लोकमान्य टिळक मराठी भाषण, निबंध | Lokmanya Tilak Speech in Marathi

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

लोकमान्य टिळक मराठी भाषण, निबंध | Lokmanya Tilak Speech in Marathi

Lokmanya Tilak Speech in Marathi: शाळेमध्ये किंवा अभ्यासासाठी लोकमान्य टिळक मराठी भाषण इंटरनेट वर शोधावे लागतात. आपल्या वेबसाईट वर तुम्हाला Lokmanya Tilak Speech in Marathi वाचायला मिळेल. तसेच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोकमान्य टिळक मराठी भाषण वापरू शकतात. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करुया.

लोकमान्य टिळक मराठी भाषण, निबंध | Lokmanya Tilak Speech in Marathi

येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना अभिनंदन! माझ्या आदरणीय गुरुजनांना आणि माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण येथे लोकमान्य टिळक ह्यांची जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने मी तुमच्यासमोर लोकमान्य टिळकांवरील भाषण सादर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने शांतचित्ताने ऐकावे हीच नम्र विनंती!

लोकमान्य टिळक मराठी भाषण
लोकमान्य टिळक – केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” या घोषणेशी संपूर्ण देश परिचित आहे. ही सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक भारताचे महान नेते होते. लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. लोकमान्य टिळक यांचे खरे नाव केशव होते. पण, लहानपणी सर्व जण त्यांना बाळ नावाने हाक मारत असे. त्यामुळे त्यांना बाळ ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे संपूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे आहे.

त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वती होते. टिळक लहानपणापासूनच हुशार, तेजस्वी आणि धाडसी होते. त्यांना कोणावर अन्याय झालेला पाहवत नसे. टिळकांचे माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले, त्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून आपले पदवीचे शिक्षण घेतले. त्याकाळात राष्ट्रीय सभा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती नंतर टिळकही या संघर्षात सामील झाले. लोकमान्य टिळकांनी नेहमीच इंग्रजांच्या अन्याय आणि अत्याचाराला विरोध केला.

त्यांना सामान्य लोकांना इंग्रजांच्या अन्यायी शासनाविरुद्ध जागृत करायचे होते. म्हणून त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याची भूक निर्माण करण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे उत्सव सुरु करून जनतेला एकत्र आणले.

स्वातंत्र्य चळवळींमध्ये टिळकांना अनेक वेळा तुरुंगातही जावे लागले. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीतेवर भाष्य करणारा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर ते इतके लोकप्रिय झाले की त्यांना लोकांकडून ‘लोकमान्य’ ही पदवी मिळाली.

टिळकांची मंडालेच्या जेलमधून १९१४ मध्ये सुटका झाली, त्यानंतर त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक कार्ये केली. १८८० साली टिळकांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सोबत मिळून पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ सुरू केले. लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी ह्या शाळेची स्थापना केली होती.

टिळक यांना लोकमान्य या पदवीने सन्मानित केले गेले होते. ब्रिटिश सरकार टिळकांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पिता मानत असे. तसेच महात्मा गांधी हे त्यांना नवीन भारताचे निर्माता म्हणून संबोधित असे.

१८८१ साली बाळ यांनी केसरी आणि मराठा सारखे दोन वृत्तपत्रे सुरू केली होती. केसरी वृत्तपत्र हे मराठी भाषिकांसाठी तर मराठा वृत्तपत्र हे इंग्रजी भाषिकांसाठी सुरू केले होते. १८८४ मध्ये दांडेकर आणि तेलम यांच्या साहाय्याने टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रासोबत लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले. लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हाच त्यांचा दृष्टिकोन होता. ह्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले.

१८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. आणि शेतकऱ्यांना एकत्र संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या हक्काबाबत त्यांना जाणीव करून दिली. टिळकांनी केसरी वृत्तपत्रातून सरकारला शेतकऱ्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली.

पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत टिळकांची महत्वपूर्ण भूमिका होती. इंग्रज सरकारशी लढत असताना त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यांना शिक्षेसाठी मंडालेच्या तुरुंगात टाकण्यात आले. त्यावेळी त्यांनी तुरुंगात असताना गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. १ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी लोकमान्य टिळक या थोर महापुरुषाची जीवनज्योत मावळली. पंडित जवाहरलाल नेहरू यांना ही बातमी समजताच त्यांनी “भारतातील एक तेजस्वी सूर्याचा अस्त झाला” असे उद्गार काढले.

लोकहितासाठी आणि राष्ट्रासाठी लढलेल्या अध्या थोर व्यक्तिमत्त्वामुळे आज भारत आजाद आहे. असे थोर व्यक्तिमत्व भारताला व महाराष्ट्राला लाभले, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. अशा ह्या महान पुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम..

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, जय हिंद! जय महाराष्ट्र! 🙏🏻🚩

तुम्हाला लोकमान्य टिळक मराठी भाषण / निबंध and Lokmanya TilakSpeech in Marathi कसे वाटले ते खाली कमेंट्स करून नक्की सांगा. त्यासोबत तुम्ही हे भाषण तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. तसेच अश्याच माहितीसाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *