मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ | 500+ Marathi Mhani with Meaning

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ | 500+ Marathi Mhani with Meaning

आज आपण 500+ मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ (Marathi Mhani with Meaning) पाहणार आहोत. शाळेत अभ्यासात मराठी म्हणी विचारल्या जातात. शाळेतील किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी म्हणी व अर्थ विचारल्या जातात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी म्हणी व त्यांचे अर्थ ह्या लेखामध्ये दिल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या मार्क्स ने उत्तीर्ण होऊ शकता.

Read: 1500+ मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi

मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ | 500+ Marathi Mhani with Meaning

 • अंगाची लाही लाही होणे – खूप संतापणे.
 • अंथरूण पाहून पाय पसरावे- आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे.
 • अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ – दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.
 • अपयश हे मरणाहून वोखटे – अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे.
 • अक्कल खाती जमा – नुकसान होणे.
 • असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा – भरपूर द्रव्य असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे.
 • अती झालं अऩ हसू आलं – एखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते.
 • अठरा विश्वे दारिद्र असणे – अति दुर्बळ असणे.
 • असतील शिते तर नाचतील भुते – संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात.
 • अडली गाय खाते काय – गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो.
 • अंगाचा तीळ पापड होणे – खूप संतापणे.
 • अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा – क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे.
 • अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा – मूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो.
 • असतील शिते तर जमतील भूते – फायदा असेल तर त्या माणसाच्या आजूबाजूला फिरणे.
 • काप गेले नी भोके राहिली – सारे ऐश्वर्या गेले आणि आता फक्त आठवणी राहिल्या.
 • जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – बाह्य देखाव्याने माणूस हुशार होत नाही.
 • तळे राखील तो पाणी चाखील – सोपावलेले काम पूर्ण करून आपला फायदा करून घेणे.
 • काकडीची चोरी फाशीची शिक्षा – अपराध खूप लहान पण त्याची शिक्षा मात्र खूप मोठी.
 • अर्थी दान महापुण्य – गरजूंना दान करणे हे पुण्य काम आहे.
 • आवळा देऊन कोहळा काढणे – स्वार्थासाठी छोटी वस्तु देऊन मोठा फायदा करून घेणे.
 • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत जीवाला धोका निर्माण करू शकते.
Marathi Mhani with meaning photos
Marathi Mhani with meaning photos
 • अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसान कारक ठरतो.
 • गर्जेल तो पडेल काय – नुसता बोलणं कृती काही नाही.
 • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे.
 • उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा.
 • नाचता येईना अंगण वाकडे – स्वतःला काही येत नसताना दुसऱ्यात दोष काढणे.
 • उंटावरून शेळ्या हाकणे -आळस, हलगर्जीपणा करणे.
 • घोडमैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे.
 • अंधारात केले पण उजेडात आले – कितीही लपून केलेले काम असो शेवटी ते नजरेसमोर येताच.
 • उंटावरून शेळ्या हाकणे -आळस, हलगर्जीपणा करणे.
 • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.
 • डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
 • भरवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे.
 • पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाची.
 • अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे – इतरांकडून आवश्यक ती मदत घ्यायची आणि वर आणखी काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
 • कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात – चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
 • जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले – जीवंतपणी दुर्लक्ष करायचे आणि मेल्यावर गोड कौतुक करायचे.
 • तरण्याचे कोळसे म्हातार्‍याला बाळसे – उलट गुणधर्म असणे.
 • आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं – एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
 • अती खाणे मसणात जाणे – अति खाणे नुकसानकारक असते.
 • राईचा पर्वत करणे – मूळ गोष्ट लहान पण ती उगाचच मोठी करून सांगणे.
 • अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा.
 • वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.
 • छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे.
 • नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही.
 • तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे.
 • आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण.
 • झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.
 • नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती.
मराठी म्हणी आणि अर्थ
मराठी म्हणी आणि अर्थ
 • अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते.
 • अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज – गरजवंताला बुद्धी नसते.
 • कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही.
 • जो गुळाने मरतो त्याला विष कशास – जिथे गोड बोलून काम होते तिथे हिंसचारची गरज नसते.
 • पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे.
 • लग्नाला गेली आणि बारशाला आली – खूप उशिराने पोहोचणे.
 • वळणाचे पाणी वळणावर जाणे – ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार.
 • विशी विद्या तिशी धन – योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो.
 • तट्टाला टूमणी तेजीला इशारत – जी गोष्ट मूर्खाला शिकवून समजत नाही ती शहाण्याला इशाऱ्याने समजते.
 • अडली गाय फटके खाय – एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला त्रास दिल जातो.
 • अवचित पडे, नि दंडवत घडे – स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.
 • राज्याचे घोडे आणि खासदार उडे – वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची.
 • लंकेत सोन्याच्या विटा – दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो.
 • वरातीमागून घोडे – योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.
 • शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ.
 • तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – मुर्खपणामुळे कामाच्या गोष्टी हातातून जाणे.
 • टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्ट केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही.
 • कुंपणानेच शेत खाणे – सुरक्षा करणाऱ्यानेच घात करणे.
 • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – वेळ सगळ्यांवर येते.
मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ
 • अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या काळात मूर्खांलापण मान द्यावा लागतो.
 • तोंड दाबून बुक्क्यांचा मार – कारण नसताना अन्या सहन करणे.
 • नावडतीचे मीठ अळणी – न आवडणाऱ्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट न आवडणे.
 • दुष्काळात तेरावा महिना – एक संकट अस्ताणे अजून संकट येणे.
 • एका हाताने टाळी वाजत नाही – प्रत्येक कार्यात दोनी बाजूचा सहभाग असावा.
 • अंगावरचे लेणे, जन्मभर देणे – दागिन्याकरिता कर्ज घेणे आणि ते जन्मभर फेडने.
 • विचाराची तूट तेथे भाषणाला उत – मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते.
 • झाकली मूठ सव्वा लाखाची – व्यंग नेहमी झाकून ठेवावे.
 • कुडी तशी फोडी – देहा प्रमाणे आहार मिळणे.
 • ताकापुरते रामायण – कामापूर्ती खुशामत करणे.
 • अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का – प्रत्यक गोष्टीला ठराविक मर्यादा असते.
 • अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे – एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू.
 • रोज मरे त्याला कोण रडे – रोजच्या होणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे.
 • लाज नाही मला कोणी काही म्हणा – निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.
 • विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी – विश्वासघात करणे.

नवीन मराठी म्हणी व त्यांचे अर्थ (Marathi Mhani & Meaning)

 • पालथ्या घड्यावर पाणी – सगळे प्रयत्न अपयशी होणे.
 • रात्र थोडी सोंगे फार – कमी वेळात जास्त काम करणे.
 • कामापुरता मामा – स्वार्तासाठी गोड बोलणे.
 • आधी पोटोबा मग विठोबा – पहिले पोट भरणे नंतर देवाचे पूजन करणे.
 • काखेत कळसा गावाला वळसा – स्वतःकडे असून सगळीकडे शोधणे.
 • लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही – धाका शिवाय शिस्त नाही.
 • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
 • नाव मोठे लक्षण खोटे – कार्य मोठे पण प्रत्येक्ष कृती काहीच नाही.
 • हपापाचा माल गपापा – छळाने मिळवलेली संपत्ती जास्त काळ टिकत नाही.
 • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच माणसाचे आपल्या हातून वाईट होणे.
 • गाढवाला गुळाची चव काय – मूर्ख माणसाला ज्ञानाचे महत्व माहित नसते.
 • अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण – मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.
 • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
 • लेकी बोले सुने लागे – एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
 • शहाण्याला शब्दाचा मार – शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तर ती पुरेसे असते.
 • संग तसा रंग – संगती प्रमाणे वर्तन असणे.
 • डोळ्यात केर आणि कानात फुंकर – रोग एकीकडे आणि उपचार दुसरीकडे.
 • कानात बुगडी, गावात फुगडी – कमी संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
 • अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती करणे.
 • अंगापेक्षा भोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
 • अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही – एखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही.
 • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर – गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे.

100 लेटेस्ट मराठी म्हणी (100 latest Marathi mhani)

 • घोंगडे भिजत पडणे – एखादी गोष्ट खूप दिवसापासून प्रलंबित असणे.
 • घरात नाही एक तीळ अन मिशाला पिळ – गरीब असताना श्रीमंतीची एट करणे.
 • घोडे खाई भाडे – एखाद्या गोष्टीवर भरमसाठ खर्च होणे.
 • घरचा उंबरठा दारालाच माहित – घरातील गोष्टी घरातल्या लोकांनाच माहित असते.
 • घार हिंडते आकाशी परी तिचे चित पिल्लांपाशी – घर प्रमुखाचे लक्ष आपल्या मुलांकडेच असते.
 • घरोघरी मातीच्या चुली – सर्वदूर सारखीच परिस्थिती असते.
 • घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर – कोणताही विचार न करता विसंगत कृत्य करणे.
 • घरात नाही कौलान रिकामा डौल – गरीब असताना श्रीमंतीची एट करणे.
 • घोड मैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे.
 • चार आण्याचा मसाला बारा आण्याची कोंबडी – एखाद्या छोट्या गोष्टीची किंमत कमी आणि इतर खर्च खूप जास्त असणे.
 • चांभाराची नजर जोड्यावर – आपआपल्या व्यवसाया संबधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो.
 • चकाकते ते नेहमी सोने नसते – बडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात.
 • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाचा दिवस असतो.
 • चोर नाही तर चोराची लंगोटी – भरपूर अपेक्षा असताना अल्प लाभावर समाधान मानणे.
best marathi mhani
best marathi mhani
 • चोर तो चोर वर शिरजोर – गुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे.
 • चुकलेला फकीर मशिदीत – मनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो.
 • चोरीचा मामला हळू हळू बोंबला – वाईट गोष्ट सर्व बाजूंनी झाकण्याचा प्रयत्न होतो.
 • चोराच्या वाटा चोरालाच माहीत – वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे मार्ग व स्त्रोत माहिती असतात.
 • चालत्या गाडीला खीळ घालणे – एखाद्याच्या चांगल्या कामात व्यत्यय आणणे.
 • चोराच्या मनात चांदणे – वाईट व्यक्ती कायम कुटिल डाव रचत असतो.
 • चतुर्भुज होणे – लग्न करणे.
 • चिंती परा ते येई घरा – वाईट चिंतन केले की तशीच घटना आपल्या आयुष्यात घडते.
 • चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा – चांगली गोष्ट स्वतः पासून सुरवात करावी.
 • ठेवीले अनंते तैसेची राहावे – जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानावे.
 • ठकास महाठक – प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच.
 • डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे.

अर्थपूर्ण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

 • डोळ्यात अंजन घालणे – एखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करुन फसविणे.
 • एकदा की नाव कानफाट्या पडले की पडलेच – लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.
 • एका पुताची माय वळचणीखाली जीव जाय – एक मुलगा पोटी असून सुद्धा तो आईला सुखाने जगू देत नाही.
 • एकटा जीव सदाशिव – एकटा माणूस चिंतामुक्त अन सुखी असतो.
 • एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नये – एकाने वाईट गोष्ट केली तर आपल्यालाही वाईट गोष्ट करण्याचा हक्क पोहोचत नाही.
 • कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच – वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही.
 • काम न धंदा, हरी गोविंदा – रिकामटेकडा मनुष्य फक्त बडबड करण्यात आपला वेळ घालवतो.
 • कामा पुरता मामा – व्यावहारीक जगात स्वार्थ बाळगणे.
 • घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरीपान – काम न करता फक्त दिखाउपणा प्रदर्शित करणे.
 • कुठे राजा भोज कुठे गंगुतेली – बलाढ्य माणूस आणि दुर्बळ यांची तुलना होऊ शकत नाही.
 • एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही – अत्यंत गुप्तपणे आपले कार्य करणे.
 • गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ – मुखं मनुष्य आपल्या वागण्याने सर्वदूर गोंधळ उडवतो.
 • गावात नाही झाड अन म्हणे एरंडया ला आले पान – एखादी गोष्ट उगीचच वाढवून सांगणे.
 • गरजवंताला अक्कल नाही – असहाय्य माणूस कोणाकडेही मदतीची याचना करतो.
 • गतं न शौच्यम – एखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे.
 • एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ – एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होतो.
 • एका म्यानात दोन तलवारी राहत नाही – लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.
 • एका दगडात दोन पक्षी मारणे – एकाच कार्यात दोन काम करणे.
 • एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही – अत्यंत गुप्तपणे आपले कार्य करणे.
 • गर्वाचे घर खाली – गर्व असलेल्या माणसाचा पराजय होतोच.
 • एकादशी अन दुप्पट खाशी – नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही.
 • कवड्यांचे दान केले अन गावात नगारे वाजविले – दान छोटे करून इतर लोकांना महती सांगत फिरणे.
 • एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नये – एकाने वाईट गोष्ट केली तर आपल्यालाही वाईट गोष्ट करण्याचा हक्क पोहोचत नाही.
Marathi comedy lockdown mhani
Image:- Sharechat
 • एका म्यानात दोन तलवारी राहत नाही – लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.
 • एकादशी अन दुप्पट खाशी – नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही.
 • कोंबड झाकलं तरी तांबड उगवल्या शिवाय राहत नाहीलपत नाही – सत्य कधीही लपत नाही.
 • काळी बेंद्री एकाची अन सुंदर बायको लोकाची – सर्वाना आपल्या गोष्टीपेक्षा इतरांच्या चांगल्या आहेत असे वाटते.
 • कावळा बसायला अन फांदी तुटायला एकाच घात – योगायोगाने एखादी गोष्ट घडून भलत्याच गोष्टीचा संबंध वेगळ्याच गोष्टीला लावणे.
 • काम नाही घरी अन सांडून भरी – काम नसताना उगाच काम निर्माण (वाढवून) तेच काम परत परत करणे.
 • कानामागून आली तिखट झाली – नवीन आलेली व्यक्ती लवकरच यशस्वी होणे.
 • करून करू भागले अन देवपूजेला लागले – वाईट गोष्टींचा वीट आल्यावर चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे.
 • एका दगडात दोन पक्षी मारणे – एकाच कार्यात दोन काम करणे.
 • करंगळी सुजली तर डोंगरा एवढी होईल काय – छोट्या माणसाला थोर माणसाची बरोबरी करणे अशक्य आहे.

तुम्हाला ह्या 500+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ (Marathi Mhani with Meaning) कसे वाटले ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच जर तुमच्या जवळ आणखी काही म्हणी असतील तर आम्हाला नक्की सेंड करा.

हे नक्की वाचा:

» English Alphabets in Marathi (इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे)

» Amazon कंपनी बद्दल संपूर्ण माहिती

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *