Top Marathi YouTubers | टॉप मराठी लोकप्रिय यूट्यूब चॅनल | Marathi Youtube Channels

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Top Marathi Youtube Channels | Top Marathi YouTubers

Top Marathi YouTubers – अनेक मराठी तरुण मंडळी आता ऑनलाईन कंटेंट बनवत आहे. आणि यूट्यूब सारख्या व्हिडिओ शेरींग प्लॅटफॉर्म वर पोस्ट करून फेमस होत आहेत. भारतात कोण कोणते Top Marathi YouTubers आहेत. ते आपण आजच्या मराठी मधील लोकप्रिय यूट्यूब चॅनल लेखात जाणून घेऊया. Top Marathi YouTubers सोबत आपण Top Marathi YouTube Channel बद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत.

यूट्यूब ह्या ॲप वरील व्हिडिओज भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात पाहिल्या जातात. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात राहणारे मराठी लोकं सुद्धा हे मराठी व्हिडिओज पाहू शकतात. त्यामुळे मराठी यूट्यूबर्स ना खूप प्रोत्साहन मिळत आहे. आता वेगवेगळे Marathi Youtubers मराठी मध्ये वेगवेगळ्या विषयांवरील मराठी कंटेंट यूट्यूब वर उपलब्ध करून देत आहेत.

आज आपण मराठी मधील लोकप्रिय यूट्यूब चॅनल (Top Marathi Youtube Channels) बद्दल माहिती जाणून घेऊया. Top 10 Marathi Youtubers list मध्ये आम्ही Comedy, Entertainment, Education, Government Schemes, Business Ideas ह्या कॅटेगरी मधील Top Marathi Youtube Channels ला सामील केले आहे. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

Top Marathi Youtubers list (मराठी मधील टॉप 10 यूट्यूब चॅनल व यूट्यूबर्स)

1. Madhuras Recipe Marathi

Madhuras Recipe Marathi हे मराठी मधील फेमस आणि उत्कृष्ट असे रेसिपी मेकिंग आणि कुकिंग संदर्भात यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनल वर विविध पदार्थांच्या रेसिपी व्हिडिओ स्वरूपात दाखवल्या जातात. जेणेकरून ती व्हिडिओ बघून समोरील व्यक्ती एखादा पदार्थ उत्तमरीत्या बनवू शकेल.

ह्या यूट्यूब चॅनल ची सुरुवात 26 ऑगस्ट 2016 रोजी साली होती. तसेच ह्या यूट्यूब चॅनल वर रोज लाखो views येतात. तसेच Madhuras Recipe Marathi चॅनल वर एकूण 6 मिलियन पेक्षा जास्त Subscribers आहेत. तसेच ह्यांचे स्वतःचे रेसिपी प्रॉडक्ट्स सुद्धा आहेत. हे प्रॉडक्ट्स ते Amazon वेबसाईट वर विकून त्यातून ते पैसे कमवतात.

Subscribers –6 Million
Channel Category – Cooking & Recipe Channel

2. Rajshri Marathi

राजर्षी मराठी हे मराठी मधील सर्वात लोकप्रिय असे एन्टरटेन्मेंट यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनल वर तुम्हाला मराठी भाषेतील नवनवीन चित्रपट, नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे ट्रेलर, मूव्ही रिव्ह्यूज, मराठी नवीन आणि जुनी गाणी, कलाकारांच्या गप्पा अश्या अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात.

Subscribers –3.58 मिलियन
Channel Category –Entertainment, Movies & Songs

3. Marathi Sanket

Marathi Sanket हे मराठी मधील शेयर मार्केट आणि ट्रेडिंग विषयी माहिती देणारे यूट्यूब चॅनल आहे. Share Market Tips, इन्व्हेस्टमेंट ह्याबद्दल सविस्तर माहिती ते ह्या YouTube चॅनल वर व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करून देतात.

Subscribers –1.82 मिलियन
Category –Share Market Tips, इन्व्हेस्टमेंट

4. Vinayak Mali

विनायक माळी हा मराठी युटूबर आहे. विनायक माळी हा यूट्यूब वर आगरी कोळी भाषेतील कॉमेडी विडिओ अपलोड करतो. हे सर्व कॉमेडी व्हिडिओज त्याने स्वतःहून बनवलेले असतात. विनायक हे सर्व यूट्यूब व्हिडिओज आगरी कोळी भाषेत बनवतो व त्या व्हिडिओज मध्ये त्याच्या सोबत त्याचे मित्र सुद्धा अभिनय करतात. विनायक माळी त्याच्या यूट्यूब व्हिडिओज मधून एक चिडलेल्या व्यक्तीचा अभिनय करतो. विनायक माळी ची शेट नावाची व्यक्तिरेखा ही सुद्धा खूप लोकप्रिय आहे.

Subscribers –1.84 मिलियन
Category –Comedy Videos

5. Bhadipa

भाडिपा हे सुद्धा एक मराठी भाषेतील बेस्ट आणि लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे. Bhadipa चा फुल फॉर्म काय? तर Bhadipa (Bhartiya Digital Party) ह्या चॅनल वर विविध कलाकार एकत्र मिळून त्यांचे कॉमेडी व्हिडिओज, वेब सिरीज, Funny Interviews इत्यादी अपलोड करत असतात. अनेक मराठी कलाकार ह्या चॅनल सोबत काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे कॉमेडी, Stand-up Comedy व्हिडिओज पाहायला मिळतील.

Subscribers –1.08 Million
Category –Comedy, Entertainment, Stand-up Comedy

6. Namdevrav Jadhav

नामदेवराव जाधव हे त्यांच्या यूट्यूब चॅनल वरून बिझनेस टिप्स, मार्गदर्शन, मोटिवेशनल व्हिडिओज उपलब्ध करून देत असतात. नामदेवराव मराठी उद्योजक घडवण्यासाठी अनेकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांचे मार्गदर्शन व्हिडिओज इंस्टाग्राम, फेसबुक वर खूप लोकप्रिय आहेत. तुम्हाला सुद्धा उद्योजक बनायचे असेल, तर ह्यांच्या व्हिडिओज नक्की पहा.

Subscribers –1 Million
Channel Category –Business Coach, Motivation Speaker

7. Josh Talks Marathi

जोश Talks मराठी हे एक असे यूट्यूब चॅनल आहे. ज्यावर उद्योजकांचे, कलाकारांचे, खेळाडूंचे, प्रेरणादायक भाषण (Speech) अपलोड केले जातात. जे जे कलाकार फेमस आहेत, त्यांचे मार्गदर्शक व्हिडिओज ह्या चॅनल वर अपलोड केले जातात. Josh Talks ह्या यूट्यूब चॅनलचे हे मराठी चॅनल आहे. जर तुम्हाला मोटिवेशनल स्पीच मराठी मधून पाहायचे असतील. तर ह्या चॅनल वर एक उत्तम कलेक्शन आहे.

Subscribers –791 K
Channel Category –Motivational & Success Stories

8. Marathi Kida

मराठी किडा हे मराठी मधील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे. ह्या यूट्यूब चॅनल वर वेगवेगळ्या टॉपिक वरून प्रेक्षकांना प्रश्न – उत्तरे (QnA) विचारले जातात. व त्यांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेतली जाते. हे सर्व व्हिडिओ स्वरूपात ह्या मराठी किडा चॅनल वर दाखवले जातात. काही व्हिडिओज मध्ये गंभीर टॉपिक असतात, तर काहींमध्ये कॉमेडी सुद्धा असते. General Knowledge, Quizz, इतिहासावर आधारित प्रश्न सुद्धा लोकांना विचारून त्यांचे सामान्य ज्ञान पाहिले जाते. ह्या चॅनल वर दोन सूत्र संचालक आहेत. जे ह्या व्हिडिओज ना सूत्रसंचालन करून लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतात.

Subscribers –1 Million
Channel Category –Public QnA

9. Kori Pati Production

मराठी मधील यूट्यूब वरील मनोरंजन क्षेत्रामधील Kori Pati Production हे लोकप्रिय चॅनल आहे. ह्या चॅनल वर अनेक वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्स पाहायला मिळतील. गावाकडच्या गोष्टी, आजोळ अश्या वेब सिरीज ह्या यूट्यूब चॅनल वर लोकप्रिय आहेत.

Subscribers –1 Million
Channel Category –Entertainment, Web Shows

10. Snehal Niti

या मराठी यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला बिझनेस, मोटिवेशन, बिझनेस टिप्स विषयी व्हिडिओ पाहायला मिळतील. स्नेहल निती हे मराठी तरुणांना मार्गदर्शन व बिझनेस विषयी माहिती देतात. ह्या चॅनल वर तुम्हाला मराठी मध्ये बिझनेस बद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल.

Subscribers –1 Million
Channel Category –Business Coach

11. Everest Marathi

राजर्षी मराठी नंतर Everest Marathi हे दुसरे मराठी यूट्यूब चॅनल आहे. ज्यावर मराठी मधील सिनेमा, सिनेमा Trailer, मनोरंजन, मराठी नाटके, मराठी साँग्ज, BTS (Behind-The-Scenes), मराठी uncut दृश्ये, इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात. हे सुद्धा खूप लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे.

Subscribers –2.25 Million
Channel Category –Entertainment, Movie, Songs & Celebraty Uncut Videos

12. Jeevan Kadam Vlogs

जीवन कदम ह्यांचे हे पर्सनल यूट्यूब चॅनल आहे. ह्या यूट्यूब चॅनल वर ते वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज अपलोड करतात. जीवन कदम हे Marathi Vlogger आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनल वर सर्व मराठी Vlogs अपलोड करतात. Vlog म्हणजेच व्हिडिओ ब्लॉग (Video Blog).

Subscribers –456 K
Channel Category –Travel Videos & Vlogging

13. RJ Soham

Rj Soham हा एक मराठी Roast व्हिडिओ बनवणारा मराठी लोकप्रिय यूट्यूबर आहे. सोहम हा RJ म्हणजेच Radio Jockey सुद्धा आहे. RJ Soham हा यूट्यूब चॅनल वर इंस्टाग्राम, क्रिकेट, आणि इतर क्षेत्रातील फेमस सेलिब्रिटींचे Roast व्हिडिओज अपलोड करतो. ह्याच्या यूट्यूब चॅनल वर अनेक subscribers आहेत.

Subscribers –326 K
Channel Category –Roast Videos

14. iconik Marathi

आयकॉनिक मराठी हे सुद्धा मराठी मधील फेमस यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनल वर तुम्हाला मराठी भाषेत Work-From-Home (WFH) जॉब्स, गवर्नमेंट नोकरी, ऑनलाईन पैसे कमावणे, पार्ट टाइम जॉब्स, बिझनेस ideas बद्दल उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.

Subscribers –331 K
Channel Category –Business Ideas, WFH Jobs, Online Earning Money

15. Marathi Corner

मराठी कॉर्नर हे मराठी मधील गवर्नमेंट स्कीम, ऑनलाईन फॉर्म, सरकारी फॉर्म्स, सरकारी अपडेट्स, इत्यादी विषयी माहिती ह्या चॅनल वर मराठी मधून उपलब्ध करून दिली जाते. शुभम पवार हा मराठी कॉर्नर चॅनल चा मालक आहे.

Subscribers –405 K
Channel Category –Govt Schemes, Online Forms

16. Shreeman legend

सिद्धांत प्रवीण जोशी यांचा जन्म महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याला लहान वयातच गेमिंगची आवड निर्माण झाली आणि जेव्हा PUBG मोबाईल भारतात आला तेव्हा हा गेम बहुतेक चिनी भाषेत होता. सिद्धांतचे मित्र अभिजीत, तन्वी आणि अनुप यांनी त्याला गेमिंग करण्यास प्रोत्साहित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पाठिंब्याने, सिद्धांतने कंटेंट क्रिएटर म्हणून त्याचा प्रवास सुरू केला, सुरुवातीला प्रामुख्याने PUBG मोबाइलवर लक्ष केंद्रित केले.

कालांतराने, सिद्धांतने ओळख मिळवली आणि YouTube आणि Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर सदस्य आणि फॉलोअर्सची एक समर्पित फौज मिळवली. त्याच्या मैत्रीपूर्ण आणि बंधुत्वाचा स्वभाव, ज्यामध्ये विनोदी छेडछाड आणि विनोदाचा समावेश आहे, प्रेक्षकांशी संवाद साधतो आणि त्याच्या प्रसिद्धीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सिद्धांतच्या YouTube चॅनेल “श्रीमान लीजेंड लाइव्ह” आणि “श्रीमान लीजेंड” ने लक्षणीय संख्येने सदस्य मिळवले आहेत आणि त्याच्या प्रमुख चॅनेलचे सध्या 1.94 दशलक्ष सदस्य आहेत. याव्यतिरिक्त, तिचे इंस्टाग्रामवर 684,000 फॉलोअर्ससह मजबूत उपस्थिती आहे.

17. Kay Vishay

Kay Vishay ह्या Marathi YouTube Channel वर तुम्हाला मराठी भाषेत कॉमेडी व्हिडिओज, funny marathi shorts, roast videos पाहायला मिळतील. तसेच तुम्हाला भाऊ आणि बहिणी मधील भांडणे आणि तक्रारी व्हिडिओ स्वरूपात पाहायला मिळतील.

Tip – ह्या लेखात दिलेल्या लिंक आणि यूट्यूब व्हिडिओ फक्त Reference म्हणून देण्यात आलेल्या आहेत. Add केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे क्रेडिट व्हिडिओ मालकासाठी राखीव आहे. धन्यवाद!

मित्रानो, तुम्हाला टॉप मराठी लोकप्रिय यूट्यूब चॅनल आणि यूट्यूबर्स हा लेख कसा वाटला, ते खाली कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तुमचा आवडता Top Marathi Youtubers कोणता आहे. ते सुद्धा आम्हाला कॉमेंट करून सांगा. अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *