बाकी आहे. अमेझॉन ही कंपनी फक्त ई कॉमर्स कंपनी नसून, ही कंपनी Amazon Prime, Amazon App Store, Amazon Prime Video, अश्या सेवा सुद्धा देते.

जगभरात ऑनलाईन मूव्हीज, वेब शोज चे प्रमाण वाढत असल्यामुळे Netflix सारख्या बिग OTT Platform ला competition देण्यासाठी त्यांनी Amazon Prime Video ही OTT सेवा सुरू केली.

अमेझॉन कंपनीच्या इतर प्रॉडक्ट्स आणि सेवा, खालीलप्रमाणे;

1. Amazon Prime Video – ह्या सेवेमध्ये ऑनलाईन मूविज, वेब सिरीज, वेब शोज ऑनलाईन पाहता येऊ शकतात. ही एक OTT सर्व्हिस आहे. महिन्याचे किंवा वर्षाचे सबस्क्रिपशन विकत घेऊन अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर इंटरनेट च्या मदतीने वेब सिरीज किंवा चित्रपट पाहू शकतो. तसेच Amazon ची Amazon Prime Video ही प्रायव्हेट कंपनी United States मधली दुसऱ्या क्रमांकाची Employer असलेली कंपनी आहे. तसेच ह्यांचे 200 मिलियन सबस्क्राईबर्स आहेत.

हे सुद्धा वाचा: 200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस

2. Amazon App Store – अमेझॉन ॲप स्टोअर हे अँड्रॉइड साठी बनवले आहे. परंतु हे ॲप स्टोअर अमेझॉन च्या Fire OS साठी बनवलेले आहे. ह्या App Store वर सर्व पॉप्युलर ॲप्स उपलब्ध आहेत. तसेच Google Play Store आणि Apple App Store सारखेच हे Amazon App Store आहे. हे ॲप स्टोअर मार्च 22, 2011 मध्ये लॉन्च करण्यात आले होते.

3. Amazon Alexa – अमेझॉन अलेक्सा जगभरासह भारतात सुद्धा प्रसिद्ध आहे. इंटरनेटवर चालणारी ही Alexa एक कमांड दिली, की आपले कोणतेही काम लगेच ऐकू शकते. Alexa प्रत्येक भारतीय भाषेत बोलू शकते व कार्य करू शकते. Alexa हे कॉम्प्युटर रोबोट आहे, ज्याला काही कमांड दिली की ते काम करते.

4. Amazon Music – इंटरनेट वर सर्व ऑनलाईन ऐकू शकतो. मग मराठी, हिंदी, इंग्लिश साँग्ज ऑफलाईन का? तर अमेझॉन म्युजिक वर ऑनलाईन साँग्ज ऐकू शकतो. तसेच Amazon Music वर ऑनलाईन गाणी ऐकण्यासाठी Amazon Prime सबस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे.

5. Amazon Kindle – इंटरनेट च्या दुनियेत लायब्ररी मध्ये जाऊन पुस्तके वाचायला प्रत्येकाला वेळ नसतो. त्यामुळे Amazon Kindle वरून ऑनलाईन पुस्तके वाचू शकतो व नवीन प्रकाशित झालेली पुस्तके सुद्धा वाचू शकतो. लहान मुलांसाठी सुद्धा Kindle वर अनेक पुस्तके आहेत. शिक्षणाची तसेच गमतीशीर पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा: YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

6. Amazon Audible/Podcast – काही जणांना पॉडकास्ट ऐकायची खूप सवय असते. Amazon Audible वर ऑनलाईन पॉडकास्ट फ्री मध्ये ऐकू किंवा तयार करू शकतो. हे खूप लोकप्रिय podcast ॲप आहे.

7. Amazon Luna – हे एक क्लाउड गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. जे अमेझॉन कंपनीकडून बनवलेले आहे आणि त्यांच्याकडून हाताळले जाते. Luna ह्या गेमिंग प्लॅटफॉर्म वर अनेक Games आहेत. Amazon ने Ubisoft सोबत भागीदारी करून एक Exclusive गेमिंग चॅनल बनवले आहे. ह्याने Amazon Luna च्या सबस्क्राईबर्स ना Ubisoft चे गेम्स सुद्धा लवकरात लवकर (early access) मिळू शकतात. Amazon Luna चे Early Access सुविधा फक्त united states मध्ये उपलब्ध आहे.

8. Amazon.com – अमेझॉन.कॉम ही एक ई कॉमर्स वेबसाईट आहे. ज्या वेबसाईट वर व्हिडिओ गेम्स, फॅशन प्रॉडक्ट्स, क्लॉथ, प्राईम व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक्स सारखे ऑनलाईन प्रॉडक्ट्स सेल होतात.

9. Amazon Associates – ह्या मध्ये तुम्हाला अमेझॉन वेबसाईट वरील प्रॉडक्ट्स आपल्या माणसांना किंवा इतर व्यक्तींना विकायचे असते. त्यानंतर त्या प्रॉडक्ट मागील काही टक्के कमिशन तुम्हाला अमेझॉन कंपनी देते. तर काही टक्के स्वतः कडे ठेवते. जर तुम्हाला सुद्धा Amazon Associates मधून पैसे कमवायचे असतील तर ह्या लिंक वर क्लिक करा.

10. Amazon Pay – मोबाईल पेमेंट करण्यासाठी अमेझॉन पे हे सेवा सुरू केली आहे. मोबाईल रिचार्ज, पोस्टपेड बिल्स, वॉटर बिल्स, QR Code सारख्या सुविधा ह्यात मिळतात. अमेझॉन वरून शॉपिंग केल्यानंतर Amazon Pay करून ऑनलाईन पेमेंट केल्यास डिस्काउंट सुद्धा मिळतो.

अमेझॉन कंपनी बद्दल काही प्रश्न??

1. Amazon कंपनीचे सीईओ कोण आहेत?

Ans: Andy Jassy हे अमेझॉन कंपनीचे सीईओ आहेत. तसेच Jeff Bezzos हे Executive Chairman आहेत.

2. अमेझॉन कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे?

Ans: अमेझॉन कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ www.amazon.com असे आहे. तसेच अमेझॉन कंपनीचे अनेक डोमेन आहेत.

3. अमेझॉन कंपनीचा शोध कुठे लागला होता?

Ans: अमेझॉन कंपनीचा शोध 5 जुलै, 1994 साली वॉशिंग्टन येथील Bellevue ह्या ठिकाणी झाला होता. Jeff Bezos ह्यांनी Amazon कंपनीचा शोध लावला होता.

4. अमेझॉन कंपनीचे पूर्वीचे नाव कोणते होते?

Ans: अमेझॉन कंपनीचे पूर्वीचे नाव Cadabra असे होते. हे नाव 1994-95 पर्यंत होते. त्यानंतर त्याचे नाव बदलून Amazon ठेवले.

5. Amazon कंपनीचे स्वतःचे App आहे का?

Ans: अमेझॉन कंपनीचे स्वतःचे Android App आणि iOS App आहे. Amazon App तुम्ही गूगल पले स्टोअर आणि iOS ॲप स्टोअर वरून फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता.

6. अमेझॉन ही भारतीय कंपनी आहे का?

Ans: Amazon ही अमेरिकन कंपनी आहे. तसेच ह्यांचे हेडक्वार्टर हे US येथे आहे. Flipkart, Snapdeal ही भारतीय ई कॉमर्स कंपनी आहे.

https://youtube.com/shorts/Pgv7I5wU4p0?feature=share

हे सुद्धा वाचायला विसरू नका:

» Interesting Facts in Marathi | रोचक तथ्य मराठी मध्ये

» Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!

Amazon कंपनी बद्दल संपूर्ण माहिती (Amazon Information in Marathi) तुम्ही आजच्या लेखात जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कॉमेंट्स करून सांगा. Amazon Information in Marathi ही माहिती तुमच्या सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

अधिक माहितीसाठी आपल्या आवडत्या Creator Marathi वेबसाईट ला जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “Amazon कंपनी बद्दल संपूर्ण माहिती | Amazon Information in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *