PM Modi Names 21 Largest Unnamed Islands Of Andaman & Nicobar Islands. Here's Full List

पराक्रम दिवस : पंतप्रधान मोदींनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील 21 सर्वात मोठ्या अनामित बेटांची नावे घोषित केली! येथे पाहा संपूर्ण यादी..

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

PM Modi Names 21 Largest Unnamed Islands Of Andaman & Nicobar Islands. Here’s Full List

पराक्रम दिवस | पंतप्रधानांनी अंदमानच्या २१ बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवली आहेत. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस द्विपवर बांधलेल्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही पंतप्रधान मोदींनी अनावरण केले. हा दिवस सर्व भारतीय नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

पराक्रम दिवस: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिवसानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठ्या अनामित बेटांची नावे दिली. मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि हॉनी कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, द्वितीय लेफ्टनंट रामा राघोबा राणे आणि नायक जदुनाथ सिंग यांच्यासह २१ परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या नावावरून या बेटांची नावे ठेवण्यात आली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती 23 जानेवारी हा दरवर्षी ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

नेताजी सुभाषचंद्र बोस द्विपवर बांधण्यात येणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही पंतप्रधान मोदींनी अनावरण केले.

तसेच भारताचा इतिहास पाहता अंदमान आणि निकोबार बेटांचे एक विशेष महत्व आहे. अंदमान आणि निकोबार मधील रॉस बेटाचे (Ross Island) एक खास महत्व आहे त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ रॉस बेटाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे ठेवण्यात आले. हा निर्णय खूप ऐतिहासिक आहे, ज्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्तीला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. पंतप्रधानांनी 2018 मध्ये या बेटाच्या भेटीदरम्यान नील बेट आणि हॅवलॉक बेटाचे शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे नामकरणही करण्यात आले आहे,” असे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या नावावर असलेल्या बेटांची संपूर्ण यादी येथे आहे

21 परमवीर चक्र पुरस्कार विजेते, ज्यांच्या नावावर बेटांची नावे देण्यात आली आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत:

Major Somnath Sharma; Subedar and Hony Captain (then Lance Naik) Karam Singh MM; 2nd Lt. Rama Raghoba Rane; Nayak Jadunath Singh; Company Havildar Major Piru Singh; Capt GS Salaria; Lieutenant Colonel (then Major) Dhan Singh Thapa; Subedar Joginder Singh; Major Shaitan Singh; CQMH.

Abdul Hamid; Lt Col Ardeshir Burzorji Tarapore; Lance Naik Albert Ekka; Major Hoshiar Singh; 2nd Lt. Arun Khetrapal; Flying Officer Nirmaljit Singh Sekhon; Major Ramaswamy Parameswaran; Naib Subedar Bana Singh; Captain Vikram Batra; Lt Manoj Kumar Pandey; Subedar Major (then RifleMan) Sanjay Kumar; and Subedar Major Retd (Hony Captain) Grenadier Yogendra Singh Yadav.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *