star health insurance information in marathi
star health insurance in marathi – या लेखात तुम्हाला कौटुंबिक आरोग्य विम्याबद्दल तसेच स्टार हेल्थ इन्शुरन्स ची माहिती मराठीत सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचणे आवश्यक आहे. तर चला मग सुरुवातीपासून समजून घेऊया.
साथीच्या आजारात तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय गरजांचे संरक्षण करणे ही तुमची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे की नाही? म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या विरोधात पुरेसे आरोग्य विमा संरक्षण मिळेल याची खात्री करण्यासाठी health insurance आज एक प्राथमिक गरज बनली आहे.
कुठलाही विमा घ्यायचा असल्यास त्याबद्दल तुम्हाला निश्चित माहिती असली पाहिजे. आजकाल जास्तीत जास्त लोकांचा कल हा स्टार हेल्थ इन्शुरन्स घेण्याकडे असतो पण, त्या आधी तुम्ही health insurance policy हा विषय समजून घेणे गरजेचं आहे.
आरोग्य विमा पॉलिसी म्हणजे काय?
आरोग्य विमा योजना तुम्हाला विविध रोगांपासून संरक्षित राहण्यास मदत करते. जर तुम्ही कौटुंबिक विमा घेतला तर तुमच्या कुटूंबाला सुद्धा विम्याचं संरक्षण मिळते. याशिवाय, विमा आपल्याला कर बचत (tax savings) करण्यास मदत करतो. आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 80 डी अंतर्गत, आपण आपल्या आरोग्य विमा प्रीमियमवर कर लाभांचा दावा करू शकता.
जर तुम्ही health insurance घेतले असेल तर आरोग्य विमा पॉलिसी आजारपणात तुमच्या उपचारासाठी वैद्यकीय खर्च प्रदान करते. एक विश्वासार्ह हेल्थ इन्शुरन्स तुमचे अचानक आलेल्या वैद्यकीय आर्थिक खर्चापासून संरक्षण करते. तुमचे वैद्यकीय बिले चुकते केले जातात व तुमच्या वतीने वैद्यकीय सेवा प्रदात्याला थेट पैसे दिले जातात. सर्वसमावेशक वैद्यकीय विमा रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च, डेकेअर प्रक्रिया, घरी वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका शुल्क इत्यादींचा समावेश यात होऊ शकतो.
तुम्ही स्वत: साठी, तुमच्या जोडीदारासाठी, आणि मुलांसाठी फ्लोटर विम्याच्या आधारावर विमा संरक्षण मिळवू शकता, जे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना संपूर्ण विमा रकमेपर्यंत वैधकीय आर्थिक मदत करते. तुमच्या कुटुंबाच्या गरजेनुसार विम्याच्या योजना सानुकूलित देखील केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी चांगला आरोग्य विमा शोधत असाल तर तुम्ही स्वतः पॉलिसीबझारमध्ये सर्वोत्तम कौटुंबिक आरोग्य विमा योजना शोधू शकता व त्यांची सहज तुलना करू शकता.
नक्की वाचा : Digital Rupee in Marathi
स्टार हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती (star health insurance information in marathi)
आता आपण इन्शुरन्स इंडस्ट्री मधील सर्वात आघाडीची कंपनी स्टार हेल्थ इन्शुरन्स (star health insurance information in marathi) बद्दल माहिती आपल्या सोप्या मराठी भाषेत जाणून घेऊया.
स्टार हेल्थ आणि अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीची स्थापना 2006 साली भारताची पहिली स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी म्हणून झाली. कंपनीचा मुख्य उद्देश कमी खर्चात आरोग्य विमा प्रदान करणे आणि सर्व वर्गातील लोकांना उपलब्ध करणे हा आहे. हि कंपनी प्रत्येकाच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यावर भर देते, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विस्तारित कव्हरेज प्रदान करते. कंपनी आरोग्य, वैयक्तिक अपघात आणि प्रवास विमा व्यवहार करते. कंपनी आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी नेहमीच तत्पर असते.
स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीने लोकांचा विश्वास संपादन करून, ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेसाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. हि गोष्ट त्याचे समर्पण आणि दृढनिश्चय दर्शवते. स्टार हेल्थ इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी किमतीच्या आरोग्य विमा योजना ऑफर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. स्टार हेल्थची देशभरात 14,500 हून अधिक नेटवर्क हॉस्पिटल्स आहेत. कंपनीची 800 हून अधिक शाखा कार्यालये आहेत. 6 लाखांहून अधिक प्रतिनिधींसह, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नंतर सर्वात जास्त विमा प्रतिनिधी असलेली स्टार हेल्थ ही एकमेव कंपनी आहे.
स्टार हेल्थ इन्शुरन्स का खरेदी करायचा?
आजच्या काळात, योग्य आरोग्य विमा योजना ही एक गरज बनली आहे जी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करू शकते. आणि त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
भारतीय विमा बाजारात अनेक आरोग्य विमा कंपन्या उपलब्ध आहेत जी ग्राहकांना अनुकूल आणि परवडणारी विमा उत्पादने देतात. स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी योग्य आरोग्य विमा निवडणे सोपे काम नाही. गरजेच्या वेळी पूर्ण आर्थिक कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी नेटवर्क हॉस्पिटल, मार्केट शेअर, सॉल्व्हन्सी रेशो, क्लेम सपोर्ट इत्यादी अनेक घटक विचारात ठेवले पाहिजे.
हे सर्व घटक लक्षात घेऊन, policybazaar.com वर आम्ही आरोग्य विमा उद्योगात कार्यरत असलेल्या सर्व 29 कंपन्यांची यादी तपासली आहे. आणि त्यात असे आढळले की ग्राहकांना यापैकी स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी चांगले फायदे मिळवून देते.
नक्की वाचा : Mutual Fund information in Marathi
स्टार हेल्थ इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
29 कंपन्यांमधून एका आदर्श कंपनीची निवड करणे काही सोपे काम नव्हते. इन्शुरन्स कंपन्यांमध्ये वाढत असलेली प्रतीस्पर्धा पाहून एक संभावित ग्राहक भ्रमित होऊ शकतो, की सर्वच कंपन्या सारख्याच सुविधा आणि लाभ देतात. पण खरं तर हा भ्रमच असतो व शेवटी ग्राहक कुठलीही चुकीची पोलिसी घेऊन पच्छाताप करतो.
म्हणून त्याआधी इतर पोलिसी च्या तुलनेत स्टार हेल्थ इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत ते पाहून घ्या.
- शाखांची संख्या 650+
- कॅशलेस हॉस्पिटल्स 10,200+
- सॉल्व्हन्सी रेशो (2019-2020) 1.69
- 3 महीन्याच्या आत क्लेम सेटलमेंट (2019-2020) 99.9%
- मार्केट शेअर (2019-2020) 6,718.99 करोड
वरील माहिती सविस्तर समजून घेऊया.
Network Hospitals – नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणजे काय?
नेटवर्क हॉस्पिटल्स अशी हॉस्पिटल्स आहेत, जी स्टार हेल्थ इन्शुरन्सशी करार करून काम करतात. ते पॉलिसीधारकाला नियोजित आणि इर्मजन्सीच्या वेळी हॉस्पिटलायझेशनसाठी कॅशलेस उपचारांसह दर्जेदार आरोग्य सेवा मिळवण्याचा अधिकार देतात. मग जेव्हा तुम्ही कॅशलेस उपचार घेऊ शकता तेव्हा खिशाबाहेरच्या खर्चाची चिंता का करायची?
solvency ratio
कंपनीच्या दीर्घकालीन आर्थिक दायित्वांची पूर्तता करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी, सॉल्व्हेन्सी रेशो तपासावा लागतो. हे करणे आवश्यक आहे. एक आदर्श आरोग्य विमा कंपनी निवडताना, सॉल्व्हन्सी गुणोत्तर हा सर्वोत्तम घटकांपैकी एक आहे.
नक्की वाचा : Top News Websites in India
IRDAI नुसार कंपनीने प्रत्येक आरोग्य विमा कंपनीसाठी 1.5 चे सॉल्व्हेन्सी रेशो ठरवले आहे. या आलेखाच्या मदतीने, आपण असे समजू शकतो की star health insurance ही आर्थिकदृष्ट्या चांगली कंपनी आहे आणि कंपनीकडे ग्राहकांचे दावे भरण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत.
Choose Your Nearest Hospital
https://www.starhealth.in/lookup/hospital/
claim support
जर तुमची आरोग्य विमा कंपनी तुमचे दावे वेळेवर निकाली काढण्यास असमर्थ असेल तर तुमचा आरोग्य विमा खरेदी करणे व्यर्थ आहे. आयआरडीएआय 2019-20 च्या अहवालानुसार, स्टार हेल्थमध्ये 99.9%क्लेम सेटलमेंट रेशो आहे. कंपनी आपल्या ग्राहकांच्या गरजांची काळजी करते हे दाखवते.
market share
वर्षानुवर्षे, स्टार हेल्थच्या शेअर मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. उपलब्ध आरोग्य उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह, कंपनी प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्याचे सुनिश्चित करते. 2019-20 चे IRDAI च्या अहवालानुसार, स्टार हेल्थचा 13% मार्केट शेअर आहे.
स्टार हेल्थ प्लॅनमध्ये कोणते अपवाद आहेत?
स्टार हेल्थ इन्शुरन्सचा काही अपवादात्मक परिस्तिथीत कव्हर मिळणार नाही जसे की,
- ऍडव्हेंचर स्पोर्ट मध्ये भाग घेतल्यास जखमी होणे.
- अमली पदार्थ किंवा दारूचे सेवन केल्यानंतर होणाऱ्या दुर्घटना.
- यौनसंक्रमित रोग जसे HIV आणि एड्स संबंधित आजारपणात कव्हरेज नाही.
- ही पॉलिसी युद्ध संबंधी दाव्यांना कव्हर देत नाही.
स्टार हेल्थ इन्शुरन्सद्वारे ऑफर केलेल्या पॉलिसी
स्टार हेल्थ प्लॅन पॉलिसी | स्टार हेल्थ प्लॅन प्रकार | कुणी खरेदी करावे |
---|---|---|
स्टार कार्डिअएक केअर इन्शुरन्स पॉलिसी | क्रिटिकल इलनेस पॉलिसी स्टार कार्डिअएक केअर पॉलिसी | त्या लोकांसाठी आदर्श आहे ज्यांना हृदयासंबंधी आजाराचा सामना करावा लागतो. |
स्टार कॅन्सर केअर गोल्ड पॉलिसी | क्रिटिकल इलनेस पॉलिसी | ही पॉलिसी कँसर पीडित व्यक्तीसाठी उपयोगी येते. |
स्टार क्रिटीकेअर प्लस इन्शुरन्स पॉलिसी | क्रिटिकल इलनेस पॉलिसी | 9 विशिष्ठ गंभीर आजारांसाठी ही पॉलिसी तयार करण्यात आली आहे. जेनेटिक आजार असलेल्या कुटुंबांनी ही पॉलिसी घेतली पाहिजे. |
स्टार सुपर सरप्लस इन्शुरन्स पॉलिसी | टॉप-अप पॉलिसी | ही पॉलिसी त्याच्या पॉलिसीधारकास विद्यमान कव्हरेज समाप्त होण्याच्या स्थितीत अतिरिक्त कव्हरेज मिळवून देते. |
स्टार नोवेल कोरोना व्हायरस इन्शुरन्स पॉलिसी | कोरोना विशिष्ठ पॉलिसी | हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे जे स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोरोना व्हायरस पासून सुरक्षित ठेऊ इच्छितात. |
कोरोना कवच पॉलिसी | कोरोना विशिष्ठ पॉलिसी | हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे जे स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोरोना व्हायरस पासून सुरक्षित ठेऊ इच्छितात. |
सिनिअर सिटीजन रेड कार्पेट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी | सिनिअर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स | नोकरीवरून सेवानिवृत्त झालेले जेष्ठ नागरिक. |
स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी | फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स | एक परिवार जो स्वस्त प्रीमियमसह एक व्यक्ती व एक फ्लोटर या आधारावर व्यापक कव्हरेजची अपेक्षा ठेवतो. |
आरोग्य संजीवनी पॉलिसी | मानक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी | जी लोकं स्वस्त चिकित्सा पॉलिसीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही पोलिसी सर्वोत्तम आहे |
फॅमिली हेल्थ ऑप्टीमा इन्शुरन्स पॉलिसी | फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स | ही पॉलिसी त्या कुटुंबासाठी आदर्श आहे ज्यांना एकाच विम्याच्या रकमेखाली कव्हर व्हायचे आहे. |
स्टार हॉस्पिटल कॅश इन्शुरन्स पॉलिसी | इंडिविज्युअल हेल्थ इन्शुरन्स | ही पॉलिसी त्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे जे हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान विविध खर्च जसे प्रवास, भोजन इत्यादींचा कव्हर प्रदान करते. |
कोरोना रक्षक पॉलिसी | कोरोना विशिष्ठ पॉलिसी | हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे जे स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोरोना व्हायरस पासून सुरक्षित ठेऊ इच्छितात. |
नक्की वाचा : Share Market Information in Marathi
स्टार हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कसा खरेदी करावा?
स्टार इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे
- स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांच्या विमा योजनांची श्रेणी एक्सप्लोर करण्यासाठी जा.
- तुमचे नाव, वय, संपर्क तपशील आणि आधीपासून अस्तित्वात असलेली कोणतीही वैद्यकीय परिस्थिती यासारखी आवश्यक माहिती द्या.
- उपलब्ध असलेल्या विविध विमा योजनांची तुलना करा आणि तुमच्या गरजा आणि बजेटला अनुकूल असलेली एक निवडा.
- कव्हरेज, अटी आणि शर्ती समजून घेण्यासाठी पॉलिसी दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.
- सुरक्षित पेमेंट गेटवे वापरून प्रीमियमची रक्कम ऑनलाइन भरा.
- या चरणांचे अनुसरण करून, तुम्ही कोणत्याही अनपेक्षित वैद्यकीय खर्चासाठी आवश्यक कव्हरेज असल्याची खात्री करून, तुम्ही सहजपणे स्टार हेल्थ इन्शुरन्स योजना ऑनलाइन खरेदी करू शकता.
Star Health Insurance in India | प्लॅन कसा आणि का घ्यावा? । व्हिडिओ
Disclaimer – सदर लेख हा फक्त मराठी भाषिक लोकांना star health insurance policy ची माहिती सविस्तर आणि सोप्या पद्धतीने त्यांच्या मातृभाषेत व्हावी म्हणून लिहिला गेला आहे. star health insurance policy in marathi अर्थात स्टार हेल्थ इन्शुरन्स बद्दल मराठी भाषेत माहितीस्तव लिहिला आहे. आम्ही किंवा आमचा ब्लॉग प्लॅटफॉर्म star health insurance कंपनीची जाहिरात करत नसून फक्त माहिती पुरविणे याच एका शुद्ध हेतूने हा लेख लिहिला आहे.
star health insurance information in marathi
Motivational Quotes in Marathi
Content Writing Job Career Tips in Marathi