200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

जीवनात स्वतःवर असलेला Self Confidence सर्वात महत्वाचा आहे. जर तुमच्या जवळ आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतीही अडचण पार करू शकता. त्यामुळे आज आपण Self Confidence Quotes in Marathi चे एक उत्तम कलेक्शन पाहणार आहोत.

Confidence Quotes in Marathi वाचून तुम्ही सुद्धा जीवनात कोणत्याही प्रॉब्लेम ला तुमच्या पासून दूर करू शकता. Self Confidence Status in Marathi चे कलेक्शन सुद्धा मी खाली दिले आहे. ते सुद्धा नक्की वाचा.

Self Confidence Quotes in Marathi | आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

“आत्मविश्वास वाढवणारे कोट्स वाचून तुम्ही प्रेरित व्हाल,
पण जर काही तरी जीवनात मिळवायचे असेल तर रोज प्रेरित राहणे आवश्यक आहे.”

“आत्मविश्वास हा स्वतःमधून येतो,
त्यामुळे स्वतःला आत्मसात करा.”

Aatmvishwas marathi quotes

“पैज लावायची च असेल तर स्वतःसोबत लावा, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.”

“आयुष्य हे एकदाच मिळते,
त्यामुळे ते मनापासून जगले पाहिजे,
उद्याची चिंता न करता,
आजच्या काळात जगणे गरजेचे आहे.”

हे सुद्धा वाचा: 200+ बेस्ट मराठी जीवन सुविचार

“आत्मविश्वास तिथे कामा येतो जिथे,
आशा सोडावी अशी वाटते.”

“आत्मविश्वास हा सुर्यासारखा असतो,
तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल.”

“Confidence हे एक प्रभावी अंजन आहे,
हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल,
त्याला कासल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.”

“स्वतःवर विश्वास असणे म्हणजे आयुष्याच्या युद्धाचे
नेतृत्व करणे होय.”

“कष्ट अशी ही चावी आहे, जी नशिबात नसलेल्या
गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.”

“एखाद्या गोष्टी विषयीची भीती आपल्या आत्मविश्वासाला तडा पोहचवता कामा नये.”

“विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.”

“जोपर्यंत आत्मविश्वास रुपी सेनापती पुढे होतं नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ति त्याचे तोंड पाहत राहतील.”

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी
प्रामाणिक रहा.

“कोणीही तुमच्यासोबत नसेल,
तर घाबरुन जाऊ नका कारण
उंच उडणारे गरुड हे कमीच असतात.”

Self Confidence हा दरवेळी कामी येतो,
भले तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी गेले असाल
पण जर का
तुमच्याजवळ Self Confidence असेल तर तुम्ही तिथे बिन्धास्त राहू शकता.

कष्ट इतक्या शांततेत करा, की यश हमखास
धिंगाणा घालेल.

गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही .

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे
खरे ध्येय आहे.

जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने
मन पवित्र होते.

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा
आरसा असतो.

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो
तो देवमाणूस !

Confidence Quotes in Marathi | आत्मविश्वास वाढवणारे मराठी कोट्स

Self Confidence Quotes in Marathi

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

हे सुद्धा वाचा:

›› 100+ Instagram Marathi Attitude Captions

›› नववर्षाभिनंदन मराठी शुभेच्छा संदेश २०२२

“विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी.”

“मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास.”‘

“अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास या त्या यशाचा पाया आहे.”

“तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून
अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती.”

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही
शिकवत असतो.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

“कोणी कौतुक करो वा टीका, दोन्ही तुमच्या फायद्याचेच
कसे तर, कौतुक प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची एक संधी.”

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि
स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाच काळीज लागत.

स्वतःची चिंता न करता जो दुसर्‍याची चिंता करतो तोच खरा संन्याशी.

संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर
मात करा.

सुख बाहेर आहे, आनंद आंत आहे.

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे
सामर्थ्य प्रभावी होते.

हे सुद्धा वाचा: फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच
येत असतात.

मनुष्य गुणाने रुपवान असला म्हणजे कुरुपही
रुपवान दिसतो.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.

बदलण्याची संधी नेहमी असते, पण बदलण्यासाठी तूम्ही तयार आहात का?

वेळ आणि पैसा आज आहे, तर उद्या नाही,
पण वेळेला उपयोगी येणारी आपली माणसे आपल्यासोबत कायम आहेत.

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही,
हे ही खरं.

हे नक्की वाचा: जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 8 यशस्वी मार्गांचा वापर करा!

धैर्य धरणार्‍याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते.

 जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास पात्र होतो.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.


हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते .

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

“जो पर्यंत आत्मविश्वास स्वरुपी सेनापती
पुढे होत नाही तोपर्यंत
आपल्या आतील शक्ती त्याचे तोंड पाहात नाही.”

फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.

“पुढे काय होणार माहीत नाही पण
आत्मविश्वास असा हवा की,
जे होईल ते परफेक्ट होणार.”

“कष्ट ही अशी चावी आहे,
जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा
दरवाजे उघडते.”

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणार्यांना कधीच मनमुराद पणे आनंद लूटता येत नाही…

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

हे सुद्धा वाचा: फ्रीलान्सिंग म्हणजे काय? Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

“यशाकडे जाणारा मार्ग हा
केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो.”

मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे.

मनात आणलं तर या जगात अशक्य
असं काहीच नाही.

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.

मनाची परिक्षा डोळ्यानी होते, तर डोळ्याची
परिक्षा मनाने होते.

Marathi Suvichar On Confidence

न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिब सुद्धा हरत नाही.

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर चांगुलपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी !

“दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं.

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.

तुम्ही माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या बरोबर नसाल, तर मी तुम्हाला माझ्या यशात सामील करून घेईन.
याची अपेक्षाही माझ्याकडुन करू नका.

हे सुद्धा वाचा: मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!

मला आता नवीन टिकाकारांची गरज आहे कारण आधीचे टीकाकार माझ्या प्रेमात आहेत.

रिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते.

मी अशी फार थोडी महान माणसे पहिली आहेत, ज्यांचा
भूतकाळ संघर्षमय नव्हता.

Confidence Quotes For Friend In Marathi | मित्रांसाठी खास आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

आयुष्यात मित्र नाही तर आयुष्याला मज्जा येत नाही. पण मित्र हा फक्त मित्र नसतो तर आपल्या जीवनातला एक घटक असतो. पण कधी कधी आपल्या मित्रांना सुद्धा आत्मविश्र्वासाची गरज असते. त्यावेळी तुम्ही हे मित्रांसाठी खास आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार त्यांना व्हॉट्सॲप वर पाठवून त्यांना थोड धैर्य देऊ शकता.

“स्मितहास्य ही अशी वक्र रेशा आहे, जी तुमच्या समस्या कमी करुन तुमचा आत्मविश्वास वाढवते.”

good morning confidence suvichar in marathi

“आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे,
जी तुम्हाला पायऱ्यांवरुन शिखरावर पोहोचवते.”

“जीवनात कधी निराश झालास तर मला एक कॉल कर,
मी नेहमी तुझ्यासाठी उपलब्ध आहे.”

“प्रॉब्लेम मध्ये असताना पाठीवर हाथ ठेवून,
मी आहे ना तुझ्यासोबत असा म्हणणारा खरा सवंगडी!”

“शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी,
आत्मविश्वास हवा, तो तुम्हीच निर्माण करु शकता.”

“मातीतला ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरुन ठेवतो,
तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरुन ठेवतो.”

“जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय,
नवीन वाट आपल्याला सापडत नाही,
ती वाट शोधणे महत्वाचे असते.”

“नशीब हातात येत नाही,
हाताला तुमच्या नशीबाकडे नेणे गरजेचे असते.”

“अरे मित्रा घाबरतोस कशाला तुझा भाऊ आहे ना
तुझ्यासोबत, बिंधास जग घाबरु नकोस कशाला.”


Self Confidence हा प्रत्येकात असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे खूप आत्मविश्वास असेल तर आपण जीवनात काहीही करू शकतो. त्यामुळे नेहमी आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

तसेच स्वतः मधला Confidence कधीही कमी व्हायला देऊ नका. हे आत्मविश्वास वाढवणारे मोटिवेशनल कोट्स वाचून तुम्ही नेहमी सकारात्मक राहू शकता.

तुम्हाला हे 200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस कलेक्शन कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

तसेच मराठी माहिती, टिप्स, मनोरंजन आणि मराठी फॅक्ट्स साठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *