WhatsApp - Marathi Short Story

व्हॉट्सअँप – एक मेसेजिंग अँप | WhatsApp Messenging App Marathi Short Story | मराठी शॉर्ट स्टोरी

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

WhatsApp Messenging App Marathi Short Story

आजच्या लेखात आपण WhatsApp Messenging App Marathi Short Story पाहणार आहोत. व्हॉट्सअँप हे जगातील लोकप्रिय आणि सर्वात चांगले सोशल मेसेंजिंग ॲप आहे. आज आपण व्हॉट्सअँप – मेसेंजिंग ॲप ह्याबद्दल मराठी मध्ये शॉर्ट स्टोरी पाहणार आहोत. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल. तसेच आवडल्यास कमेंट्स करून नक्की कळवा.

व्हॉट्सअँप – सोशल मेसेजिंग अँप | WhatsApp Messenging App Marathi Short Story

WhatsApp हे आजच्या काळात प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असतंच. Whatsapp हे एक मेसेजिंग अँप असून त्यामार्फत एकमेकांना इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन मेसेज पाठवले जातात. तंत्रज्ञानाच्या युगात असे आविष्कार होतच असतात. व्हॉट्सअँप सारखे अनेक मेसेजिंग अँप आहेत. पण व्हॉट्सअँप हे लोकप्रिय व साधे, सोप्पे अँप आहे. म्हणून जगामध्ये जास्त प्रमाणात ते वापरले जाते.

पूर्वीच्या काळी व्हॉट्सअँप, इंटरनेट हे सर्व काही नव्हते. तेव्हा लोक एकमेकांशी समोरासमोर, पत्र याद्वारे संभाषण साधायचे. ज्या माणसाची आठवण आली त्याच्या शहरात, त्याच्या गावात थोड्या दिवसांसाठी राहायला जायचे. काही क्षण घालवून ते आपल्या मनात साठवून परत आपल्या घरी परतून येणे. हे सर्व काही जुन्या काळी असायचे.

तेव्हा कोणी किती रागवलय ते सुद्धा समजायचे नाही. पण एकमेकांना समजून घ्यायची तयारी पूर्ण असायची. शहरात राहणारा मुलगा व त्याचा परिवार वर्षभर धकाधकीचं जीवन जगून कंटाळलेला. मुलाच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी मिळाल्यावर लगेच सकाळच्या ट्रेन ने किंवा संध्याकाळच्या गाडीने आपल्या गावी आपल्या आई वडिलांच्या भेटीसाठी जायचे. ही सर्व एक मज्जाच असायची. तेव्हा गावी जायचं म्हणजे एक नवलच वाटायचं. कधी ते शाळेचं वर्ष संपतय आणि कधी एकदा उन्हाळ्याची सुट्टी मिळतेय अशी धावपळ असायची.

पण एकदा गावी गेलं की त्या शांत, रम्य वातावरणात महिनाभर आनंदात रहायचं. गावच्या खळ्यात मनसोक्त खेळायच, शेतात फिरायच. सर्व कसं मस्त वाटायचं. वरच्या शेतात संध्याकाळी क्रिकेट खेळायच आणि रात्री घरी आल्यावर मस्त चुलीवरच जेवण. वाह! काय ते गावचे दिवस होते.

पण जस जसे आपण मोठे होत गेलो तस तस..सर्व काही बदलत गेलं. ती गावी जायची मज्जा, ती उन्हाळ्याची सुट्टी, ती गावची ओढ. सर्व काही बदलून गेलं. कारण आपण मोठे झालो ना.

आताच्या काळात सगळं इंटरनेट मुळे ऑनलाईन झालं. त्यामुळे कोण कुठे आहे, कसे आहे, हे सर्व एका जागेवरून समजायला लागलं. त्यात व्हॉट्सअँप मुळे आपल्या दुर च्या व्यक्तीशी बोलणे, व्हिडिओ कॉल करणे अगदी सहज होऊ लागले. त्यामुळे एकमेकांना भेटणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे, ते सर्व कसं विसरूनच गेल्यासारखं झालंय.

शहरात राहणाऱ्या मित्रांना कॉल किंवा मेसेज करून विचारपूस करणे. कधी फिरायला जायचं म्हंटल तर आज वेळ नाहीय असं म्हणून आपल्या कामात व्यस्त व्हायचं.

व्हॉट्सअँप मुळे काही फायदे तर झाले पण काही तोटे सुद्धा झाले. व्हॉट्सअँप मुळे आपल्या माणसांना भेटण्याची ओढ काहीशी कमी झाली. पण आपल्या माणसांना मेसेज व कॉल द्वारे एकत्र बांधून ठेवण्याच काम मात्र चांगल झालं.

मित्रांनो, इंटरनेट द्वारे आपण आपल्या माणसांना थोड विसरत चाललोय. त्यांना पुरेसा वेळ देत नाहीय, त्यांच्याशी मनमोकळ बोलत नाहीय. म्हणून जेव्हाही कधी तुम्हाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा इंटरनेट वर टाइमपास करण्यापेक्षा आपल्या माणसांना भेटायला जा, त्यांची विचारपूस करा. कारण जर ते आहेत तरच तुम्ही आहात.

जर तुम्हाला WhatsApp Messenging App Marathi Short Story ही शॉर्ट स्टोरी आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींना पाठवा. तसेच नातेवाईकांना सुद्धा पाठवा. तसेच नवनवीन मराठी शॉर्ट स्टोरीज वाचण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट ला भेट द्या.

Thank You For Reading This Article & Keep Supporting!


माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “व्हॉट्सअँप – एक मेसेजिंग अँप | WhatsApp Messenging App Marathi Short Story | मराठी शॉर्ट स्टोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *