ताज महालचा इतिहास मराठी मध्ये | Taj Mahal information in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

आजच्या लेखामध्ये आपण ताज महाल बद्दल संपूर्ण माहिती (Taj Mahal Information in Marathi) मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.

Taj Mahal Information in Marathi

Taj Mahal Information in Marathi

ताज महाल भारताच्या इतिहासातील एक महत्वपुर्ण स्थळ आहे. आपल्याला महितच आहे कि भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे ताज महाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. ताजमहाल ही समाधी भारताच्या आग्रा शहरात आहे.

पांढऱ्या संगमरवरा पासुन बनवलेले हे स्मारक इ.स. १६३१ ते १६५३ मध्ये सम्राट शाह जहान यांच्या आदेशानंतर बांधन्यात आले. सम्राट शाह जहान यांची पत्नी मुमताज महलचे आपल्या चौदाव्या मुलास जन्मदेताना निधन झाले. त्यानंतर सम्राट शाह जहान यांनी ताज महालची निर्मीती आपली प्रिय पत्नी मुमताज महल च्या स्मुती निमीत्त केली होती.

ताज महाल हे मुघल स्थापत्याचे एक महत्वाचे उदाहरण आहे, येथे आपल्याला इस्लामीक, इरानीक, परशियन तसेच भारतीय कलाकृती पाहण्यास मिळते. ही कलाकृती खूप जुनी असून लोकांच्या पसंतीची आहे.

भारताच्या इतिहासामध्ये अनेक युद्ध झाले, परंतु सुदैवाने ताज महालास यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. ताज महल खरे पाहता इमारतींचा, तळ्यांचा, बागीच्यांचा, कारंज्यांचा एक संच आहे.

ताज महाल मध्ये दोन‌ मशीदी आहेत, यातील एक मशीद मक्काच्या दिशेला नसल्याने वापरात नाही. ताज महाल मध्ये आपल्याला तीन इरानीयन शैलीची प्रवेशद्वारे, तीन लाल वीटांच्या इमारती, मध्यभागी स्थीत कारंजा आणि चार दिशांमध्ये चार जलाशये पाहण्यास मिळतात.

ताज महालास दरवर्शी सरासरी ४० लाख लोक भेट देतात, यामुळे ताज महाल भारतामध्ये सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. ज्याप्रमाने स्टॅच्यु ऑफ लिबट्री हे अमेरीकेचे प्रतीक आहे, त्याच प्रमाणे ताज महाल हे भारताचे प्रतीक आहे.

ताजमहाल बांधण्याचे मुख्य कारण

आपल्या सर्वांना हे माहित आहे की ताजमहाल म्हणजेच आपल्या पतीच्या पत्नीवर असलेल्या प्रेमाचा एक पुरावा. शाह जहानने आपल्या मृत पत्नी मुमताज महाल च्या आठवणीखातर ताज महालची निर्मीती केली, आणि त्याची भव्यता तिच्यावर असलेल्या प्रेमाशी जुळते. ही खूप छान कहाणी आहे.

ताजमहाल मुघल सम्राट शाहजहांची तिसरी पत्नी मुमताज महलसाठी बांधण्यात आला होता. तिने आपल्या 14 व्या मुलाला जन्म दिल्यानंतर 17 जून 1631 रोजी तिचे निधन झाले. तिला बुरहानपूर येथे पुरण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. पण ही समाधी तात्पुरती होती. आपल्या पत्नीवरचे आपले प्रेम जशे सुंदर आहे तशीच एक सुंदर समाधी स्थापन करण्याचा शहाजहानने निर्णय घेतला.

या कार्यात त्याला 22 वर्षे लागली आणि त्यांने यासाठी मोठ्या प्रमाणावर मोगल साम्राज्याचा खजिना नष्ट केला. आणि 22 वर्षांनंतर या अविश्वसनीय वास्तुची निर्मीती झाली.ताज महाल बाबत लोकांमध्ये प्रचलीत एक खोटी कथा देखील आहे. या कथेप्रमाणे लोकांचे असे म्हणने आहे की नदीच्या दुसर्‍या बाजूला दुसरा ताजमहाल तयार केला जाणार होता.

हा दुसरा ताज महाल सम्राट शाह जहानची समाधी म्हणुन बांधण्यात येणार होता. पण ही कथा खरी नाही, पुरातत्वशास्त्रीय संशोधनात येथे बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. परंतु हे अवशेष दुसऱ्या ताज महालचे नसुन मेहताब बागचे आहेत.

येथे दुसरा ताज महाल तयार करणे त्याकाळी अशक्य झाले असते, कारण राज्याचा खजिना या पहिल्या बांधकामातूनच रिकामा झाला होता.

हे नक्की वाचा: 200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस

ताज महालचे बांधकाम

हा भव्य प्रकल्प साध्य करण्यासाठी मोगल सम्राटाने लाहोर, दिल्ली, शिराझ आणि समरकंद या प्रमुख केंद्रांमधून काही हजार कामगार आणले होते. असे मानले जाते की मुख्य बिल्डर उस्ताद अहमद लाहोरी होता, परंतु प्रकल्पाच्या खर्‍या निर्मात्याचे नाव अनिश्चित आहे.

अत्यंत महत्त्वाकांक्षेसह सम्राट शाह जहानने हा प्रकल्प हाती घेतला होता. हा प्रकल्प जितका महाग होता तितकाच भव्य होता. त्या काळातल्या जगातल्या सर्व चमत्कारांना मागे टाकण्याची शाह जहानची इच्छा होती यात काही शंका नाही.

ताजमहालच्या बांधकामाला १६३१ पासुन ते १६५३ पर्यंत २२ वर्षे लागली. समाधी व इतर इमारती पूर्ण झाल्यावर शेवची 5 वर्षे बगीचे उभारण्यासाठी लागली. ताज महालच्या बांधकामाचे “श्रेय उस्ताद अहमद लाहौरी” यांना आहे. पण इतर आर्किटेक्टच्या तुलनेत या कामात त्याने घेतलेला भाग हा अज्ञात आहे.

येथील इमारती लाल वाळूच्या दगडात बांधल्या गेल्या, हा उत्तर भारतातील एक अतिशय सामान्य दगड आहे. ताज महाल चे बांधकाम वाळूच्या खडकामध्ये आहे, पण संगमरवराने हा खडक झाकलेला आहे.

खरं तर आर्किटेक्ट लाल आणि पांढऱ्या रंगाच्या फरकांवर खेळत होते, पांढऱ्या रंगात त्यांनी शिलालेखांकरिता काळ्या संगमरवराचा वापर केला. बांधकामासाठी 20,000 कर्मचारी आलटुन पालटुन काम करत होते. काही कारागीरांनी त्यांची संपूर्ण व्यावसायिक कारकीर्द या बांधकामावर खर्च केली.

त्यांना 1000 हत्तींनी मदत केली ज्यांचा वापर भार वाहण्यासाठी केला जात असे. नक्कीच कामगारांनी अचूक उपकरणे वापरली, परंतु त्याकाळच्या बांधकाम तंत्राची जास्त माहीती उपलब्ध नाही.

हे नक्की वाचा: फ्रीलान्सिंग म्हणजे काय? Freelancing द्वारे घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

ताज महाल विषयी काही रोचक तथ्य | Interesting Marathi facts about Taj Mahal

Interesting Marathi Facts About Taj Mahal

1) शाह जहानच्या आदेशानुसार इ.स. १६३२-१६५३ मध्ये ताज महाल बांधला गेला, यावेळी बांधकामासाठी ३२ दशलक्ष रुपये खर्च झाले. या पैशांचे आजचे मुल्य हे १ अब्ज डॉलर्स इतके आहे.

2) ताज महालची शोभा वाढवण्यासाठी सुमारे 28 प्रकारच्या मौल्यवान दगडांचा वापर केला गेला. तिबेट, चीन, श्रीलंका आणि भारताच्या काही भागांतून हे दगड आणन्यात आले.

3) ताज महालच्या चारही मिनारींकडे काळजीपूर्वक पाहील्यास या चार मिनारी सरळ नाहीत हे आपनास कळते. या मिनारी बाहेरील बाजूस कललेल्या दिसतात. याचे कारन असे की भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास या मिनारी मध्यभागी असलेल्या गुंबदावर पडु नये म्हणुन त्या बाहेरील बाजुस कललेल्या आहेत.

4) ताज महालच्या बांधकामासाठी संपूर्ण भारत आणि आशियामधून साहित्य वापरले गेले होते. असे म्हटले जाते की बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी एक हजाराहून अधिक हत्तींचा वापर केला गेला होता.

5) ताज महालचा कारागीर उस्ताद अहमद लाहोरी याचे हात ताज महाल बांधुन झाल्यावर कापण्यात आले होते, ही गोष्ट खरी नसुन ताज महाल बांधल्यानंतर लाल किल्याची बांधनी ही याच कारागीराने केली होती.

6) ताज महाल हा कुतुब मिनार पेक्षा उंच आहे. ताज महाल आणि कुतुब मिनार मध्ये 5 फुटांचा फरक आहे.

7) आग्रा ही ताजमहालच्या बांधकामासाठीची वास्तविक जागा नव्हती. यापूर्वी, ताजमहाल बुरहानपूर (मध्य प्रदेश) येथे बांधला जाणार होता. येथेच मुमताज महलचे निधन झाले होते, परंतु बुरहानपूरला पुरेसा पांढऱ्या संगमरवराचा पुरवठा होऊ शकला नाही आणि यामुळे आग्र्यामध्ये ताजमहाल तयार बांधण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला होता.

8) ताज महालचा रंग वेळेनुसार व सुर्यप्रकाशानुसार बदलतो. सकाळच्या वेळेस ताज महाल गुलाबी दिसतो, संध्याकाळी तो पांढरा तर चंद्रप्रकाशामध्ये सोनेरी दिसतो.

9) आग्राच्या किल्यामधील जास्मीन टाॅवर येथुन ताज महाल स्पष्ट दिसतो. याच ठिकानी शाह जहानला त्याचा मुलगा औरंगजेब याने कैद केले होते.

हे नक्कीच वाचा:

» YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

» मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!

ताज महाल बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी

▪️ भारतीय नागरीकांसाठी 45 रुपये प्रती व्यक्ती ( समाधी पाहण्यासाठी 200 रुपये अधिक).

▪️ SAARC आणि BIMSTEC पर्यटकांसाठी 535 रुपये प्रती व्यक्ती ( समाधी पाहण्यासाठी 200 रुपये अधिक).

▪️ परदेशी पर्यटकांसाठी 1050 रुपये प्रती व्यक्ती ( समाधी पाहण्यासाठी 200 रुपये अधिक).

▪️ 15 वर्षांपेक्षा लहान मुलांना प्रवेश फी नाही.

▪️ ताज महाल मध्ये रात्रीच्या वेळी मोबाईल घेउन जाण्यास परवानगी नाही. इतर वेळेस मोबाईल सायलेंट अथवा बंद ठेवावा लागतो.

▪️ ताज महाल मध्ये रात्रीच्या वेळेस मोबाईल फोन तसेच जड बॅगा घेऊन जाण्यास मनाई आहे. आवाज आणि गोंधळ करण्यासही येथे परवानगी नाही. मुख्य समाधी जवळ फोटो काढन्यास देखील परवानगी नाही.

▪️ तुम्ही ताज महाल (Taj Mahal) ला कोणत्याही महिन्यात भेट देऊ शकता. पण थंडीच्या ऋतु मध्ये भेट दिल्यास तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळेल. कारण या वेळेस जास्त ऊन आणि पाउस नसतो.

▪️ ताज महाल दर शुक्रवारी बंद असतो. दर शुक्रवारी दुपारनंतर फक्त मुस्लीम भावीकांना प्रार्थनेसाठी ताज महाल मध्ये जाता येते. इतर दिवशी सकाळी 6 ते संध्याकळी 6:30 आणि रात्री 8:30 ते रात्री 12:30 यावेळेत ताज महाल सर्वांसाठी खुले असते.


ताज महाल बद्दल संपूर्ण माहिती ( Taj Mahal Information in Marathi ) हा लेख आवडला असेल. जर आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना व सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका.तसेच कमेंट्स करून नक्की सांगा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

2 thoughts on “ताज महालचा इतिहास मराठी मध्ये | Taj Mahal information in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *