Benefits Of Dark Chocolate in Marathi

तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त | डार्क चॉकलेट चे फायदे

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Benefits Of Eating Dark Chocolate Daily in Marathi

सध्याच्या परिस्थितीत तणाव वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची, पहिले येण्याची शर्यत सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक जण तणावाखाली जगत आहे. आज आपण आरोग्य टिप्स मध्ये तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त आहे का? व ते खाल्ल्याने काय होते? त्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे पूर्ण लेख व्यवस्थित वाचा.

आपण वाढदिवसाला किंवा काही खास प्रसंगी चॉकलेट किंवा Cadbury खातो. पण तुम्हाला माहीत आहे का, चॉकलेट हे आपला तणाव दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कसं? तर खालील लेखात आपण जाणून घेऊया.

तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त!

लोक उदास वाटू लागल्यानंतर मूड बदलण्यासाठी किंवा डोकं शांत ठेवण्यासाठी अनेक उपाय करीत असतात. काही उपाय हे तेवढ्या वेळापर्यंत काम करतात. त्यानंतर ते काम करणे बंद करतात. त्यामुळे तणाव किंवा मन शांत नसेल, तर डार्क चॉकलेट खाणे सर्वात उपयुक्त आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपले मन शांत होते. अलीकडेच झालेल्या संशोधनात ही गोष्ट दिसून आली आहे की, डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने आपला खराब मूड उत्तम होतो.

कोरियात झालेल्या एका रिसर्च मध्ये डार्क चॉकलेटचे काही तुकडे खराब मूड उत्तम करू शकतो, हे सिद्ध झाले आहे. संशोधकांनी काही विशेष लोकांसोबत मिळून हे संशोधन केले आहे. कोरिया मधील संशोधकांना आढळले की, ज्या सुदृढ प्रौढांनी ८५% डार्क चॉकलेटपैकी, दररोज ३० ग्रॅम चॉकलेट खाल्ले ते त्या सुदृढ प्रौढांच्या तुलनेत जास्त खुश दिसून आले. ज्यांनी कमी कोकोचे चॉकलेट खाल्ले वा चॉकलेट खाल्ले नाही. त्यांना नैराश्य आणि चिडचिड होत राहते. हे दिसून आले आहे.

१०० ग्रॅम चॉकलेटचा सुमारे तिसरा भाग ३० ग्रॅम असतो. असे मानले जाते की, चॉकलेट खाल्ल्यामुळे मूडमध्ये झालेली सुधारणा मायक्रोबियल बदलांशी संबंधित असते. अध्ययनाच्या नमुन्यांमध्ये हे आढळून आले. संशोधकांनी सांगितले की, हे फायदे फक्त ८५% कोकोयुक्त चॉकलेट खाल्ल्याने आढळून आले आहेत. दूधयुक्त चॉकलेटने वागण्यात आणि आनंदात बदल आढळून आला नाही.

कोणत्या प्रकारचे डार्क चॉकलेट खाणे योग्य!

दूधयुक्त चॉकलेट कमी प्रमाणात खायला हवे. उच्च कोको टक्के असलेले चॉकलेट उत्पादन उत्तम असते. कारण त्यात साखर, चरबी व रंग व तेलसारखे इतर घटक कमी असतात. ८५ टक्के डार्क चॉकलेट फक्त १० ग्रॅम खाल्ल्यामुळे आनंद मिळू शकतो. ३० ग्रॅम चॉकलेट रोज खाणाऱ्यांचा मूड इतरांपेक्षा चांगला राहतो. त्यामुळे रोज चॉकलेट खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे.

तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त
तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त

तसेच कोको चे प्रमाण जास्त असलेले चॉकलेट खाणे योग्य आहे. त्यामुळे उत्तम आणि तंदुरुस्त शरीरासाठी रोज कमीत कमी ३० ग्रॅम चॉकलेट नक्की खाल्ले पाहिजे.

दररोज डार्क चॉकलेटचे खाण्याचे फायदे!

🔻 हृदय निरोगी राहते – दररोज डार्क चॉकलेटचे खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारापासून आपण दूर राहतो. डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका 50 टक्क्यांनी कमी होतो. म्हणूनच, जर आपण डार्क चॉकलेटचे सेवन केले, तर हृदय निरोगी राहते.

🔻 शरीरातील चरबी कमी होते शरीरातील चरबी वाढली असेल, तर तुम्ही रोज डार्क चॉकलेट चे सेवन करावे. वजन जास्त असेल, तर डार्क चॉकलेट वजन कमी करण्यास मदत करू शकते. डार्क चॉकलेटमध्ये असलेली कोको पावडर शरीराची चरबी कमी करते. डार्क चॉकलेट खाताना त्यात जास्त प्रमाणात दूध नसणे गरजेचे आहे. तसेच कोको पावडर चे प्रमाण कमीत कमी 50% असणे आवश्यक आहे.

🔻 शरीरातील थकवा दूर होतो – दिवसभरच्या कामाने शरीर खूप थकते. त्यावेळी एखादे कॉल्ड ड्रिंक किंवा आइस्क्रीम खाऊन थकवा दूर केला जाऊ शकतो. पण त्याचा परिणाम जास्त वेळ राहत नाही. पण जर तुम्ही डार्क चॉकलेटचे रोज सेवन केले, तर तुम्हाला सतत जाणवणारा थकवा दूर होईल. तसेच डोकेदुखी, मूळ बदलणे अशा समस्या असतील, तर तुम्ही दररोज डार्क चॉकलेट खाल्ल्याने या समस्या दूर होण्यास मदत होईल.

हे नक्की वाचा:

» मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!

» 200+ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस

🔻 ब्लड प्रेशर कमी राहते – आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला टेन्शन आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. अश्यावेळी तुम्ही डार्क चॉकलेट चे सेवन करू शकता. ज्याने ब्लड प्रेशर आटोक्यात राहण्यास मदत होते.

तुम्हाला ही आरोग्य टिप्स उपयुक्त ठरेल, अशी मी आशा करतो. तसेच Creator Marathi वेबसाईट वर आम्ही तुमच्यासाठी आरोग्यविषयक टिप्स आणि उपाय घेऊन येत राहू. त्यामुळे वेबसाईट शी नक्की जोडून रहा आणि वेबसाईट वरील आरोग्यविषयक टिप्स आणि उपाय नक्की वाचा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *