Diwali Wishes in Marathi | Diwali Quotes in marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Diwali Wishes in Marathi | Diwali New Wishes Status in Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

खास तुमच्यासाठी आम्ही आजच्या पोस्टमधे diwali Status marathi, Diwali Messages in Marathi, Diwali Quotes marathi घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिवाळी शुभेच्छा चे हे कलेक्शन नक्की आवडेल.

“दिवाळी” हा भारतातील सर्व सणांपैकी एक विशेष सण आहे. हा सर्व सणांपैक्षा महत्वाचा सण आहे. दिवाळी ह्या सणाला सर्व ठिकाणी प्रकाश आणि लखलखाट असते. हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद व सुख घेऊन येतो. भारतात दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

भारतासह आता बाहेरील देशात सुद्धा दिवाळी सण साजरा केला जातो. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई सारख्या देशात सुद्धा दिवाळी सण साजरा केला जातो.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करून कारेटी फोडली जातात. संपूर्ण भारतात सर्व जण दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठतात व फटाके फोडतात.

दीपावलीचा पवित्र सण प्रभू श्रीराम अयोध्येत चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून परत आल्याच्या आनंदात साजरा केला जातो.

दिवाळी सणाच्या निमित्ताने आणि खास मुहूर्ताला तुम्ही तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना व मित्रांना दिवाळीच्या खास शुभेच्छा मेसेज देऊन ( Happy diwali wishes in marathi) दिवाळी सण साजरा करू शकता.


Diwali Wishes in MarathiHappy Diwali Quotes in marathi | दिवाळी शुभेच्छा स्टेटस मराठी

Diwali wishes in marathi

“स्नेहाचा” सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची “परमेश्वराला”,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!🎇


आनंद घेऊन येतेच ती,
नेहमीसारखी आताही आली,
तिच्या येण्याने मने,
आनंदाने आनंदमय झाली,
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची ‘शुभ दिपावली’.
💐Happy Diwali💐


दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
आनंदी परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा…!
🎁 शुभ दिपावली 🎁


हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
शुभ दिपावली.!🎆🎆


दिवाळीचा पहिला Diva लागता दारी.,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवो तुमच्या सर्व ईच्छा,
तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🧨🧨


घेऊन “आनंद” येतेच ती नेहमीसारखी,,
आली आताही,
तिच्या येण्याने *मने* झाली आनंदी,,
झाली घाई सर्व ”मित्र-मैत्रीणीना“ मनापासून
शुभेच्छा देण्याची
सर्व मित्र मैत्रीणीना दिपावली या
सणाच्या खूप खूप शुभेच्छा!!🎈🎉
#Happy Diwali to you.!#


धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!


आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली.
Happy Diwali


सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.


हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.


यंदाची दिपावली तुम्हाला
सुखी,समाधानी,आनंदी जावो,
हीच देवाकडे प्रार्थना..!!
दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.!

मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!


फुलांची सुरुवात काळी पासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमा पासून होते,
आणि आपल्या माणसांची सुरुवात
तुमच्यापासून होते….!!
शुभ दिपावली
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!


दिवाळी काही नाही
हे एक नाव आहे उजाळ्याचे,
ह्या उजळ्याचा करा सन्मान,
लावा दिवा आपल्या अंगणी,
दिवाळी हा सण घेऊन आला आहे
तुमच्या घरी उजाळ्याचे नवी किरण.!🌼🎉
| शुभ दिपावली |


Diwali Quotes and images in marathi

सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हावून गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली दिवाळी….
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली दिवाळी आली दिवाळी…..

हे वाचा: Instagram All New Marathi Status


दिवाळीच्या ह्या शुभ मुहूर्तावर,
मला दुसऱ्यांच्या आयुष्यात
आनंद वाढवायचा आहे आणि
त्रास कमी करून त्यांचे आयुष्य अानंदिमय
करायचे आहे….


‘लक्ष’ दिव्यांचे तोरणल्याली
उटण्याचा स्पर्श ‘सुगंधी’
“फराळाची” लज्जत न्यारी
रंगावलीचा शालू भरजरी
आली आली ‘दिवाळी’ आली
पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा
🎇आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।🎇


🎇उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
🎁🎁शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!🎁🎁

जीवन विमा म्हणजे काय? संपूर्ण माहिती, विमा प्रकार | Guide for Best Life Insurance Policy in Marathi


शुभ दीपावली मराठी शुभेच्छा | Shubh deepavali marathi wishes

🎉धनाची पुजा यशाचा प्रकाश
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन
संबंधाचा फराळ
समृध्दीचा पाडवा
प्रेमाची “भाऊबीज” अशा या
दिपावली सणाच्या तुमच्या कुटुंबाला व
सहपरिवरास
🎈🎈सोनेरी शुभेच्छा!!!🎇
🎆


हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.


दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.


आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.


तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.


हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.


🎇रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि नूतन वर्ष सुख समृध्दीचे,
🧨संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!🧨


🎊इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या “बळीराजाला”
“सुखाचे” दिवस येवोत
या सदिच्छेसह..💐💐
दीपावली व बलिप्रतिपदेच्या
🎊🎊हार्दिक शुभेच्छा.🎉🎉

हे वाचा: Good Morning Wishes Marathi | 200+ शुभ सकाळ मराठी शुभेच्छा 2021 [Updated]


Diwali Best Greetings in Marathi | दिवाळी शुभेच्छा पत्र

🧨दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक
‘अनमोल’ आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
‘आयुष्य’ अधिकाधिक सुंदर व्हावं…
🎇दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🎇


Shubh dipavali shubheccha

🎉सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…🎈🎈
आमचा मान..🚩🙏🏻
दिपावलीच्या
शिवमय शुभेच्छा..!🎊


यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.


शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात, जुने हेवेदावे विसरतात, सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती आणि समादान, प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.


अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.


दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.


आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.


दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा, आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा.


दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.


आली दिवाळी चला करू Celebrate,
सगळीकडे उडवू फटाक्यांचे Spark..
दिवाळीचा मेसेज करून टाका Send,
कशाला करते एवढा वेळ Wait..
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा To All Of You,!🎉🎁


Shubh dipavali marathi status

एक दिवा आनंदाचा..
एक दिवा उत्साहाचा..
एक दिवा प्रगतीचा..
एक दिवा जल्लोषाचा..
तुम्हाला व तुमच्या आनंदी परिवारास
दिवाळीच्या आनंदीमय शुभेच्छा!!🌺💐


🎇रंगीबेरंगी रोषणाई
फटाक्यांची आतिषबाजी
फराळाचा घमघमाट
पाहुण्यांची रेलचेल
म्हणजेच दिवाळी नव्हे
तर नात्यातील सैल
झालेली वीण पुन्हा
घट्ट करणे होय.🎇


🎇दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🥰🥰


🎁🎇लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो,
सुखाची हिच सदिच्छा!🎇🎁


🎀🎇नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावलीहीआली….
“नवस्वप्नांची“ करीतपखरण,
दीपावलीही आली…🎈🎈
‘सदिच्छांचे’ पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली…
“शुभेच्छांचे गुच्छ” घेउनी,🎁🎁
दीपावलीही आली…
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!🎇


दिवाळी आहे Fantastic
तुम्ही आहात Marvelous
फटाके फोडू
चला..Chatachat.🎃
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा Patapat 😜🧨

हे वाचा: 100+ Instagram Marathi Attitude Captions | मराठी कॅप्शन / स्टेटस | instagram Captions Marathi [Latest]


दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Diwali Message in Marathi

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली


सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..
दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा..!


Diwali status in marathi

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..
दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली..!


धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली..!


वसुबारस शुभेच्छा मराठी | Vasubaras Wishes Marathi

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्तमंगलमय शुभेच्छा..!

Creator Marathi Team कडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.“ही दिवाळी तुम्हाला आनंद–दायी आणि सुखरूप जाओ हीच सदिच्छा.🎁🎉

तसेच तुम्हाला Happy Diwali Wishes in Marathi Collection कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच मराठी माहिती, ऑनलाईन जॉब्स आणि मराठी रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *