cycle marathi movie

Cycle – सायकल | मला आवडलेला एक संवेदनशील मराठी चित्रपट – cycle marathi movie

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

“फक्त वेळ घालवण्यासाठी एखादा चित्रपट बघायला घेतला पण चित्रपट संपल्यावर फारच आवडला, असा एक मराठी चित्रपट. मराठी चित्रपट हे खूपच उत्तम आणि कथापूर्ण असतात. प्रत्येक चित्रपटांमधील कथेमध्ये एखादा प्रेरणादायी विचार नक्कीच दडलेला असतो. ते विचार तुम्हाला तुमचे जीवन बदलण्यासाठी प्रेरित करू शकतात. आज अश्याच एका मराठी चित्रपटाविषयी आपण माहिती जाणून घेऊया.

Menu

Cycle – सायकल | cycle marathi movie

चला हवा येऊद्या फेम भाऊ कदम उर्फ भालचंद्र कदम आणि त्यांच्यासोबत प्रियदर्शन जाधव म्हणजेच टाईमपास 2 मधला मोठा दगडू. हे दोन मराठी सिने सृष्टीतील एक हुशार आणि प्रतिभाशाली अभिनेते आहेत. ह्या दोघांचा एक मराठी चित्रपट ज्या बद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे ही कथा शेवट पर्यंत नक्कीच ऐका.

चित्रपटाचे नाव आहे सायकल (Cycle) हा एक मराठी चित्रपट आहे. जो उत्तम कथा व अभिनयाने रंगलेला आहे. तर ह्या चित्रपटाची पटकथा व संवाद फारच मनमोहक आहेत.आपल्या जवळचे आहेत असे वाटत. तर ह्या कथेचा प्रमुख नायक आहे केशव. त्याला त्याच्या बाबांनी सायकल भेट म्हणून दिलेली असते. केशव हा प्रामुख्याने ज्योतिषी असे. त्याचा त्या सायकल वर फार जीव असे.

जिथे जाई जिथे तो ती सायकल आवर्जून सोबत नेत असे.त्यामुळे त्याला त्याच्या सायकल वरून ओळखण्यास सुरुवात झाली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव या पात्रांचा (Role) उल्लेख कसा नाही?

तर कथा इथूनच मजेशीर व मनोरंजक आहे. चला तर पाहूया.. एके दिवशी केशव ची सायकल चोरी होते. तो पूर्ण गावभर ती सायकल शोधत फिरत होता. मात्र सायकल काय सापडेना.तर ते सायकल चोरी करणारे दुसरे तिसरे कोणी नसून गज्या म्हणजेच भाऊ कदम आणि मंग्या म्हणजेच प्रियदर्शन जाधव होते.

तर हा चित्रपट आवडण्याचे कारण हेच की..जिथे जिथे गज्या आणि मंग्या ती चोरलेली सायकल घेऊन जायचे. त्या त्या ठिकाणी असलेली माणसे त्यांना केशव चे पाहुणे म्हणून ओळख दाखवू लागले. गज्या आणि मंग्या ज्या ज्या ठिकाणी भेटत गेले, तस तसे त्यांना केशव भाऊ बद्दल माहिती व चांगली कार्य कानी पडू लागली. तुम्हाला असे वाटत असेल की शेवटी त्या दोघांनी सायकल विकून टाकली असेल तर तसे नाही.

त्या दोघांनी मिळून एक पत्र लिहिले..व त्या सायकल सोबत एका झाडाखाली ठेवून दिले. अश्याप्रकारे केशव ला त्याची सायकल परत मिळते. तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा आयुष्यात तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, पण नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा..😊😊

आणि हो सायकल हा चित्रपट नक्की पाहा.. आणखी काही निवडक चित्रपट ( नशीबवान, half Ticket, Rampaat, Good Night Take Care )

मराठी चित्रपट असतात खूप भारी. पण प्रेक्षक वर्ग त्यांना हवा तेवढा प्रतिसाद देत नाहीत. का तर, bollywood मधील तडकाफडकी, अँक्शन हिरो ह्या गोष्टींमुळे मराठी सिनेमातील कथा प्रेक्षकांना भावत नाही. त्यामुळे थिएटर मध्ये कोणी जात नाही.

पण माझी आपल्या मराठी प्रेक्षकांना हीच कळकळीची विनंती आहे की, मराठी सिनेमा हा स्टोरी वर बनवलेला असतो. त्यामुळे तो तडकाफडकी नसून पारिवारिक सिनेमा असतो. त्यामुळे मराठी सिनेमा आपल्या मायबोलीतला सिनेमा नक्की पहावा.

तसेच Cycle – सायकल – cycle marathi movie हा मराठी मूवी बद्दल तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की सांगा. अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *