Marathi Life Thoughts | 200+ बेस्ट मराठी जीवन सुविचार | Successful Marathi Status

Share This Article

आज आपण क्रिएटर मराठी वेबसाईट वर 200+ Marathi Life Thoughts चा संग्रह पाहणार आहोत. Best Marathi Life Thoughts & Images वाचून तुम्ही जीवनात नवीन उत्साहाने काम करू शकता. त्यामुळे तुम्ही Marathi Life Quotes, Marathi Life Status आणि Marathi Life Thoughts चा संग्रह नक्की वाचा.

हल्लीचे जग खूप वेगाने पुढे जात आहे. पूर्वी एकमेकांशी बोलण्यासाठी फोन चा वापर केला जायचा. पण आता जगातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी बोलण्यासाठी सोशल मीडिया चा वापर केला जातो. हल्लीचे युग आणि पुढे येणारे युग हे सोशल मिडियाचे युग समजले जाणार आहे. सोशल मीडिया जीव की प्राण झाला आहे.

एखादी गोष्ट लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची असेल, तर आपण व्हॉट्सॲप, ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया ॲप्स वरून पटकन स्टेटस ठेवून पोहोचवू शकतो. रोज सकाळी उठून सर्वात अगोदर एखादे सुविचार, मोटिवेशनल स्टेटस ठेवण्याचा सगळीकडे सवय झाली आहे.

म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत बेस्ट मराठी लाईफ स्टेटसचा Marathi Life Thoughts & Status संग्रह. जर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी सुविचार आणि स्टेटस चा Marathi Life Thoughts & Status शोधत असाल तर आमचा हा मराठी संग्रह नक्की वाचा.

Marathi Life Thoughts | मराठी जीवन सुविचार

आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.


वर्तमानात राहून भविष्याचा विचार
करायला शिका.

Motivational quotes in marathi for students

पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.


जगण्यासाठी काम करा
फक्त काम करण्यासाठी जगू नका.


आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात,
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.


यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते
तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल.


वेळ आला आहे तर घाम गाळा,
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.


आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.


तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.


Marathi life status

थेंब कितीही छोटा असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची धमक असते.


तुमच्या मेहनतीचे फळ
तुम्हाला नक्की मिळेल,
फक्त रोज कष्ट आणि
कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.


जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

हे वाचा: Postman – Our Friend Story In Marathi (मराठी कथा)

ध्येय एवढं मोठे ठेवा की,
समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.


राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.


Marathi family suvichar

जीवनात तेच लोक यशस्वी होतात,
ज्यांना बघून लोकांना वाटतं
हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.


निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या
एका हत्यारानंही काम करू शकतो,
पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा
संच असूनही तो काम करू शकत नाही.


गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.


Motivational quotes in marathi for success
Motivational quotes in marathi for success

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक
आपला विचार सुरु करतील.


यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.


जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.

Marathi WhatsApp Quotes

प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते,
कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन
दवाखान्यात खूप महाग विकला जातो.


तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही
तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.


एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी
खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.


fb status marathi

रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर;
रिकामं डोकं आणि रिकामे मन यशाच्या मार्गात अडसर बनते.


तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने
जगाला दाखवून द्या,
तरच जग तुम्हाला ओळखेल.

हे वाचा: फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे
उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.


Good Thoughts in Marathi
Good Thoughts in Marathi

तुमच्याकडे वेळ फार कमी आहे
तेव्हा कोणा दुसऱ्याचं
आयुष्य जगणं सोडून द्या.


प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत.


होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा
पुढे काय करायचंय याचा विचार करा.


तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील
तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड हवेत.


जगासमोर हरलात तरी चालेल
पण स्वतःच्या मनात स्वतःला
कधीही हरलेलं समजू नका.


लोक काय म्हणतील?
पहिल्या दिवशी हसतील,
दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील,
तिसऱ्या दिवशी विसरून जातील,
त्यामुळे लोकांचा विचार करू नका.
तुम्हाला जे करायचंय तेच करा.


ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.


माणसाला अलार्म नाही
तर जबाबदाऱ्या जागं करतात.


माणसानं स्प्रिंगसारखं असावं,
जेवढं दाबलं जाईल,
तेवढं उसळून वर यावं.


जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत
त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.


जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन
आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.


Marathi royal suvichar

जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि जे शेवपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.


सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू,
असा विचार केला तर तुम्ही कधीच
प्रारंभ करू शकणार नाही.


एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदरानं झुकतात.


प्रश्न सोडण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत
यावर आपण जास्त भर दिला पाहिजे.


आयुष्यात खूप काही मिळतं,
आपण तेच मोजत बसतो
जे मिळालं नाही.


जर तुम्हाला महान बनायचं असेल,
तर जगाच्या विचारसरणी प्रमाणे
जगणे सोडून द्या.


inspirational thoughts in marathi

जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.


जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत,
मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.


कोणताही बिजनेस छोटा नसतो,
छोटी असते आपली मानसिकता.


श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका
क्षेत्रात सातत्याने मेहनत करावी लागते.


अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते,
कारण उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक
नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची.


पैश्याचा पाठलाग करू नका,
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.


यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो
यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे.


Marathi suvichar
Marathi suvichar

पाप होईल इतके कमवू नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये,
आणि भांडण होईल असे बोलू नये.


अशक्य काम शक्य करण्यात एक
वेगळीच मजा आहे.


आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा
कधीही घमेंड करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा
स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.


कोणतेही यश अपयश हे आपण
घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.


तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही,
तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.


latest thoughts in marathi hindi

सुखात असताना समजून घेणारे खूप असतात,
पण दुःखात असताना जो समजून घेतो
तोच आपला असतो.


लोकांना वाटतं यशस्वी
माणसाला दुःख होत नाही;
त्यालासुद्धा दुःख होतं,
तो त्यांना सामोरा जातो
आणि पुन्हा लढण्यास तयार होतो.


अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल,
अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील
तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता.

हे वाचा: जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!


65+ Best Good Thoughts & Photos In Marathi

पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.


marathi business quotes

व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,
तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.


तुमच्या चाली रचण्याआधीच
त्या जाहीर करू नका.


व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,
तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.


पैसे मला प्रेरित करत नाही,
तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य
मला प्रेरित करत असते.

हे वाचा: मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!

जी माणसं निश्चयी असतात
त्यांना काहीच अशक्य नसतं.


मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते,
कमावलेली नाही,
आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात,
मागण्यासाठी नाही.


ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची
पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.


ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला,
त्यांचा मी खूप आभारी आहे;
त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी
स्वतः करू शकलो.


प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असावा.


यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो.


आयुष्य हे कवड्यांच्या खेळाप्रमाणे असते
तुमचा आवडता अंक नाही आला,
तर पुन्हा खेळावेच लागते.


simple thoughts in marathi

नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा
कारण सोनाराचा कचरा सुद्धा
वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.


सगळे कागद सारखेच असतात,
फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं
सर्टिफिकेट होऊन जातं.


ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही,
पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही
खरी शोकांतिका आहे.


स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करताना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.


स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या,
नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची
इमारत बांधायला कामाला ठेवेल.


कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा
तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा.


नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला
असला तरी नारळ फोडल्याशिवाय
आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही.

हे वाचा: YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

हे वाचा: Freelancing चा जॉब करायचा आहे? मग इथून करा सुरुवात!

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.


दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.


Instagram Marathi Status

सोन्याची पारख सोन कापून,
घासून आणि तापवून होते.
माणसाची पारख गुणाने,
त्यागाने आणि चारित्र्याने होते.


जेव्हा काही माणसांना
तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं
वाईट सांगायला सुरवात करतात.


जेव्हा तुम्हाला कुमकुवत पणा जाणवेल
तेव्हा सामर्थ्यवान व्हा.
जेव्हा घाबराल तेव्हा हिमंतवान व्हा,
आणि विजयी असतांना नम्र व्हा.


आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत
तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत
तुम्ही हे कसं केलंत.


कल्पनांना सत्यात उतरविण्याची
ज्यांच्यात धमक असते,
त्यांना कोणीच रोखू शकत नाही.


मी पाहिलंय, मला ते हवंय,
मी त्यासाठी मेहनत करणार
आणि ते मी मिळवणारच.


लोक काय म्हणतील याचा विचार करत जगलात,
तर आयुष्यभर त्यांचे गुलाम म्हणून जगाल.


स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं
अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.


खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो,
खरा योद्धा तो आहे जो नेहमीच लढायला
तयार असतो.


believe status in marathi

विश्वास इतरांवर इतका करा की,
तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.


स्वतः ठाम रहा,
कोणाचेही अनुकरण करू नका.


ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले
त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,
स्वतःला दोष द्या कारण
तुम्ही त्यांच्याकडून जास्त पॆक्षा ठेवल्या.


हरण्याची काळजी अन जिंकण्याची
महत्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून
लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो
आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही.


जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.


नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते
तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता
तुमचा हात रिकामा करीत असते.

हे वाचा: Good Morning Wishes Marathi (शुभ सकाळ मराठी शुभेच्छा 2021)


काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी
सर्वात वाईट गोष्टींतून जावे लागते.


अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.


जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या
गोष्टी विकत घेत असाल,
तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी
विकण्याची वेळ येणार आहे असं समजा.


पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे जास्त महत्वाचे असतात.


alone thoughts in marathi

रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,
सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.


जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.


शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याचा अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.


खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा
समोर बादशाह असेल.


आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही,
कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे,
तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.


आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून
तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.


फक्त जिंकणारच नाही तर,
कधी, कुठे काय हरायचं
हे जाणणारा सुद्धा सिकंदर असतो.


तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,
पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.


कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,
आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.


यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,
पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.


स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना
आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची
अजिबात पर्वा नसते.

journey quotes in hindi

कधी कोणाला समजवायचा
प्रयन्त करत बसू नका,
कारण माणसं तेवढंच समजतात
जेवढी त्यांची कुवत असते.


या जगात बोलणारे आणि
विचार करणारे खूप आहेत,
तुम्ही कृती करणारे व्हा.


चांगल्या वेळेची वाट पाहणे सोडून द्या,
कारण वेळ कधीच तुमची वाट पाहणार नाही.


डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर
नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.


जीवनात काही केलं नाही तरी चालेल
पण स्वतःवरचा विश्वास
मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.

हे वाचा: Happy Birthday Wishes In Marathi (वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह)

जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता
तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.


जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,
तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी
हजर राहण्याची.


माणसाची नीती चांगली असेल तर
मनात भीती उरत नाही.


हातचे सोडून पळत्याच्या मागे
कधीही लागू नये.


good people thoughts in english

चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे
असतातच.


छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,
कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.


पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की
नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.


जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,
तर यशही हाताळू शकणार नाही.

पुढच्या पेज जावा…..

Share This Article

Related Posts

One thought on “Marathi Life Thoughts | 200+ बेस्ट मराठी जीवन सुविचार | Successful Marathi Status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *