Zee Marathi वर होणार नवीन मालिका सुरू! New Serials Alert

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Zee Marathi ही मराठी वाहिनी खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे ह्यावरील सीरिअल्स अनेक लोकप्रिय आहेत. त्यातच आता झी मराठी वरील लोकप्रिय सीरियल अग्गबाई सूनबाई ही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अग्गबाई सूनबाई ही मालिका 23 ऑगस्ट ला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

त्यासोबत झी मराठीवर 5 नवीन मालिका (Five New Marathi Serials) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नवीन मालिकांचे ट्रेलर झी मराठी इंस्टाग्राम पेज वर लॉन्च करण्यात आले आहेत. कोणकोणत्या मालिका सुरू होणार आहे त्यांच्या बद्दल खाली जाणून घेऊया.


1 . Man Zhal Baajind ( मन झालं बाजिंद )

“मन झालं बाजिंद” ही पहिली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्यामध्ये दोन्हीही नवीन चेहरे दिसून येत आहेत. वैभव चव्हाण आणि श्वेता राजन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका 23 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता असणार आहे.


2. Man Udu Udu Zhal ( मन उडू उडू झालं )

झी मराठी वरील दुसरी मालिका “मन उडू उडू झालं” ही आहे. ह्यात फुलपाखरू सारख्या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेली वैदेही म्हणजेच हृता दुर्गुळे आणि colors मराठी वाहिनी वरील विठू माउली मालिकेतील विठ्ठलाची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सर्वांना ही मालिका कधी सुरू होते ह्यांची चाहूल लागली आहे. ही नवी मालिका 30 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता असणार आहे.


3. Tujhi Majhi Reshimgath ( तुझी माझी रेशीमगाठ )

हिंदी चित्रपटात लोकप्रिय असलेला मराठी कलाकार श्रेयस तळपदे आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. तुझी माझी रेशीमगाठ ह्या रोमँटिक मालिकेतून तो सिल्व्हर स्क्रीनवर एन्ट्री मारत आहे. श्रेयस तळपदे सोबत मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका 23 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता झी मराठी वर सुरू होणार आहे.


4. Tujya Majhya Sansarala Ani Kay Hava ( तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं )

ही नवीन मालिका 30 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठी वर सुरू होणार आहे. ह्या मध्ये मुख्य भूमिकेत अमृता पवार असणार आहे.


5. Ti Parat Aaliy ( ती परत आलीय )

ही एक भयानक मराठी मालिका असणार आहे. ह्याचा ट्रेलर झी च्या इंस्टाग्राम पेज वर लाँच करण्यात आला आहे. रात्रीस खेळ चाले नंतर आत्ता प्रेक्षकांच्या भेटीला ही नवीन Horror सीरियल येत आहे.

हे नक्की वाचा:

» Instagram वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

» YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

मराठी स्टेटस, मनोरंजन, माहिती, रोचक तथ्य आणि ऑनलाईन जॉब्स बद्दल माहितीसाठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *