नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला शेतकरी मराठी घोषवाक्ये संग्रह पाहणार आहोत. शेतकरी घोषवाक्ये (Farmer Slogans in marathi) वाचून तुम्हाला समझेल, की आपला शेतकरी आपल्या देशासाठी व आपल्या परिवारासाठी किती महत्वाचा आहे. शेतकरी मराठी घोषवाक्ये (Farmer Slogans in Marathi) हे एक चांगले पर्याय आहे. ज्यातून आपण लोकांमध्ये शेतकऱ्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करू शकतो. तसेच भारताच्या येणाऱ्या तरुण पिढीला व तरुणांना शेतकरी का गरजेचं आहे. ह्याची जाणीव करून देण्यासाठी हे शेतकरी घोषवाक्ये खूप महत्वाचे काम करतील.
भारत हा देश खूप काळापासून कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जात आहे. भारतातील शेतकरी हे भारतातील जनतेसाठी अहोरात्र मेहनत व कष्ट करून अनेक पिकं पिकवतात. ज्यामुळे सर्व भारतीय नागरिक दोन वेळी व्यवस्थित जेवू शकतो. भारतात पुरातन काळापासून शेती केली जात आहे. तसेच आजूनही भारतात ग्रामीण भागात शेती केली जाते. शेतकऱ्याला बळीराजा असे सुद्धा म्हंटले जाते. शेतकरी असेल तरच आपण आहोत, हे सर्वांनी लक्षात घेऊन त्यांचा आदर राखला पाहिजे. कारण “शेतकरी सुखी तर जग सुखी”. हे Farmer Slogans in Marathi तुम्ही वाचून इतरांना सुद्धा नक्की पाठवा. व आयुष्यात जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा बळीराजाची प्रसंशा व मदत नक्की करा.
Farmer Slogans in Marathi
शेतकरी आहे अन्नदाता,
शेतकरी आहे देशाचा भाग्यविधाता.
करुनी सर्व संकटावरी मात
शेतकरी राबतो दिवसरात.
गाऊ आपण एकचं गाणी,
पुसून टाकू शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी.
बळीराजा तू घेऊ नको फाशी,
जग राहील तुझविन उपाशी.
यशस्वी शेतकरी,
प्रगत शेतकरी.
करुनी आपल्या रक्ताचे पाणी
शेत पिकवी कास्तकारी.
हे पण वाचा : मराठी प्रेम कविता – शायरी
शेतकरी टिकेल
तर शेत पिकेल.
जय जवान,
जय किसान.
देशाची श्रीमंती,
शेतकऱ्यांच्या विकास.
अन्नधान्य पिकवेल शेतकरी,
तर देशात नांदेल सुख समृद्धी.
नको लावू फास गळा बळीराजा,
तूच आहेस देशाचा पोशिदा खरा..
जमिनीवरील एकचं तारा
शेतकरी आमचा न्यारा.
करुनी कष्ट गाळुनी घाम,
असां आहे आपला शेतकरी महान.
शेतकरी सुखी
तर जग सुखी
हे पण वाचा : बिल गेट्स मराठी प्रेरणादायी सुविचार
जन जनात संदेश पोहचवूया,
बळीराजाला आत्महत्ये पासून रोखूया.
शेतकऱ्यांना मदत करा,
देशाच्या विकासाची गती वाढवा.
शेतकऱ्याची उन्नती,
देशाची प्रगती.
शेतकऱ्यांचा करून सन्मान,
यातचं खरा देशाचा अभिमान.
देशाची प्रगती आहे अपूर्ण,
शेतकऱ्यांचा विकाशाशिवाय नाही होणार पूर्ण.
बळकट असता शेतकरी,
होईलं उन्नती घरोघरी.
हे पण वाचा : 100+ इंस्टाग्राम मराठी कॅप्शन्स/स्टेटस
शेतकरी असता सक्षम
शेती पिकवेल भक्कम.
चला सुरुवात करूया,
शेतकऱ्यांना धन्यवाद देऊया.
देश विकास करेल,
जेव्हा शेतकरी परिपूर्ण बनेल.
साधी राहणी मजबूत बांधा
तोच आहे शेतकरी राजा.
बळीराजा माझा लयं इमानी,
कष्टाने पिकवितो पीकपाणी.
हे पण वाचा : 200+ आत्मविश्वास वाढवणारे सुविचार
हरित क्रांती पुन्हा येईल,
देश नंबर १ वर येईल.
खाऊन भाकर पिऊनी पाणी,
कष्ट करी शेतकरी.
काळ्या मातीची त्याची खाण,
राबी तो त्याच्यात विसरुनी भान.
ईमानदारी आणि कठोर परिश्रम ज्याची शान आहे,
तो माझ्या देशाचा शेतकरी आहे.
शेतकऱ्यांसाठी एक छोटासा संदेश
त्या सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार व धन्यवाद! ज्यांच्यामुळे मी रोज दोन वेळेचे व्यवस्थित अन्न खाऊ शकतो. ज्यांच्यामुळे माझा परिवार सुखरूप आहे. सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा!! तुमच्या परिवाराला व तुम्हाला खूप खूप धन्यवाद! कधीही हार मानू नका आणि नेहमी उत्साहाने काम करा. आम्ही सर्व भारतीय तुमच्यासोबत आहोत. 💐😊🙏🏻👏
शेतकरी घोषवाक्ये (Farmer Slogans in marathi) वाचून तुम्हाला कसे वाटले, ते खाली कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.
शेतकरी मराठी घोषवाक्ये वर तुमचा अभ्यासपूर्ण पोस्ट वाचून मला खूप आनंद झाला.