Facebook ने Meta नाव ठेवण्याचे नक्की कारण कोणते आहे?

Share This Article

Facebook ह्या multi-national कंपनीने त्यांचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सर्व ठिकाणी, सर्व जगभर, सर्व सोशल मीडिया वर, सर्व न्यूजपेपर मध्ये त्यांच्याच ह्या निर्णयाबद्दल चर्चा चालू होत्या.

पण फेसबुक ह्या कंपनीने एवढे चांगले नाव बदलण्याचा निर्णय का घेतला असेल? तुम्ही कधी विचार केला आहे का? तर आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. तसेच त्यामागे कोणते कारण होते ते सुद्धा समजावून घेऊया.

फेसबुकने कंपनीचे नामांतर मेटा (Meta) असे करण्याचे कारण नक्की काय?

फेसबुक सारख्या लोकप्रिय आणि multi-national कंपनीने त्यांचे नाव बदलून Meta असे ठेवले. Facebook कंपनीचा मालक/सीईओ मार्क झुकरबर्ग हा आहे. त्यांनी हा निर्णय घेण्यामागे खूप मोठे कारण आहे.

तंत्रज्ञानाचा वापर सर्व ठिकाणी होत आहे. त्यामुळे पुढे येणारे जग हे तंत्रज्ञानाचे असणार हे आता सर्वांना कळून चुकले आहे. Mark Zuckerberg ह्यांनी सुद्धा तंत्रज्ञानाच्या जगात अग्रेसर होण्याचे ठरवले आहे. त्यांनी मेटा हा शब्द व्हर्च्युअल रिएलिटी संदर्भात मेटाव्हर्स या शब्दापासून अ‍ॅडाप्ट केला आहे.

Meta चा शब्दश: अर्थ सुधारीत, प्रगत किंवा अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी. Metaverse म्हणजे मेटा युनिव्हर्स (प्रगत विश्व). आता तुम्हाला समजले असेल की, एवढा मोठा निर्णय घेतला म्हणजेच नक्कीच काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी विचार केला असेल.

तसेच फेसबुक चे नामांतर केल्यामुळे त्यांचा parent कंपन्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि त्या कंपन्यांचे नाव बदलणार नाही, असे मार्क झुकरबर्ग ह्यांनी सांगितले आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप ह्यांचे नाव तसेच राहणार आहे.

फक्त पॅरेंट कंपनीचे नाव फेसबुक इंटरनॅशनल कॉर्पोरेशनऐवजी (Facebook Int. co.) मेटा असे बदलण्यात आले आहे. मेटासाठी त्यांनी नवीन लोगोही लाँच केला आहे. खाली तुम्ही फेसबुक चा नवीन लोगो पाहू शकता.

Facebook ची दूरदृष्टी खूप पुढे पर्यंत आहे. फेसबुक म्हणजेच मेटाची भविष्यातील वाटचाल मेसेंजर सर्व्हिस, मल्टीमिडिया, Games, अ‍ॅडव्हर्टायजिंग पुरती मर्यादित न राहता आता अ‍ॅडव्हान्स व्हर्च्युअल रिएलिटीकडे (VR) होणार आहे.

Metaverse म्हणजे एक आभासी जग. ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तिथे Virtul Reality च्या माध्यमातून आपण स्वतःहून जाऊन अनुभव घेऊ शकतो. तसेच Metaverse च्या माध्यमातून तुम्ही लोकांशी फेस टू फेस संवाद साधू शकता व त्यांना भेटू शकता. हे सर्व Metaverse मुळे घडणार आहे.

आता तुम्हाला समजले असेलच की फेसबुक चे नाव Meta ठेवण्याचे नक्की कारण काय आहे. ते समजले असेल.

Share This Article

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *