Father And Son Story in Marathi | बाबा आणि मुलगा मराठी कथा

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

नियमित अपडेट साठी फॉलो करा

 Facebook | Instagram | Twitter | Sharechat

नमस्कार मित्रांनो, बाबा ह्या दोन अक्षरी शब्दात किती गोष्टी दडल्या आहेत. बाबा हे आपल्यासाठी काय काय करतात..ह्याची प्रत्येकाला जाणीव असतेच. किती हाल, किती राग, किती टेन्शन, किती प्रश्न घेऊन तो एकटा माणूस आपल्या सोबत जगत असतो. पण चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवतो. का, तर कोणाला समजू नये म्हणून. खरंच बाबा हे आपल्यासाठी किती काही काही सहन करतात, ते त्यांनाच ठाऊक. माफ करा हा मी बाबांचा एकेरी नावाने उल्लेख केला. आपण १२-१५ वर्षाचे झाल्यावर आपल्याला वाटतं की आपण मोठे झालोय. आपले बाबा आपल्यावर थोडे रागवले की आपण त्यांना उलट बोलतो..की तुम्हाला काय माहित, तुम्हाला नसेल समजत तर मध्ये मध्ये बोलू नका. खरंच आपण आपल्या आई बाबांपेक्षा मोठे होतो का? खरंच आपण एवढे मोठे आहोत का ? ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आपण मनाला येईल तसं उलट बोलतो. त्यांना किती वाईट वाटत असेल. ह्या चुकीची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. पण प्रत्येक परिवारात बाबा आणि मुलगा ह्यांच्यात आठवड्यातून एकदा तरी भांडण होतच. काय करणार..जेवढं जास्त भांडण तेवढं जास्त प्रेम पण असतं ना.

हे नक्की वाचा:- जबरदस्त मराठी प्रेरणादायी सुविचार

तर आज मित्रांनो आम्ही तुम्हाला अश्याच बाबा आणि मुलाच्या दोन मराठी कथा सांगणार आहोत. ज्या तुमच्याशी थोड्या का होईना निगडित असतील. आम्ही मनापासुन विनंती करतो की तुम्ही ही मराठी कथा नक्की वाचा. व तसेच आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणीला पाठवा. तसेच आम्हाला Instagram वर फॉलो करा.चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करुया..

पहिली कथा ( First Story )

प्रत्येक मध्यमवर्गीय घरात बाप आणि मुलाचे किरकोळ कारणासाठी का होईना भांडण होतेच.“अरे पंखे बंद न करता बाहेर का निघून जातोस?”अरे लाईट बंद न करता बाहेर का निघून जातोयसं?””टीव्ही सुद्धा चालू आहे आणि त्याच्यासमोर कुणीच नाही..तो पाहिला बंद कर बघू!”

“अरे पंखे बंद न करता बाहेर का निघून जातोस?”अरे लाईट बंद न करता बाहेर का निघून जातोयसं?””टीव्ही सुद्धा चालू आहे आणि त्याच्यासमोर कुणीच नाही..तो पाहिला बंद कर बघू!” मुलाला वडिलांच्या किरकोळ कारणासाठी अशा सूचना दिलेल्या अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसे.!.काल पर्यंत तो वडिलांबरोबर या घरात रहात होता तो पर्यंत तरी त्यानं हे सर्व सहन केलं.!

काल त्याला नोकरी साठी एक कॉल आला. उद्याच्या उद्या इंटरव्ह्यूला यायचं असं सांगितलं. उद्याचा दिवस उजाडला. तो नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेला.
“मला जर ही नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्की सोडणार”.! ( तो मनातल्या मनात म्हणाला )
वडिलांची बोलणी असह्य झालीय,असं त्याला वाटत होतं.!.
तो मुलाखतीसाठी निघतच होता तितक्यात..त्याचे वडील त्याला म्हणाले बाळा
“कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक दे! आणि
उत्तर नाही आलं तर ठोकून दे” असं सांगून वडिलांनी
आज नेहमीपेक्षा जरा जास्तच पैसे दिले..

मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचतो.
प्रवेशद्वारावर कुणीच सुरक्षा कर्मचारी नव्हता, दरवाजा पण उघडाच होता.दरवाज्याचं लॕच व्यवस्थित बसवलं नव्हतं, त्यामुळे दरवाजा सारखा आपटत होता, त्याने युक्ती लावून दरवाजा आपटायचा बंद केला आणि धावत धावत ऑफिसकडे निघाला. “पहिल्या मजल्यावर मुलाखती होतील” अशी सूचना फलकावर लिहिली होती.
तो हळू हळू जिना चढू लागला.! मनात अनेक विचार चालू असतात. आपल्याला नोकरी मिळेल ना.मी व्यवस्थित उत्तर देऊ शकतो ना. काही चुकलं तर. असे अनेक प्रश्न त्याच्या मनात चालू असतात. असाच विचार करत करत तो आतमध्ये गेला. दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावली होती. दोन तीन कुंड्या खाली पडल्या होत्या. त्याने लगेच त्या उचलून व्यवस्थित ठेवल्या व तो पहिल्या मजल्यावर हळू हळू चालू लागला. स्वागत कक्षात पण कुणीच दिसत नव्हतं.

काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी १० वाजून गेले तरी तसेच चालू होते. त्याला वडिलांचे शब्द आठवले ! पंखे,लाईट बंद न करता घरातून का निघून जातोस? आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला त्याने त्या विचारातच दिवे बंद केले.

वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पहात बसलेले दिसले. बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला.!.तो घाबरत घाबरत हॉलमध्ये गेला. दरवाजा जवळ “सुस्वागतम” लिहिलेली चटई होती.त्याच्या लक्षात आले की ती चटई दुमडली आहे,कुणाच्या तरी पायात अडकेल म्हणून त्याने चिडूनच ती चटई सरळ केली.त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यांवर इंटरव्ह्यू देण्यासाठी उमेदवार बसले होते. ते ओळींमध्ये बसले होते. जसा नंबर यायचा तस तस ते आत इंटरव्ह्यू द्यायला जायचे. तो सुद्धा द्या ओळींमध्ये त्याचा नंबर येण्याचे प्रतीक्षा करत बसतो. अचानक त्याचे लक्ष मागे जाते. तिथे काही खुर्च्या रिकामी असतात. परंतु ततिकडचे अनेक पंखे विनाकारण चालू होते. त्याला लगेच त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीची जाणीव होते. “अरे पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जातोस?” त्याने पटकन गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या.

अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडतांना दिसत होते,त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता. तो दचकत दचकत आत गेला आणि न घाबरता मुलाखती साठी उभा राहिला.!.”

मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याला खुर्ची वर बसायला सांगितले. नंतर त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले की तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता? त्याला काही समजेना की, हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली आहे? तो पूर्णपणे गोंधळून गेला.!

तुम्ही काय विचार करीत आहात?” (असे बॉसने विचारले.)
आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही,काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याही कौशल्यांचे मूल्यांकन करू शकणार नाही.म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सीसीटीव्ही (CCTV) द्वारे नजर ठेवली.
आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने दरवाज्याचे बॅच,स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत.

पण तुम्ही फक्त एकच असे उमेदवार होता ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे, बॉस म्हणाला.!
तो आनंदाने वेडा झाला. अचानक त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेली वाक्य आठवली.
आपल्या वडिलांच्या शिस्त व सुचनांवरून त्याची नेहमीच चिडचिड होत असे.आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळे काम मिळाले आहे,या प्रसंगामुळे वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे निघून गेला.

त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्ये कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि खुश होऊन परत आपल्या घरी जायला निघाला.
आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.!
दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या छिन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात.
तसेच आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे,तेच आपले वडील करतात जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात.

आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते आणि खाऊ पिऊ झाल्यावर तिला झोपवते. पण वडीलांचं तसं नसतं. ते बाळाला “आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहु शकत नाहीत”. आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो; परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते.

आई जेंव्हा म्हातारी होते,तेव्हां ती आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊ शकते; परंतु पित्याला ते करता येत नाही. तो नेहमी स्वतंत्र आणि एकटा असतो.म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग नाही.
जिवंतपणी आईवडीलांच्या चिडण्यावर,रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर, तत्वांवर मनःपूर्वक शांततेने विचार करा, आपले खरचं चुकत आहे का? हे ठरवा आणि वागण्याचे ध्येय ठरवा बघा काय हाती लागतयं ? आई वडिलांचा आदर करा. त्यांना जपा, त्यांना खुश ठेवा.

हे नक्की वाचा:- पोस्टमन-आपला मित्र मराठी कथा


दुसरी कथा ( Second Story )

सुयश नावाचा एक मुलगा होता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला एक साधा व सरळ मुलगा. त्याच्या कुटुंबात त्याचे आई बाबा आणि एक बहिण होती. तो व त्याचे कुटुंब मुंबईत राहत असे. सुयश हा १५ वर्षांचा होता. शाळा पूर्ण करून आता तो कॉलेज ला शिक्षण घेणार होता. त्याने ११ वीचे एडमिशन घेतले. त्याच्या बाबांनीच सर्व एडमिशन ची जबाबदारी घेतली होती. सुयश कॉलेज ला जाऊ लागला. नवीन कॉलेज, नवीन मित्र, मैत्रिणी सगळ काही नवं नवं होतं.

जसं जसे दिवस पुढे जात गेले सुयश ची मैत्री वाढत गेली. रोज सगळे लेक्चर न चुकवणारा सुयश हल्ली एकही लेक्चर नाही बसायचा. रोज नवीन नवीन कपडे घालून कॉलेज च्या नावाने कुठेतरी पिक्चर बघायला तर कट्ट्या वर टाइमपास करायचा. त्याचं कॉलेज मधून लक्षच उडाल होतं. असेच दिवस जात गेले व आता ११ विची शेवटची परीक्षा सुरू झाली होती. सुयश व त्याचे मित्र रोज परीक्षेला जायचे. सोबतच असायचे येताना जाताना. सुयश मात्र आता अभ्यासाला पूर्णपणे कंटाळला होता. परीक्षा द्यायची म्हणून तो द्यायचा. पेपर संपला की सगळे मित्र मिळून रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल वर वडापाव, चायनीज फूड खायचे. आज सुयश चा शेवटचा पेपर होता. त्याने पेपर दिला. पेपर मधे कमी अन्य त्याच घड्याळाकडे लक्ष जास्त होतं. कशी बशी शेवटची बेल वाजली, सुयश व मित्र मंडळी सर्व लगेच घरी गेले.

सुयश मस्त गावावरून मुंबई ला आला होता. थोड्याच दिवसांनी ११ विचा निकाल लागणार होता. सुयश टेन्शन मध्ये आला, माझे तर पेपर खूप कठीण गेलेयत. पास होऊन ना? चांगले मार्क्स मिळतील ना? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. शेवटी निकालाचा दिवस उजाडला, सुयश त्याच्या मित्रांसोबत कॉलेज ला निघाला. त्यांना जायला थोडा लेटच झाला होता. वर्गात मॅडम व सर निकाल देत होते. सुयश व त्याचे मित्र हळू हळू मागे जाऊन बसले. त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. मात्र सुयश शांत शांत बसलेला. एक एक विद्यार्थी शिक्षकांकडे जाऊन निकाल घेत होते. सुयश ते बघत बघत शांत बसलेला. थोड्या वेळाने त्याच्या एक मित्राचा नंबर आला. तो निकाल घेऊन आला. नाचत नाचत सुयश च्या इथे आला आणि त्याला निकाल दाखवला. असेच सुयश चे सर्व मित्र निकाल घेऊन आले. व सगळे पास झाले होते. सुयश मात्र टेन्शन मधेच होता. पास होऊ की नाही. तितक्यात सर सुयश असे मोठ्याने ओरडतात. तो दचकून सरांच्या इथे जातो. सर निकाल देतात आणि म्हणतात की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्याला समजेना काय झालय. निकाल बघतो तर तो नापास झालेला असतो. त्याला धक्काच बसतो. काय करावे त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याचे सर्व मित्र पास झाले होते पण तो एकटाच नापास. अश्याच निराशेने तो बॅग घेऊन घरी निघाला. निराशेने तो घरी पोहोचला. घरी कोणत्या तोंडाने सांगू की मी नापास झालोय ते.

पण त्याची आई स्वतःच त्याला विचारते.. सुयश बाळा पास झालास ना. तो मान खाली घालून शांतच होता. आईला समझल की काहीतरी झालंय. तिने विचारलं त्याला की बाळा काय झाल? नापास झालास? तो मान खाली घालून हो म्हणाला. आई ला थोडा धक्का बसला तिने शांतपणे त्याला समजावून सांगितले. त्याला जेवायला दिले. रात्री बाबांना कस सांगायचं ह्याच विचारात तो झोपी गेला. रात्र झाली त्याचे बाबा घरी आले. हात पाय धुवून झाल्यानंतर त्याच्या आईने बाबांचा सांगितले की आज आपल्या सुयश चा निकाल लागला. काय मग पास झाला ना? किती टक्के मिळाले? सुयश च्या बाबांनी विचारले. नाही तो नापास झाला, सुयश ची आई म्हणाली. त्याचे बाबा थोडा वेळ शांतच होते. सुयश व त्याची आई मात्र टेन्शन मधे होती की पुढे काय बोलतील. त्याच्या बाबांनी जेवून घेऊया सांगितलं. त्या सर्वांचं जेवण झालं. सुयश चे बाबा सुयश जवळ बोलवून सांगतात. बाळा काय झाल आहे? अभ्यासात लक्ष लागत नाहीय का? नाही बाबा, मी माझा पूर्ण कॉलेज चा वेळ माझ्या मित्रांसोबत घालवायचो. कधी पिक्चर तर कधी पार्ट्या. लेक्चर, अभ्यास ह्यातून लक्षच उडाल होतं. पण ते सगळे पास झाले पण मी नापास झालो.

त्याच्या बाबांनी समजावून सांगितले की, बाळा मस्ती मज्जा एका बाजूला आणि अभ्यास एका बाजूला. जीवनात आपल्याला यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. मज्जा, मस्ती नंतरही करता येते. मी बघ १२ नापास आहे, म्हणून मला लिफ्टमध्ये Liftman ची नोकरी करावी लागत आहे. का? तर कमी शिक्षणामुळे. म्हणून मी तुला सांगत असतो अभ्यास कर पुढे नोकरी चांगली मिळेल. सुयश ला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी बाबांना आश्वासन दिले की मी आजपासून रोज अभ्यास करेन आणि एक मोठ्या पदावर काम करेन. सुयश च्या बाबांना व आईला थोडा धीर मिळाला. त्यादिवशी सुयश ने मनात ठाम ठरवून ठेवले होते की आता टाइमपास नाही. आपला अभ्यास आणि आपण. मज्जा मस्ती नंतर अगोदर चांगली नोकरी. त्या दिवसापासून सुयश अभ्यासाला लागला. १२ वी मध्ये बाहेरून एडमिशन घेतले व रोज लेक्चर न चुकवता अभ्यास करू लागला. आई बाबा ते बघत होते. त्यांना त्याच्यावरचा विश्वास आजुन घट्ट झाला. सहामाही परीक्षा, प्रोजेक्ट्स, तोंडी परीक्षा (viva) व बोर्डाची परीक्षा त्याने व्यवस्थित दिल्या.
१२ वित त्याला ८५% मिळाले. त्याच्या आई बाबांना त्याचा आनंद झाला. सुयश अभ्यास व्यवस्थित व नियमितपणे करू लागला. पुढे त्याने १५ वी पूर्ण केली आणि एक चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागला. दरमहा १५,००० रुपये पगार मिळत असे त्याला. त्याला त्याच्या आई बाबांनी समजावून सांगितल्या चा फायदा झाला. तो खूप आनंदाने काम करू लागला.

तर मित्रांनो, ह्या कथेचा एवढाच अर्थ आहे की अभ्यास करा, मेहनत करा. मस्ती, मज्जा ही आयुष्यात करावी पण अभ्यास ही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. कारण मस्ती मज्जा करून कोणी तुम्हाला नोकरी देणार नाही. पण तुमच्या अभ्यासावर व गुणांवर तुम्हाला नोकरी मिळेल. आपले आई बाबा दिवसरात्र कष्ट घेऊन आपल्याला मोठे करतात, आपल्याला चांगल्या शाळेत व कॉलेज मध्ये शिकायला पाठवतात. आणि आपण तिथे जाऊन फक्त टाइमपास करतो. त्यांचा आपल्यावर किती विश्वास असतो. त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नका. तुमच्यासाठी नाही तर त्या बिचाऱ्या आई बाबां साठी शिका व चांगली नोकरी मिळवा. तुम्ही सुयश कडून नक्की काहीतरी शिकला असाल अशी मी आशा करतो व तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जीवनात यशस्वी व्हा..आई बाबांना चांगलं आयुष्य द्या. आणि त्यांना कधी निराश करू नका.

Read More:-
Motivational Quotes In Marathi
Sharechat Jabardast Status In Marathi
Instagram Attitude Captions in Marathi
Girls Marathi Attitude Status


मित्रांनो तुम्हाला बाबा आणि मुलगा ही मराठी कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व तुम्ही सुद्धा सुयश कडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच ही मराठी कथा आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला पाठवा.
तसेच आमच्या Facebook Page ला Like करायला विसरु नका.

Thank You For Reading This Article & Keep Supporting! 💖


माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

2 thoughts on “Father And Son Story in Marathi | बाबा आणि मुलगा मराठी कथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *