Interesting Marathi facts about Google | गूगल बद्दल मराठी रोचक तथ्य

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

आजच्या लेखात आपण गूगल बद्दल मराठी रोचक तथ्य (Interesting Marathi facts about Google | ) जाणून घेणार आहोत. तसेच Google ह्या कंपनी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

गूगलची स्थापना सप्टेंबर 1998 मध्ये लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी केली होती. तेव्हा ते पीएच.डी. कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थी होते.
गूगल एलएलसी ही अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. जी इंटरनेटशी संबंधित सेवा आणि उत्पादनांमध्ये माहिर आहे, ज्यात ऑनलाइन जाहिरात, तंत्रज्ञान, शोध इंजिन (Google Search Engine), क्लाऊड संगणन, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश आहे.

Credits:- Google.com

4 सप्टेंबर 1998 रोजी कॅलिफोर्निया मध्ये गूगल चे मुख्यालया होते. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2002 रोजी गूगलला डेलॉवरमध्ये पुन्हा एकत्रित केले गेले. जुलै 2003 मध्ये गुगल कॅलिफोर्निया मधील माउंटन व्ह्यू येथील मुख्यालयात स्थापन करण्यात आले.

आज आपण गूगल कंपनी बद्दल मराठी रोचक तथ्य जाणून घेणार आहोत.


Interesting Marathi facts about Google | गूगल बद्दल मराठी रोचक तथ्य

  • गूगल ह्या कंपनीची स्थापना लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी 1998 ला केली होती. 2 ऑक्टोंबर 2015 ला सुंदर पिचाई हे गूगल सीईओ म्हणून निवडण्यात आले.
  • गूगल ही कंपनी नवनव्या कंपन्या विकत घेत असते. तसेच गूगल ही कंपनी cloud computing, internet, Computer software and hardware, artificial intelligence, advertising ह्या सर्व्हिस देणारी कंपनी आहे.
  • गूगल ही कंपनी प्रत्येक सेकंदाला ₹ 1,30,900 कमावते.
  • 1 एप्रिल, 2004 मध्ये गूगल ने Gmail नावाचे नवे प्रॉडक्ट लॉन्च केले. ह्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इंटरनेट चा वापर करून मेल पाठवता येतो. तसेच ह्या Gmail मध्ये त्यांनी 15GB ऑनलाईन स्टोरेज, फ्री जीमेल अकाऊंट उपलब्ध करून दिले.
  • Google AdWord ची सुरुवात करण्यात आली. ही सुविधा 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती. ह्याचे आता नाव बदलून Google Ads करण्यात आले आहे. ह्याच्या मदतीने आपण आपले कोणतेही प्रॉडक्ट गूगल च्या सर्च रिझल्ट्स मध्ये दाखवू शकता. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात.
  • तसेच 1998 पासून गूगल ने Google Doodle ही सुविधा सुरू केली. ह्यामध्ये विविध सणांविषयी माहिती डूडल पोस्ट द्वारे गूगल वर केली जाते. दिवाळी, होळी, जयंती, वाढदिवस अश्या वेळी गूगल डूडल तयार करून पोस्ट केले जाते.
  • गूगल ह्या कंपनीचा Google Pixel हा स्मार्टफोन जगप्रसिद्ध आहे.
  • Google चा एका वर्षाचा रेव्हेन्यू 182,527,000,000 अमेरिकन डॉलर इतका आहे.
  • गूगल ने अनेक प्रॉडक्ट लॉन्च केले. तसेच ते जगप्रसिद्ध आहेत. गूगल ने कोण कोणते प्रॉडक्ट लॉन्च केले ते पाहूया.

• Google Cardboard, Google Sheets, Google Maps, Google Drive, Google Keep Notes, Google Docs, Google Home, Google Workspace, Gmail, Photos, Google News, Google Books, AdMob, AdSense, Google Ads ( AdWord ), Google Analytics, Search Console, Google Pixel, Google Slides, Google Duo, Google Earth इत्यादी गूगल चे स्वतःचे प्रॉडक्ट आहेत. जे खूप सुरक्षित आणि लोकप्रिय आहेत.

Credits:- google.com
  • Google कंपनी ने सर्च इंजिन वरील शोध अधिक वाढवण्यासाठी क्रोम वेब ब्राउजर लॉन्च केले.
  • Online Streaming Content पाहण्यासाठी गूगल ह्या कंपनी ने Chromecast नावाचे dongle लॉन्च केले. हे dongle स्मार्ट टीव्ही ला जोडून इंटरनेट च्या मदतीने ऑनलाईन चित्रपट किंवा वेब सीरिज पाहू शकतो.
  • Google च्या मुख्यालयामध्ये 200 हुन अधिक शेळ्या पाळल्या आहेत. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून Google कार्यालयाच्या लॉन मधील गवत कापनीसाठी मशीनचा वापर न करता शेळ्यांचा केला जातो.
  • Google चे Search Engine हे 100 दशलक्ष गिगाबाइट (GB) चे आहे. इतका डेटा साठवून ठेवण्यासाठी एक टेराबाइट च्या एक लाख ड्राईव्ह ची गरज पडते. गूगल सर्च इंजिन हे जगात सर्वाधिक वापरले जाते.
  • गूगल चे मेन पेज म्हणजे मुखपृष्ठ इतके रिकामी कसे? तर त्याचे मुख्य कारण म्हणजे सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज ह्यांना HTML चे पूर्णपणे ज्ञान नव्हते. त्यामुळे तेव्हा त्यांना होमपेज इतका आकर्षित बनवता आला नाही.
  • जगातील सर्वात लोकप्रिय कंपनीच्या वेबसाइट कोड मध्ये 23 मार्कअप एरर आहेत. प्रत्येक आठवड्यात 20,000 पेक्षा अधिक लोक Google मध्ये नोकरी साठी अर्ज करतात.
  • Google ची 2020 मधील ९०% कमाई ही फक्त जाहिरातींमधून आली होती. 146.92 अब्ज डॉलर्स एवढी होती.
Interesting Marathi facts about Google
Credits:- google.com
  • गूगल ह्या कंपनी ने 2006 साली YouTube ही कंपनी खरेदी केली. यूट्यूब हे ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूब वर चॅनल बनवणे व व्हिडिओ शेअर करणे अगदी मोफत आहे.
  • Google वर प्रत्येक सेकंदाला 70,000 पेक्षा अधिक शोध घेतला जातो. तसेच दर वर्षाला Google वर 12.69 मिलियन सर्च केले जाते.
  • गूगल वर सर्वाधिक YouTube हे शोधले जाते. त्या पाठोपाठ फेसबुक, जीमेल आणि अमेझॉन सर्वात जास्त शोधले जाते.
  • Google चे Google Home नावाचे प्रॉडक्ट आहे. त्याचा वापर करण्यासाठी आपल्याकडे सर्वात चांगले इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. गूगल होम वरून तुम्ही हवामान, गाणी, बातम्या इत्यादी गोष्टी ऑनलाईन ऐकू शकता.
  • Google ह्या कंपनी ने स्मार्टफोन सोबत त्यांचे SmartWatch देखील लॉन्च केले आहेत. जे खूप लोकप्रिय आहेत.

तर हे आहेत गूगल बद्दल मराठी रोचक तथ्य (Interesting Marathi facts about Google). मला खात्री आहेत तुम्ही हे वाचून गूगल ह्या जगप्रसिद्ध कंपनी बद्दल नवीन गोष्टी जाणून घेतल्या असतील.

तसेच जर हा लेख आवडला तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. आणि कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या कंपनी बद्दल रोचक तथ्य जाणून घ्यायचे आहेत ते. आम्ही नक्की त्यावर लेख लिहू.

हे नक्की वाचा:-

तसेच आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करायला विसरु नका आणि अश्याच नवनवीन माहितीसाठी आणि रोचक तथ्य वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “Interesting Marathi facts about Google | गूगल बद्दल मराठी रोचक तथ्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *