Maharashtra Day Wishes In Marathi | कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष शुभेच्छा)

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

आज आपण महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष शुभेच्छा (Maharashtra Day Wishes In Marathi) पाहणार आहोत. ह्या शुभेच्छा तुम्ही 1 मे रोजी महाराष्ट्रा दिनानिमित्त तुमच्या स्टेटस ला ठेवू शकता.

महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ह्याच दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस (international Worker’s Day) सुद्धा साजरा केला जातो.

महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ह्या दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण मराठी शुभेच्छा आपल्या मित्रांना देऊन साजरा करू शकतो.

महाराष्ट्र राज्याचा तसा खूप मोठा इतिहास आहे. आज आपण पाहूया खालील लेखा मध्ये.



महाराष्ट्र राज्याचा इतिहास (History Of Maharashtra In Marathi)

Maharashtra Day Wishes In Marathi

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविध भाषांप्रमाणे अनेक प्रांतांची निर्मिती झाली. १९६० सालापर्यंत महाराष्ट्र राज्य हे अनेक भाषिकांचे राज्य होते. महाराष्ट्रात अनेक भाषिक राहत होते. पण मराठी भाषिकांसाठी एक स्वतंत्र राज्य असावं. असं प्रत्येक मराठी माणसाचे स्वप्न होते.

महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य करण्याची प्रक्रिया सुरू असताना मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या मागणीला मात्र प्रचंड विरोध झाला होता. महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी माणसे ही मुंबईत राहणारी होती. त्यामुळे मराठी माणसांपासून मुंबई हिसकावली जात आहे हे पाहून जनमाणसांमध्ये प्रक्षोभ वाढत गेला.

२१ नोव्हेंबर १९५६ रोजी याबाबत सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलकांनी मुंबईच्या फ्लोरा फाऊंटनसमोर भव्य मोर्चा काढला होता. आंदोलकांनी मुंबईसह सयुंक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत हा परिसर अक्षरशः दुमदुमवून टाकला होता.

मात्र सरकारकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जने परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात १०६ आंदोलकांना आपले जीव गमवावे लागले होते.

पुढे या बलिदानापुढे नमतं घेत सरकारने १ मे रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. आजही या हुताम्यांचे स्मरण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

▪️Taj Mahal Information in Marathi



महाराष्ट्र दिनाचे महत्त्व | Importance of Maharashtra Day In Marathi

महाराष्ट्र हा अनेक रुढी परंपरा, अनेक जाती आणि अनेक विविधतेनं भरलेले राज्य आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्राची त्या काळातील भौगोलिक परिस्थितीनुसार निरनिराळ्या जिल्हांमध्ये विभागणी करण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असे विभाग मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले.

हा इतिहास आजही संपूर्ण महाराष्ट्राला रोमांचित करणारा आहे. ज्यामुळे या दिनानिमित्त अनेक पोवाडे आणि गाणी रचण्यात आली. आज या गाण्यांचे बोल महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांला प्रेरित करणारे आहेत.



महाराष्ट्र दिन शुभेच्छा (Maharashtra Day Wishes In Marathi)


माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिना च्या खूप खूप शुभेच्छा! जय महाराष्ट्र!


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा..


प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा.


मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा..महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


महाराष्ट्र दिनानिमित्त आणि जागतिक कामगार दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा!


गर्जा महाराष्ट्र माझा…. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.


कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा… महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा!!


महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रत्येक माणसाच्या आनंदात आपला आनंद सामावून घेणाऱ्या.. अश्या माझ्या मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनानिमित्त खूप शुभेच्छा!


आम्हाला अभिमान आहे आम्ही महाराष्ट्रीयन असण्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा…
महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास हार्दिक शुभेच्छा!


कामगार दिनाच्या शुभेच्छा | International Worker’s Day Wishes


सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा… महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवस हक्काचा… दिवस कामगारांचा… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण … कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


काम असे करा की लोकांना म्हणायला हवं काम करावं तर यानेच… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट…सर्व कामगार बंधू आणि भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा इतिहास मराठी माणून कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच हेे संदेश प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपण महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान निर्माण करतील.

महाराष्ट्र दिनानिमित्त हे संदेश (Maharashtra Day Wishes In Marathi) तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे. महाराष्ट्र दिन संदेश एकमेकांना पाठवून महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा करू.

अश्याच नवनवीन मराठी स्टेटस आणि रोचक तथ्य तसेच मराठी माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *