Keyboard Information In Marathi – मित्रांनो, आज आपण मराठी मध्ये कीबोर्ड विषयी माहिती (Keyboard Information In Marathi) आणि कीबोर्ड शॉर्टकट की लिस्ट (Keyboard Shortcut Keys Marathi) पाहणार आहोत.
जगात संगणकाचा वापर खूप केला जात आहे. प्रत्येक गोष्टीत आता संगणक किंवा लॅपटॉप चा उपयोग केला जातो. संगणक हे अनेक उपकरणांपासून बनवण्यात आले असून, यामध्ये इनपुट आणि आउटपुट उपकरणे असतात. कॉम्प्युटर मध्ये keyboard, mouse, scanner हे Input Devices आहेत.
कीबोर्ड चा वापर आपण अनेकवेळा करतो. परंतु कीबोर्ड विषयी आपल्याला संपूर्ण माहिती आहे का? नसेलच! चला तर मग आजच्या लेखा मधून आपण कीबोर्ड विषयी संपूर्ण माहिती (Keyboard Information in Marathi) जाणून घेऊया. तसेच कीबोर्ड शॉर्टकट लिस्ट आणि कीबोर्ड चे विविध प्रकारांबद्दल माहिती (Types of Keyboard in Marathi) जाणून घेऊया.
कीबोर्ड म्हणजे काय? | Keyboard Information in Marathi
कीबोर्ड चा मुख्य वापर संगणकाला सूचना देणे. कीबोर्ड हा एक इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड हा कॉम्प्युटर ला USB Cable द्वारा जोडावा लागतो. कीबोर्ड चा वापर मुख्यकरून कॉम्प्युटरला कमांड (Command), टेक्स्ट (Text), न्यूमेरिकल डाटा (Numerical Data), फंक्शन किज (Function Keys) आणि दुसऱ्या प्रकारचा डाटा टाईप करण्यासाठी केला जातो. कीबोर्ड ला मराठीत कळ-फलक असे म्हणतात.
कॉम्प्युटर सोबत संवाद साधण्यासाठी कीबोर्ड आणि माउस चा वापर केला जातो. कीबोर्ड वरून कॉम्प्युटर ला दिलेली कमांड मशीन लैंग्वेज (Machine Language) मध्ये कॉम्प्युटर मध्ये बदलली जाते.
कीबोर्ड च्या प्रत्येक buttons वर अक्षरे प्रिंट केलेली असतात. आपण त्या अक्षराच्या बटणावर क्लिक केल्यावर कीबोर्ड डेटा ला Machine Language मध्ये Convert करते, ज्यामुळे CPU ह्या डेटा ला वाचू शकतो व पुढील प्रक्रिया करतो. Keyboard Information In Marathi
हे वाचा: भारतीय क्रिकेट संघाच्या कपड्यांचा रंग निळाच का असतो?
कीबोर्ड चे विविध प्रकार | Types of Keyboard in Marathi
- Multimedia Keyboard
- Wireless Keyboard
- लॅपटॉप कीबोर्ड (Laptop Keyboard)
- Machanical
- लेझर किंवा इन्फ्रारेड कीबोर्ड (Laser or Infrared Keyboard)
- गेमिंग कीबोर्ड (Gaming Keyboard)
- रोल अप किंवा फ्लेक्सीबल कीबोर्ड (Rollup or flexible Keyboard)
- एर्गोनॉमिक कीबोर्ड (Ergonomic Computer keyboard)
कीबोर्ड च्या लेआऊट चे प्रकार | Types of Keyboard Layouts In Marathi
QWERTY Keyboard Layout
- QWERTY
- QWERTZ
- AZERTY
- QZERTY
Non-QWERTY Keyboard Layout
- Dvork
- Colemak
- Workman
कीबोर्ड च्या सर्व किज ची माहिती | Keyboard keys information in marathi
कीबोर्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किज असतात. त्यामुळे कीबोर्ड वरील काम हे प्रत्येक की ला विभागून दिलेले असते. Alphanumeric key, Punctuation key, Numeric key, Function key, Navigation key, Control key इत्यादी keys असतात.
Keyboard keys विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया..
1 .Alphanumeric Keys
Keyboard वर एकूण 104 Alphanumeric Keys असतात. संगणकीय अल्फान्यूमेरिक कीज तुमच्या कीबोर्डवरील कीज असतात. ज्यात सर्व अक्षरे आणि संख्या आणि काही भिन्न चिन्हे असतात. या किज मध्ये A पासून Z पर्यंत जाणारी सर्व अक्षरे आणि 0 ते 9 पर्यंतची संख्या समाविष्ट असतात.
2. Punctuation Keys
Punctuation keys ह्या खालील प्रमाणे असतात. ह्यांचा सुद्धा कीबोर्ड मध्ये खूप विशिष्ट वापर आहे.
- comma key
- question mark
- colon key
- period key
या सर्व punctuation keys लेटर keys च्या उजव्या बाजूला असतात. ह्या keys चा वापर करण्यासाठी तुम्हाला Shift बटन दाबून ठेवून हव्या असलेल्या punctuation key ला प्रेस करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते punctuation key कॉम्प्युटर च्या मॉनिटर वर दिसेल.
3. Function Keys
फंक्शन की कीबोर्डच्या शीर्षस्थानी म्हणजेच सर्वात वरच्या बाजूला असतात. विशिष्ट कार्य करण्यासाठी फंक्शन की वापरल्या जातात. फंक्शन किज कीबोर्डमध्ये F1 ते F12 पर्यंत दिलेले असतात. प्रत्येक प्रोग्रॅम मध्यें त्यांची कार्ये वेगळी असतात.
4. Navigation Keys
Navigation keys कीबोर्डच्या उजव्या बाजूला असतात. ह्या किज मध्ये मुख्यता चार arrows असतात. जसे की left, right, up, down arrow. यांच्या सहाय्याने आपण कॉम्प्युटर वरील कोणतीही गोष्ट Navigate करू शकतो.
Navigation keys मध्ये Arrow keys, Home, End, Insert, Page Up, Delete, Page Down इत्यादी. keys असतात.
5. Command keys आणि Special keys
Command keys चा वापर कीबोर्ड वापरताना खूप केला जातो. Command keys म्हणजे अश्या किज ज्या सूचना देण्यासाठी वापरल्या जातात. जसे की, Enter, Spacebar, Delete, Return, Backspace इत्यादी.
हे वाचा: Secrets of Success in marathi
6. Numeric keys
Numeric keys ह्या कीबोर्ड च्या उजव्या बाजूला असतात. ह्यामध्ये तुम्हाला 1 ते 10 नंबर दिलेले असतात. Num Lock बटन दाबल्यावर ह्या numeric keys वापरू शकता.
8. Control Keys
कीबोर्ड वर अनेक कंट्रोल किज असतात. जसे की, Ctrl, Alt, Escape, Windows Key, Scroll Key, PrtScr, Pause, Break keys ह्या सर्व Control keys आहेत.
9. Indicator Lights
कीबोर्डमध्ये काही विशिष्ट किज साठी इंडिकेटर लाइट्स दिलेल्या असतात. जेव्हा आपण ह्या Keys चालू करतो, तेव्हा ह्या किज चालू आहेत की नाही ते आपल्याला समजण्यासाठी ह्या indicator lights दिलेले असतात.
कीबोर्ड च्या उजव्या बाजूला हे इंडिकेटर लाइट्स दिलेले असतात. कीबोर्डमध्ये Indicator Lights चे तीन प्रकार असतात. Num Lock, Scroll Lock आणि Caps Lock. कीबोर्डवरील पहिली लाइट ही Num Lock साठी दिलेली असते. तर दुसरी Caps Lock साठी दिलेली असते.
हे वाचा: MBA Information in Marathi
मल्टीमीडिया की काय आहेत? | What are multimedia keys?
मल्टीमीडिया की अशा की आहेत. ज्या वापरकर्त्याला त्यांच्या संगणकाच्या कीबोर्डवर संगीत नियंत्रित करू देतात. या की संगीतासाठी play, pause, stop, rewind, mute, fast forward, skip, repeat यासारखी कार्यक्षमता जोडतात.
Keys (किज) | माहिती (Information) |
Windows | मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये Windows Key दिलेली असते. ह्याचा वापर Start Menu साठी केला जातो. |
Menu | PC keyboards also have a Menu key that looks like a cursor pointing to a menu |
Command | Apple कंपनीच्या MacBook लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये command key दिलेली असते. |
Esc | (Escape) key कोणत्याही टॅब मधून डायरेक्ट बाहेर येण्यासाठी दिलेली असते. |
Tab | Tab key |
Caps lock | Caps lock key |
Shift | Shift key |
Ctrl | Ctrl (Control) key |
Fn | Fn (Function) key |
Home | Home key |
Alt | Alt (Alternate) key (PC Only; Mac users have Option key) |
Insert | Insert Key |
Spacebar | Spacebar key |
Arrows | Up Down Left Right Arrow keys |
BackSpace | Backspace (or Backspace) key |
Delete | Delete or Del key |
Enter | Enter key |
Prt Scrn | Print screen key |
Break | Break key |
Pause | Pause key |
Page up | Page up or pg up key |
Page down | Page down or pg dn key |
End | End Key |
Num Lock | Number Key |
हे वाचा: MPSC Exam information in Marathi
Symbol (चिन्हे) | Information (माहिती) |
~ | Tilde |
` | Acute, Back quote, grave accent, Open quote, left quote |
€ | Euro |
@ | Ampersat, Arobase, Asperand At, or At Sign |
! | Exclamation mark, exclamation point, or bang. |
# | Octothorpe, number, pound, sharp, or hash. |
£ | Pound Sterling or Pound symbol. |
€ | Euro |
$ | Dollar sign or generic currency. |
¢ | Cent sign |
¥ | Chinese/Japenese Yuan. |
§ | Micro or section |
% | Percent |
° | Degree |
^ | Caret or circumflex. |
& | Ampersand, epershand, or and symbol. |
* | mathematical multiplication symbol, and sometimes referred to as star. |
( | Open or left parenthesis. |
) | Close or right parenthesis. |
– | Hyphen, minus, or dash. |
_ | Underscore. |
+ | Plus |
= | Equal |
{ | Open brace, squiggly brackets, or curly bracket. |
} | Close brace, squiggly brackets, or curly bracket. |
[ | Open Bracket |
] | close bracket |
| | Pipe, or, or vertical bar. |
: | Colon. |
; | Semicolon. |
/ | Forward slash, solidus, virgule, whack, and mathematical division symbol. |
\ | Backslash or reverse solidus. |
“ | Quote, quotation mark, or inverted commas. |
‘ | Apostrophe or single quote. |
< | Less than or angle brackets. |
> | Greater than or angle brackets. |
? | Question mark. |
. | Period, dot or full stop. |
, | Comma. |
स्पेशल कॅरॅक्टर काढण्यासाठी शॉर्टकट किज (shortcut keys for special characters)
Shortcut Keys | Special Characters |
Alt+0224 | à |
Alt+0232 | è |
Alt+0236 | ì |
Alt+0242 | ò |
Alt+0241 | ñ |
Alt+0246 | ö |
Alt+0228 | ä |
Alt+0252 | ü |
Alt+0248 | ø |
Alt+0223 | ß |
Alt+0198 | Æ |
Alt+0176 | ° (degree symbol) |
Alt+0177 | +, – (plus/minus symbol) |
Alt+0169 | © |
Alt+0153 | ™ |
Alt+0174 | ® |
Alt + Ctrl + 4 | ₹ (Indian Rupee, Currency Symbol) |
हे वाचा: YouTube वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?
कीबोर्ड वरील काही शॉर्टकट किज (Keyboard Shortcuts)
• Ctrl+C or Ctrl+Insert
कोणतेही मोठे paragraph कॉपी करण्यासाठी Ctrl+C ह्या शॉर्टकट की चा वापर केला जातो. तसेच CTRL+Insert शॉर्टकट की ने आपण सिलेक्ट केलेले एखादे item जसे की, फोटो. तो आपण दुसऱ्या जागी paste करू शकतो.
Apple वापरकर्त्यांनसाठी Command + C ही shortcut key देण्यात आली आहे. ह्याचा वापर करून apple लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये कोणतीही गोष्ट क्लिपबोर्ड मध्ये copy करून paste करू शकतो.
• Ctrl+X | Ctrl+V
कोणताही paragraph एखाद्या फाईलवरून कायमचा कॉपी करून दुसऱ्या फाईल मध्ये add करायचा असेल, तर Ctrl+X ही शॉर्टकट की वापरू शकतो. ह्या shortcut key चा वापर करून आपण एखादा paragraph Cut करून दुसऱ्या जागी Paste करू शकतो.
तसेच Cut केलेला paragraph paste करण्यासाठी Ctrl+V ही शॉर्टकट की वापरू शकतो. तसेच Apple वापरणाऱ्यांसाठी ही Command+V Shortcut Key आहे.
• Ctrl+Z | Ctrl+Y
एखादी लाईन चुकून delete झाली असेल तर तुम्ही Ctrl+Z दाबून ती परत मिळवू शकता. ह्या प्रोसेस ला Undo असे म्हणतात. तसेच तुम्ही Undo केलेली लाईन Ctrl+Y दाबून Redo करू शकता म्हणजेच परत delete करू शकता.
Apple साठी Undo करण्यासाठी Command+Z आणि Redo करण्यासाठी Command+Y ही शॉर्टकट की आहे.
• Ctrl+F | Ctrl+R | Ctrl+T
ह्या शॉर्टकट की चा वापर खूप उपयोगी आहे. जेव्हा तुम्ही Word Document मध्ये काम करत असता. तेव्हा एखादा शब्द शोधण्यासाठी तुम्ही Ctrl+F ह्या शॉर्टकट कीचा वापर करू शकता. ह्या कीचा वापर एखादी गोष्ट किंवा वर्ड शोधण्यासाठी केला जातो.
तसेच जर तुम्हाला एखाद्या paragraph मधील शब्द बदलायचा असेल, तर तुम्ही Ctrl+R प्रेस करून तो शब्द बदलू शकता. किंवा वेब पेज reload करण्यासाठी ही शॉर्टकट की वापरली जाते.
एखाद्या वेब ब्राऊझर मध्ये new tab ओपन करण्यासाठी Ctrl+T ही शॉर्टकट की वापरू शकता.
Apple मध्ये Command+F प्रेस करून एखादा शब्द शोधू शकतो.
हे वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती
• Ctrl+S | Ctrl+O | Ctrl+N | Ctrl+P
एखादी फाइल सेव्ह करण्यासाठी तुम्ही Ctrl+S बटन प्रेस करून ती फाईल सेव्ह करू शकता. तसेच एखादी सेव्ह केलेली फाईल किंवा डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी तुम्ही Ctrl+O ही शॉर्टकट की वापरू शकता. त्यासोबत एखादी New फाईल ओपन करण्यासाठी Ctrl+N बी शॉर्टकट की वापरू शकता. तसेच Ctrl+P ह्या शॉर्टकट किने तुम्ही एखादे page चे प्रिंट काढू शकता.
• Ctrl+A | Ctrl+B | Ctrl+I | Ctrl+U
कोणतेही डॉक्युमेंट किंवा फाईल मधील सर्व डेटा एकत्र सिलेक्ट करण्यासाठी Ctrl+A शॉर्टकट कीचा वापर केला जातो. तसेच एखादे word डार्क (bold) करण्यासाठी Ctrl+B हे शॉर्टकट बटन वापरू शकतो आणि एखादे word थोडे वाकडे करण्यासाठी Ctrl+I ही शॉर्टकट की वापरली जाते. तसेच एखाद्या शब्दाखली underline द्यायची असेल तर, Ctrl+U ही की वापरा.
• Alt+Tab | Ctrl+Tab | Ctrl+Tab Number
जर तुम्ही कॉम्प्युटर मध्ये 2 पेक्षा अधिक एप्लिकेशन्स ओपन केलेले आहेत. तर एका एप्लिकेशन्स मधून दुसऱ्या ॲप्लिकेशन मध्ये जाण्यासाठी Alt+Tab शॉर्टकट की वापरू शकतो.
तसेच जर तुम्ही browser वापरत असाल तर, एकापेक्षा अधिक Tabs वापरत असताना, एका मधून दुसऱ्या Tab मध्ये जाण्यासाठी Ctrl+Tab किंवा Ctrl+ Tab Number (त्या tab चा नंबर जसे की, 1, 2, 3 ,4 ).
• Alt+Left/Right Arrow | Win+Alt+PrtScrn
तुम्ही क्रोम ब्राऊझर वापरत असताना एखादी वेबसाईट ओपन करून त्यातील अनेक पेजेस ओपन केले असाल तर, ते पेजेस मागे पुढे करण्यासाठी तुम्हाला Browser मधील डाव्या बाजूला असलेला Arrow माऊस ने दाबावा लागतो. तर त्यापेक्षा तुम्ही Alt+Left/Right Arrow दाबून वेब पेजेस मागू पुढे करू शकता.
तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंट किंवा फोटोचा स्क्रीनशॉट काढायला असेल तर तुम्ही Windows+Alt+PrtScrn ही शॉर्टकट की वापरू शकता.
हे वाचा: Digital Marketing in Marathi
F1 – F12 फंक्शन किज ची माहिती ( F1 – F12 Function Keys information in Marathi )
F1
- F1 Key जवळजवळ प्रत्येक प्रोग्राममध्ये मदत की (Help Key) म्हणून वापरली जाते. F1 दाबल्यावर, मदत स्क्रीन उघडते किंवा तुम्हाला वेब पेजवर माहिती दाखवली जाते.
F2
- Microsoft Windows मध्ये, Windows च्या सर्व आवृत्त्या (versions) मध्ये हायलाइट केलेल्या icon, file किंवा folder चे नाव बदलते. ह्यासाठी F2 की चा वापर केला जातो.
F3
- मायक्रोसॉफ्ट Windows मध्ये, Windows 7 किंवा त्याच्या पेक्षा खालील व्हर्जन मध्ये विंडोज मधील प्रोग्राम्ससाठी search feature म्हणून F3 key काम करते.
F4
- विंडोज एक्सप्लोरर आणि इंटरनेट एक्सप्लोररमध्ये address bar ओपन करण्यासाठी F4 Key वापरली जाते.
- विंडोज 95 ते XP व्हर्जन मध्ये Find Window ओपन करण्यासाठी F4 Key चा वापर केला जातो.
- ALT+F4 ही शॉर्टकट की वापरून Microsoft Windows मधील एखादा चालू असलेला प्रोग्राम बंद करू शकतो.
F5
- सर्व आधुनिक इंटरनेट ब्राउझरमध्ये, F5 दाबल्याने Web Page किंवा Documents विंडो रिफ्रेश होते किंवा रीलोड होते.
- CTRL+F5 की वापरल्याने एखादे वेब पेज पूर्णपणे Refresh करू शकता. तसेच डाऊनलोड केलेलं कंटेंट आणि वेबसाईट cache सुद्धा क्लिअर करू शकता.
- Microsoft Windows मधील Ms Word मध्ये find, replace आणि go to विंडो ओपन करण्यासाठी F5 Key चा वापर केला जातो.
- Microsoft PowerPoint मध्ये F5 Key दाबल्याने पहिल्या Slide पासून Slideshow सुरू होतो. तसेच Shift+F5 दाबल्याने आपण काम करत असलेल्या स्लाइड पासून slideshow सुरू होतो.
हे वाचा: फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!
F6
- इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स आणि इतर बर्याच इंटरनेट ब्राउझरमधील address bar वर कर्सर हलवण्यासाठी F6 की वापरतात.
- Ctrl+Shift+F6 प्रेस केल्याने दुसरा Word Document ओपन होतो.
F7
- मायक्रोसॉफ्ट वर्ड, आउटलुक इ. सारख्या मायक्रोसॉफ्ट प्रोग्राम्समधील डॉक्युमेंट्स तपासण्यासाठी आणि व्याकरण तपासण्यासाठी F7 की वापरतात.
- Adobe Photoshop मध्ये Layet Panel ओपन करण्यासाठी F7 Key वापरतात.
F8
- Windows स्टार्टअप मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी फंक्शन की वापरली जाते, सामान्यतः Windows सुरक्षित मोडमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरली जाते.
- macOS मधील सर्व कार्यक्षेत्रांसाठी thumbnail image प्रदर्शित करते.
- F8 की दाबल्याने TextPad मधील Replace विंडो उघडते.
F9
- Microsoft Word मधील Document रिफ्रेश करण्यासाठी वापरू शकतो.
- मायक्रोसॉफ्ट outlook मध्ये ईमेल send आणि receive करण्यासाठी F9 की वापरतात.
F10
- बहुतेक मायक्रोसॉफ्ट विंडोज प्रोग्राम्समध्ये, डीफॉल्टनुसार, F10 key ने एखाद्या ओपन ऍप्लिकेशनचा मेनू बार किंवा रिबन activate करू शकतो.
F11
- सर्व आधुनिक इंटरनेट ब्राउझरमध्ये फुलस्क्रीन मोड open आणि close करण्यासाठी F11 Key वापरतात.
F12
- Microsoft Word मधील एखादे डॉक्युमेंट Save as करण्यासाठी F12 Key वापरतात.
- Ctrl+F12 Key दाबून Microsoft Word मधील new document ओपन करता येते.
- Ctrl+Shift+F12 की Word Document प्रिंट करण्यासाठी वापरतात.
कीबोर्ड मध्ये एकूण किती फंक्शन किज (function keys) असतात?
हल्लीच्या Modern Computer कीबोर्ड मध्ये F1 ते F12 पर्यंत आणि नंतर F13, F14, F15 दिलेले असतात. अगोदर च्या कीबोर्ड मध्ये फक्त F1 ते F12 पर्यंतच function keys दिलेल्या असायच्या. नवीन Apple Keyboard मध्ये F13 ते F19 पर्यंत function keys दिलेल्या असतात. तसेच IBM कॉम्प्युटर कीबोर्ड मध्ये F13 ते F24 पर्यंत function keys असतात.
हे वाचा: जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!
कीबोर्ड मध्ये एकूण किती alphabetical keys असतात?
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कीबोर्ड मध्ये एकूण 26 alphabetical keys असतात.
कीबोर्डमध्ये एकूण किती नंबर किज असतात?
प्रत्येक कीबोर्ड मध्ये वरच्या बाजूला 0 ते 9 पर्यंत number keys असतात. तसेच काही कीबोर्ड ना उजव्या बाजूला Number keypad दिलेला असतो. त्यामध्ये सुद्धा 0 ते 9 नंबर दिलेले असतात.
हा लेख वाचून तुम्हाला कीबोर्ड विषयी संपूर्ण माहिती (Keyboard Information in Marathi) मिळाली असेल अशीच मी आशा करतो. त्यासोबत तुम्हाला ह्या लेखामध्ये कीबोर्ड शॉर्टकट किज बद्दल सुद्धा माहिती दिली आहे. व तुम्ही कोणती Shortcut Key वापरून कोणते काम काम करू शकता ते सुद्धा सविस्तर सांगितलेले आहे.
तसेच कीबोर्ड बद्दल मराठी भाषेत ही माहिती (Keyboard Information in Marathi) वाचून तुम्हाला कसे वाटले, ते आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा किंवा आमच्या Instagram अकाउंट वर मेसेज करून नक्की सांगा.
आमचे इतर लेख नक्की वाचा :
Motivational Quotes in Marathi
Share Market Information in Marathi