गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी मध्ये | Guru Purnima Quotes in Marathi
आजच्या गुरू पौर्णिमा विशेष दिनी आपण आपल्या सर्व गुरूंना ह्या गुरू पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा (Guru Purnima Quotes in Marathi) देऊन त्यांना आनंदी केले पाहिजे. तसेच त्यांना तुम्ही फुलांचा गुच्छा किंवा एक गुलाब देऊन त्यांना शुभेच्छा देऊ शकता.
गुरू हे आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. जीवनाच्या लहान वयात गुरू आपल्याला शिक्षण देत असतात. आपल्याला चांगले मार्गदर्शन देऊन आपल्याला माणूस बनवतात. गुरू आपल्याला चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले शिक्षण देतात. शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये आपले गुरू असतात. तसेच आपल्याला जन्म देणारी आई व बाबा हे सुद्धा आपले गुरू आहेत. जर ते नसते, तर आपण ह्या जगात पाऊलच ठेवले नसते. त्यामुळे त्यांचा नेहमी आदर आणि अभिमान बाळगला पाहिजे.
गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी मध्ये | Guru Purnima Quotes in Marathi
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि शिकवणुकींचा प्रकाश असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात अंधार होणार नाही. गुरु पूर्णिमा शुभेच्छा!
“आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा
सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्की वाचा: जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 8 यशस्वी मार्गांचा वापर करा! (8 Ways To Success)
गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट.
गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली
गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
“आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं,
लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे.
मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या
लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
आदी गुरूसी वंदावे |
मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरण त्याचे हृदयीं धरू ||
आजच्या दिवसानिमित्त सर्वांना माझ्याकडुन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच चंद्र शोधा..
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा
एकच सूर्य जवळ ठेवा…
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा.
जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो,
तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला,
तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर
पुन्हा पुन्हा चालायला.
गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल,
लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.
गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.
माझ्या सर्व गुरूंना आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जो नेहमी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करतो, जो नेहमी विद्यार्थी आयुष्यात काहीतरी चांगल करावं.. ह्यासाठी जीवापाड मेहनत करणाऱ्या गुरूंना आजच्या दिवसाचा हार्दिक शुभेच्छा!!
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत.
गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.
नक्की वाचा: मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!
गुरू पौर्णिमा विशेष मराठी सुविचार | Guru Pornima Quotes in Marathi
सर्वोत्कृष्ट गुरू पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात. गुरु पूर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात! देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे गुरु असल्याबद्दल धन्यवाद. गुरु पूर्णिमा शुभेच्छा!!
गुरू हे आपल्याला नेहमी जीवनात पुढे
जाण्याची दिशा दाखवत असतात..
आयुष्यात मेहनत कशी करायची,
ह्याचा मार्ग दाखवत असतात..
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
हा एक अतुलनीय प्रवास आहे जिथे गुरु आपल्याला दृश्यापासून अदृश्य, भौतिक ते दैवीकडे, अल्पकालापासून अनंतकाळपर्यंत नेतो. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
गुरु आपल्या चिरंतन जीवनात सर्व काही आहे, त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण आता ज्या मार्गावर आहात त्याकडे टिकून रहा, आपल्या गुरूने दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण करा, यश तुमच्याकडे येईल, आपण आपल्या जीवनाचा तारा व्हाल गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू पौर्णिमा शुभेच्छा व स्टेटस
आजच्या निमित्त मी तुम्हाला माझ्या जीवनात आणून दिलेल्या चांगल्या बडलावांबद्दल धन्यवाद देत आहे. जर तुम्ही नसता तर हे होणे शक्य नव्हते. माझ्या लाडक्या सरांना गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
शाळेत आम्हाला जग काय असते हे दाखवून दिले. जीवनात कोण कोणत्या समस्यांना कसे सामोरे जायचे हे सांगितले. ज्यामुळे आम्हाला आता ह्या मतलबी दुनियेत जगता येत आहे. माझ्या सर्व गुरूंना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻🙏🏻💐💐
जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
आई व बाबा गुरू पौर्णिमा मराठी शुभेच्छा
ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला शिक्षण दिले, ज्यांनी मला मोठे केले, ज्यांनी मला माणुसकी काय असते, हे शिकवले, अश्या माझ्या आई वडिलांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
हे सुद्धा नक्की वाचा:
» तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त | डार्क चॉकलेट चे फायदे
» 200+ मराठी कोडी व उत्तरे | Latest Marathi Riddles with Answers
मी आशा करतो की तुम्हाला वर दिलेले गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी मध्ये (Guru Purnima Quotes in Marathi) संग्रह आवडला असेल. तसेच ह्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या शिक्षकांना व गुरूंना व आई वडिलांना पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता.