Amazing Facts About india in Marathi: भारत ही अशी भूमी आहे ज्यात अनेक शूरवीरांचा जन्म झाला. ह्या भूमीत अनेक भाषांचा जन्म झाला. ह्या भूमीला इतिहासाची आई म्हंटले जाते. ह्या पावन भूमीत महान लोकांचा जन्म झाला. परंपरेची मातृभूमी असलेली तसंच मौल्यवान वस्तूंची खाण असलेली ही भारत भूमी आहे.
या भुमीने हजारो लाखो भूमिपुत्रांना जन्म दिलाय, या भारताचे वर्णन करणे हे शब्दांपलीकडचे आहे. तसेच भारत देशातील अनेक जणांनी जगाला नवनवीन आविष्कार शोधून दिले. धर्म, जात, विविधता असलेला हा भारत देश आहे, ह्या देशाबद्दल खूप आहे सांगण्या सारखे.
आज आपण भारत देशाबद्दल काही रोचक तथ्य (Amazing Facts About india in Marathi) जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये ह्या गोष्टींचे आविष्कार झाले! (Amazing Facts About india in Marathi)
▪️मोतीबिंदू दूर करायच्या शस्त्रक्रियेचा आविष्कार भारतामध्ये झाला.
▪️बुद्धिबळाचा शोध भारतातच लागला.
▪️बटणाचा शोध हादेखील भारतामध्येच लागला.
▪️शाम्पू चा शोध भारतात लागला.
▪️शून्याचा शोध हादेखील भारतामध्येच लागला.
▪️त्रिकोणमिती आणि बीजगणित यांचा अविष्कार देखील भारतामध्येच झाला.
▪️चंद्रावर पाण्याचा शोध हा एका भारतीयांनीच लावला.
▪️बौद्ध आणि जैन धर्माची सुरुवात ही भारतामधून झाली.
▪️भारत सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे.
▪️भारताने आत्तापर्यंत कधीच कोणत्या देशावर प्रथम हल्ला केला नाही.
▪️जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक हे फक्त भारतामध्ये आहेत.
▪️भारताची अर्थव्यवस्था ही दुनियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
▪️इसवी सन 17 पर्यंत भारत हा खूप श्रीमंत देश होता.
▪️अमेरिका आणि जपान नंतर सुपर कॉम्पुटर बनवणारा भारत हा तिसरा देश आहे.
▪️भारत देशाचे भारत हे नाव एका राजाच्या नावावरून ठेवण्यात आले होते.
आपण खाली भारतातील काही आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेणार आहोत. ह्या गोष्टी वाचून तुम्हाला भारतीय असल्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटेल.
भारताबद्दल ह्या गोष्टी वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल! (Amazing Facts About India in Marathi)
▪️विश्वातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण!
मेघालयात असणाऱ्या एका छोट्याश्या गावात विश्वातील सर्वाधिक पाऊस पडतो. हे गाव मेघालयातील खासी टेकड्यांमध्ये आहे. हे गाव छोटेसे असले तरी ह्या गावात विश्वातील सर्वाधिक पाऊस पडतो. ह्या गावाचे नाव मावसिनराम आहे.
विश्वातील सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे हे छोटेसे गाव जगाच्या नकाशावर खूप प्रसिद्ध झाले आहे. चेरापुंजी हे सुद्धा सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आणि हे ठिकाण देखील मेघालयातच आहे. 1861 साली चेरापुंजी येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती.
▪️संपूर्ण पृथ्वीला गुंडाळता येतील इतक्या स्टील वायर्स वापरले जाणारे भारतातील पाहिजे ठिकाण!
भारतातील वाहतुकीला वेग मिळावा तसेच कमी वेळात अंतर पार पडावे, म्हणून भारतीय सरकारने समुद्रात सी लिंक बांधला. हा सी लिंक बांद्रा ते वरळी पर्यंत बांधलेला आहे. हा सी लिंक बांधण्यासाठी 30 पेक्षा अधिक वर्ष लागली होती.
तसेच आश्चर्याची गोष्ट ही आहे की ह्या सी लिंक च्या बांधकामासाठी जेवढ्या स्टील वायर्स चा वापर करण्यात आला आहे. त्या स्टील वायर्स संपूर्ण पृथ्वीला गुंडाळता येतील इतक्या आहेत. अजित गुलाबचंद यांच्या नेतृत्वात असलेल्या हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने (HCC) सी लिंक चे संपूर्ण बांधकाम केले आहे.
▪️चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावणारा प्रथम देश तो म्हणजे भारत.
2009 मध्ये ISRO ने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला. ISRO ही कंपनी भारताची असून, चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा प्रथम शोध लावला.
▪️तरंगते पोस्ट ऑफिस ते सुद्धा पाण्यावर!
भारतातील पोस्टाचे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे आणि विशाल आहे. भारतामध्ये पोस्टाचे एकूण 1,55,015 पोस्ट ऑफिस आहेत. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही आजपर्यंत जमिनीवर असलेले पोस्ट ऑफिस पाहिले असेल, इमारतीमध्ये असलेले पोस्ट ऑफिस पाहिले असेल.
पण तुम्ही कधी पाण्यावर तरंगणारे पोस्ट ऑफिस पाहिले आहे का? हो पाण्यावर तरंगते पोस्ट ऑफिस भारतामध्ये आहे. तुम्हाला ते पहायचे असल्यास तुम्हाला श्रीनगर ला भेट द्यावी लागेल. हे तरंगते पोस्ट ऑफिस श्रीनगर येथील दल सरोवरात 11 ऑगस्ट 2011 साली सुरु झाले.
▪️सर्व कबड्डी विश्वकप जिंकणारी एकमेव टीम!
भारतीय क्रिकेट टीम जागतिक पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून आहे. त्यातच भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघ देखील जागतिक पातळीवर आपले वर्चस्व गाजवत आहे.
आजवर झालेल्या 5 ही पुरुष कबड्डी विश्व कप भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाने पटकावले आहेत. तसेच भारतीय महिला कबड्डी संघाने देखील आजवरचे सर्व विश्वकप जिंकलेले आहेत.
▪️Satelight ने घेतलेले कुंभमेळ्याचे छायाचित्र
भारतामध्ये कुंभमेळा भरवला जातो. त्यामध्ये अनेक व्यक्ती, भाविक साधू, संत इत्यादी व्यक्ती एकत्र येतात. 2011 साली हरिद्वार येथे भरलेल्या कुंभमेळ्यात सगळ्यात जास्त यात्रेकरूंची आणि भाविकांची गर्दी अनुभवायला मिळाली. तब्बल 75 मिलियन साधू, संत आणि भाविक या कुंभमेळ्यात स्नानाकरता एकत्र आले होते. हे छायाचित्र उपग्रहाने घेण्यात आले आहे.
▪️शाम्पू चा शोध लावणारा देश आपला भारत
शाम्पू चा शोध लावणारा देश हा भारत आहे. भारताने फार वर्षापूर्वी नैसर्गिक शाम्पू चा शोध लावला होता. तसेच शाम्पू हा शब्द संस्कृत भाषेतील ‘चंपू’ या शब्दावरून घेण्यात आला आहे. ज्याचा अर्थ मसाज करणे असा होतो.
▪️भारताच्या माझी राष्ट्रपतींच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वित्झर्लंड देशात विज्ञान दिवस साजरा केला जातो.
आजही भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वित्झर्लंड देश विज्ञान दिवस साजरा करतो. भारताच्या मिसाईलचे जनक माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी 2006 साली स्वित्झर्लंड ला भेट दिली होती. त्या भेटीने प्रभावित झालेल्या स्वित्झर्लंडने 26 मे हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.
▪️राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती.
भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती हे डॉ. राजेंद्र प्रसाद होते. त्यांनी त्यांच्या पगारातील केवळ 50% रक्कम स्वीकारली. यापेक्षा अधिक रक्कम आपल्याला नको असे त्यांनी जाहीर केले होते. आपल्या 12 वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांनी पगाराच्या केवळ 25% रक्कमच स्वीकारली. त्यावेळी राष्ट्रपतींचा पगार हा 10,000 रुपये इतका होता.
▪️हत्तींसाठी बांधलेले एकमेव स्पा
स्पा हे माणसांसाठी असते हे आपण ऐकले असेलच, पण कधी हत्तीसाठी स्पा बांधलेले पाहिले आहे का! 😳 हो आपल्या भारत देशात चक्क हत्तींकरता स्पा उघडले आहे. हा स्पा केरळ राज्यातील पुन्नथुर कोट्टा एलिफंट यार्ड रिजुव्हिनेशन सेंटर मधे सुरू करण्यात आला आहे. या स्पा सेंटर मधे हत्तींना उत्तम अंघोळ, मालिश, आणि भरपूर अन्न देण्यात येतं.
▪️भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश बोलणारा देश आहे:
भारत हा देश इंग्लिश बोलणारा जगातील दुसऱ्या क्रमांका चा देश आहे. अमेरिकेनंतर भारत देश इंग्लिश बोलणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातील जवळजवळ साडे बारा करोड लोक इंग्रजीचा वापर करतात. येत्या काळात हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
▪️जगात सर्वाधिक शाकाहारी लोकं भारतात राहतात.
जगातील सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात आहेत. भारतात जवळपास 20 ते 40% लोक ही शाकाहारी आहेत. भारतात मांसाहारी लोकांचं प्रमाण असले तरी शाकाहारी लोकांचे प्रमाण हे अधिक आहे.
▪️जगातील सर्वाधिक दूध उत्पादक करणारा देश.
भारत जगातील सर्वाधिक दुध उत्पादक करणारा देश आहे.
भारताने दुध उत्पादनात नुकतेच युरोपियन देशांना मागे टाकले आहे. भारताचे दुध उत्पादन 132.4 मिलियन टनांपर्यंत पोहोचले आहे.
▪️इंडियाला भारत हे नाव कसे पडले?
पुराणानुसार, भारत हे नाव हे एका राज्याचे नावावरून ठेवण्यात आले होते. राजा भारत हा दुष्यंत आणि शकुंतला ह्यांचा पुत्र आहे. पुराणामध्ये भारत देशाला भारत खंड किंवा क्षेत्र असे म्हंटले जायचे.
▪️भारताची वेगवान महिला कॅल्क्युलेटर
शकुंतला देवी या भारतातील मानवी कॅल्क्युलेटर म्हणून ओळखल्या जातात. नुकताच त्यांच्यावर एक हिंदी चित्रपट काढण्यात आला आहे. त्याचे कारण देखील तसेच अनोखे आहे. 13 आकडी संख्येच्या गुणाकाराचे उत्तर त्या अवघ्या 28 सेकंदात अचूक देतात. असे एकापेक्षा एक व्यक्ती आपल्या भारत देशात राहतात. हे खूप अभिमानास्पद आहे.
▪️भारतासोबत बांगलादेश करिता सुद्धा लिहिले राष्ट्रगीत.
रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या भारत देशासाठी राष्ट्रगीत लिहिले. तसेच त्यांनी बांगलादेशाकरिता सुद्धा राष्ट्रगीत लिहिले. रवींद्रनाथ टागोर यांनी केवळ जन गन मन हे भारताचे राष्ट्रगीत लिहिले असे नव्हे तर बांगलादेशातील राष्ट्रीय गान आमार सोनार बांगला लिहिण्याचे श्रेय देखील टागोरांनाच जाते.
▪️अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळातून म्हणतात, सारे जहां से अच्छा.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतराळात गेलेले पहिले भारतीय राकेश शर्मा यांना हा प्रश्न विचारला होता की, अवकाशातून भारत कसा दिसतो. त्यावर उत्तर देत ते म्हणाले, “सारे जहां से अच्छा”…🇮🇳🇮🇳
▪️हेवेल ही पूर्णतः भारतीय कंपनी असून मूळ मालकाच्या नावावरून पडले हेवेल हे नांव:
हेवेल ही भारतीय कंपनी बऱ्याच वर्षांपूर्वी अवघ्या दहा लाख रुपयांमध्ये विकत घेण्यात आली होती, आणि आज हि अब्जावधी इलेक्ट्रिकल वस्तू बनविणारी कंपनी म्हणून अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. या कंपनीचे नाव आजही मूळ मालक हवेली राम गुप्ता यांच्या नावामुळेच हेवेल असे आहे. आहे की नाही भारी!🥳
▪️सर्वप्रथम हिरे शोधणारा देश आहे आपला भारत
सर्वप्रथम हिरे शोधणारा देश आहे भारत. भारतातील गुंटूर व क्रिष्णा जिल्ह्यातील क्रिश्ना नदीच्या तीरावर डेल्टा इथे हिरे सापडले होते. त्यानंतर 18 व्या शतकात ब्राझील इथं हीरे गवसले, पण हिऱ्यांच्या उत्पादनात भारताने जगाचे नेतृत्व केले आहे.
▪️सापशिडी खेळाचा शोध भारतात लागलाय!
Snakes & Ladders या खेळाला फार पूर्वी मोक्षा पटामु म्हणून ओळखले जायचे. लहान मुलांना आपले कर्म चांगले आणि नैतिक असावेत असा बोध या खेळातून देण्याचा उद्देश होता. पुढे या खेळाला कमर्शिअल स्वरूप प्राप्त झाले आणि हा जगातील सर्वाधिक आवडणाऱ्या खेळांमधील एक झाला.
(वरील दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास आम्हाला कमेंट्स करू नक्की सांगा. आम्ही त्यात अपडेट करू.)
हे नक्की वाचा:-
- रोज सकाळी लवकर उठण्याचे फायदे! जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!
तर हे होते भारत देशाबद्दल काही रोचक तथ्य (Amazing Facts About india in Marathi). मी आशा करतो की तुम्हाला हा “Interesting Facts About India” लेख आवडला असेल. आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.
तसेच अश्याच नवनवीन माहिती साठी आणि मराठी रोचक तथ्य वाचण्यासाठी क्रिएटर मराठी सोबत जोडून रहा.