नवरदेवासाठी खास मराठी उखाणे | Marathi Ukhane For Groom – [Love/Arrange Marriage]
लग्न म्हंटल की उखाणे हे येतातच. लग्नात अनेक ठिकाणी नवरदेवाला अडवून त्याच्या तोंडून नवरीचे नाव बोलून घेतले जाते. आणि ते उखण्याच्या द्वारे घेतले जाते. उखाणे घेतल्यावर नवरदेवाला गृहप्रवेश दिला जातो.
त्यासाठी नवरदेवाला उखाणे येणं गरजेचं आहे.म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. रोमॅंटिक उखाणे, विनोदी उखाणे, शॉर्ट उखाणे संग्रह घेऊन आलो आहे. मला आशा आहे तुम्हाला नक्की आवडतील.
Marathi Ukhane for Groom | नवरदेवासाठी खास उखाणे [Latest]

1.“पुरणपोळीत तुप असावे साजुक, __ आहेत आमच्या फार नाजुक.”
2.“दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ__सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.”
3.“शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, __ राणी मिळाली स्वर्ग आला होता.”
4.“बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, __चे नाव घेतो लग्नाच्या राती.”
5.“सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, __ राणी माझी घरकामाता गुंतली.”
6.“देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, __ शी लग्न करुन स्वप्न पुर्ण झाले माझे.”
7.“नवा शहारा,नवा बहारा, __ च नाव घेतो आता तरी द्या मला आत जायला.”
8.“रुपाचं चांदणं येतं आकाशात भरून,__शी लग्न करून मन माझे आले भरून.”
9.“सोशल मीडिया च लागतं प्रत्येकाला वेड, __शी लग्न करून मला लागलं तिचं वेड.”
10.“जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,__च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.”
11.“संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, __चे नाव घेतो सर्वजण ऐका”.
12.“मायामय नगरी, प्रेममय संसार, __च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.”
13.“जिजाऊ सारखी माता राजा शिवाजी सारखा पुत्र,
__च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
14.“जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी __ म्हणजे लाखात सुंदर नार”
15.“अस्सल सोने चोविस कॅरेट, __ अन् माझे झाले आज लव्ह मॅरेज.”
16.“जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर __सारथी.”
17.“हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, __च्या जीवनात मला आहे गोडी.”
18.“चंद्राला पाहून येते भरती सागराला, __ ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.”
- “पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नाव घेऊन राखतो मी सर्वाचा मान.”
20.“तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट, पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट.”
काही जण लव्ह मॅरेज करतात तर काही अरेंज मॅरेज..पण प्रेम असणं हे खूप महत्त्वाचे आहे.काही जण प्रेम करून लग्न करतात तर काही जण लग्न करून प्रेम करतात. तुमच्यासाठी 150+ रोमॅंटिक लव्ह स्टेटस इन मराठी नक्की वाचा.
हे ही नक्की वाचा
गूड मॉर्निंग शुभेच्छा संग्रह मराठी
गूड नाईट शुभेच्छा संग्रह मराठी
नवरदेवासाठी रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane for groom) [New]

लग्नाला अनेक वर्ष झाल्यावरही एकमेकांप्रती असलेलं प्रेम जाहीर करण्यासाठी अनेकदा उखाणे घेतले जातात. कधी कधी सासूबाईंच्या आग्रहाने किंवा नवऱ्याच्या आग्रहाने उखाणे घ्यायला लागतात. त्यासाठीच हे खास उखाणे आणले आहेत. असेच काही रोमँटिक उखाणे खास तुमच्यासाठी. तुम्हाला हे उखाणे नक्की आवडतील.
1.“ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, __चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.”
2.“सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, __ चे नाव घेतो
__च्या घरात.”
3.“लग्नाचा वाढदिवस करू साजरा, __ तुला आणला मोगऱ्याचा गजरा”.
4.“चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, __चे नाव घेऊन सोडतो कंकण.”
One thought on “नवरदेवासाठी खास मराठी उखाणे | Marathi Ukhane For Groom – [Love/Arrange Marriage]”