आजच्या ब्लॉग मध्ये आपण Fiverr वेबसाईट वर अकाउंट कसे बनवावे? (How to create fiverr account in marathi) ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच अकाउंट बनवल्यानंतर फिवर प्रोफाइल कशी तयार करायची? (How to create fiverr profile in marathi) हे सुद्धा सविस्तर जाणून घेऊया.
Fiverr ही एक freelance website आहे. फिवर सारख्या इंटरनेट वर अनेक वेबसाइट्स आहेत. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही फ्रीलान्सिंग करून ऑनलाईन पैसे कमवू शकता.
Fiverr बद्दल थोडक्यात माहिती | Fiverr information in Marathi
Fiverr हे फ्रीलांसर आणि व्यवसायांसाठी सहयोग करण्यासाठी एक लोकप्रिय व्यासपीठ आहे. हे सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते, विशिष्ट कार्ये पूर्ण करण्यासाठी शोधत असलेल्या व्यक्तींसाठी ते सोयीस्कर बनवते. Fiverr चा वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आणि प्रतिभांचा विविध पूल क्लायंट आणि फ्रीलांसर दोघांनाही आकर्षित करतात, जो एक दोलायमान आणि गतिमान ऑनलाइन मार्केटप्लेसला प्रोत्साहन देतात.
फिवर ही एक फ्रीलान्स सर्व्हिस देणारी कंपनी आहे. ह्याचे हेडक्वार्टर इस्राईल ला आहे. ह्या वेबसाईट वरून तुम्ही घरबसल्या काम करून पैसे कमवू शकता. फक्त त्यासाठी तुमच्याकडे स्किल्स असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही जॉब करता करता सुद्धा फ्रीलान्सिंग करू शकता.
Fiverr चा शोध Micha kaufman आणि Shai Wininger ह्यांनी लावला आहे. फिवर ह्या कंपनीची वेबसाईट फेब्रुवारी 2013 ला लॉन्च करण्यात आली.
तुम्ही ही पोस्ट वाचत आहात, म्हणजे तुम्ही नक्की Freelancer आहात किंवा Freelancing करण्याची सुरुवात करत आहात.
चला तर मग Fiverr वेबसाईट वर अकाउंट कसे बनवावे? हे जाणून घेऊया.. How to create fiverr account in marathi
नक्की वाचा : Freelancing information in marathi
Fiverr वेबसाईट वर अकाउंट कसे बनवावे? – How to create fiverr account in marathi
जर तुम्हाला फिवर वर खाते ओपन करायचे आहे. तर खालील स्टेप्स फॉलो करा.
- 1. सर्वात अगोदर फिव्हर वेबसाईट ओपन करा. जर तुम्ही मोबाईल वर ओपन केले असेल, तर Desktop Mode ऑन करा.
- 2. त्यानंतर Join वर क्लिक करा. आता ईमेल आयडी टाकून continue वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हारा हवा तो Username आणि पासवर्ड टाकून रजिस्टर करून घ्यायचे आहे. किंवा गूगल अकाउंट ने सुद्धा रजिस्टर करू शकता.
- 3. ईमेल आयडी ने रजिस्टर केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वर Fiverr वेबसाईट कडून एक Account Activation लिंक पाठवली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून तुमचे Fiverr अकाउंट activate करा.
- 4. त्यानंतर तुमच्यासमोर fiverr वेबसाईट चे Dashboard ओपन होईल.
- 5. आता तुम्ही तुम्हाला हवे असलेले जॉब्स शोधून क्लाएंट कडून कामे मिळवू शकता. व पैसे कमवू शकता.
- 6. अश्या प्रकारे काही मिनिटात तुम्ही Fiverr वर अकाउंट बनवू शकता.
आता आपण पाहूया की Fiverr वर Professional Profile कशी बनवावी?
तुम्ही Fiverr वेबसाईट वर अकाउंट बनवल्यानंतर तुम्हाला काम मिळवण्यासाठी फिवर अकाउंट वर प्रोफेशनल प्रोफाइल बनवणे खूप गरजेचे आहे. त्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊया..
- 1. त्यानंतर तुम्हाला फिव्हर वेबसाईट वर डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात Fiverr कंपनीचा लोगो दिसेल. तिथे तुम्हाला थ्री लाईन्स दिसतील त्यात Menu दिलेला असेल. त्या मेनू मध्ये सर्वात पहिले तुमचे Username दिसेल. त्यावर क्लिक करा.
- 2. आता तुमच्यासमोर एक Profile ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो, तुमचे स्किल्स, तुमचे introduction इत्यादी गोष्टी add कराव्या लागतील.
- 3. ग्राहकांना (clients) आकर्षित करण्यासाठी Fiverr वर व्यावसायिक प्रोफाइल तयार करणे महत्त्वाचे आहे.
- 4. स्पष्ट आणि वर्णनात्मक वापरकर्तानाव निवडून प्रारंभ करा.
- 5. पुढे, तुमची कौशल्ये (skills ) आणि अनुभव (experience) हायलाइट करणारे आकर्षक बायो लिहा.
- 6. व्यावसायिक प्रोफाइल चित्र अपलोड करण्यास आणि संबंधित पोर्टफोलिओ नमुने जोडण्यास विसरू नका. त्यानंतर स्पर्धात्मक किंमत सेट करा आणि आकर्षक पॅकेज ऑफर करा.
नक्की वाचा : Digital Rupee in Marathi
शेवटी, ग्राहकांच्या पुनरावलोकनांचे महत्त्व कमी लेखू नका. आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी आणि संभाव्य क्लायंटसह विश्वास निर्माण करण्यासाठी आपले प्रोफाइल अद्यतनित आणि आकर्षक ठेवा.
तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल. तसेच हा लेख तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. तसेच अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.
Motivational Quotes in Marathi