BharOS भारतीय स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टम, अँड्रॉईड आणि ios ला टक्कर देण्यासाठी भारताचे मोठे पाऊल!

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

BharOS भारतीय ऑपरेटिंग सिस्टम, अँड्रॉईड आणि ios ला टक्कर देण्यासाठी भारताचे मोठे पाऊल!

डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत आता भारतात आजुन एक नवीन स्वदेशी सेवा सुरू केली जाणार आहे. अमेरिकन अँड्रॉईड आणि आयओएस ला टक्कर देण्यासाठी भारतीय सरकारने स्वतःचे एक OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच हे ऑपरेटिंग सिस्टम भारतात लॉन्च होईल.

प्रत्येक स्मार्टफोन आणि आयफोन चालण्यासाठी त्यामध्ये एक ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेली असते. जर ती ऑपरेटिंग सिस्टम त्यात नसेल, तर कोणताही स्मार्टफोन चालणार नाही. तुम्ही Android आणि iOS हे दोन शब्द नक्कीच ऐकले असतील. OnePlus, Vivo, Oppo, Redmi सारख्या मोबाईल मध्ये Android हे OS दिलेलं असतं. तर ॲपल कंपनीच्या आयफोन मध्ये iOS हे ऑपरेटिंग सिस्टम असते. BharOS Made in India Operating System

त्यामुळे जगभरात अँड्रॉईड आणि आयओएस ह्या दोन ऑपरेटिंग सिस्टम ची डिमांड आहे. त्यामुळे भारताने ह्या मार्केट मध्ये उतरायचे ठरवले आहे. भारतीय IT कंपन्या ह्या जगभरात आपले नाव गाजवत आहेत. त्यामुळे आता अँड्रॉइड आणि आयओएस ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये भारताची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम येणार आहे.

ह्या नवीन येणाऱ्या भारतीय ऑपरेटिंग सिस्टम चे नाव आहे BharOS. BharOS चा फुल फॉर्म भारतीय ऑपरेटिंग सिस्टम असा आहे. तसेच BharOS एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असून ते IIT मद्रासद्वारे डेव्हलप केलं आहे.

ज्या मोबाईल मध्ये BharOS ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्या मोबाईल मध्ये प्री इन्स्टॉल्ड अ‍ॅप्स देण्यात येणार नाहीत. ज्यामुळे आपल्याला हवे तितकेच Apps मोबाईल मध्ये ठेवता येतील. तसेच फोन स्टोरेज जास्त प्रमाणात मिळेल. ज्यामुळे हवे ते ॲप्स ठेवू किंवा delete करू शकतो.

BharOS हे सिक्युरिटीच्या बाबतीत सर्वात बेस्ट असणार असल्याचे BharOS डेव्हलप करणाऱ्या व्यक्तिने म्हटले आहे. तसेच BharOS चे स्वत:चं App स्टोअर सुद्धा असणार आहे. ज्यामुळे भारतीय ॲप्स जास्त प्रमाणात ह्या ॲप स्टोअर वर उपलब्ध असतील.

भारत हा देश विविध भाषांचा देश आहे. त्यामुळे ह्या भारोस मध्ये विविध भारतीय भाषा असणार आहे. ज्यामुळे प्रत्येक भारतीय भाषेत सुद्धा काम करणं सोप्पे होणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने हे सिस्टीम खूप महत्त्वाचे रोल बजावणार आहे.

ही सिस्टीम आता काही काळासाठी फक्त सरकारी कर्मचारी आणि संस्थांसाठी वापरण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जेव्हा ही सर्वांसाठी उपलब्ध होईल. तेव्हा ही सिस्टम किती चांगली आहे, हे आपल्याला समझेल. मराठी भाषेत उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या आवडत्या Creator Marathi वेबसाईट ला नक्की भेट द्या.

हे सुद्धा वाचा :-

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *