Chhatrapati Shivaji Maharaj Shivgarjana

Shivgarjana Lyrics छत्रपती शिवाजी महाराज: शिवगर्जना घोषणा

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

आज आपण Shivgarjana lyrics Marathi, Chhatrapati Shivaji Maharaj Slogans, Chhatrapati Shivaji Maharaj Shivgarjana पाहणार आहोत. ह्या शिवगर्जना आपल्या शिवभक्तांना नक्की शेअर करा. तसेच तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटस वर सुद्धा नक्की ठेवा.

आजच्या लेखामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही शिवगर्जना पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे जरी नाव कानावर पडले,तरी अंगातील रक्त सळसळते. अंगात जोश येतो, नवीन प्रयत्न करण्याचे सामर्थ्य येते. छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या जगाचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवगर्जना तुम्ही शिवजयंती साठी वापरू शकता.

Chhatrapati Shivaji Maharaj Shivgarjana

आस्ते कदम…. आस्ते कदम….. आस्ते कदम….
महारा ssssssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजा पती
सुवर्णरत्नश्री पती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रि यकुला वतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.!

Shivgarjana lyrics Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Shivgarjana

Chhatrapati Shivaji Maharaj Slogans

छत्रपती शिवाजी महाराज गारद आणि त्याचा सविस्तर अर्थ..

गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असा राजा.

गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल)

भूपती प्रजापती – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे आणि पालन हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.

सुवर्णरत्नश्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवराय हे ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती होते)

अष्टावधानजागृत – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.

अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज. शिवरायांनी राज्य हाकण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते.

न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. महाराज शस्त्राविद्या पारंगत होतेच त्याबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते.

राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज. खऱ्या अर्थाने महाराज राजनीनीधुरंदर होतेच, गनिमी कावा वापरून शत्रूला ठरवण्यात महाराज पटाईत होते.

प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. महाराजांनी अनेक लढाया जिंकत स्वराज्य प्रस्थापित केले होते.

क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.

सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांनी राज्याभिषेक साठी ३२ मण सिंहासन बनवून घेतले होते.

महाराजाधिराज – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.

राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.

Shivgarjana in Marathi Lyrics

इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है|

इन्द्र जिमि जृंभ पर …पवन बारि बाह पर, संभु रति नाह परज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है|

इन्द्र जिमि जृंभ पर …दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है|

इन्द्र जिमि जृंभ पर …तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है

इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है|

Shivgarjana Marathi PDF Download.

मित्रांनो, तुम्हाला जर Shivgarjana Marathi PDF फाईल मध्ये हवी असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून ती पाहू शकता. व तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की send करा.

हे नक्की वाचा:-

Share Market Tips in Marathi | शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!

भारतीय क्रिकेट संघाच्या कपड्यांचा रंग निळाच का असतो?

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *