आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे? (How to Apply Driving License Online in Marathi) ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. व ड्रायव्हिंग लायसन्सचा ऑनलाईन कसा अर्ज करावा? त्या बद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत.
भारतातील कोणत्याही राज्यात किंवा शहरात ड्रायव्हिंग करण्यासाठी आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला आरटीओ (RTO) ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करावा लागायचा.
त्यानंतर खूप महिन्यांनी आपल्याला आरटीओ मधून लायसेन्स मिळायचे. त्यामुळे काही जण ड्रायव्हिंग लायसेन्स काढत नाही. पण गाडी चालविणाऱ्या प्रत्येकाकडे ड्रायव्हिंग लायसेन्स असणे गरजेचे आहे. आज आपण ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे? ते जाणून घेणार आहोत.
ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी तुमच्याजवळ एक स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे. कारण ऑनलाईन लायसेन्स काढताना आपल्याला एक Application Form भरावा लागतो.
ड्रायव्हिंग लायसेन्स साठी लागणारी सरकारी कागदपत्रे.
ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आहे. ही कागदपत्रे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसेन्स काढताना जमा करावी लागतात.
Age Proof साठी खालीलपैकी एक Document पाहिजे)
- Birth Certificate
- PAN Card
- Passport
- 10th MarkSheet
- शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
कायमचा पत्ता असण्याचा पुरावा (खालीलपैकी एक Document पाहिजे)
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- लाईट बिल
- मतदान कार्ड (Voter ID)
- रेशन कार्ड
जर ही कागदपत्रे नसतील, तर दंडाधिकाऱ्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांच्या मदतीने ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.
लर्निग लायसेन्स साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? (How to Apply Learning License Online in Marathi)
ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी सर्वात अगोदर लर्निग लायसेन्स काढणे आवश्यक आहे. ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी लर्निग लायसेन्स नंबर असणे गरजेचे आहे. त्या शिवाय तुम्हाला ड्रायविंग लाईसन्स काढणे शक्य होणार नाही. आता आपण पाहूया ऑनलाईन पद्धतीने लर्निग लायसेन्स कसे काढायचे?
Step #1 : सर्वात आधी सारथी वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यातील Apply for learner licence पर्यायावर क्लिक करा.
Step #2 : लर्निंग लाईसन्स काढण्यासाठी तुम्हाला माहिती द्यावी लागेल. तिथे तुम्हाला जी माहिती भरायला दिली आहे. ती भरून Continue वर क्लिक करा.
Step #3 : तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. येथे तुम्हाला Applicant does not hold any Driving/Learner license issued in india हा पर्याय सिलेक्ट करून क्लिक करायचे आहे. आता Submit वर क्लिक करा.
Step #4 : नंतर तुम्हाला Authentication प्रोसेस पूर्ण करावी लागेल. तुम्ही तुमच्या आधार कार्डद्वारे / मोबाईल नंबरद्वारे प्रोसेस पूर्ण करु शकता.
*आधार कार्ड पर्याय वापरून पूर्ण करणार असल्यास Submit via Aadhaar Authentication वर क्लिक करा. किंवा मोबाईल नंबर द्वारे प्रोसेस पूर्ण करणार असल्यास Submit without Aadhaar Authentication पर्यायावर क्लिक करा.*
Step #5 : Authentication प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या स्क्रीन वर खालील प्रमाणे एक फॉर्म येईल. फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेली माहिती भरून Submit बटनावर क्लिक करायचे.
Step #6 : तुमच्यासमोर Acknowledgement फॉर्म Generate होईल. तुम्हाला तुमचे काही सरकारी डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. त्यानंतर Test Schedule करुन पेमेंट करुन फॉर्म पूर्ण होईल.
Documents अपलोड करण्यासाठी तुमच्या जवळ दोन पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वरून त्या डॉक्युमेंट चे फोटोज् काढून ते अपलोड करू शकता. किंवा Scanner Machine द्वारे स्कॅन करून अपलोड करू शकता.
अश्या प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटात Learning License काढू शकता. तसेच तुम्ही Learning License काढले की त्यानंतर तुम्ही आरामात driving licence काढू शकता.
ड्रायव्हिंग लायसेन्स साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? (How to Apply Driving License Online in Marathi)
ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी तुमच्या कडे सर्व डॉक्युमेंट्स तसेच Learning License नंबर असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे हे सर्व तयार असेल, तर तुम्ही बिन्धास्त ड्रायविंग लाईसन्स काढू शकता. तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ते तुम्ही वर पाहू शकता. ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
Step #1 : पहिल्यांदा सारथी वेबसाईटला भेट द्या. तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. त्यातील Apply for Driving License या पर्यायावर क्लिक करा.
Step #2 : ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती भरावी लागेल. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर Continue वर क्लिक करा.
Step #3 : त्यानंतर तुम्हाला Learning License Number आणि Birth Date एंटर करायची आहे. नंतर OK वर क्लिक करा.
Step #4 : आता तुम्हाला फोटो, सही आणि इतर डॉक्युमेंट्स अपलोड करुन Submit वर क्लिक करा.
Step #5 : तुम्हाला Driving Test Schedule करावी लागेल. त्यानंतर ऑनलाईन Fee Payment करा. तसेच त्यानंतर तुमच्या मोबे नंबरवर आणि Email ID वर एक Acknowledgement मेसेज येईल. ह्या Details जपून ठेवा.
Schedule केलेली Driving Test त्या दिवशी RTO ऑफिस मध्ये जाऊन पूर्ण करा. तुम्हाला उत्तीर्ण घोषित केल्यास तुमच्या अर्जास पूर्ण मान्यता दिली जाईल. त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसेन्स मिळेल.
ड्रायविंग लाईसन्सची फी किती असते?
ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी खालील प्रकारे फी तुमच्याकडून घेतली जाते. महाराष्ट्र राज्या पुरतीच ही फी आकारली जाते. प्रत्येक राज्यात वेगवेगळी फी आकारली जाते.
- Learning License – 151/- रुपये
- Test Fee – 50/- रुपये
- Driving License – 716/- रुपये
- Renewal of Driving License – 416/- रुपये
- Duplicate Driving License – 216/- रुपये
- कालावधी संपल्यानंतर अर्ज केल्यास – 1000/- रुपये
अश्या प्रकारे तुम्ही आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसेन्स आणि Learning License काढू शकता. तसेच तुम्हाला फक्त Driving Test देण्यासाठी आरटीओ ऑफिसला जावे लागेल.
हे सुद्धा वाचायला विसरू नका:-
» 200+ आत्मविश्वास वाढवणारे सुविचार
» 100+ इंस्टाग्राम मराठी कॅपशन्स
अश्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाईन लायसेन्स (How to Apply Driving License Online in Marathi) काढू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या सोशल मीडिया वर व मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच नवनवीन लेख वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.