स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा | 15 ऑगस्ट मराठी कोट्स (Independence Day Quotes in Marathi)

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

15 ऑगस्ट ह्या दिवशी आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना शुभेच्छा देतो व शेअर करतो. आम्ही आजच्या लेखामध्ये तुमच्यासाठी काही खास स्वातंत्र्य दिनानिमित्त संदेश, कोट्स आणि शुभेच्छा (Independence Day Quotes in Marathi) घेऊन आलो आहोत. जे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअँप स्टेटस ला किंवा तुमच्या नातेवाईकांना पाठवू शकता.

आपल्या भारत देशाला आपले खूप प्रेम असते. भारत माझा देश आहे असे आपण नेहमी गर्वाने म्हणतो. स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशातला एक महत्त्वाचा दिवस आहे. ह्या एका दिवसासाठी अनेक जणांनी आपल्या जीवाचे प्राण पणाला लावले आहेत. ब्रिटिशांना हाकलून भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे ह्या दिवसाला एक विशेष असे महत्त्व आहे.

ब्रिटिशां कडून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी म्हणजेच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी दिल्ली येथील लाल किल्याच्या लाहोटी गेट वर भारताचा तिरंगा फडकवला. ह्या दिवसापासून प्रत्येक भारतीय त्याची नवीन सुरुवात करून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत होता.

प्रत्येक सणाप्रमाणेच भारतात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. या दिवशीही प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी देशभक्ती गीत ऐकू येत असतात.


स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi)

Independence Day Wishes in Marathi

“आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”


“देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”


“चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”


15 August Marathi Wishes

“ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा…माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”


“स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!”


“उत्सव तीन रंगाचा,
अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारत देश घडविला..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”


“देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”


“अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया.”
Happy Independence Day To All Of You


“ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”


“देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.”


Independence Day status in Marathi

“कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”


“गंगा – यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

वाचा: फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!


Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi

“मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा.
जय हिंद जय भारत.”


“जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात
आठवणी भारताच्या असो…
मरण आलं तरी दुःख नाही…
फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय..”🇮🇳🇮🇳


“बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज
सर्वात उंच फडकतो आहे….
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”


“विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान..
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi

“ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”


“माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.”


“एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…
वंदे मातरम्.”


“रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक
तरी आपण सारे भारतीय आहोत एक
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”


“मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.”


“जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.”


“गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

वाचा: Life Quotes in Marathi (जीवनावर आधारित मराठी कोट्स)


देश प्रेमावर काही खास मराठी सुविचार (Desh Bhakti Special Marathi Thoughts)


“ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारत देश आमुचा.”

Desh Bhakti Special Marathi Thoughts

“मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.”


“सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.”


“भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.”


“बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो.”


“देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.”


“दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!”


“सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..”


“सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.”


“देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.”


“देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.”

Desh Bhakti Special Marathi Quotes

“पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.”

वाचा: 500+ Insta Captions in Marathi


स्वातंत्र्य दिनानिम्मित खास मराठी कोट्स (Independence Day Quotes In Marathi)

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या
त्या वीरांना त्रिवार वंदना..
भारत देशासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या
त्या डॉक्टरांना व फ्रंट वर्कर्स चे खूप खूप आभार..
भारत देशाच्या सीमेवर अहोरात्र झटत देशाची
काळजी व देशाचे अतिरेक्यांपासून संरक्षण
करणाऱ्या सैनिकांचे खूप खूप धन्यवाद..
भारत देशातील प्रत्येक नागरिकांना
ह्या अप्रतिम आणि शानदार
भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


तिरंगा हा आपल्या भारत देशाचे प्रतीक आहे..
ह्या तिरंगा कडे पाहिल्यावर त्याला
हातात पकडल्यावर जी ऊर्जा निर्माण होते..
त्याला शब्दात व्यक्त करने अशक्य आहे.
15 ऑगस्ट च्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!


भारत देशाची शानच वेगळी आहे..
संपूर्ण जगात सर्वात निराळा असा आहे
आपला भारत देश..
अनेक वीर योद्धा, अनेक साधू संत,
अनेक महाराज ज्या भूमीत जन्माला आले
अश्या ह्या भारताची संस्कृती जगापेक्षा निराळी आहे.
भारत देश हा फक्त देश नाही,
तर प्रत्येक भारतीयांची धडकन आहे.


भारत देशातील उद्योजक जगातील
लोकप्रिय कंपनीत उच्च पदावर आहेत..
संपूर्ण जग हे फक्त भारतीय लोकांमुळे चालते
अश्या ह्या भारत देशात जन्माला येणे खूप
गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.


स्वातंत्र्य सेनानींचे भारत माते बद्दलच्या घोषणा (Slogans By Freedom Fighters in Marathi)

ज्यांनी या भारत मातेला ब्रिटीशांच्या जुलूमातून आपले रक्त सांडून मुक्त केले. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन. पाहा त्यांनी भारत मातेबद्दल व्यक्त केलेले विचार.

“स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय.”

– विनायक दामोदर सावरकर

“एक देव एक देश एक आशा..
एक जाती एक जीव एक आशा..”

– विनायक दामोदर सावरकर

“उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान
वाया जात नाही.”

– विनायक दामोदर सावरकर

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे
आणि मी तो मिळवणारच.”

– लोकमान्य टिळक

“जय जवान जय किसान

– लाल बहादूर शास्त्री

“जय हिंद”

– सुभाष चंद्र बोस

“सत्यमेव जयते”

– मदन मोहन मालवीय

“तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा” (तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो)

– सुभाष चंद्र बोस

“दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे,
आजाद है आजादही रहेंगे.”

– चंद्रशेखर आजाद

“सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है.”

– रामप्रसाद बिस्मिल

हे नक्की वाचा:

» जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 8 यशस्वी मार्गांचा वापर करा! (8 Ways To Success)

» मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!

ह्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना 15 ऑगस्ट दिवशी व्हॉट्सअँप वर शेअर करून त्यांना शुभेच्छा देऊ शकता. तसेच ह्या स्वातंत्र्य शुभेच्छा इंस्टाग्राम व फेसबुक वर नक्की शेयर करा म्हणजेच दुसरे ही त्यांच्या मित्रांना पाठवू शकतील.

तसेच क्रिएटर मराठी वेबसाईट कडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासुन शुभेच्छा! जय हिंद! जय भारत!

मराठी स्टेटस, मनोरंजन, माहिती, रोचक तथ्य आणि ऑनलाईन जॉब्स बद्दल माहितीसाठी आत्ताच क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *