जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा

Happy International Women’s Day Wishes in Marathi | जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

नियमित अपडेट साठी फॉलो करा

 Facebook | Instagram | Twitter | Sharechat

Happy International Women’s Day Wishes in Marathi:- आजच्या लेखामध्ये आपण जागतिक महिला दिनाचे शुभेच्छा संदेश (Happy International Women’s Day Wishes in Marathi) पाहणार आहोत. सगळ्यात आधी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐

महिला दिन हा एक दिवस साजरा करून काही उपयोग नाही. कारण दिवसरात्र आपल्यासाठी कष्ट करणारी आपली आई, आजी तसेच आपली ताई. नेहमी आपले हट्ट व आपली काळजी घेत असतात. तर बरं त्यांना एक दिवस शुभेच्छा देऊन कस चालेल बरं. तरी सुद्धा हा एक दिवस आपण त्यांना त्यांची काम बाजूला ठेवून त्यांना आनंदाने जगायला देऊ. त्यांना काय हवं काय नको ह्याची काळजी घेऊ.

तसे पाहिले तर प्रत्येक दिवस हा स्त्रीच्या सन्मानाचाच असला पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. त्यांना सन्मान केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना उलट नाही बोललं पाहिजे. तर आज 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त आपण त्यांना खास शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना खुश करुया.


Happy International Women's Day Wishes in Marathi
Happy International Women’s Day Wishes in Marathi

“मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम
आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम
बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम
स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”💐💐

Womens day wishes in marathi
Womens day wishes in marathi

“विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू,
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”!💐💐

Mahila din vishesh sandesh
Mahila din vishesh sandesh

“इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला,
जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला,
अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान
कायम करा अशा स्त्रीचा सन्मान
Happy Women’s Day!”💐💐

Mahila Dinachya Hardik Shubhechha Sandesh
Mahila Dinachya Hardik Shubhechha Sandesh

“ती आहे म्हणून हे विश्व आहे,
ती आहे म्हणून घराला घरपण आहे,
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे,
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!”💐💐

womens day quotes
womens day quotes

“ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे, ती सून आहे,
ती सासू आहे, ती आजी आहे.
पण याआधी ती एक स्त्री आहे.
जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”💐💐


महिला दिनानिमित्त काही लोकप्रिय महिलांचे प्रेरणादायी कोट्स (Women’s Day Special Inspirational Quotes in Marathi)

1. “कृतीविना दृष्टीकोन हे केवळ स्वप्न आहे आणि दृष्टीकोनविना कृती करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. म्हणूनच कृतीला दृष्टीकोनाची जोड द्या तुमचे जग बदलू शकेल”. – सुधा मुर्ती


2. “संशय हा एक खूप मोठा शत्रू आहे. आपण कोण आहोत आहेत आपला जन्म कशासाठी आहे हे माहीत असणं गरजेचं आहे”. – जेनिफर लोपेझ


3. “स्वप्नांचा पाठलाग करा आणि संयमी राहा”. – अॅंजेलिक केर्बर


4. “स्त्रीयांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीदेवीची अपमान आहे”. – सुर्यकांत त्रिपाठी निराला


5. “तुम्हाला तुमच्या शत्रुंसमोर उभं राहण्यासाठी फार धैर्याची गरज असते. मात्र त्याहून जास्त संयम लागतो तुमच्या प्रियजनांसोबत उभं राहण्यासाठी” – जे. के. रोलिंग


6. “इतरांना धक्का न देताही तुम्ही शिखर गाठू शकता”. – टेलर स्विफ्ट


7. “जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते”. – ब्रिघम यंग


8. “स्वप्नांचा पाठपुरावा करताना बरेच अडथळे येतात. पण तुमच्या अथक प्रतत्नांनी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता”. – पी. व्ही. सिंधू


9. “प्रत्येक व्यक्तीने कठीण परिस्थितीला तोंड देण्यास आणि जोखिम घेण्यास तयार असावं”. – प्रतिभाताई पाटील


10. “तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे”. – अॅटिकस


11. “महिला नेहमीच विजयी राहतील”. – महादेवी वर्मा


12. “तुम्ही एकतर स्वतःला समुद्राच्या लाटेप्रमाणे समजू शकता किंवा तुम्हाला स्वतःला स्वतःच समुद्र व्हावे लागेल”. – ऑप्रा विन्फ्रे


13. “अशी कोणतीच गोष्ट नाही ज्या महिला करू शकत नाहीत”. – मिशेल ओबामा


14. “एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही. शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते”. – ऑप्रा


15. “जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या पुरूषाला विचारा मात्र जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर ती एखाद्या महिलेलाच सांगा”. – मार्गारेट थॅचर


16. “स्वतःसाठी विचार करणे ही एक ध्यैर्यपूर्ण कृती आहे”. – कोको चॅनल


स्त्री ने प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. घर, संसार, नोकरी, कुटुंब ही तारेवरची कसरत ती अगदी चांगल्याप्रकारे सांभाळते. जागतिक दिनानिमित्त ही एक गोष्ट प्रत्येक स्त्रीने नक्कीच केली पाहिजे, की प्रत्येक निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेतला पाहिजे. तसच आपल्या घरातल्यांचा नेहमी पाठिंबा व आशीर्वाद घ्या. आणि प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव मोठं करा.

तसच तुम्ही ही पोस्ट जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचवा. तसेच मित्रांनो व मैत्रिणींनो तुमच्या आईला व बहिणीला ह्या महिला दिनानिमित्त विशेष शुभेच्छा द्या व त्यांना आनंदी करा.

डेली अपडेट्स साठी आमच्या Facebook Page ला लाईक करा.


Thank You For Reading This Article & Keep Supporting! 


माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *