Home Loan Information in Marathi
आजच्या काळात कोणतेही घर घ्यायचा विचार केला. तरी आपल्या डोळ्यांसमोर सर्वात पहिली गोष्ट येते, ती म्हणजे घराची किंमत. घराची किंमत ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांसाठी घर घेणे म्हणजे खूप कठीण बाब झाली आहे. अश्यावेळी आपण बँकेच्या आधारे घर घेण्याचे स्वप्न बघतो. ते कसे, तर बँक घर घेण्यासाठी आपल्याला Home Loan देते. त्याच्या मार्फत आपण आपले स्वतःचे घर घेऊ शकतो.
पण होम लोन म्हणजे काय? आणि होम लोन घेण्यासाठी कोण कोणत्या डॉक्युमेंट्स ची गरज लागते? ( Home Loan information in marathi ) ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. तसेच होम लोन घेणे किती उपयोगी आहे ह्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया.
होम लोन बद्दल थोडक्यात माहिती : गृहकर्ज म्हणजे काय? ते कोणासाठी असते? ( Home Loan Information in Marathi )
होम लोन म्हणजे अशी एक अशी सुविधा आहे. ज्या सुविधेमध्ये बँक आपल्याला ठराविक रक्कम कर्ज स्वरूपात आपल्याला घराशी आवश्यक वेगवेगळ्या कामांसाठी प्रदान करते. ती रक्कम आपण EMI स्वरूपात बँकेला महिन्याला परत द्यायचे असतात. ह्याच प्रक्रियेला होम लोन म्हणजेच गृह कर्ज असते म्हणतात.
गृहकर्ज हे फक्त घर विकत घेण्यासाठी नाही. तर नवीन घर बांधण्यासाठी, तसेच घर दुरुस्तीसाठी सुद्धा बँक आपल्याला देते. होम लोन घेण्याचे विविध फायदे आहेत. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घर बांधणीसाठी सरकार २ ते ३ लाखांपर्यंत गृहकर्ज देऊ शकते. तुम्ही कोणत्या सरकारी योजनेसाठी पात्र आहात. हे चेक करण्यासाठी येथे MyGov Scheme वर क्लिक करा.
होम लोनचे विविध प्रकार
होम लोन घेताना आपण फक्त घर खरेदी करण्यासाठी नाही. तर इतर गोष्टींसाठी सुद्धा होम लोन घेऊ शकतो. चला तर मग होम लोन चे एकूण किती प्रकार असतात. त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.
1 | Loans for Purchase of Land | जमीन खरेदीसाठी कर्ज |
2 | Loans for Home Purchase | गृहखरेदीसाठी कर्ज |
3 | NRI Home Loans | भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय व्यक्तीसाठी गृह कर्ज |
4 | Loans for Construction of a House | घराच्या बांधकामासाठी किंवा घर बांधणीसाठी कर्ज |
5 | House Expansion or Extension Loans | गृह विस्तार कर्ज |
6 | Bridged Loans | ब्रिज्ड कर्ज |
7 | Loans for Home Improvement | गृह सुधारणेसाठी कर्ज |
8 | Home Conversion Loans | गृह रूपांतरण कर्ज |
9 | Balance Transfer Home Loans | बॅलन्स ट्रान्सफर होम लोन |
10 | Stamp Duty Loans | स्टॅम्प ड्युटी कर्ज |
नक्की वाचा : म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे! | Mutual fund investment benefits in marathi
होम लोन घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे?
होम लोन देण्यासाठी काही विशिष्ट संस्था आणि Agency काम करत असतात. त्यांच्या गृहकर्ज देण्यासाठी काही अटी आणि नियम असतात. ते आपण आज जाणून घेऊया. प्रत्येक नियम हे वेगवेगळे असू शकतात.
- गृहकर्ज घेणारी व्यक्ती ही भारतीय असणे आवश्यक आहे. ( NRI असला तरी देखील गृहकर्ज मिळू शकते. )
- स्वतःचा स्मार्टफोन आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- व्यक्तीचे वय 18 वर्ष ते 70 वर्ष ह्यामध्ये असावे
- होम लोन घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमचा Credit Score ७५० किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- नोकरी करणाऱ्या व्यक्तीकडे दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक
- महिन्याचे उत्पन्न २५,००० ते ५०,००० रुपये असावे. जास्त मासिक उत्पन्न असल्यास कर्जाची रक्कम जास्त मिळते. तसेच किमान उत्पन्न २०,००० ते २५,००० रुपये इतके असणे आवश्यक आहे.
- स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीसाठी कमीत कमी ३ ते ४ वर्षाचा व्यवसाय अनुभव आणि ३-४ वर्ष जुना व्यवसाय असणे गरजेचे आहे.
- IPL विजेता संघांची यादी
होम लोन घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
कोणत्याही प्रकारचे लोन घेण्यासाठी बँक तुमच्याकडे काही सरकारी कागदपत्रे मागते. ज्यांच्या वापर करून ते कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची सर्व माहिती स्वतः कडे साठवून ठेवते. होम लोनसाठी अर्ज करताना सुद्धा अश्याच डॉक्युमेंट्स ची आवश्यकता असते. तसेच खालील सर्व कागदपत्रे होम लोन घेण्यासाठी आवश्यक असतात. आणि नोकरदार तसेच व्यावसायिक या दोघांनाही ते लागू होतात. खाली दिलेले कागदपत्र तुम्हाला गृहकर्ज घेण्यासाठी आवश्यक ठरतील.
KYC कागदपत्रे –
- Pan कार्ड, पासपोर्ट किंवा विसा, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र, घरचा पत्ता ( वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक)
- स्वतःतचे पासपोर्ट साइज फोटो ( ५-६ फोटो आवश्यक) आणि गृहकर्जाचा भरलेला फॉर्म
शैक्षणिक आणि निवासाचा पुरावा –
- १० किंवा १२ वी मार्केटशिट, पदवी प्रमाणपत्र
- आधार कार्ड, वोटर आयडी, लाईट बिल, टेलिफोन बिल, LIC Policy Slip, घराचे कागदपत्र
Income कागदपत्रे –
तुमचे कर्मचारी ओळखपत्र (जिथे नोकरी करत आहात त्या कंपनीचा पुरावा म्हणून)
- मागील ३ महिन्यांचे Salary Slip
- मागील 6 महिन्याचे Bank Statement
हे वाचा :- Instagram वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?
- किमान ३ ते ५ वर्षांच्या व्यवसायाच्या पुराव्याचे दस्तऐवज (व्यावसायिक/स्वयंरोजगार व्यक्तींसाठी)
- आयकर परतावा (ITR)
- जर अगोदर कोणतेही कर्ज घेतले असेल तर सॅंक्शन आणि क्लोजर लेटर द्यावे लागेल.
- २ – ३ बँक check
महत्वाची टीप – वरील यादी ही केवळ माहिती साठी देण्यात आली आहे. कर्ज देणारी संस्था किंवा बँक त्यांना आवश्यक अशी कागदपत्रे देखील मागू शकतात.
होम लोन व्याजदर | Home Loan Interest Rate
पगारदार अर्जदारांसाठी | 6.70% -14.00% |
स्वयंरोजगार अर्जदारांसाठी | 8.25% -14.00% |
होम लोनसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?
गृह कर्ज घेणे आता पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. आणि ते फक्त डिजिटल सुविधांमुळे ज्या बँका तुम्हाला प्रदान करतात. नेट बँकिंग, ई बँकिंग आणि UPI सुविधांमुळे आपले बँकिंग विश्वातील प्रत्येक व्यवहार सुरक्षित आणि सोयीस्कर झाले आहे. होम लोन साठी काही पद्धती आहेत. त्या आपण आज खालील माहितीमध्ये जाणून घेऊया.
प्रत्येक व्यक्तीला कामाच्या व्यापातून बँकेत जाऊन लोन काढणे शक्य नसते. तसेच घरातून सुद्धा तुम्ही गृहकर्ज काढू शकता. अश्यावेळी बँकेतून ऑनलाईन पद्धतीने होम लोन काढण्याची सुविधा दिली जाते.
होम लोन घेण्यासाठी अर्ज कसा करायचा ह्याबद्दल सविस्तर माहिती आपण आज जाणून घेऊया. ज्यामुळे तुम्हाला लोन घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
1. सर्वात अगोदर तुम्ही होम लोन बाबत बँकेने दिलेल्या सर्व अटी व्यवस्थित वाचल्या आहेत की नाही ह्याची खात्री करून घ्या. तसेच तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही ह्याची सुद्धा एकदा नक्की खात्री करून घ्या.
२. होम लोन देताना बँक तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पाहते. त्यामुळे तुमचे सर्व कागदपत्रांवर संपूर्ण नाव, पत्ता व्यवस्थित आहे की नाही ते तपासा. तसेच तुमचा cibil score 750 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, तसेच इंटरेस्ट रेट इत्यादी चेक करून पहा.
३. ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे. त्या बँकेमध्ये जाणून गृह कर्ज काढण्याचा फॉर्म घ्या. ( तसेच तुम्ही तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सुद्धा होम लोन संबंधी फॉर्म डाऊनलोड करू शकता. )
हे वाचा :- ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे?
४. तो व्यवस्थित भरून, योग्य ती कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडून बँक कर्मचाऱ्याला द्या. किंवा ऑनलाईन फॉर्म भरत असाल. तर व्यवस्थित सबमिट करा.
५. थोड्या दिवसात बँक कर्मचारी तुमची माहिती व कागदपत्रे तपासून तुम्हाला डॉक्युमेंट verification साठी कॉल करून तुमचा होम लोन स्वीकारेल.
६. त्यानंतर थोड्या दिवसांनी तुमच्या बँक खात्यात त्या लोन ची रक्कम जमा होईल. व तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकता.
RBI Introduces New Innovative Rules for Home Loans
FAQ – On Home Loan information Marathi
गृह कर्ज वयोमर्यादा किती आहे?
गृहकर्ज घेण्यासाठी वयाची मर्यादा १८ ते ७० इतकी आहे.
होम लोन साठी लागणारी कागदपत्रे?
होम लोन साठी आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, घराचे कागदपत्र, नोकरी लेटर, उत्पन्न पुरावा, इत्यादी कागदपत्र लागतात.
होम लोन घेण्यासाठी सर्वात कमी इंटरेस्ट रेट किती आहे?
6.70% (६.७० टक्के) इतका इंटरेस्ट रेट आहे.
होम लोनसाठी अर्ज करण्यासाठी किमान पगार किती आहे?
तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न ₹ 25,000 च्या दरम्यान असल्यास, तुमचे भाडे, किंवा ईएमआय (EMI) उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त नसल्यास तुम्ही कर्जासाठी पात्र होऊ शकता.
गृहकर्ज घेण्यासाठी कोणत्या बँक चांगल्या आहेत?
जर तुम्हाला मोठ्या रक्कमेचे गृहकर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही HDFC Bank, ICICI Bank, SBI Bank, बँक ऑफ बडोदा, Axis बँक, कोटक महिंद्रा बँक, indusland बँक आणि कॅनरा बँक आहेत. ह्या बँक तुम्हाला योग्य त्या इंटरेस्ट रेट मध्ये लोन प्रदान करते.
आजच्या लेखामध्ये आपण होम लोन बद्दल सविस्तर माहिती : गृहकर्ज प्रकार कागदपत्रे, पात्रता, योग्य बँक ( Home Loan Information in Marathi ) बद्दल सविस्तर माहिती मराठी भाषेत जाणून घेतली आहे. तुम्हाला ह्या माहितीचा उपयोग होईल, अशी मी आशा करतो. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
मराठी भाषेत उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या आवडत्या Creator Marathi वेबसाईट ला नक्की भेट द्या.
आमचे इतर लेख नक्की वाचा :
Home loan बद्दल खूप informative माहिती दिली आहे.
धन्यवाद!