mother day quotes in marathi

आई साठी विशेष मराठी कोट्स | Aai Quotes in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

मित्रानो व मैत्रिणींनो, आज आपला लेख हा खूप खास आहे. कारण आज आपण आई साठी विशेष मराठी कोट्स (Aai Quotes in Marathi) पाहणार आहोत. आई हे दोन अक्षरी शब्द आपल्या चेहऱ्यावर आनंद, आपल्या जीवनात उत्साह, सुख निर्माण करत. आई साठी आपण कधीच काही विशेष करत नाही. पण आई आपल्यासाठी नेहमी काहीना काही विशेष करतच असते. जसे की, नवीन कपडे घेऊन देणे, नवनवीन पदार्थ बनवणे, आपले हट्ट पूर्ण करून देणे. सर्व काही आई लगेच पूर्ण करते. त्यामुळे आता आपली वेळ आहे, की आपण आई ला Aai Quotes in Marathi पाठवून ह्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद देऊ शकतो.

आज आपण आई साठी विशेष मराठी कोट्स (Aai Quotes in Marathi) संग्रह खास तुमच्यासाठी आणला आहे. ह्या संग्रहामधील मराठी आई शुभेच्छा (Aai Marathi Status) तुम्ही तुमच्या प्रिय आईला पाठवू शकता किंवा व्हॉट्सॲप स्टेटस वर ठेवू शकता.

आई साठी मराठी कोट्स (Aai Status in Marathi)

जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं,
जी नेहमी घरातल्यांना आनंदी ठेवण्याचा
प्रयत्न करत असते,
जिला अनेक टेन्शन असून सुद्धा
जिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य टिकून असते.
ती फक्त आईच असू शकते.


प्रेम कुणावर करावं…?
ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर ,
कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?
सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या “गुलाबावर” की
त्याला जपणाऱ्या काट्यांवर?
काल सोशल मीडियावर भेटलेल्या “मुलीवर”,
कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकनाऱ्या “आई-वडिलां” वर
🙏🏻💐💐🙏🏻


देवाची पुजा करुन
आई मिळवता येत नाही..
आईची पुजा करुन
देव मिळवता येतो…
💐💐💐💐


देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…
🙏🌹🌹🙏


तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात.
🙏🏻🙏🏻💐💐


देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात..


तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही.🙏🏻💐😊😇


पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यांत येणा-या
आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं..
✨🌺


देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला…🤔🤔
,
,
‘ तुमच्या आयुष्यातून सर्वसुख:
काढून घेतले…आणि विचारलं
दुसरं काही मागा….तर तुम्ही काय मागणार..?? ‘
,
,
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले….😊😊
,
,
”माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार…
.
कारण,
त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत…


पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..


नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते.
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…


न थकता, न हरता, कधी न कंटाळता,
न थांबता कसलाही मोबदला न घेता.
आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क कोणाचा असेल,
तर तो आपल्या आईवडिलांच…💐💐💐💐💐


ह्या जगातील प्रत्येक मुलासाठी व मुलीसाठी आई ही सर्वश्रेष्ठ असते. आई साठी खूप काही करण्याचा प्रयत्न प्रत्येक मुलगा व मुलगी करत असते. कधी कधी आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो, हे बोलून दाखवू शकत नाही. अश्यावेळी तुम्ही तुमच्या आईसाठी हे काही खास आई विशेष मराठी कोट्स (Aai Quotes in Marathi) पाठवू शकता किंवा व्हॉट्सॲप स्टेटस द्वारे मातृदिनाच्या दिवशी ठेवू शकता.

आई साठी विशेष मराठी कोट्स (Aai Quotes in Marathi)

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ.. आई 🤱🤱

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..
आईला प्रेमळ शुभेच्छा

गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची

आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही

तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही.

आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..तूच माझा पांडुरंग आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. आईला प्रेमळ शुभेच्छा!

आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु… आई माझी प्रितीचे माहेर.. मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे… अशी आरोग्यसंपदा आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

आई साठी स्टेटस मराठी (aai status in marathi)

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा…
पण कोणासाठी आईला सोडू नका.

आई साठी स्टेटस मराठी

ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं.

माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई

जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.

चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा..प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.

घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.

‘आ’ म्हणजे आत्मा… आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.. आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच मातृदिनाच्या शुभेच्छा!

जन्म दिला तू मला.. माणूस म्हणून घडवले.. तुझ्याशिवाय या जगात काहीही नाही चांगले

रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.. आईच्या प्रेमाची माय काहीही केल्या कमी होत नाही. आईला मातृदिनाच्या शुभेच्छा

आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा… आई तुला शुभेच्छा!

जगाच्या बाजारात सगळे काही मिळते… पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.

घराला घरपण आणते ती आई… आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते ती म्हणजे आपली आई
माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई… आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!

आई तुला किती काय काय सांगायचे असते.. तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते.. पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.

सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात.. तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात.

ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी.. 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’. आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या जन्माआधीपासून ओळखते.

घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी… प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.

कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास
तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात..अशा प्रिय आईस खूप खूप प्रेम.

मित्रांनो व मैत्रिणींनो तुम्ही हे आई साठी विशेष स्टेटस व शुभेच्छा तुमच्या प्रिय आईला पाठवू शकता. किंवा बोलून दाखवू शकता. आई साठी कोणताही दिवस सर्व कारण सर्व दिवस हे आईचेच असतात. अश्याच Wishes & Status साठी Creator Marathi वेबसाईट ला भेट द्या.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *