सकाळी लवकर उठण्याचे फायदे

रोज सकाळी लवकर उठण्याचे फायदे! जाणून घ्या संपूर्ण माहिती!

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Benefits of getting up early morning in Marathi:- मित्रांनो आपण आपल्या आई वडिलांकडून तसेच आजी आजोबांकडून आपण ऐकले असेलच की पहाटे लवकर उठायचे, व्यायाम करायचा, पोष्टिक आहार घ्यायचा. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक कामामुळे माणसाला शांतता नाहीय. रात्री उशिरापर्यंत काम करणे त्यानंतर उशिरा झोपणे. त्यामुळे लवकर उठणे कठीण झाले.

पण आपले पूर्वज रोज पहाटे उठने, व्यायाम करने, आहार घेणे, मोकळ्या वातावरणात फिरायला जाणे, इत्यादी कामे करायचे. त्यामुळे त्यांचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी होते. त्यांच्या अंगात प्रत्येक काम करण्याची इच्छा आणि जोश असायचा. तसेच धर्मशास्त्रात सांगितले आहे, की लवकर झोपणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामुळे दीर्घायुष्य, धनसंपदा व उत्तम आरोग्य लाभते.

आताच्या काळात आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाहीय. पण आपले आरोग्य हे फार महत्त्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थित असले की आपल्याला नवनवीन कामे करण्याची इच्छा आणि टाकत मिळते.

आज आपण रोज सकाळी लवकर उठण्याचे फायदे (Benefits of getting up early morning in Marathi) पाहणार आहोत.

सकाळी लवकर उठण्याचे फायदेBenefits of getting up early morning in Marathi

सकाळचा वेळ

सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला दिवसातील जास्तीत जास्त वेळ वापरण्यास मिळतो. एका रिपोर्ट नुसार माणूस त्याच्या आयुष्यातील फक्त 23-24 वर्ष झोपण्यात वाया घालवतो.

सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला ताज्या वातावरणात जाता येते. तसेच लवकर उठून व्यायाम, योगा व मेडिटेशन करू शकतो. त्यामुळे आपल्या शरीरात जोश आणि ताकत येते. सकाळी उठून आपण आपल्या कामाचे नियोजन करू शकतो व 24 तासातील जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकतो.

योगा करणे शरीरासाठी चांगले असते. त्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.

सकाळी मिळणारा एकांत

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला वेळ देणे विसरून गेलेलो आहे. पण स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे. रोज सकाळी लवकर उठून आपण एकांतात स्वतःशी थोडावेळ बोलू शकतो. स्वतःशी बोलल्यामुळे आपण केलेल्या चुका तसेच आपल्या जीवनातील पुढील काम इत्यादी गोष्टींचे नियोजन करू शकतो. त्यामुळे आपल्याला कोणतेही काम करणे सोप्पे आणि सरळ होऊन जाते.

थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा म्हंटले आहे की, “दिवसातून एक वेळा तरी तुम्ही स्वतःची संपर्क साधा, जर तुम्ही तुमच्या मनाशी संपर्क साधत नसाल तर तुम्ही जगातील सर्वात उत्कृष्ट अशा व्यक्तीला गमावत आहात”. म्हणून रोज सकाळी उठून आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. तसेच आपल्या चुकांचं, आपल्या वाईट सवयीबद्दल, स्वतःशी बोलून त्यांना बदलले पाहिजे.

वाचा: Interesting Facts in Marathi | रोचक तथ्य मराठी मध्ये

पहाटे मिळणारा सूर्यप्रकाश

रोज उशिरा उठून सुद्धा सूर्य दिसतो, सूर्यप्रकाश दिसतो. पण पहाटे मिळणारा सूर्यप्रकाश हा आपल्याला शरीराला गुणकारी असतो. सकाळच्या सूर्य प्रकाशातून डी जीवनसत्त्व मिळते. जे आपल्या शरीरासाठी चांगले असते.
सकाळचा सूर्यप्रकाश हा डी-जीवनसत्वाचा एक चांगला स्रोत आहे.

डी जीवनसत्त्वाचे अनेक फायदे आहेत. त्यातून आपल्याला कॅल्शिअम मिळते, आपली हाडे, दात मजबूत होतात. त्यामुळे सकाळी उठून घराबाहेर जाऊन सूर्य प्रकाश घेतला पाहिजे. सकाळचा सूर्य आणि शांतता, निसर्गाच्या सौंदर्यासह असलेले वातावरण मन प्रसन्न करण्यास मदत करते.

वाचा: बिल गेट्स यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

कार्य करण्याच्या क्षमतेत वाढ होते

सकाळी लवकर उठणाऱ्यांच्या कार्य करण्याच्या क्षमतेत खूप गती असते. एका संशोधनातून असे साध्य झाले आहे की ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात, त्यांच्यामध्ये असणारी कार्य करण्याची क्षमता ही उशिरा उठणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते.

म्हणूनच यशस्वी लोक रोज सकाळी लवकर उठून आपल्या कामाची सुरुवात करतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्याकडे नवनवीन कामे करण्याची तयारी आणि जोश असतो.

वाचा: Ratan Tata Best Quotes in Marathi

आपली मनस्थिती व्यवस्थित राहण्यास मदत होते

सकाळी लवकर उठणाऱ्या माणसांची मनस्थिती ही चांगली आणि आनंदी असते. दिवसातील 24 तासांपैकी वेळ तो व्यक्ती वापरू शकतो.

दिवसाची सुरुवात ही चांगल्या मनस्थिती ने व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर आपण लवकर उठलो तर आपली मनस्थिती एकदम शांत आणि प्रसन्न असते. मन चांगले असेल तर आपला पूर्ण दिवस एकदम चांगला जातो.

त्यामुळे आपल्या मनात आणि आजूबाजूला सकारात्मकता दिसून येते. पण जे लोक उशिरा उठतात त्यांच्या मध्ये नकारात्मकता, चिडचिड, राग दिसून येतो. त्याचा मनस्थिती वर खूप परिणाम होतो.

जर आपली मनस्थिती चांगली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

वाचा: व्हॉट्सअँप – मराठी शॉर्ट स्टोरी

आरोग्य व्यवस्थित राहते

सकाळचा वेळ हा खूप चांगला मानला जातो. सकाळी लवकर उठून स्नान करून मोकळ्या वातावरणात फिरायला गेल्यामुळे आपल्या शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळतो. तसेच आपल्या पुरेसा वेळ आणि नवीन ऊर्जा मिळते.

सकाळी लवकर उठल्यामुळे स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देता येते. सकाळचा पौष्टिक आहार, व्यायाम, नवीन ध्येय, नवीन काम अश्या बऱ्याच गोष्टी करता येतात. सकाळी योगा केल्याने आरोग्य व्यवस्थित राहते. आणि तुम्ही कोणत्याही कामात यश मिळवू शकता.

सकाळचा पौष्टिक आहार

आहार आपल्या शरीरासाठी चांगला असतो. आपण रोज चांगला आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. सकाळी उठून चांगला आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपला दिवस एकदम चांगला जातो.

आपण संपूर्ण दिवसामध्ये जो आहार घेतो, त्या आहारामध्ये जवळपास चार ते पाच तासाचे अंतर असले पाहिजे. परंतु रात्रीच्या आहारा नंतर आपण झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतरच आहार घेतो. या सकाळी घेतल्या जाणाऱ्या आहारामध्ये असणारे अंतर हे भरपूर असते जवळपास नऊ ते दहा तास.

याचा अर्थ असा होतो की नऊ ते दहा तास तुमच्या पोटामध्ये काहीही नसते. त्यामुळे आपल्या शरीराला सकाळचा नाश्ता हा खूप गरजेचा असतो.

जर आपण उशिरा उठत असो तर हेच अंतर जवळपास अकरा ते बारा तासापेक्षाही जास्त होऊन जाते त्यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. याचमुळे सकाळचा नाष्टा हा महत्त्वाचा ठरतो.


तर आज आपण सकाळी रोज सकाळी लवकर उठण्याचे फायदे (Benefits of getting up early in the morning in Marathi) जाणून घेतले. मला आशा आहे की ही माहिती वाचून तुम्ही सुद्धा रोज सकाळी लवकर उठाल.

तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर शेअर करा. मराठी माहिती, मनोरंजन आणि रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी क्रिएटर मराठी वेबसाईट ला भेट द्या.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

2 thoughts on “रोज सकाळी लवकर उठण्याचे फायदे! जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *