Panghrun Marathi सिनेमा: महेश मांजरेकर दिग्दर्शित “पांघरुण” मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे! येत्या फेब्रुवारी मध्ये..

Share This Article

Panghrun Marathi Movie: पांघरुण हा मराठी चित्रपट घेऊन महेश मांजरेकर लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ह्या चित्रपटाचा पोस्टर महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे. पांंघरुण हा चित्रपट 11 फेबुवारीला प्रेंक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महेश मांजरेकर यांनी मराठी तसेच हिंदी भाषेत अनेक चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. मराठी मध्ये काकस्पर्श, FU – Friends Unlimited, नटसम्राट सारखे अनेक यशस्वी आणि सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज एकत्र येऊन आगामी चित्रपट पांघरुण (Panghrun) लवकरच रुपेरी पडद्यावर आणणार आहे.

ह्या चित्रपटातील कलाकार सुद्धा उत्तम आहेत. अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, सुरेखा तळवलकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांनी ह्या चित्रपटाला संगीत दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

हा चित्रपट काही नवीन घेऊन येईल, ह्याकडे सर्व मराठी रसिकांचे लक्ष आहे. पांघरुन ह्या चित्रपटाची अनेक महोत्सवासाठी ही निवड झाली आहे. 18व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, 28व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पांघरुण चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.

हे सुद्धा वाचा: टॉप 13 बेस्ट मराठी वेब सीरिज! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे!

बंगळुरु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रभारती इंडियन सिनेमा कॉम्पिटेशन या विभागात सर्वोकृष्ट भारतीय चित्रपट हा मानाचा पुरस्कारही पांघरुणने पटकावला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कसा असेल, ह्याकडे सर्व चाहते लक्ष ठेवून बसले आहेत.

तसेच मराठी मधील बिग बजेट सिनेमा सैराट, टाईमपास, नटसम्राट, झिम्मा नंतर पांघरून हा बिग बजेट सिनेमा कसा असणार आहे. ह्याच्याकडे सर्वाची नजर आहे. तसेच पांघरून चित्रपटातून परत एकदा प्रेम कथा अनुभवता येणार आहे.

Share This Article

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *