1500+ मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Samanarthi Shabd in Marathi | Marathi Samanarthi

शाळेमध्ये मराठी व्याकरण शिकत असताना आपल्याला अनेक समानार्थी शब्द (Samanarthi Shabd in Marathi) सोडवावे लागतात. तसेच स्पर्धा परीक्षा सरावासाठी सुद्धा मराठी समानार्थी शब्दांची गरज असते. तसेच मराठी व्याकरणात समानार्थी शब्द खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे आज आपण खास 1500+ मराठी समानार्थी शब्द (Marathi Synonyms) पाहणार आहोत.

हे 1500+ Marathi Samanarthi Shabd तुम्ही शाळेत, क्लासेस मध्ये किंवा स्पर्धा परीक्षासाठी वापरू शकता. ज्यामुळे तुमचा सराव चांगला होईल व तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील. चला तर मग वेळ न वाया घालवता समानार्थी शब्द पाहूया..

1500+ मराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Samanarthi Shabd in Marathi

‘अ’ अक्षरापासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द

मराठी शब्दसमानार्थी शब्द
अवर्षण – दुष्काळ
अभिनेता –नट
अपराधी –गुन्हा
अग्नी –पावक, वन्ही, आग
अत्याचार –अन्याय, जुलूम
अहंकार –गर्व, घमेंड
अरण्य –वन, जंगल, रान
अनर्थ –संकट
अचल –स्थिर, शांत
अविरत –सतत, अखंड
अपाय –इजा, त्रास
अमृत –पियूष, सुधा
अवचित –एकदम, अचानक
अंग – शरीर, काया
अंगार –निखारा
अंत –शेवट
अंतरीक्ष –आकाश
अचंबा –आश्चर्य, नवल
अतिथी –पाहूया
अपमान –मानभंग
अवघड –कठीण
अन्न –आहार, खाद्य
अभिवादन –नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन –गौरव

‘आ’ अक्षरापासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
आयुष्य –जीवन
आकाश –गगन, नभ, अंबर
आरसा –दर्पण
आई –माता, जननी, जन्मदात्री
आपत्ती –संकट
आज्ञा –आदेश, हुकुम
आनंद –मोद, हर्ष
आश्चर्य –नवल
आसक्ती –लोभ, हव्यास
आस –इच्छा
आसन –बैठक
आशीर्वाद –शुभचिंतन, शुभेच्छा
आरंभ –सुरुवात
आरोपी –गुन्हेगार, अपराधी
आठवण –स्मृती, स्मरण
आजारी –पीडित, रोगी

इ आणि ई अक्षरापासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द

समानार्थी शब्द मराठी 1000
समानार्थी शब्द मराठी 1000
शब्दसमानार्थी शब्द
इहलोक –मृत्युलोक
इशारा –सूचना, खूण
इंद्र –देवेंद्र
इलाज –उपाय
इतर –इत्यादी, उरलेले
ईर्षा –चुरस

उ , ऊ , ॠ अक्षरापासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
उणीव –न्यूनता, कमतरता
उपवन –बगीचा, बाग, उद्यान
उदर –पोट
उदास –खिन्न
उत्कर्ष –भरभराट
उपद्रव –त्रास, छळ
उपेक्षा –हेडसाळ
उत्सव –कार्यक्रम, समारंभ, सोहळा
ऊर्जा –शक्ती
ॠण –कर्ज
ॠतू –मोसम

ए , ऐ, ओ, औं, अं अक्षरापासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
एकजूट –एकता, एक्य
ऐश्वर्य –वैभव
ऐट –रुबाब
ओझे –वजन, भार
ओढा –नाला, झरा
ओहोळ –वाहते पाणी
औक्षण –ओवाळणे
अंत, अंतिम –शेवट
अंग –शरी
अंतरीक्ष –अवकाश
अंगार –निखारा, किटाळ
अंगण –आवार
अंधार –काळोख, तिमिर
अंबर –वस्त्र
अंक –आकडा
अंघोळ –स्नान
नवीन मराठी समानार्थी
नवीन मराठी समानार्थी

क ते ज्ञ पर्यंत मराठी समानार्थी शब्द (Ka te Gyna Samanarthi Shabd in Marathi)

 • कष्ट = मेहनत
 • काळ = समय, वेळ, अवधी
 • कालांतराने = दिसामासा
 • किल्ला = गड, दुर्ग
 • करमणूक = मनोरंजन
 • कट = कारस्थान
 • कटी = कंबर
 • कथा = गोष्ट, कहाणी
 • कठोर = निर्दयी
 • कनक = सोने
 • कमळ = पंकज, अंबुज, पदम, सरोज
 • कपाळ = ललाट, मस्तक
 • काठ = तीर, किनारा
 • कान = कर्ण, श्रवण
 • कावळा = काक, एकाक्ष
 • काष्ट = लाकूड
 • किल्ला = गड, तट, दुर्ग
 • किमया = जादू, चमत्कार
 • कुटी = झोपडी
 • कृपण = कंजूस
 • कृश = बारीक, हडकुळा
 • कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
 • काम = कार्य, काज
 • कोवळीक = कोमलता
 • कोठार = भंडार
 • कुत्रा = श्वान
 • काव्य = कविता
 • कुशल = हुशार
 • खडक = दगळ, पाषाण
 • खटाटोप = धडपड, प्रयत्न
 • खग = पक्षी, विहंग
 • खडग = तलवार
 • खेडे = गाव, ग्राम
 • खंत = दुःख
 • खात्री = विश्वास
 • खाली जाणे = अधोगती
 • खोड्या = चेष्टा
 • ख्याती – प्रसिद्धी, कीर्ती
 • घर – सदन, गृह, निवास, भवन
 • घोडा – अश्व, हय, वारू
 • घागर = घडा, मडके
 • घरटे = खोपे
 • गवई – गायक
 • ग्रंथ – पुस्तक
 • गनीम – शत्रु
 • गणपती – गजानन, विनायक, एकदंत, लंबोदर
 • गरुड – खगेंद्र
 • गृहिणी – घरधनीन
 • गाणे – गीत
 • गाय – गोमाता, धेनु
 • गोष्ट – कथा, कहाणी
 • गौरव – सत्कार
 • गंध – वास, परिमळ
 • गुन्हा = अपराध
 • गोणी = पोते
 • ग्राहक = गिऱ्हाईक

समानार्थी शब्द म्हणजे काय ?

आपल्या मराठी भाषेत एका शब्दासाठी अनेक वेगवेगळे शब्द वापरले जातात. एका शब्दासाठी असलेल्या समान अर्थाच्या दुसऱ्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हटले जाते. समानार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत Synonyms असे म्हटले जाते.

 • चेहरा = तोंड, मुख
 • चौफेर = चहूकडे, सर्वत्र
 • चंद्र = शशी, सोम, इंदू, सुधांशू
 • चांदणे = कौमुदी, चंद्रिका
 • छडा = तपास
 • छंद = नाद, आवड
 • छिद्र = भोक
 • जरा = म्हातारपण
 • जयघोष = जयजयकार
 • जिन्नस = पदार्थ
 • जिव्हाळा = माया, प्रेम, ममता
 • जीर्ण = जुने
 • ज्येष्ठ = मोठा, वरिष्ठ
 • झाड = वृक्ष, तरु
 • झुंबड = गर्दी, रीघ
 • झुंज = लढा, संग्राम
 • झेंडा = ध्वज, पताका
 • झोका = हिंदोळा
 • टंचाई = कमतरता
 • ठसा = खूण
 • ठग = लुटारू
 • ठक = लबाड
 • ठेकेदार = कंत्राटदार
 • डोके = मस्तक
 • डोंगर = पर्वत
 • डोळे = चक्षु, अक्ष, नयन
 • ढग = मेघ, जलद, पयोद
 • ढीग = रास
 • तलाव = कासार, सारास, तळे
 • तरुण = जवान, युवक
 • तरु = झाड, वृक्ष
 • तारे = तारका, चांदण्या
 • तारु = जहाज, गलबत
 • तिमिर = काळोख
 • तृषा = लालसा
 • तृण = गवत
 • तुरुंग = कारागृह, कैदखाना
 • थंड = शीतल, गार
 • थवा = समुदाय, घोळका
 • दंत = दात
 • दंडवत = नमस्कार
 • दास = नोकर, चाकर
 • दानव = राक्षस, दैत्य, असुर
 • दारा = बायको, पत्नी
 • दागिना = अलंकार, आभूषण
 • दिन = दिवस
 • दीन = गरीब
 • दुजा = दुसरा
 • दुनिया = जग
 • दुर्दशा = दुरावस्था
 • दुर्धर = कठीण
 • देव = ईश्वर, परमेश्वर
 • दैन्य = दारिद्र्य
 • धरती = धरणी, पृथ्वी, वसुंधरा
 • धवल = पांढरे
 • धनुष्य = चाप, कोंदड
 • धन = पैसा, संपत्ती
 • नगर = शहर, पुरी
 • नजराणा = भेट, उपहार
 • नवनीत = लोणी
 • नदी = सरिता, जीवनदायिनी
 • नृप = राजा
 • नाथ = धनी, स्वामी
 • नारळ = श्रीफळ
 • निर्जन= ओसाड
 • निर्झर = झरा
 • निर्मळ = स्वच्छ
 • नीच = तुच्छ
 • नेता = नायक, पुढारी
 • नौदल = आरमार
 • पशु = प्राणी, जनावर
 • पती = नवरा
 • पर्वत = नग, अचल
 • परिमल = सुवास, सुगंध
 • पाणी = जल, जीवन, वारी, नीर
 • पारंगत = निपुण
 • पान = पत्र, पर्ण
 • पोपट = राघू, रावा, शुक
 • पंक = चिखल
 • पंक्ती = रांग, ओळ
 • पंडित = शास्त्री, विद्वान
 • प्रकाश = उजेड, तेज
 • प्रजा = लोक, रयत
 • प्रपंच = संसार
 • प्रतीक = चिन्ह
 • प्रताप = पराक्रम, शौर्य
 • प्राचीन = पुरातन, पूर्वीचा
 • प्रातः काळ = सकाळ, उषा
 • प्रेम = माया, लोभ, स्नेह
 • फुल = पुष्प, सुमन
 • बहर = हंगाम, सुगी
 • बक = बगळा
 • बाप = वडील, पिता, जन्मदाता
 • बांधेसूद = रेखीव, सुडौल
 • बेढब = बेडौल
 • बैल = वृषभ, पोळ, खोड
 • बंधन = निर्बंध, मर्यादा
 • बंधू = भाऊ, भ्राता
 • ब्रीद = बाणा, प्रतिज्ञा
 • भगिनी = बहीण
 • भरवसा = विश्वास
 • भार = ओझे
 • भान = शुद्ध, जागृती
 • भाऊबंद = नातेवाईक, संगेसोयरे
 • भुंगा = भ्रमर, भृंग
 • भू = जमीन, धरा, भूमी
 • भेद = फरक, भिन्नता
 • भेकड = भित्रा, भ्याड
 • महिमा = महात्म्य, थोरवी, मोठेपणा
 • मनसुबा = बेत, विचार
 • मकरंद = मध
 • मलूल = निस्तेज
 • मंदिर = देऊळ
 • मयुर = मोर
 • मत्सर = द्वेष, असूया
 • मार्ग = रस्ता, वाट, पथ, सडक
 • मानव = मनुष्य, माणूस, नर
 • मासा = मीन, मत्स्य
 • मित्र = सवंगडी, दोस्त, साथीदार
 • मुलामा = लेप
मराठी समानार्थी शब्द यादी
 • मुलगा = सुत, पुत्र, लेक
 • मुलगी = लेक, पुत्री, कन्या, सुता
 • मूषक = उंदीर
 • मेष = मेंढा
 • मोहिनी = भुरळ
 • मौज = मजा, गम्मत
 • मंगल = पवित्र
 • याचक = भिकारी
 • यातना = दुःख, वेदना
 • यान = अंतराळवाहन
 • युवती = मुलगी, तरुणी
 • Similar words in Marathi
 • रात्र = रजनी, निशा, रात
 • रुक्ष = कोरडे, निरस
 • रोष = राग
 • रंक = गरीब
 • लढा = लढाई, संघर्ष
 • लाज = शरम, लज्जा
 • लाडका = आवडता
 • लावण्य = सौंदर्य
 • वर = नवरा, पती
 • वंदन = नमस्कार, प्रणाम, नमन
 • वर्षा = पाऊस, पावसाळा
 • वचक = धाक, दरारा
 • वत्स = वासरू, बालक
 • वारा = हवा, पवन, वायू
 • वासना = इच्छा
 • वाली = रक्षणकर्ता
 • वायदा = करार
 • विलंब = उशीर
 • विमल = निष्कलंक, निर्मळ
 • विवंचना = काळजी, चिंता
 • विद्रूप = कुरूप
 • विनय = नम्रता
 • विस्तृत = विशाल, विस्तीर्ण
 • विस्मय = आश्चर्य, नवल
 • विलग = वेगळे, सुटे, अलग
 • विषण्ण = खिन्न, कष्टी
 • वीज = चपला, चंचला, बिजली, तडिता
 • वेश = पोषक
 • व्यथा = दुःख
 • व्रण = खूण,
 • व्याकुळ = दुःखी, कासावीस
 • शव = प्रेत
 • शक्ती = बळ, जोर, ताकत
 • शर = बाण, तीर
 • शत्रू = अरी, रिपु
 • शेज = बिछाना, अंथरूण
 • शिकारी = पारधी
 • शिक्षक = गुरुजी, गुरु, मास्तर
 • शीघ्र = जलद
 • शीपा = थकवा
 • शिकस्त = पराकाष्टा
 • सज्जन = संत
 • समाधान = आनंद, संतोष
 • समुद्र = सागर
 • सिंधू = समय
 • साप = सर्प, भुजंग
 • सहार = नाश, विनाश, सर्वनाश
 • स्वच्छ = निर्मळ, साफ स्तुती
 • प्रशंसा = कौतुक
 • साधू = संन्यासी
 • साथ = सोबत, संगत
 • सुगम = सुलभ, सोपा
 • सुरेल = गोड
 • सुंदर = सुरेख, छान
 • सीमा = वेस, मर्यादा
 • सेवक = दास, नोकर
 • सैन्य = दल, फौज
 • संघ = गट
 • संदेश = निरोप
 • संशोधक = शास्त्रज्ञ
 • स्वामी = मालक
 • संकल्प = बेत, मनसुबा
 • स्वेद = घाम
 • सुर्य = दिनकर, प्रभाकर, रवी, भास्कर, आदित्य
 • संग्राम = युद्ध
 • संशय = शंका
 • सिंह = वनराज, केसरी
 • स्त्री = महिला, वनिता, कामिनी
 • हताश = निराश
 • हरीण = मृग, सारंग
 • हत्ती = गज, कुंजर
 • हिम = बर्फ
 • हिम्मत = धैर्य
 • हुशार = चतुर
 • होडी = नाव, जहाज, नौका
 • क्षत = जखम, व्रण
 • क्षमा = माफी
 • क्षीण = अशक्त
 • क्षिर = दूध
 • क्षय = झीज
 • क्षुधा = भूक
 • क्षेम = कल्याण, हित
 • क्षोभ = क्रोध

हे सुद्धा वाचायला तुम्हाला आवडेल:

» रोचक तथ्य मराठी मध्ये

» १ ते १०० मराठी अंक आणि अक्षरी | 1 To 100 Number & Words in Marathi

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला 1500+ मराठी समानार्थी शब्द (Marathi Synonyms) ह्याबद्दल माहिती मिळाली असेल. तसेच अश्याच माहितीसाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *