Book Mumbai Local Train Ticket Online in Marathi

UTS App वरून मुंबई लोकल ट्रेन ची ऑनलाईन तिकीट अश्या प्रकारे काढा! | Book Mumbai Local Train Ticket Online in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

आज UTS App वरून मुंबई लोकल ट्रेन ची ऑनलाईन तिकीट अश्या प्रकारे काढा! Book Mumbai Local Train Ticket Online in Marathi ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांसाठी मुंबई लोकल ने प्रवास करणे सोपे झाले आहे .

मुंबई लोकल मधून दररोज प्रवास करणारे आता त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीने ट्रेन तिकीट बुक करू शकतात. मध्य रेल्वेने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, लोक आता लसीच्या पूर्ण डोसमुळे त्यांच्या स्मार्टफोन वर ट्रेनचे तिकीट बुक करू शकतात.

याबाबत माहिती देताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वेने यूटीएस मोबाईल अॅपला महाराष्ट्र शासनाच्या ‘युनिव्हर्सल पास’शी जोडले आहे. ज्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या स्थानिक प्रवाशांना त्यांच्या फोनवर तिकीट बुक करता येईल. दोन्ही सुविधा एकत्र लिंक केल्यामुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे आता लोकल ट्रेन तिकीट साठी मोठी लाईन लावावी लागणार नाही आहे.

तसेच ज्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस उलटले आहेत आणि ज्याला मुंबई लोकलने प्रवास करायचा आहे. त्याने राज्य सरकारचा युनिव्हर्सल पास सर्वात अगोदर काढावा लागेल. युनिव्हर्सल पास कसा काढायचा ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण मागच्या पोस्ट मध्ये माहिती करून घेतली आहे. ती नक्की वाचा.

लसीबाबत माहिती सबमिट केल्यानंतर हा युनिव्हर्सल पास जारी केला जातो. तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागतो.

चला आता आपण लोकल ट्रेन ची तिकीट ऑनलाईन कशी काढायची हे जाणून घेऊया..

Book Mumbai Local Train Ticket Online in Marathi

UTS App वरून मुंबई लोकल ट्रेन ची ऑनलाईन तिकीट अश्या प्रकारे काढा! | Book Mumbai Local Train Ticket Online (Marathi)

Step 1 :- Google Play Store वरून UTS App डाऊनलोड करून घ्या.

Step 2 :- त्यानंतर Login वर क्लिक करा. जर तुम्ही अगोदरच अकाउंट बनवले असेल तर लॉगिन करून घ्या. जर नवीनच अकाउंट बनवणार आहात तर Register वर क्लिक करा.

Step 3 :- रजिस्टर करण्यासाठी तुमच्या समोर एक फॉर्म येईल तो पूर्ण भरा. नंतर प्रायव्हसी पॉलिसी accept करून Register वर क्लिक करा.

Step 4 :- आता तुमच्या समोर UTS App चा Dashboard ओपन होईल.

Step 5 :- ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे Normal Booking वर क्लिक करा.

Step 6 :- तुम्हाला दोन पर्याय दिसतील 1. Book & Travel (Paperless) आणि 2. Book & Print (Paper)

Step 7 :- तुमचा स्रोत आणि गंतव्यस्थान म्हणून “मुंबई” निवडा. प्रवासाची तारीख आणि वर्ग निवडा.

Step 8 :- प्रवासी तपशील प्रविष्ट करा आणि पेमेंट करा.

Step 9 :- ईमेलद्वारे ई-तिकीट प्राप्त करा किंवा डाउनलोड करा. ट्रेनमध्ये चढताना ई-तिकीट आणि तुमचा आयडी दाखवा.

तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल. तसेच हा लेख तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. तसेच अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

MBA Information in Marathi

Content Writing Job Career Tips in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *