Sant Tukaram Maharaj Marathi Suvichar :- आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील थोर संत आणि वारकरी संत म्हणजेच संत तुकाराम यांचे काही सर्वश्रेष्ठ सुविचार – Sant Tukaram Maharaj Suvichar. जे वाचून आपण आपले मन शांत आणि तृप्त करु शकता. १७ व्या शतकात संत तुकाराम यांचा जन्म झाला होता. वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीच्या शुभ मुहूर्तावर संत तुकारामांनी महाराष्ट्रात जन्म घेतला.
Sant Tukaram Maharaj Marathi Suvichar | संत तुकाराम महाराज मराठी सुविचार
मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचे कारण ।
खरा ज्ञानी
लोकांना तारतो.
दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये.
उलट पद्धतशीरपणे अवमान करावाl
ठेविले अनंती तैसेचि राहावे ।
चित्ती असुद्या समाधान

लहानपण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ।।
बोले तैसा चाले ।
त्याची वंदावी पाऊले ।
धर्माच्या नावाखाली
अधर्म चालु असतो.
प्रस्थापित पढिक विद्वान हे
ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत
सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी
आपल्या मनाचा कौल मानावा.
Sant Tukaram Maharaj Status
पंढरपूरचे लोकप्रिय दैवत विठ्ठल- रखुमाई हे संत तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकाराम महाराज विठ्ठल आणि रखुमाई यांचे वेडे भक्त होते. संत तुकारामांची महाराष्ट्रात ‘जगद्गुरु ‘ अश्या नावाने ओळख आहे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रवचन आणि कीर्तनाच्या शेवटी हे खालील कडवे आवर्जून घेतले जाते.
|| “पुंडलीक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय,
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय” ||
असा जयघोष केला जातो.
बहुमत चुकीचे असल्यास
कधीही स्वीकारू नये
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
सुख पाहता जवापाडे ।
दुःख पर्वताएवढे ।।
दया, क्षमा, शांती ।
तेथे देवाची वस्ती ।।
चांगले मित्र
हेच भाग्याचं लक्षण
शुध्द बीजापोटी ।
फळे रसाळ गोमटी ।।
साधु-संत येती घरा ।
तोचि दिवाळी दसरा ।
जे जाणुनबुजून चुकत असतील
त्यांची फजिती करा.
अनाथ अपंगाची
सेवा करा.
माणसाने थोडातरी
परोपकार करावा.
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला करावी लागत नाही
तुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता.
पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला
अज्ञानाच्या पोटी,
अवघीच फजिती
Sant Tukaram Maharaj Marathi Suvichar अश्याच माहितीसाठी क्रिएटर मराठी ह्या मराठमोळ्या वेबसाईटला नक्की भेट देत रहा.